वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही.
बुवा लिहितात -
पार्थ म्हणे गा हृषीकेशी,
या युद्धाची ऐशीतैशी,
बेहत्तर आहे मेलो उपाशी,
पण लढणार नाही.
धोंड्यात जावो हि लढाई,
आपल्या बाच्याने होणार नाही,
समोर सारेच बेटे, जावाई,
बाप, दादे, काके.
अरे लढाई असते का सोपी ..
मारे चालते कापाकापी,
कित्येक लेकाचे संतापी
मुंडकी ही छाटती.
मग बायका बोंबलती घरी,
डोई बोडून करती खापरी,
चाल चाल कृष्णा माघारी,
सोड पिच्छा युद्धाचा.
ऐसे बोलून अर्जुन,
दूर फेकून धनुष्यबाण,
खेटरावाणी तोंड करून
मटकन खाली बैसला.
मग कृष्ण अर्जुनाला समजावतो -
कृष्ण म्हणे रे अर्जुना,
हा कोठला रे बायलेपणा,
पहिल्यानं तर टणटणा
उडत होतासी लढाया.
तू बेट्या मूळचाच ढिला,
पूर्वीपासून जाणतो तुला,
परि आता तुझ्या बापाला ही
सोडणार नाही बच्चमजी.
आहाहा रे भागूबाई,
म्हणे मी लढणार नाही,
बांगड्या भरा की रडूबाई
आणि बसा दळत.
वर्हाडी बोलीची लज्जत समजण्यासाठी एव्हढे नमुने पुरे व्हावेत.
वि. सू. - मूळ कवीची इथे लेखनास अनुमति प्राप्त, चिंतातुर जंतुंनी काळजी करू नये ही वि.वि.
प्रतिक्रिया
30 Mar 2008 - 4:48 pm | आणिबाणीचा शासनकर्ता
वि. सू. - मूळ कवीची इथे लेखनास अनुमति प्राप्त, चिंतातुर जंतुंनी काळजी करू नये ही वि.वि.
कॉपीराईट कायद्याचा आग्रह धरणे, सन्मान करणे हे मिपाचे घोरण आहे. या धोरणास/आग्रहास, "चिंतातुर जंतुंनी काळजी करू नये ही वि.वि." अश्या शब्दात हिणवणे, हे अत्यंत गैर आहे.
सबब, सृष्टीलावण्या यांनी २४ तासांच्या अवधीत याच लेखात स्वतंत्र प्रतिसाद देऊन मिपाची जाहीर क्षमा न मागितल्यास हा लेख येथून उडवून लावण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
तसेच जोपर्यंत सृष्टीलावण्या यांचा जाहीर माफीनामा येथे प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत कुणीही सभासदांनी येथे प्रतिसादात्मक लेखन करू नये, ही विनंती, अन्यथा तेही येथून उडवले जाईल ही पूर्वसूचना.
जनरल डायर.
31 Mar 2008 - 12:40 am | ॐकार
वि. सू. - मूळ कवीची इथे लेखनास अनुमति प्राप्त, चिंतातुर जंतुंनी काळजी करू नये ही वि.वि.
ह्या वाक्यात गैर काय? इतर हेकट, उद्धट, शिवराळ सूचना आणि उपदेशांपेक्षा हे वाक्य कितीतरी मऊ आहे. चिंतातुर जंतु ह्या शब्दाने असं काय घोडं मारलं हे कळलं तर बरं होईल. मूळ कवीची अनुमती आहेच ना? मग लेखाच्या उडवाउडवीची भाषा कशाला?
31 Mar 2008 - 1:06 am | विसोबा खेचर
आत्ताच आपल्याशी फोनवर बोलणे झाल्याप्रमाणे आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे याचा विस्तृत खुलासा झाला व आपण सांगितलेल्या काही गोष्टी आमच्या विचाराधीन आहेत. मिपाच्या हिताच्या दृष्टीने त्या आम्हाला महत्वाच्या वाटतात!
धन्यवाद... :)
तात्या.
30 Mar 2008 - 6:58 pm | सृष्टीलावण्या
कृपया नोंद घ्यावी की मी मिसळपाव ची ह्या बाबतीत सपशेल माफी मागत आहे. मिसळपावच्या धोरणाचा उपमर्द करावा हा हेतू नक्कीच नव्हता. पण बरेचदा काही सभासद मराठी संस्थळावर विनाकारण हा मुद्दा उकरून काढतात. माझा चिंतातुर जंतु हा शब्द त्यांच्या संदर्भात होता.
