माझे खाद्य-पेय जीवन-१

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जनातलं, मनातलं
27 Oct 2009 - 7:03 am

'गॉड मेड ब्यूटी अ‍ॅन्ड स्पॉईल्ड इट बाय अ‍ॅडींग अ टंग इन इट' हे बायकांच्या आड्यन्सला चिडवणारे वाक्य फार पूर्वी ऐकले होते. जिभेचा हा गुण जरी नवीन असला तरी सर्वसामान्यांपेक्षा आपल्याला जरा जास्तच नखरेल जीभ लाभली आहे, हे जन्मानंतर लवकरच लक्षात आले होते. त्यातून आई, बहीण, आजी हा घरातला समग्र स्त्रीवर्ग खाना बनवण्यात आणि खिलवण्याचा शौकीन असल्याने जिभेचे मुद्दाम लाड करावे लागले नाहीतच; ते आपोआपच झाले. सणवार, व्रतवैकल्ये आणि त्यांची उद्यापने, गावच्या जत्रा आणी शेतावर होणारा विहिरीच्या पूजेचा तो कार्यक्रम 'पारडी' या विविध निमित्तांनी घरात आणि घराबाहेर खाल्लेल्या विविध पदार्थांच्या आस्वादाला चटावलेली आणि सोकावलेली जीभ पुढे मुर्गीमटणातही रमली. आदल्या दिवशीचा उरलेला सत्यनारायणाचा प्रसाद दुसर्‍या दिवशी जितका चविष्ट लागला, तितकाच कडक रोटीबरोबरचा पाकिस्तानी हाटेलात सकाळीसकाळी खाल्लेला झणझणीत लालभडक खिमाही. घासागणिक एक असे तुपाची टोपी घातलेले गरमगरम मोदक ज्या रसिकतेने हाणले, त्याच रसिकतेने कडाक्याच्या थंडीत पंजाबमधल्या ढाब्यावर कुरकुरीत भाजलेली मसालेदार कोंबडीही चापली. वर काजू बदामाची पेरणी केलेली बरेलीतली मलईदार 'दीनानाथ की मशहूर लस्सी पिऊन जसा संतोष झाला, तसाच कोल्हापुरातल्या 'ओपल' मधला कडकडीत पांढरा रस्सा पिऊनही.
आता खाण्यात इर्षा करण्याचे दिवस मागे पडले. जीभ अजूनही चावट आहे, पण आता 'क्वांटिटी' पेक्षा 'क्वालिटी' ला अधिक महत्व देण्याचे दिवस आले. आजही मुर्ग-मसालाबरोबर पचडी तशीच लागते, पण आता कोंबडीच्या त्या घासांबरोबर 'फायबर' हा विचारही चावला जातो. आजही सुका मेवा तितकाच चविष्ट लागतो, पण तो खाताना 'अक्रोड हार्टला बरे म्हणे!' हे मनात आल्याशिवाय राहात नाही. पण ते असो. कधीतरी या लाडावलेल्या जिभेलाच आता 'काय तुझा तेगार' म्हणून विचारावे असे वाटले आणि आजवरच्या आयुष्यातल्या खाण्यापिण्याच्या या रंगरंगिल्या प्रवासवाटेवर मन मागेमागे रेंगाळत गेले.
कुणाकुणाला म्हणे आपले स्वतःचे उष्टावणही आठवते. कुणाला स्वतःच्या बारशात वाटलेल्या घुगर्‍यांची चवही आठवत असेल, काय सांगावे! मला असले काही आठवत नाही. पण खान पान यात्रेची (हा शब्द 'भारतीय रेल' कडून साभार!) सुरवात होते ती चहापासून. मुखमार्जनानंतर (हा शब्द 'सारे प्रवासी घडीचे' मधून साभार!) काही क्षणांतच वाफाळता चहाचा मोठा मग समोर आला नाही तर सगळे जग व्यर्थ वाटू लागते. दुधा-दह्याच्या प्रदेशात बालपण गेले असल्याने लहानपणी या चहात चहा नावापुरताच आणि भरघोस दूध असायचे. कपातल्या गोडमिट्ट चहावर खापरीसारखी दाट साय ही कल्पना आज ओशट वाटते, पण अंगाभोवती पांघरुण घट्ट गुंडाळून घेऊन असा चहा चाखतमाखत पिणे आणि रिकामा कप कुठेतरी भिरकावून परत पांघरुणात गुडुप होणे यापरते सुख नसे. शहरी चहात चहाचा स्वाद वगैरे महत्वाचा, पण गावाकडच्या आतिथ्याच्या कक्षा चहातल्या साखरेच्या प्रमाणानुसार रुंदावतात. 'खडे चम्मचवाली चाय' ही काही उत्तर भारतीयांची मक्तेदारी नव्हे. गावाकडच्या चहात एकवेळ चहा लहान चमच्याने पडेल, पण साखर पडते ती मुठीने. पुढे मग तारांकित हाटेलातला उंची पण मचूळ चहा, गुजरातमधली गोड आणि सुगंधी 'मसालानु चाय', तीन आकडी किंमत असलेला 'ब्लॅक' किंवा 'आईस टी' असले अनेक प्रकार चाखले, पण चहा तो चहाच. सकाळी सहा आणि दुपारी तीन या वेळी ज्यांना न मागता कपभर गरम चहा मिळतो, तेचि पुरुष भाग्याचे. रविवारी बाकी चहाच्या तीन-चार फेर्‍या व्हाव्यात. शब्दकोडे सोडवताना न मागता अर्धा कप चहा बायकोने हातात आणून दिला की हातातला पेपर खाली ठेवून तिच्या कानशिलावरुन हात फिरवून कडाकडा बोटे मोडत 'कशी गं माझी बाय गुणाची!' म्हणावेसे वाटते! कॉफी - तीही आसक्या दुधातली आणि वेलदोडे जायफळ घातलेली- कधीकधी मजा आणून जात असे. विशेषतः गावाकडच्या तंबूतला शिणेमा बघून रात्री परत आल्यावर असली कॉफी केवळ अफलातून लागे. कॉफी हे उच्चभ्रू लोकांचे पेय आहे आणि चहा हे जनतेचे, हा सूक्ष्म फरक कळायला बराच वेळ लागला. न कळणार्‍या चित्रांचे वातानुकूलित प्रदर्शन बघताना त्या वेळी लोक कॉफी पीत असत. (आता वाईन पितात!) नुकत्याच प्रेमात पडलेल्या (किंवा नुकतेच लग्न ठरलेल्या) युगुलांना हाटेलात जाऊन चहा पिणे जरा कमीपणाचे वाटे; म्हणून असे लोक महागड्या हाटेलांत जाऊन न परवडणारी कॉफी पीत असत. डोळ्यांत डोळे घालून बघणे, चोरटे स्पर्श, 'एक मुलगी हवीच हं मला.. आणि नावही ठरवून ठेवलंय मी - नेहा!' वगैरे सगळ्या साईड डिशेस. एकंदरीत काय, तर कॉफी जराशी शिष्टच. चहा जसा पाठीत जोरदार धबका मारुन शेजारच्या खुर्चीत कोसळणार्‍या दोस्तासारखा वाटला, तशी कॉफी कधीही वाटली नाही. पुढे 'ब्रिष्टॉल - विल्स - गोल्ड फ्लेक' या प्रवासाला साथ दिली ती तर केवळ चहानेच. 'चहा-बिडी' हा शब्दप्रयोग काळाच्या ओघात टिकून आहे ही तर अवघ्या महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावावी अशी दैदिप्यमान घटना आहे!
चहा-कॉफी हे मानाचे गणपती सोडले तर कोको, बोर्नव्हिटा, ड्रिंकिंग चॉकलेट, हॉर्लिक्स वगैरे काही राखीव खेळाडूही होते, पण त्यांच्याशी कधी फारशी दोस्ती झाली नाही. बोर्नव्हिटा चॉकलेटच्या स्वादाचा म्हणून जरा बरा वाटे पण हॉर्लिक्स, प्रोटिनेक्स वगैरे मंडळी आजारीपणाची कडवट आठवण घेऊन येतात. कोको ही तर शुद्ध फसवाफसवीच होती. शिवसेनेतच राहू, की मनसेत जाऊ,शिवसेनेतच राहू, की मनसेत जाऊ असले तळ्यात-मळ्यात खेळणारा कोको.
तात्पर्य काय, की कोणताही ऋतू असावा, विचारहीन शांत झोप व्हावी, 'आज आपण जग जिंकणार' या आत्मविश्वासाने जागे व्हावे आणि तोंड खंगाळेपर्यंत हातात ते ताम्रवर्णी अमृत हजर व्हावे. घोटाघोटांनिशी आयुष्याचा अर्थ पटत जातो! 'उत्तेजक पेयांपासून दूर' असणारे लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. शेवटी 'कंबख्त तूने पीही नही' हे काय फक्त वारुणीलाच लागू आहे? 'कंबख्त तूने चाय पीही नही' हेही तितकेच समर्पक आहे की! आणि व्याकरणदृष्ट्या बरोबरही!

