सव्यसाचि (अंतिम)

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
1 Apr 2010 - 4:29 pm

भाग -१

भाग -२

भाग -३

भाग -४

भाग -५

भाग -६

भाग -७

"कमॉन एग. येवढी चांगली ऑफर तुमच्या रशीयाला कधी वर्ल्ड बँकेनी देखील दिली नसेल ! एकाच वेळी "यु एस, चायना आणी आखाती देशांच्या ऑईल कंपन्यांचा संपुर्ण डाटाबेस घर बसल्या मिळतोय तुम्हाला ! वर एलिट आणी अनटचेबल्स सारख्या ग्रुपसना संपवल्याचे फुकटचे पुण्य वेगळेच; आणी त्याबदल्यात मला फक्त हवय ते रशियन नागरीकत्व, 'केजीबी'ची मदत आणी एफ बी आय पासून संरक्षण....."
---------

चारच दिवसात मी बोस्टनला रवाना झालो. आता खरी लढाई सुरु होणार होती. सगळ्या मोहरा आपापल्या जागी उभ्या होत्या आणी मी फक्त योग्य वेळेची प्रतिक्षा करत होतो.

"डायना मला कॅथ्रीनची गरज आहे, एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी."

"असे कोणते काम आहे जे फक्त तीच करु शकेल??"

"आपले पहिले टार्गेट आहे चायनीज कंपनी 'कोनाट' , आणी तीचा बोस्टन हेड हा सेक्सचा अत्यंत भुकेला माणूस आहे. दिवसातले ६/६ तास डेटिंग साईटवर पोरी शोधणे हा त्याचा आवडता उद्योग आहे. त्याला गळाला लावण्यासाठी कॅथ्रीन सारखी विश्वासु मासळी अजुन कुठे मिळणार ??"

"त्याला जाळ्यात फसवुन आपला काय फायदा पॅपिलॉन ??"

"मला त्याची गरज नाहिये डायना ! मला हवाय त्याचा लॅपटॉप. अलिबाबाची गुहा."

"हे सगळे जमुन आले तरी पण तो तिला भेटायला लॅपटॉप घेउनच येईल ह्याचा भरवसा काय?"

"नाही आला तर जागा फक्त बदलेल. हॉटेल रुमच्या ऐवजी त्याच्या घरातुन लॅपटॉपमधल्या डेटाची चोरी होईल. मी सगळी तयारी ठेवली आहे."

"जिनियस !"

"धन्यावाद. शेवटी चेला...."

अपेक्षेप्रमाणे पाचच दिवसाच्या आत बोस्टन हेड आमच्या गळाला लागला. आणी त्या दिवसापासुन 'कोनाट' आणी तीच्या उपकंपन्यांच्या प्रत्येक आत येणार्‍या आणी बाहेर जाणार्‍या इ-मेल्स, डेटा ह्यावर अनटचेबल्सची अदृष्य नजर रोखली गेली. पहिल्याच झटक्यात मोठे यश मी पदरात पाडून घेतले. आता अधिक वेळ घालवून उपयोग न्हवता...
--------------------

"वॉल्टर मी बोलतोय"

"काय सेवा करु ??"

"सेवा तर मी तुमची करायला फोन केलाय सर."

"ती तर तुला करावीच लागणार आहे, त्यासाठी तर तुला येवढी रक्कम मोजली आहे मी पॅपिलॉन!"

"माझ्या लक्षात आहे सर. पण आज तुम्हाला मी वेगळ्याच कारणासाठी फोन केला होता. तुमच्यासाठी माझ्याकडे एक पार्सल आहे, उम्म्म्म्म अनमोल आहे."

"मला शब्दांचे खेळ आवडत नाहीत पॅपिलॉन !"

"डायना ! हवीये??"

"तु शुद्धीत आहेस ?"

