या नाडीला लिहितो? कोण एक सारखी नसती दोन...
नाडीग्रंथांतील अदभूतता मला सागराच्या धीरगंभीर अथांगपणाच्या, हिमालयाच्या उत्तुंगतेच्या, अमरनाथ गुहेतील रात्रीच्या काळोख्याच्या, खोल दरीत आणखी पुढे जाऊन डोकावताना थरारण्याच्या इंद्रधनुच्या अदृष्य रंगबहाराच्या अनुभूतीप्रमाणे खुणावते.
मालकंसाची लकेर हवेत विरते आहे. संतूरवर शिवरंजनी शहारे आणणारे तरंग धुंद करतेय. बासरीच्या मधुर स्वरांनी वसंत बहारला आहे. शंकरारागातील खर्जातून सुरू झालेला ख्याल नुकताच द्रुत लईशी लडिवाळपणे जुळवुन घेतोय. अशा माहौलातील आनंदाची अनुभूती मला नाडी महर्षींच्या लिखाणातून भासते. महर्षीच्या विराट प्रज्ञाशक्तीच्या लीलेने, त्यांच्या करुणाभावाने ह्रदय भरून येते. आणखी जाणून घ्यायला ललचावते.
एक धागा नाडीचा
शम्भर धागे राशीन्चे
जरतारी हे वस्त्र 'मिपावा' तुझिया आयुष्याचे...
या धाग्याना विणतो कोण ?
एक सारखी नसती दोन!
कुणा न दिसले त्रिखन्डात या बोर्ड टन्कणार्यान्चे !
पुर्वी एकांनी, मला वाटते जागो मोहन प्यारेंनी "एक धागा नाडीचा" असे काव्यात अचुक वर्णन करून नाडी ग्रंथांची महती नकळत गायली होती. त्यावर प्रतिसाद फार नव्हते.
सध्या 'काका' लोक अनेक नव्या मिपावाचकांना नाडीग्रंथांवरील घिशापिट्या पुराण्या-तकलादू संशयांना पुढेकरून नाडी ग्रंथांना दूषणे देणाऱ्या अनेक जुन्या दुव्यांचा 'कडबा' नव्याने चा(वा)यला टाकून, स्वतः अन्य धाग्यांचा 'रवंथ' करायला नामानिराळे होतात.
काहीं मिपाकरांना नाडीग्रंथांतील दिलेल्या मार्गदर्शनाने थरारक प्रेरणा मिळतात पण ते आपल्या अनुभवांचा गवगवा करायला उत्सुक नसतात.
तात्या मंडळींना नाडीच्या आठवणींनी आशिकीचे रोमानी शौक खुणावतात.
मला नाडीग्रंथांतील अदभूतता सागराच्या धीरगंभीर अथांगपणाच्या, हिमालयाच्या उत्तुंगतेच्या, अमरनाथ गुहेतील रात्रीच्या काळोख्याच्या, खोल दरीत आणखी पुढे जाऊन डोकावताना थरारण्याच्या इंद्रधनुच्या अदृष्य रंगबहाराच्या अनुभूतीप्रमाणे खुणावते.
मालकंसाची लकेर हवेत विरते आहे. संतूरवर शिवरंजनी शहारे आणणारे तरंग धुंद करतेय. बासरीच्या मधुर स्वरांनी वसंत बहारला आहे. शंकरारागातील खर्जातून सुरू झालेला ख्याल नुकताच द्रुत लईशी लडिवाळपणे जुळवुन घेतोय. अशा माहौलालातील आनंदाची अनुभूती मला नाडी महर्षींच्या लिखाणातून भासते. महर्षीच्या विराट प्रज्ञाशक्तीच्या लीलेने, त्यांच्या करुणाभावाने ह्रदय भरून येते. आणखी जाणून घ्यायला ललचावते....
गायनाची अशी महफिल सजलेली असताना कोणी उगाचच टाळी वाजवून, अधोवायूचा ढुंमकार काढून रसभंग करावा असा कधी कधी विरस होते. मग वाटते आपलेच मिपाकर आहेत. थोडे वात्रट. काहीसे खट्याळ. मधेच बोचरे. आवेशाने लिहितात पण तात्कालिक उत्साहानंतर थंडावतात. चालायचेच.
माझ्या रखडत टंकण करून पाठवलेल्या लिखाणाला वाचक आहेत. हे ही नसे थोडके... असो...
मोहनप्यारे म्हणतात...