जाता जाता : प्रिय जनरल डायरराव आपण नोंद घेतलीच असेल की श्री. क्ष हे माझे त्यांच्याशी कुठलेही वैयक्तिक संबंध नसताना मी दिलेल्या प्रतिसादांना जोडून एक स्वत:चा बिनबुडाचा / अर्थहीन / अवांतर प्रतिसाद चिकटवतात. (ते जरा आपले खाजगी लाडाचे पिल्लू असेल म्हणून आपण त्यांना जाहीर समज दिला नसेल पण) मिपाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने हे चांगले नव्हे असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते तरी यावर चिंतन अवश्य करावे ही वि.वि.
कळावें,
असाच लोभ अक्षय असावा,
आपल्या करड्या शिस्तीची अखंड भोक्ती,
सृला
>
>
वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्हाटी बोलैन...
30 Mar 2008 - 7:14 pm | विसोबा खेचर
कृपया नोंद घ्यावी की मी मिसळपाव ची ह्या बाबतीत सपशेल माफी मागत आहे.
अनेक आभार!
अवांतर - क्षमा मागणे/माफी मागणे याला हिंमत लागते आणि जाणते/अजाणतेपणे केलेल्या चुकीबद्दल मनमोकळेपणाने क्षमा मागणार्या व्यक्तिची प्रतिमा नेहमीच उंचावते व ती व्यक्ति आदरणीय ठरते!
सहकार्याबद्दल मिपा आपले आभारी आहे...!
मिपाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने हे चांगले नव्हे असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते तरी यावर चिंतन अवश्य करावे ही वि.वि.
अवश्य! कृपया 'क्ष' व्यक्तिचे नांव जनरल डायरना किंवा आम्हाला पोष्टकार्ड पाठवून कळवावे. जनरल डायर यांच्याकडून २४ तासांच्या आत योग्य ती कारवाई केली जाईल व ते आपल्याला़ही कळवले जाईल!
अवांतर- कृपया आपली खरडवही तपासा. त्यात इतर मराठी संकेतस्थळांच्या काही प्रचारकांनी आणि प्रसारकांनी त्यांच्या संकेतस्थळाचा प्रचार व प्रसार केला आहे! तसेच मिपापेक्षा ही संस्थळे अधिक चांगली आहेत असेही सुचवले आहे!
सृलाजी, मिपावर येण्यास किंवा मिपावरून इतर संस्थळांवर जाण्यास आपल्याला पूर्ण मुभा आहे आणि संपूर्ण मिपा परिवार आपल्या कुठल्याही निर्णयाचे स्वागतच करेल!
बाय द वे, हजारांच्या संख्येत सभासद असलेल्या मराठीतील एका जुन्या व बलाढ्य संस्थळाच्या प्रचारकंना मिपासारख्या नव्या संस्थळावर प्रचारा-प्रसाराकरता यावे लागते याचे जरा आश्चर्यच वाटते! :)
असो..
सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार...
ज्ञानेश्वर महाराज की जय! :)
तात्या.
30 Mar 2008 - 7:31 pm | सृष्टीलावण्या
मला वाटत नाही की जनरल डायर ह्यांच्या चाणाक्ष नजरेतून त्या व्यक्तीचे नाव आणि
उद्योग सुटले असेल. मात्र जर सुटलेच असेल तर ज्या भिंगाने माझे दोष शोधतात त्याच भिंगाने इतरांचेही दोष शोधावे ही आग्रहाची विनंती. (विसोबा खेचर ह्यांनी पण एका ठिकाणी एका लेखाच्या प्रतिसादात माझी श्री. दुर्वासमुनींबरोबर तुलना केल्याचे अंधुक आठवते, तो प्रतिसाद पण काढून टाकलात तर लई उपकार होतील बगा आमच्यावर)
असो. दोन मराठी संस्थळाच्या साठमारीत मला अजिबात स्वारस्य नाही. माझा कल प्रशासकांना वैतागून कोणतेही संस्थळ सोडून जाण्यापेक्षा तिथेच राहून हळूहळू ते संस्थळ आणि तिथले प्रशासक ह्यांना योग्य मार्गाकडे नेणे हा आहे ;)
कुठही जा, प्रत्येक संस्थळी मातीच्याच चुली... हा हा हा
>
>
वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्हाटी बोलैन...
31 Mar 2008 - 12:03 am | विसोबा खेचर
मात्र जर सुटलेच असेल तर ज्या भिंगाने माझे दोष शोधतात त्याच भिंगाने इतरांचेही दोष शोधावे ही आग्रहाची विनंती.
कृपया दुवा द्यावा. शोधायला वेळ नाही, आणि मिपाच्या धोरणासंदर्भात अवांतर सदराखाली चिंतातूर जंतू हे शब्द वापरलेले बघायला भिंग लागत नाही!