"चांगलाच ! आणी मला बेशुद्ध करेल अशी रक्कम तुम्ही मला ऑफर करत असाल तर तुम्ही बोस्टनमध्ये पाय ठेवल्यापासून ४ तासात मी डायनाला तुमच्या हवाली करायला तयार आहे."

"मी तुझ्यावर का विश्वास ठेवावा पॅपिलॉन ??"

"तुमचा मेल बॉक्स चेक करा, काही छान फोटो पाठवलेत मी. वाट बघतोय....."

काही क्षणाच्या शांततेनंतर अचानक वॉल्टरचा आतुर झालेला स्वर माझ्या कानात शिरला..

"पैसे कुठे पोचवायचे पॅपिलॉन"

"तुमचा एकेकाळचा परम मित्र आणी तत्कालीन मार्क-रॉबिन्सनचा मॅनेजर डेव्हिडच्या खात्यावर"

"यु आर सच बास्टर्ड पॅपिलॉन !! त्याचा तुझा काय संबंध ??"

"माझी सर्वात सुरक्षीत तिजोरी आहे ती. असो... आमच्याकडे एक छान म्हण आहे, "फळ खा, झाडे मोजत बसु नका !"

"मी ज्या कंपन्यांसाठी काम करतोय त्यांना माझ्यासाठी व्हिसा वगैरेची सोय करण्यात निदान २४ तास तरी नक्की लागतील ! साधारण परवा मी बोस्टनमध्ये असेन. येताना मी ब्रुसला देखील नक्की घेउन येईन. माझी अनोखी भेट त्याला नक्की आवडेल."

"मी वाट बघीन वॉल्टर....आणी हो, तु केनच्या संपर्कात आहेस हे आता उघड करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते..."

"गो अहेड !!"
----------

"आज सुट्टीच्या दिवशी अशी अचानक मिटींग बोलावण्याचे कारण ?"

"आपल्यात कोणीतरी एक फितुर असावा अशी डायनाला शंका आहे केन !"

"तु गप्प बसशील ? डायनाला काय ते बोलु दे ."

"केन तु वॉल्टरला कसा काय ओळखतोस??"

"STFU पॅपिलॉन "

"त्याच्यावर ओरडून तुझा गुन्हा लपणार आहे केन ? हि तुझ्या मोबाईलची कॉल हिस्टरी, तुला रोज कमीत कमी दोन वेळा वॉल्टरचे फोन येतात, आणी तेही रात्रीच्या वेळी. कशासाठी सांगु शकशील ?? "

"......."

"तुझा आणी वॉल्टरचा ज्यावेळी दुसर्‍यांदा फोन झाला त्याच्या दुसर्‍याच दिवशी बोस्टन हेडनी त्याचा पासवर्ड चेंज केला. ह्याला योगायोग म्हणायचे का? उत्तर दे केन..."

"ह्या पुढे आपल्याला केनची गरज आहे असे मला वाटत नाही" डायना शांतपणे म्हणाली आणी खोलीतुन बाहेर पडली.

केनचे प्रेत बागेत पुरुन सर्व व्यवस्था निट लावून झोपायला जायला मला आणी डग्लसला रात्रीचे दोन वाजले.
-----------------

"डायना.... सेव्ह मी, प्लिज..."

"कॅथ्रीन.. बेबी काय झालय ? तुझा आवाज असा का येतो आहे ?"

"वॉल्टर आणी ब्रुस बोस्टन मध्ये आलेत ताई. सध्या मी त्यांच्या ताब्यात आहे."

"...."

"हॅलो ब्युटीफुल ! तुझा जुना मित्र ब्रुस बोलतोय."

"कॅथ्रीनला सोडा. तीचा ह्या सगळ्याशी काही संबंध नाहिये."

