बतावणी!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
12 Mar 2010 - 12:54 am

(स्थळ - क्षीरसागर, विष्णूंचा महाल.
एका कोचावर गरुड लॅपटॉपवर 'मिपा मिपा' खेळतोय!
टीपॉयवर काही आध्यात्मिक ग्रंथ पसरुन ठेवलेत.)

(आतल्या खोलीतून) लक्ष्मी : अहो! अहोऽऽ!!
लगबगीनं बाहेर येत : आँ..कुठे कडमडले हे आता?
(गरुडाकडे पहात) : ए चोच्या, कुठैत रे हे?

अं...आँ....कोण कुठे?

अरे अं आँ काय? हे कुठे गेलेत आत्ता सकाळी सकाळी विचारतेय मी?

हां हां ते होय, ते मगाशीच बाहेर पडले! जाताना काही सांगितलं नाही पण 'मानससरोवर' असं काहीतरी पुटपुटत होते!

मानससरोवर?? इतक्या लांब आणि तुला न घेता कसे गेले?

मला काय माहीत? मी नेऊ का विचारलं तर फक्त हातानेच नको अशी खूण केली!

(कानाशी आयफोन लावत) लक्ष्मी : छ्या..मोबाईलही ऑफ करुन ठेवलाय!! मेसेजवर जातोय!!! कसं शोधायचं आता कोण जाणे? काही शिस्तच राहिली नाहीये! जाऊ दे मेलं, मी आता नाष्टा करुन घेते नाहीतर आणखीन कलकलतं मग!! (आत जाते)

नारद (महालात प्रवेश करत) : नारायण! नाऽरायण!!

गरुड : या या मुनिवर! आज सकाळीच येणं?

लक्ष्मी लगबगीनं बाहेर येत (हातात धिरड्याची प्लेट) : यावं मुनिवर. आसन ग्रहण करा आणि मग हे धिरडंही!

नारद (काऊचवर बसत) : वा वा! देवी, आपण भलत्याच सुग्रण आहात, काय खमंग वास सुटलाय धिरड्याचा! वा!!

(धिरडं खात) नारद : कुठे आहेत तुमचे हे?

लक्ष्मी : अहो काय सांगू मुनिवर? सकाळपासूनच गायब झालेत! हा गरुड म्हणतोय की 'मानससरोवर' असं काहीतरी म्हणत गेले म्हणे!

नारद : हंम्म्म्. हे अंमळ भलतंच काहीतरी! आत्ता यावेळी तिकडे?
(नारद अजून एक धिरडं चापतात आणि वरती फक्कड चहाही हाणतात!)
आहा! आता कसं पोट छान भरलं बघा देवी. काल भूलोकावर फारच चालणं झालं होतं, आणि भूकही अंमळ जास्तच लागते आजकाल!
चला आता निघावे म्हणतो. हे घरी आले की कळवा.

लक्ष्मी : हो हो नक्कीच कळवेन. फोनवर भेटला नाहीत तर व्यनि तरी नक्कीच टाकेन!

नारद : हो हो व्यनिच करा. खरडींचा काय भरोसा, त्या 'बिका'ट वाटेने 'परा'गंदा होतात लगेच!

(एवढ्यात विष्णू महालात प्रवेश करतात)

लक्ष्मी (पुढे होत) : अग्गोबाई!! आलात? या, तुमचीच वाट बघत होते हो सगळे!! कुठे नाहीसे झाला होतात?

विष्णू : सांगतो, सांगतो!! आधी मला एक चहा आण आणि थोडं खायला सुद्धा!!

(लक्ष्मी आणते म्हणत आत जाते.)

विष्णू : हुश्य्.....दमलो बुवा! हं .....बोला मुनिवर कसं काय येणं केलंत?

नारद : काही नाही सहजच आलो होतो बरेच दिवसात आपलं दर्शन नव्हतं!

(लक्ष्मी बाहेर येत धिरडं आणि चहा टीपॉयवर ठेवते. विष्णू सगळं झटपट संपवतात आणि उपरण्याला हात, तोंड पुसतात!)