...विन्ग कमान्डर महोदय, ..... भरकटलेली ही चर्चाच काय हल्ली विमाने, हेलिकॉप्टर्स आणि रॉकेट्स सुद्धा भरकटतात...
एक शन्का आहे.... शशिकान्त नावाची हजारो माणसे असणार....... नेमका हाच तो हे पट्टी बघून कसे कळते?
लग्न झाले, दुसरे लग्न झाले, धर्म बदलला, गम्मत म्हणून बदलले अशा कारणानी जर नाव बदलले तर नेमके कुठले नाव बघतात ? एखादा माणूस नन्तर नाव बदलणार असेल तर तेही आधीच्या पट्टीत दिसायला हवे.. ते दिसते का ?
सांगाना?
--------------
सांगतो....
"या धाग्यांच्या नाडीला लिहितो? कोण एक सारखी नसती दोन" ... खरे आहे.
'शशिकांत' नावाचे अनेक लोक असणार त्यापैकी ती पट्टी माझीच कशावरून ठरणार? असे न होण्यासाठी पट्टीत व्यक्तीच्या आई-वडिलांची नावे, पति वा पत्नीचे नावे, जन्मदिनांक, जन्मकालाची ग्रहपरिस्थिती, शिक्षण व सध्याची नोकरी वा व्यवसायाची माहिती भावा-बहिणींची, अपत्यांची संख्या असे अनेक दुवे त्यापट्टीत लिहिलेले असतात. त्यासर्वांवरून विशिष्ठ ताडपट्टी आपली आहे किंवा नाही याचा पडताळा घेता येतो.
म्हणून तुम्ही म्हणता तसे या नाडीपट्टीला आपल्या जन्माच्याही आधीपासून लिहितो कोण? असा प्रश्न पडतो खरा. असो.
मात्र या अनुभवायच्या गोष्टी आहेत. मी किती सांगितले तरी त्या थापाच वाटणार, कोणाचाही विश्वास बसणार नाही, जसा माझाही एके काळी नव्हता.
मासला म्हणून मी फक्त माझ्या नावाचा उल्लेख असलेला भाग पुरावा म्हणून येथे सादर केला होता. आता चिकित्सा करणाऱ्यांनी आपापल्या पट्टीचा शोध घेताना त्यात अशीच माहिती कुठे व कशी लिहिलेली आहे ते दाखवण्यास नाड़ीवाचकाला सांगितले तर तो ते नाडपट्टीतून व त्या शिवाय दिल्या जाणाऱ्या वही,कॅसेट मधून शोधता येते. आता इतका पुरावा आपण न मागता दिला जातो. त्याची चिकित्सा करणे आपल्या हातात आहे.
---------
नाडी केंद्रात ताडपट्टी फुकट बघितली जात नाही.
नाडीग्रंथातील विवक्षित पट्टी ग्राहकाने त्यातील माहिती 100 टक्के बरोबर आहे असे समाधानाने म्हटले की मग त्या ताडपट्टीतील मजकून सावकाशपणे वाचून वही उतरवला जातो. हे काम बऱ्याचदा केंद्राची जागा अपुरी असेल तर ग्राहकासमोरच केले जाते. त्यामुळे ज्या पट्टीतून माहिती जुळली त्याच पट्टीतील मजकूर वहीत उतरवला जात आहे किंवा नाही याची खात्री आपणांस आपसुकच घडते. त्यानंतर त्या त्या केंद्राने ठरवलेली बिदागी ते पुजारूम मधील थाळीत ठेवायला सांगतात. त्याआधी फी पट्टी सापडली नाही तरी आगाऊ घेतली जात नाही. अनेकदा त्या केंद्रातील पट्ट्यांचा साठा संपूनही एखाद्याची विशिष्ठ पट्टी सापडली नाही तर त्याला नंतर काही काळानंतर बोलावले जाते. त्यामधेही त्याची पट्टी खात्रीने सापडेलच अशी हमी नाडी केंद्रवाले देऊ शकत नाहीत.
------
ओकसाहेब ही चक्क माघार झाली हो.