"नक्की सोडणार ! तु आम्हाला 'युएस' सर्व्हर मध्ये घुसण्याचा रस्ता दाखवलास की आम्ही तीला लगेच सोडणार आहोत. 'हॉटेल हयात' रुम नंबर २८७. 'एकटीच ये' वगैरे सूचना तुला द्यायची गरज नाही, नाही का?"
-----------

"गुड आफ्टरनून ऑफीसर "

"मि. पॅपिलॉन, गुड मॉर्नींग. तुम्ही पाठवलेली भेट माझ्या बायकोला फार आवडली."

"हि तर सुरुवात आहे ऑफीसर माईक. तुम्ही अशीच मैत्री ठेवा, मी तुम्हाला मालामाल करुन टाकीन."

"खरच सांगतो मि. पॅपिलॉन मी ह्या नोकरीला अगदी कंटाळलो आहे. मला ह्या पोलिस दलातून सुटका हवी आहे."

"काळजी करु नका मि. माईक. तुम्हाला लवकरच राजेशाही नोकरी मिळेल असे वचन देतो मी तुम्हाला."

"धन्यवाद पॅपिलॉन. आज संध्याकाळी गुड न्युज देणार्‍या माझ्या फोनची वाट बघा."

"नक्कीच माईक. तुम्ही माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी नक्कीच तडा जाऊ देणार नाही."

"गुड बाय पॅपिलॉन"

"गुड बाय माईक. डाव्या दंडात एक गोळी.... विसरणार नाहीस ना?"
-----------------------

"चिअर्स ! ह्या अनपेक्षीत यशासाठी."

"आणी चिअर्स ह्या यशातील माझी निम्मी भागीदार कॅथ्रीनसाठी देखील."

"आय लव्ह यु पॅपिलॉन, लव्ह यु सो मच. ह्या येणार्‍या पैशात आपण जगातले कुठलेही सुख विकत घेउ शकु."
---------------

"मिस्टर डग्लस.."

"हुकुम करा मालक, एकाच शहरात असुन मला कॉलींग कार्ड वरुन फोन ?"

"सावधगिरी हा प्रत्येक यशाचा पाया असतो हे तुम्हीच शिकवलेत मला मि. डग्लस. माझी प्रवासाची व्यवस्था झाली ?"

"येस सर ! उद्याची संध्याकाळ तुम्ही आणी कॅथ्रीन मॅडम एका नविन भुमीत साजरी करत असाल."

"कॅथ्रीनला मी आधीच वरच्या प्रवासाला पाठवून दिलय."

"कायsss?"

"पैशासाठी जी स्वतःच्या बहिणीला धोका देते, तिच्यावर मी विश्वास ठेवावा असा सल्ला तुम्ही देखील मला दिला नसतात, नाही का गुरुजी?"

"ठरलेल्या ठिकाणी गाडी तुझी वाट बघत असेल पॅपिलॉन. हॅपी जर्नी."

"पार्सल तुमच्या घरी पाठवायची व्यवस्था केलेली आहे. हातात आलेला दोन्ही कडचा डेटाबेस विरुद्ध कंपन्यांना कसा विकायचा हे तुम्ही जाणताच मि. डग्लस. आलेल्या पैशाची तुम्ही योग्य गुंतवणुक कराल अशी मी आशा करतो."
----------------

"प्रत्येक मोठ्या आणी अचानक मिळालेल्या यशामागे एक गुन्हा लपलेला असतो" असे मी कुठल्याश्या कादंबरीत वाचले होते. असेल बॉ... मल तरी काही अनुभव नाही.

सध्या मी दुबईतल्या एका छोट्याश्या कृत्रीम बेटावर छानसा बंगला घेतलाय. माझा सगळा दिवस तिथेच जातो. तिथेच बसुन मी चार देशात केलेल्या माझ्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवुन असतो. मि.डग्लस माझे प्रतिनिधी आणी कायदेशीर सल्लागार म्हणुन काम बघतात. ऑफिसर माईकला मध्ये एका झटापटीत गोळी लागली. त्यानंतर त्याने पोलिसाच्या नोकरीला कायमचाच रामराम ठोकला. सध्या तो माझ्याकडेच काम करतो, माझ्या सिक्युरीटीचा चिफ आहे तो.