विष्णू (लोडाला टेकत): तर मी सकाळीच कुठे गेलो असा तुमचा प्रश्न आहे! ती एक समस्याच होती.

??

विष्णू : त्याचं काय झालं काल मी भूलोकावर हिंडत असताना अचानक दुर्वास ऋषी सामोरे आले. त्यांच्या चरख्यावर त्यांनी एक दोन इंची मिळमिळीत धागा काढला होता!
मी विचारता झालो की "तुम्ही इतके सुंदर धागे ह्यापूर्वी कातलेले असताना असला धागा कातण्याचे प्रयोजन काय?"
तर माझ्यावर कोपिष्ट होत गरजले "देवा, तुमच्यासारख्यानंही पक्षपाती व्हावं ना? इकडे स्पष्टवक्तेपणाचा आव आणताय तिकडे लोक प्रक्षोभक धाग्यामागून धागे उसवताहेत, तुमचं लक्ष नाही आणि माझ्या निरुपद्रवी धाग्यावर तुमचा आक्षेप??"
मी म्हणालो "समजलं नाही मुनिवर! काही उदाहरण देऊ शकाल का? चूक झाली असेल तर अवश्य दुरुस्त करेन!"
तेव्हा छद्मी हसत गरजले "आत्मपरीक्षण करा देवा! तुमचं तुम्हालाच सापडेल!"
तेव्हापासून जो भंजाळलोय मी तो आत्तापर्यंत!
अहो तुम्हाला सांगतो देवर्षी, रात्रभर तळमळतोय, डोळ्याला डोळा नाही!
ही, ही बघा, ही सगळी पुस्तकं दिसताहेत ना? सगळी चाळली हो, पण शिंचं कोणी आत्मपरीक्षण कसं करावं त्याबद्दल बोलतंच नाही.
गूगलवर 'आत्मपरीक्षण' असा सर्च दिला तर भलभलत्याच साईट्स उघडल्या! :(
शेवटी वैतागून सक्काळी मानससरोवराच्या काठी जाण्यासाठी निघालो, म्हटलं त्या शांततेत तरी काही सुचेल पण नाही जातानाच एवढा ट्रॅफिक जाम की काही विचारु नका!
आणि तिथे सरोवराकाठी सुद्धा एक चमत्कारिक दृश्य दिसलं हो माझ्यासारखेच साताठजण विमनस्क चेहेर्‍याने तिथे हिंडत होते एकाला विचारलं तर म्हणाला "दुर्वास भेटले होते आणि आत्मपरीक्षणाबद्दलच सांगितलं!" तिथे झाडावरही काही मंडळी दबा धरुन बसली होती मज्जा बघायला बसल्यासारखी (त्यातला एकजण जाम उचकवत होता बाकीच्यांना, स्वर्गाच्या पश्चिम भागातला असावा असा संशय आहे.)
तिथे बराच वेळ डोळे बंद करुन बसलो तळ्याकाठी पण मग काही अप्सरा जलक्रीडेसाठी उतरल्या पाण्यात मग लक्ष लागेना, सारखे डोळे किलकिले व्हायला लागले!!
मग आलो परत बापडा.
(लक्ष्मी डोळे मोठे करुन) : हंम्म्म्म्म (एवढंच करते)

नारद (मोठ्यानेहसत) : हा हा हा हा!! अहो इतकंच ना मला एक एसेमेस केला असतात तर चुटकीसरशी सोडवला असता प्रॉब्लेम तुमचा!!!

विष्णू : आँ काय सांगताय काय?

नारद : मग! चला आत्ता लगेच निघूया.

विष्णू : कुठे?

नारद : आत्मपरीक्षणाला! दुसरीकडे कुठे?
(चला दोघेही निघतात)

लक्ष्मी : अहो पण मुनिवर येणार कधी तुम्ही?

नारद : आमची वाट नका बघू देवी अंमळ वेळ लागेल!

(महालातून बाहेर पडतात)

विष्णू : अहो पण मुनिवर निघालोय कुठे आपण!

नारद : देवा, अहो कसलं डोंबलाचं आत्मपरीक्षण हो! बशीभर काजू, एक तळलेल्या पापलेटने भरलेली डिश आणि फक्कडसा सोमरसाचा प्याला, बास सुरु आत्मपरीक्षण!!