मी आपले भविष्य पहा असा सल्ला दिला. मी आपल्यासारख्यांना बरोबर नेतो वा नाडीच्या खरेपणाचा अनुभव आणण्यासाठी पुढाकार घेतो असा मी दावा कुठे होता म्हणून मी माघार घेतली? उलट मी अनेकदा आपापले अनुभव घ्या व बोला असे सुचवत आहे. त्यासाठी आपणांस पुढाकार घेणे अपेक्षित आहे. आता इतके झाल्यावरही आपण वा अन्य किती लोक खरोखर जातील कोणास ठाऊक. ते पाहून आल्यावर आपल्या पट्टीतील माहितीची वही व कॅसेट आणि फोटोसह केलेली चिकित्सा आम्हाला वाचायला आवडेल. मात्र नाडी केंद्रावाल्यांचा खोटेपणा उघडा करण्याच्या नादात पुर्वग्रहामुळे आपण आपल्याला सचोटीपासून ढळू देऊ नये ही विनंती.
प्रतिक्रिया
14 Mar 2010 - 1:08 am | Nile
काय थोतांड आहे तिच्यायला!
समजा मी लग्न केले आणि माझा पहिल्या अपत्याची नाडी पहायला गेलो. तर सापडेल का? तिथे त्याच्या भावा बहिणीची माहिती असेल का? (असेल असे मानले तर)च्यायला मी दुसरा अपत्याला जन्मच द्यायचा नाही असे ठरवले तर काय तुमची नाडी जन्माला घालणार का?
अविवाहीताने जर नाडी पाहिली,तर त्याच्या नाडीत भावी पत्नीचे नाव असते का? अपत्यांची नावं असतात का? ब्रह्मचार्याच्या नाडीत कुणाकुणाची ननावे असतात?
गजानन कुळकर्णी, आइ लक्ष्मी कुळकर्णी आणी वडील विठ्ठल कुळकर्णी अशी पन्नास एक काँबीनेशन्स तर नक्की सापडतील (काही वर्षापुर्वी त्यात गजाननबुवा बॅंकेत अशीही अनेक काँबीनेशन्स असतीलच)
आणि तुमच्या नाडीत एचडीएफसी बॅंकेत नोकरी वगैरे पण माहीती असते का? न्यु यॉर्क स्टॉक एक्सेंजमध्ये कीती गुंतवणुक करणार हे ही असेलच!
एकविसाव्या शतकात काय हे फालतु पालुपद लावुन ठेवलंय च्यामारी.
14 Mar 2010 - 1:27 am | शुचि
मला तर माझं भविष्य पाहण्यातच स्वारस्य नाहीये ..... कशाला घाई करायची ..... मस्त सस्पेन्स अनुभवायचा सोडून.
***********************************
हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.
14 Mar 2010 - 8:18 am | विसोबा खेचर
ओकसाहेब, आपण साला फ्यॅन आहे तुमचा हे पुन्हा एकदा कबूल करतो..माझ्यासकट सार्या नाडीविरोधकांना भांचोत पार जेरीस आणलंत तुम्ही, नामोहरम केलंत! नाडीदेवींचा पुन्हा एकदा विजय असो..! :)
क्या बात है..सुंदर वाक्य. आपली दाद स्विकारा ओकसाहेब!
ओकसाहेब, इथे हमीर किंवा गौडसारंग हवा. 'लकेर' हा शब्द अश्या हलक्याफुलक्या रागांकरता अधिक शोभून दिसतो..
चालेल..
हेही चालेल.. बसंतच्या ऐवजी मधुवंती/यमनही चालतील..
मिष्टेक ओकसाहेब.. शंकरा हा मुळातच उत्तरांगप्रधान आहे. त्यात खर्ज गायकीला फारसं महत्व नाही.. खर्ज हा शब्द वापरताय मग तिथे आमचा पुरिया किंवा दरबारीच हवा! असो..
=))
आपला,
(गाण्याबजावण्यातला) तात्या.
14 Mar 2010 - 8:33 am | Nile
अरे काय हा अवांतर प्रतिसाद! मुळ धागा नाडी बद्दल आहे त्याबद्द्ल बोला की.
14 Mar 2010 - 8:36 am | विसोबा खेचर
अवांतर नाही. मूळ लेखात जी वाक्य आहेत त्यांबद्दलच लिहिले आहे..
तात्या.
15 Mar 2010 - 2:58 am | अर्धवटराव
तात्या, तुम्ही लिहीलेले असले काही वाचले की मला माझ्या सांगीतीक दारिद्र्याची जाणीव अधीक प्रकर्षाने होते. यातलं १% जरी मला कळलं तरी माझी श्रीमंती १००% नी वाढेल. म्हणजे कसं होतं की आपल्याला भूक जाणवतेय... छान साजूक तूपात बनवलेल्या लाडवांचा गोड गोड वास पण येतोय... तुमच्या सारखा खवय्या चवीनी खात खात रसभरीत वर्णन पण करतोय... आणी मी फक्त लाळ गाळतोय :(
तूमच्या तपश्चर्येला, (या बबतीत) नशीबाला आणि श्रद्धेला सलाम !!