तुम्हाला माझा मित्र डेनीस 'द एग' आठवतोय ? त्यानी आता एक छोटीशी सॉफ्टवेअर कंपनी रशियात चालू केली आहे. खुप सुखात आहे तो. पॅपिलॉन नाही पण निदान पॅपिलॉनच्या आई वडीलांना रशियात सुरक्षीत ठेवल्याचे बक्षिस दिलय मी त्याला कंपनीच्या रुपाने.

अरे हो जाता-जाता तुमच्याशी दोन महिन्यापुर्वी पेपरात आलेली एक गंमतीदार बातमी शेअर करीन म्हणतो.

दिनांक १९ मे :- आज शहरातील प्रसिद्ध अशा दोन हॉटेलमध्ये खूनाच्या घटना घडल्या. 'हॉटेल हयात' मधून दोन व्यक्तींचा खून करुन पळून जायच्या प्रयत्नात असलेल्या एका स्त्रीला पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता तीने पोलिसांवरच गोळीबार केला, उलट गोळीबारात हि महिला ठार झाली. मृत झालेल्या तिनहि व्यक्ती ह्या एकेकाळी गाजलेल्या 'एलिट' ह्या हॅकर ग्रुपच्या सर्वेसर्वा असल्याच संशय व्यक्त केला जात आहे.

ह्या हॉटेलपासून जवळच असलेल्या हॉटेल किंग मध्ये एका तरुण महिलेचे प्रेत सापडले असून तिचा विष पाजून खुन करण्यात आला आहे. सदर तरुणीच्या सामानाची व लॅपटॉपची तपासणी केली असता हि तरुणी 'पॅपिलॉन' ह्या नावाने हॅकिंग विश्वात प्रसिद्ध होती असे निदर्शनास आले आहे. वरिल दोन्ही घटनांचा काही परस्परसंबंध आहे का ह्याची शहर पोलिस तपासणी करत आहेत.

(समाप्त)

कथासाहित्यिकतंत्रमौजमजाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

शार्दुल's picture

1 Apr 2010 - 4:56 pm | शार्दुल

मस्त लि़खाण रे प.रा. =D>
नेहा

शानबा५१२'s picture

1 Apr 2010 - 5:06 pm | शानबा५१२

ह्या हॉटेलपासून जवळच असलेल्या हॉटेल किंग मध्ये एका तरुण महिलेचे प्रेत सापडले असून तिचा विष पाजून खुन करण्यात आला आहे. सदर तरुणीच्या सामानाची व लॅपटॉपची तपासणी केली असता हि तरुणी 'पॅपिलॉन' ह्या नावाने हॅकिंग विश्वात प्रसिद्ध होती असे निदर्शनास आले आहे. वरिल दोन्ही घटनांचा काही परस्परसंबंध आहे का ह्याची शहर पोलिस तपासणी करत आहेत.

(समाप्त)
...............हे एवढच वाचल आणि वरच काहीच वाचल नाही ह्याचा आनंद झाला :D

*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****

महेश हतोळकर's picture

1 Apr 2010 - 5:50 pm | महेश हतोळकर

काय लिहीलयस रे! पूर्ण कथामाला कमीतकमी २दा वाचावी लागणार सगळे संदर्भ नीट डोक्यात बसण्यासाठी.

बाकी रसग्रहण वगैरे आपला प्रांत नाही. लीहीत रहा. वाचत रहातो.

प्रमोद देव's picture

1 Apr 2010 - 6:00 pm | प्रमोद देव

मात्र शेवट गुंडाळलेला वाटला.
पराशेठ, तुम्ही भविष्यात महाजालावरचे बाबुराव अर्नाळकर म्हणून नक्कीच प्रसिद्ध व्हाल ह्याबद्दल खात्री आहे.