विष्णू : आँ!!!!! मुनिवर ??!!...

नारद (डोळे मिचकावत) : चला, चला, लवकर चला! 'पूनम' झिंदाबाद!! आत्मपरीक्षण झिंदाबाद!!!

-चतुरंग

औषधोपचारविनोदजीवनमानविचारसद्भावनाआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रभो's picture

12 Mar 2010 - 6:26 am | प्रभो

हॅहॅहॅहॅ.....काय जबहरा मुलुखमैदानी तोफ चालवलीय....

_/\_...

=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))

एका दगडात दोन पक्षी मारलेत. आत्मपरिक्षण ही केलं आणी बायकोला सुगरण सांगून खुश पण करून टाकलं.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

शेखर's picture

12 Mar 2010 - 3:02 am | शेखर

भन्नाट रंगाशेट....
जबरा लिवलय.... कामाचा लोड विभागल्या गेल्या मुळे लेखणीला पण धार चढली आहे...

एक शंका: साताठजण विमनस्क चेहेर्‍याचे लोक पण पदधारक होते का? ;)

सुमीत भातखंडे's picture

12 Mar 2010 - 3:05 am | सुमीत भातखंडे

=)) =)) =)) =)) =))
एक नंबर.

Nile's picture

12 Mar 2010 - 3:05 am | Nile

विष्णुचं काय खरं नाय आता, दुर्वासाने सेटींग करुन लक्ष्मीलाच धाडलं ऑनसाइट जोडीनं. आता आत्मपरिक्षण नाही झालं तरी परिक्षण नक्की! ;)

शुचि's picture

12 Mar 2010 - 3:12 am | शुचि

मनातील तरंग छान उमटले आहेत रुपकाच्या रुपाने. आवडलं. संतुलीत आणि संयमीत म्हणून कौतुकास्पद.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

इंटरनेटस्नेही's picture

12 Mar 2010 - 4:45 am | इंटरनेटस्नेही

लैई झ्याक लिवल हाय, चालु ठेवा बर का...

नंदन's picture

12 Mar 2010 - 4:52 am | नंदन

=)) =))

>>> तेव्हा छद्मी हसत गरजले "आत्मपरीक्षण करा देवा! तुमचं तुम्हालाच सापडेल!"
--- तथास्तु राहिलंच की ;)

>>> नारद (काऊचवर बसत) : वा वा! देवी, आपण भलत्याच सुग्रण आहात, काय खमंग वास सुटलाय धिरड्याचा! वा!!
--- सूतोवाच, सूतोवाच म्हणतात ते हेच असावे काय? :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

हर्षद आनंदी's picture

12 Mar 2010 - 6:12 am | हर्षद आनंदी

सकाळ फ्रेश झाली.. मस्त खुसखुशीत धागा!!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

देवा, अहो कसलं डोंबलाचं आत्मपरीक्षण हो! बशीभर काजू, एक तळलेल्या पापलेटने भरलेली डिश आणि फक्कडसा सोमरसाचा प्याला, बास सुरु आत्मपरीक्षण!!

लय भारी...

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

प्राजु's picture

12 Mar 2010 - 6:15 am | प्राजु

हम्म!! टोलेबाजी चालू आहे तर!!
लक्ष्मी बाई, कामाचा ताण फार नका हो घेऊ, विष्णूंना लगेच रिकामा वेळ मिळतो आणि मग टोलेबाजी चालू होते. ;)

आवांतर : जे लिहिले आहे ते हुच्च!!