तेव्हा आपल्याला वाटत असलेले इतरांचे दोष आपल्यालाच वेळोवेळी आम्हाला व्य नि किंवा खरड पाठवून दाखवून द्यावे लागतील म्हणजे त्यावर आम्हाला इष्ट ती कारवाई करता येईल..
(विसोबा खेचर ह्यांनी पण एका ठिकाणी एका लेखाच्या प्रतिसादात माझी श्री. दुर्वासमुनींबरोबर तुलना केल्याचे अंधुक आठवते, तो प्रतिसाद पण काढून टाकलात तर लई उपकार होतील बगा आमच्यावर)
कृपया दुवा द्यावा..
माझा कल प्रशासकांना वैतागून कोणतेही संस्थळ सोडून जाण्यापेक्षा तिथेच राहून हळूहळू ते संस्थळ आणि तिथले प्रशासक ह्यांना योग्य मार्गाकडे नेणे हा आहे ;)
विचार चांगला आहे, मिपाच्या प्रशासकांना योग्य मार्गाकडे नेण्याच्या विचारांचे आम्ही स्वागत करतो..:)
तूर्तास तरी आपल्या एका जाणते-अजाणतेपणाबद्दल मिपांनेच आपल्याला जाहीर क्षमा मागायला लावून योग्य मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे! :)
तात्या.
30 Mar 2008 - 8:56 pm | पिवळा डांबिस
सृलाजी,
आपण दिलेली कविता आवडली. साधी, सोपी, आणि मुख्य म्हणजे खुमासदार!!
१. ही भगवत गीता प्रसिद्ध झाली आहे काय? असल्यास कवीचे नांव खरंच बुवा उपाद्धे आहे का? प्लीज कळवा म्हणजे पुढच्या वेळेस मुंबईहून कुणी आलं तर पुस्तक मागवता येईल.
२. तोपर्यंत वाचण्यासाठी म्हणून या भगवत गीतेचे इतर काही भाग आंतरजालावर कुठे मिळतील काय?
आ,
पिवळा डांबिस
30 Mar 2008 - 8:58 pm | ऋषिकेश
प्रत्येक बोलीचा खुमार काहि औरच :) इथे ही वर्हाडी मेजवानी दिल्याबद्दल आभार!!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
30 Mar 2008 - 11:06 pm | रामदास
हे ज.के. उपाध्ये = बुवा ?
30 Mar 2008 - 11:51 pm | नंदन
खुमासदार शब्दरचना. येथे दिल्याबद्दल अनेक आभार.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
31 Mar 2008 - 12:31 am | इनोबा म्हणे
भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही.
वाचून लक्षात आलेच...
तू बेट्या मूळचाच ढिला,
पूर्वीपासून जाणतो तुला,
परि आता तुझ्या बापाला ही
सोडणार नाही बच्चमजी.
हा हा हा.... शब्दरचना अती उत्तम....
ही भगवत् गीता जाम आवडली. आपून तर बूवा उपाध्यांचा फ्यानच झालो...
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
31 Mar 2008 - 3:33 pm | स्वाती राजेश
या बोलीभाषेविषयी नविन ओळख केल्याबद्दल धन्यवाद...
बुवां नी छानच लिहिले आहे...
अजुनी तुमच्या संग्रही असतील तर इथे लिहा ही विनंती...
31 Mar 2008 - 7:56 pm | संजय अभ्यंकर
सृ.ला. जी,
उपाध्ये बुवांची पुर्ण गीता वाचू इच्छीतो.
कृपया दुवा द्यावा. अथवा पुस्तकाचे नांव व प्रकाशकाचे नांव सांगावे.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
31 Mar 2008 - 8:07 pm | मनस्वी
+१
31 Mar 2008 - 9:59 pm | सृष्टीलावण्या
खरे तर माझ्याकडेही बुवा उपाध्ये यांची पूर्ण गीता नाही. असती तर मीच ती इथे क्रमश: दिली असती. असो. मी पण बघते मुंबईत कुठे मिळते का ते. मिळाली तर नक्की इथे त्याविषयी माहिती देईन.
>
>
वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्हाटी बोलैन...
31 Mar 2008 - 10:44 pm | सर्किट (not verified)
मुळात ही वर्हाडी बोली हेच चूक आहे.
ह्यात एक टक्का देखील वर्हाडी नाही.
वर्हाडी बोली कळण्यास प्रा. देविदास सोटे ह्यांच्या कविता वाचाव्यात.
येन्न रे बाप्पू
पेन्न रे चा
आता काऊन करते
ट्यां ट्यां
बाकी विडंबन चांगले आहे. (अरे, इथले धर्ममार्तंड कुठे गेले आज ?)
- वर्हाडी सर्किट