रेवती's picture

1 Apr 2010 - 7:34 pm | रेवती

चांगले झालीये ही मालिका!
शेवट अजून थोडा विस्तारीत हवा होता असे वाटले पण तरीही कथा आवडली.

रेवती

गोगोल's picture

2 Apr 2010 - 4:06 am | गोगोल

पहिले तीन भाग छान जमले आहेत. मला त्यातले तांत्रीक डिसक्रिपशन आवडले. ज्या हॅकिंग मेथड्स सांगितल्या आहेत त्या पटण्यासारख्या आहेत. विशेषत: शफी आणि पॅपिलॉन यामधले चॅट मेसेजस ज्यामधून पॅपिलॉन शिकतो ते मस्त लिहिल आहे. शिवाय भारत पाकिस्तान हा एक मस्त अँगल जमून आला होता. त्यामुळे पुढील भागात काय होईल त्याची उत्सुकता होती. थोडक्यात कथानकाला एक जबरदस्त पोटेनशियल होत ...

पण .. नंतरचे ४ भाग वाचून पहिले तीन भाग आणि नंतरचे चार भाग लिहिणारा व्यक्ती एकाच आहे का अशी शंका यायला लागली. पॅपिलोन चे जेम्स बॉन्ड करण्याच्या नादात अचाट अतर्क्य आणि खूळचट गोष्टी घुसडून मूळतल्या सशक्त कथानकाची पार वाट लावली. ते भाग वाचून असा वाटायला लगाल की लेखकानी देशी दारूचे घोट घेत, मिथूनाच्या गुंडा चित्रपटाची एक भ्रष्ट नक्कल केली आहे.

मला माहीत आहे की या प्रतिक्रियेवर बाकी लोकांच्या बॅशिंग प्रतिक्रिया येतील. पण मला मनापासून हेच म्हणायाच आहे. एक खूप चांगल्या सुरुवातीनंतर अन्टि क्लायमॅक्स ..

श्रावण मोडक's picture

2 Apr 2010 - 10:46 am | श्रावण मोडक

"पॅपिलोन चे जेम्स बॉन्ड करण्याच्या नादात अचाट अतर्क्य आणि खूळचट गोष्टी घुसडून मूळतल्या सशक्त कथानकाची पार वाट लावली. ते भाग वाचून असा वाटायला लगाल की लेखकानी देशी दारूचे घोट घेत, मिथूनाच्या गुंडा चित्रपटाची एक भ्रष्ट नक्कल केली आहे."

केवळ अनावश्यक. लिहिणारा काय करत लिहितो याच्याशी वाचकाचं काय देणं-घेणं?
शेवटच्या परिच्छेदात म्हणता की तुमच्या या प्रतिसादावर बॅशिंग प्रतिक्रिया येतील. त्या या मांडणीवर आल्या तर त्याचं काहीही वाईट वाटणार नाही. पण या अशा मांडणीमुळं तुमच्या प्रतिसादातील मूळ मुद्यांकडं इतर वाचकांचं आणि खुद्द लेखकाचंही दुर्लक्ष झालं तर तो दोष सर्वस्वी तुमचाच.
हा भाग सोडून उरणाऱ्या तुमच्या प्रतिसादाला +१. अगदी नेमकं लिहिलं आहे.

गोगोल's picture

2 Apr 2010 - 1:48 pm | गोगोल

मान्य आहे की माझी प्रतिक्रिया ओवर द टॉप होती. थोडी ज्यास्तच पॅशॉनेटली लिहिली गेली..पण भावना दुखावायचा हेतू नव्हता...दुर्दैवानी मला ते वाक्य संपादन करता येत नाही.

श्रावण मोडक's picture

2 Apr 2010 - 2:01 pm | श्रावण मोडक

संपादनाची गरज नाही. भावना दुखावण्याचा हेतू नसावा हा माझा कयास होताच. लिहिताना झालेली ती गडबड आहे म्हणून स्पष्ट दाखवली. सॉरीची गरज नाय!!! विषय संपला... :)
तुमच्या या समजूतदारपणालाही दाद!