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

सन्जोप राव's picture

12 Mar 2010 - 6:34 am | सन्जोप राव

बेष्टराव शेणोलीकर!
(त्यातला एकजण जाम उचकवत होता बाकीच्यांना, स्वर्गाच्या पश्चिम भागातला असावा असा संशय आहे.)
कोण हो तो? काही टोटल लागेना बघा!
सन्जोप राव
आये गये मंजिकों के निशां
लहराके झूमा झुका आसमां
लेकिन रुकेगा न ये कारवां
मुड मुड के ना देख मुडमुडके

पाषाणभेद's picture

12 Mar 2010 - 7:05 am | पाषाणभेद

बतावणी झाली आता गण अन गौळण कुठाय?
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

प्रमोद देव's picture

12 Mar 2010 - 7:57 am | प्रमोद देव

वा! विष्णुपंत,वा!
दंडवत आपल्याला. शेवटी किती झालं तरी आपण पालनहार आहात पृथ्वीचे...आपलं मिपासृष्टीचे. ;) त्या दुर्वासांकडे दूर्लक्ष करा हो.वय झालं आता त्यांचं.
कुणी तरी म्हणून गेलंय ना...ऐसी छोटी-बडी घटनायें होती ही रहती है...
आता तुमच्या जोडीला लक्ष्मीबाईही आहेत. तेव्हा जरा जपून बरं का. तुम्हाला आत्मशोध जमला नाही तरी लक्ष्मीबाई जाणून आहेत तुम्हाला पूरेपूर.
तथास्तु!

खुदके साथ बाता: हा सुत्रधार देखिल भलता डामरट दिसतोय..परस्पर काट्याने काटा काढतोय..डायरेक्ट घरातच निरीक्षक बसवलाय बोडक्यावर.

मुक्तसुनीत's picture

12 Mar 2010 - 8:12 am | मुक्तसुनीत

रंगराव , लय भारी काम !

मेघवेडा's picture

12 Mar 2010 - 3:22 pm | मेघवेडा

एका कोचावर गरुड लॅपटॉपवर 'मिपा मिपा' खेळतोय!
ए चोच्या, कुठैत रे हे?

पहिल्या दोन वाक्यांतच जिंकलंत!!! अक्षरशः डोळ्यांसमोर चित्र उभं राहिलं .. गरूड.. लॅप्टॉपवर मिपा उघडलंय!! आणि एखादा टार्‍याचा लेख वाचतोय!! आणि मागून लक्ष्मी हाक मारतेय.. "ए.. चोच्या!!!!"
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))

हहपुवा!

विष्णुपंत, लेख एकदम झक्कास्स!! मस्त लिहिलंय!!

-- (गरूडाला हसताना बघून गोंधळलेला) शे. ष. नाग

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

स्वाती दिनेश's picture

12 Mar 2010 - 3:28 pm | स्वाती दिनेश

लई भारी फटकेबाजी...
स्वाती

टारझन's picture

12 Mar 2010 - 3:43 pm | टारझन

तुफाआआआआआआआआन !! =)) =)) =)) =)) =))
स्वर्गलोकाच्या डावीकडच्या काका देवांना मात्र स्वर्गाच्या पश्चिमेकडच्या देशांतील व्यंगचित्रांचा फार मोठा व्यासंग .. वर त्यांवर शिलालेख लिहीण्याचा अजुन मोठा व्यासंग !!

भां$$$ बा$$$$ .... ब्रम्हदेवा मुळे होतं हे सगळं ... आता ह्याला इनबिल्टंच चार आहेत .. म्हणुन आम्ही 'ब्रम्हदेवाचे चार हात करा रे ....!! " असं तरी कसं म्हणनार ? ब्रम्हदेव हल्ली यमदुतांवर जाम खार खाऊन आहे असं ही कळतं !
ते दुर्वासांच्या बोलण्याचं विषाणु ने मनावर नाही घेतलं पाहिजे .. ते तर एका शिडाच्या जहाजा प्रमाणे ... वारा ड्रिव्हन :)

- (यमदुत) टारझन

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2010 - 4:08 pm | बिपिन कार्यकर्ते

भगवान भगवान !!!!!!!!!!!!!!!!!!! कुठे आहात? चरण द्या तुमचे इकडे... डोकं ठेवीन म्हणतो....

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

लै लै लै फटकवलाय....

गूगलवर 'आत्मपरीक्षण' असा सर्च दिला तर भलभलत्याच साईट्स उघडल्या!

तरीच आजकाल बरेच लोक आत्मपरिक्षणं करायला लागलेत. ;)

त्या लक्षुंबाईंना आमचा नमस्कार सांगा... आणि तुम्ही जपून रहा... ;)

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Mar 2010 - 5:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=) =)) =) =)) =) =)) =) =))

वाईटातून चांगलं होतं ते हेच बहुदा! ;-) नास्तिकाची आस्तिक झाले मी आज ... शेषशायी रंगवानजी!