(कफल्लक) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
15 Mar 2010 - 8:22 am | विसोबा खेचर
अहो साहेब, उगाच कशाला स्वत:ला 'सांगितिक दरीद्री' वगैरे म्हणवून घेता? संगीतातल्या/रागदारीतल्या काही तांत्रिक गोष्टी, रागांची नावं, स्वर, इत्यादी नसतीलही तुम्हाला कळत.. पण त्यानं काय फरक पडतो? संगीत कळण्यापेक्षा संगीत आवडणे हे अधिक महत्वाचं.. तुम्हाला संगीत श्रवणातून आनंद मिळतो आहे ना? मग तुम्हीही श्रीमंतच! :)
तात्या.
16 Mar 2010 - 12:50 am | अर्धवटराव
हो !! संगीत फार फार आवडतं... पण कसं.. की ´ती´ खूप सुंदर दिसते, गोड हसते... पण तिच्या अदा आपल्याला काही कळत नाही... मग दील से दील मिळत नाही... मीलन अधुरं राहातं... पु. लं. च्या भाषेत सांगायचं तर, आयुष्याला जीवन बनवणारं अस काहीतरी तिच्यापाशी आहे... आणी मी उपाशी आहे...
(प्यासा) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
15 Mar 2010 - 9:33 am | तुका म्हणे
लकेर हा शब्द जर तान या अर्थी घेतला तर कुठलाही राग चालू शकेल नाही का? हलका फुलकाच का? चू. भू. दे. घे.
आपला,
(गाण्याबजावण्यात रस असलेला) तुक्या
14 Mar 2010 - 8:43 am | टारझन
समवन सेड ... इफ यु कान्ट अवॉईड द रेप ... देन जस्ट रिलॅक्स अँड एन्जॉय इट :) लेखक हल्ली फार रिलॅक्स होऊन एन्जॉय करत करत लेख पाडतांना दिसतात :)
नाडी केंद्रात बकरे पकडुन आणण्याचे कमिशन भेटतं काय ?
-(पोपट्,हस्तरेषा,नाडी किंवा पत्रिकेपेक्षा आमच्या जगन्नाथावर अंमळ विष्वास असलेला) चिंताक्रांत लोक
14 Mar 2010 - 10:11 pm | प्रकाश घाटपांडे
टार्या ते मिशन असतय काहि लोकांसाठी. कमिशन असत ते परिहारकांडम नावाच्या प्रकारात. म्हण्जे खरी कमाई तिथे असते.काही लोक काडीकाडी जमवुन पैसा उभा करतात तर काही नाडीनाडी जमवुन! ;)
नशा केवळ ताडीने येत नाही
नशा केवळ माडीने येत नाही
नशा ही नाडीने येते
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
14 Mar 2010 - 9:41 am | विजुभाऊ
टारुलियाजी
एखाद्या गोष्टीला अनुल्लेखाने मारणे हा शब्द प्रयोग ठाऊक आहे ना.
शंका : चिंताक्रान्त लोक्.....तुम्ही कधीपासून चिंता करु लागलात? आणि कशाची?
14 Mar 2010 - 9:44 pm | नावातकायआहे
>>समवन सेड ... इफ यु कान्ट अवॉईड द रेप ... देन जस्ट रिलॅक्स अँड एन्जॉय ....
आईच्य्या गावात........हा बलात्कार नाही तो तरी केन्व्हातरी संपतो ...हा न संपणारा मानसीक छळ आहे ~X(
आरे ह्यांना कुणी तरी आवरा रे.....साले टेली मार्केटिन्ग वाले परवडले.....
अवांतरः आता मालकांनाच खिश्यात टाकल्यावर तक्रार तरी कुणाकडे करायची? :T
ईल्यास्टिक वाला
14 Mar 2010 - 9:58 pm | अनामिक
नाडीग्रंथांतील अदभूतता मला सागराच्या धीरगंभीर अथांगपणाच्या, हिमालयाच्या उत्तुंगतेच्या, अमरनाथ गुहेतील रात्रीच्या काळोख्याच्या, खोल दरीत आणखी पुढे जाऊन डोकावताना थरारण्याच्या इंद्रधनुच्या अदृष्य रंगबहाराच्या अनुभूतीप्रमाणे खुणावते.