कानडाऊ योगेशु's picture

2 Apr 2010 - 10:25 pm | कानडाऊ योगेशु

शेवटच्या भागात मलाही कहाणी फसल्यासारखी वाटतेय.

हे म्हणजे सचिन तेंडुलकरने चांगली सुरवात करावी.लागोपाठ ३ चौकार मारावेत आणि हा आता चांगला सेट झालाय असे वाटत असतानाच आऊट व्हावा.तेव्हा स्वतःवर ही आपण चरडफडतो आणि सचिनवरही. :( . मी गोगोलचा त्रागा समजु शकतो.

ह्या भागात पॅपिलॉनने दिलेले कबुलिजबाब ते ही कथेतील दुसर्या पात्रांना... हे पचवायला थोडे जडच जातेय.पॅपिलॉन जसा इतराशी डबलगेम खेळतोय तसेच इतरही खेळत असायला हवे होते.तो अँगल ह्या कथेत सुटलेला दिसतोय.

पण लिखाणाची शैली..संवादातुन कथानक पुढे नेण्याची हातोटी प्रशंसनीय..

कथेमध्ये कादंबरीचे बीज दडलेले आहे.

अवांतर : कुणी सु.शि. "समांतर" ही कादंबरी वाचली आहे काय?

एकदातरी वाचण्याजोगी कादंबरी आहे.टिपिकल सु.शि स्टाईल.ल्व्ह,रोमान्स,सेक्स,सस्पेन्स सर्व काही. ३००+ एक पृष्ठांची कादंबरी असावी ही.

ही कादंबरी आठवण्याचे कारण... "समांतर" वाचल्यानंतर काही वर्षांनी शन्नांच्या लघुकथा वाचत होतो तर त्यात समांतरच्या कथानकाशी तंतोतंत साधर्म्य असणारी एक तीन-चार पानी लघुकथा वाचली.

मूळ कथाबीज तेच..पण सु.शिंनी त्याची ३०० पानी कादंबरी केली.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

सूर्य's picture

2 Apr 2010 - 5:54 am | सूर्य

जबरा लिहीले आहे राव परा. आत्ताच सगळे भाग एकदमच वाचुन काढले.

- सूर्य.

समंजस's picture

2 Apr 2010 - 10:28 am | समंजस

वा!! छान
कथा आवडली :)

अस्मी's picture

2 Apr 2010 - 10:33 am | अस्मी

लय भारी...:) खरंच सगळ नीट कळण्यासाठी दोनदा वाचावी लागेल

=D> =D> =D> =D> =D>

- अस्मिता

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

हर्षद आनंदी's picture

2 Apr 2010 - 4:12 pm | हर्षद आनंदी

सही रे परा

एकदम मस्त!
छान वेग, धक्कातंत्र पन शेवटच्या २ भागात गुंडाळा-गुंडाळी जास्त वाटली.
अजुन २-३ भाग सहज जमले असते.

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

योगेश गाडगीळ's picture

2 Apr 2010 - 5:45 pm | योगेश गाडगीळ

फार अनपेक्षित अंत केला आहेस. जरा अजून वाढवली असतीस तर आणखीन मजा आली असती...........

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्|
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे||

अनिल हटेला's picture

2 Apr 2010 - 10:11 pm | अनिल हटेला

पूर्ण मालीका आवडली..
थोडासा जेम्स बाँड केलायेस पॉपीलॉनचा ,पण हरकत नच्छे....:)

(बंडोबा) चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D

Dipankar's picture

3 Apr 2010 - 6:35 pm | Dipankar

शतकाची अपेक्षा होती पण........

प्राजु's picture

3 Apr 2010 - 7:18 pm | प्राजु

शेवट गुंडाळला.
अपेक्षाभंग!! :(
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/