अदिती

टारझन's picture

12 Mar 2010 - 5:03 pm | टारझन

आणि हो ... विष्णु ला मी आयफोनची चौकशी करायला लावली होती .. आणि येत्या माणससरोवर भेटीला बरोबर घेऊन याल का ? असं ही विचारलं होतं .. पण त्यांनी तो फोन लक्षुमी ला दिलेला दिसतोय .. विष्णुंचा णिषेध !

बाकी एका यमदुताला तिकडे धाडला होता ... बहुतेक तो तिकडच्या भोगविलासी सागरात बुडालाय .. परत यायचंही नाव घेत नाहीये.

-( आयफोन प्रेमी) अ‍ॅप्पल अभिजात

परिकथेतील राजकुमार's picture

12 Mar 2010 - 5:14 pm | परिकथेतील राजकुमार

बेSSSSSक्काSSSSSSर !!!!!!!

=)) =))

"नारद : हो हो व्यनिच करा. खरडींचा काय भरोसा, त्या 'बिका'ट वाटेने 'परा'गंदा होतात लगेच!" हे वाक्य काळजाला भिडले.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

श्रावण मोडक's picture

12 Mar 2010 - 6:16 pm | श्रावण मोडक

जोरदार!!!
आत्मचिंतनाचा परिणाम काय आहे? तोही कळवा! ;)

सविता's picture

12 Mar 2010 - 9:52 pm | सविता

ह. ह. पु. वा =)) =)) =)) =)) =))

-सविता.

नावातकायआहे's picture

12 Mar 2010 - 9:57 pm | नावातकायआहे

>>(गरुडाकडे पहात) : ए चोच्या, कुठैत रे हे?
आईच्या गावात......जबरी

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

वेताळ's picture

12 Mar 2010 - 10:29 pm | वेताळ

करा हो तुम्ही तुमचे आत्मपरिक्षण.........बाकी एव्हढी सगळी वजनदार लोक झाड्यावर बसल्यावर झाडाची काय हालात झाली असणार ..कल्पना करवत नाही. :D
वेताळ

विजुभाऊ's picture

13 Mar 2010 - 12:04 am | विजुभाऊ

(गरुडाकडे पहात) : ए चोच्या, कुठैत रे हे?

रंगाकाका लै भारी

राजेश घासकडवी's picture

13 Mar 2010 - 8:16 am | राजेश घासकडवी

कोणीतरी सूतकताई नीट केल नाही म्हणून विष्णू ओरडले तेव्हा विष्णूंचा निषेध. त्यांनाच आत्मपरिक्षण करायला सांगायचं या दुर्वासमुनींच्या वर्तनाचा निषेध. वर कोणी काय काय रूपकं वगैरे काही म्हणून गेले आहेत, व एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचं म्हटलेलं आहे त्यावरून आपलं काहीतरी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याचं काम चालू आहे एवढं कळलं. असल्या थिल्लरपणाचा जालिम निषेध.

तरी बरं मला काही कोणी टपल्या मारलेल्या नाहीत. मारलेल्या असतील तर मारणाऱ्यांचा निषेध.

पण सर्वात कडक निषेध म्हणजे अप्सरांच्या जलक्रीडेविषयी 'डोळे किलकिले व्हायला लागले' यापलिकडे एकही अक्षर न लिहिण्याचा.

राजेश

शुचि's picture

13 Mar 2010 - 7:54 pm | शुचि

=))
मस्त!!!
***********************************
हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.

झकासराव's picture

13 Mar 2010 - 10:17 am | झकासराव

=))

ऋषिकेश's picture

13 Mar 2010 - 10:20 am | ऋषिकेश

शि सा न .. रंगराव
लय लय भारी!!
वाक्यावाक्याला फुटलो

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.



***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

शेखर काळे's picture

14 Mar 2010 - 9:31 am | शेखर काळे

अं...आँ....कोण कुठे?
(तो मिपात पार बुडालेला आहे)