वरची वाक्ये वाचून 'जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ' आठवला.
बाकी वर नायल्याने विचारलेले प्रश्न मलाही पडलेत... उत्तर मिळणार नाही हे माहीतच आहे.
-अनामिक
15 Mar 2010 - 1:14 am | राघव
हद्द आहे बुवा. आपण तर वाचून वाचूनच थकलो.
ओकसाहेब,
अहो भविष्य जाणणं, ते जाणून देण्यास मदत करणं.. हे काय जीवनाचं प्रयोजन बनलंय का काय? बरेच जण भविष्य जाणण्याचा दावा करतात. खरेही धरून चालू एकवेळ. त्यामुळे कुणी भारावूनही जाईल. तेही एकवेळ मान्य करू. पण त्यापुढे काय?
भविष्य जाणून घेतले. बास. खुष अथवा नाखुष. अहो पण त्याचा उपयोग काय मुळात? हे करणे म्हणजे आपल्या जगण्यातला अमूल्य वेळ वाया घालवणे नाही का? इतर अनेक सर्जनशील गोष्टी करणे शक्य असतांना काय हे घेऊन बसलात? तुमचे किंवा इतर कुणाचेही भविष्य तुम्ही किंवा दुसर्याने जाणून घेतल्याने तुमची किंवा कुणाचीही काही उन्नती घडली का? घडेल का?
एखाद्या गोष्टीला वाहून घेणे चांगले पण त्यासाठी काही योग्य प्रयोजन नको का?
हे सर्व थोतांड आहे अथवा नाही हा वादसुद्धा निरर्थक आहे, असे खरोखर तुमच्या विवेकबुद्धीला पटत नाही का?
(तुम्हाला मनापासून समजावून सांगण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणारा) राघव
15 Mar 2010 - 8:34 am | तुका म्हणे
मला एक कळत नाही, "नाडी शास्त्र किती बरोबर" हे सांगण्याचा आटापिटा का?
तुम्हाला वाटतो न विश्वास, मग तुम्हाला कुणाच्या पावतीची गरज नाही आणि कुणी किती नाव ठेवताहेत याची चिंता नको.
व्यक्तिगत श्रद्धेला सार्वजनीक करूच नये. केलंच तर, लोकांच्या सर्व प्रकारच्या प्रतिक्रियेला तयार असावा आणि त्यांचा आदर करावा.
श्रद्धेत वाद विवाद होऊच शकत नाही कारण ती व्यक्ती सापेक्ष आहे. तुम्ही तिला विज्ञानाच्या कक्षेत आणा, मग वाद विवाद होऊ शकतात.
नाडी शास्त्र हा श्रद्धेचा भाग आहे आणि त्याला प्रचाराची जोड नको.
माझ अस मत आहे:
जेव्हा एखाद्या गोष्टीला प्रचाराची जोड असते, तेव्हा त्यात स्वार्थ निगडीत असतो. (तो स्वार्थ कुठल्याही प्रकारचा असू शकतो)
जर तुमचा त्या गोष्टी वर प्रामाणिक विश्वास आहे, तर तुम्हाला प्रचाराची गरज नाही, तुम्ही स्वानंदात आणि स्वानुभवात रममाण असा.
15 Mar 2010 - 8:39 am | विसोबा खेचर
स्वगत : नाईल, राघव, तुका म्हणे वगैरे मंडळींना शश्या ओकने पार दमवलंन! =))
तात्या.
15 Mar 2010 - 8:56 am | Nile
आम्ही कशाला दमतोय? तुमचे ओक गेले पळुन. पुढच्या महिन्यात येउन उत्तरे देतील, काय उपयोग?
15 Mar 2010 - 10:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नायल्या, सोड रे तू! तुला काही अवांतर प्रतिसादांमधून सूट मिळणार नाही आहे.
अदिती
15 Mar 2010 - 10:24 am | तुका म्हणे
तसा काही नाही तात्या,
मुळात मला असा वाटत कि ओकसाहेब त्यांच्या श्रद्धेबद्दल प्रामाणिक आहेत.
फ़क़्त त्याचा (ती एक श्रद्धा असल्या कारणाने) सार्वजनिक उहापोह व्हावा, हे मला पटत नाही.
कारण त्यात मना दुखावण्याचा संभाव होतो, कारण विरुद्ध बाजूचे लोक देखील त्यांच्या श्रद्धे बद्दल प्रामाणिक असतात.