(क्रमशः)

हे ठिकाणप्रकटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

27 Oct 2009 - 7:29 am | मुक्तसुनीत

संजोपराव , मजा आणली राव तुम्ही.

"ऐटीत बाबू , सिंगल चाय, बिस्कुट नाय म्हणून रागान जाय !" असे म्हणणार्‍या आजीपासून "अर्ल ग्रे" पाजणार्‍या स्टारबक्स् पर्यंत ... तुमची माझी धाव आहे, चहापासून चहाकडे !

विनायक प्रभू's picture

27 Oct 2009 - 8:49 am | विनायक प्रभू

असेच म्हणतो

अवलिया's picture

27 Oct 2009 - 1:29 pm | अवलिया

असेच म्हणतो.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

लवंगी's picture

28 Oct 2009 - 12:37 am | लवंगी

अगदि अगदि असच म्हणते

विजुभाऊ's picture

27 Oct 2009 - 9:23 am | विजुभाऊ

तुमची माझी धाव आहे, चहापासून चहाकडे !

मुक्तसुनीत काका हे वाक्य थोडेसे बदलायला हवे
तुमची माझी धाव आहे, इनोपासून चहाकडे !
हे कसे आता बरे वाटतेय ;)

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शेखर's picture

27 Oct 2009 - 7:53 am | शेखर

पुढचे भाग वाचण्यास उत्सुक....

संजोपराव अ‍ॅट हिज बेस्ट... येऊ द्यात...

शेखर

प्राजु's picture

27 Oct 2009 - 7:57 am | प्राजु

रावसाहेब,
खूप दिवसांनी इतका फुलका लेख वाचायला मिळाला. चहाच्या ते ही भरपूर दूधातल्या... नावाने बर्‍याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
खरंच, ज्यांना सकाळचा चहा ऐता हातात मिळतो ना.. त्या लोकांचा हेवा वाटतो मला. भाग्यवान असतात अशी लोकं.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/

Nile's picture

27 Oct 2009 - 7:58 am | Nile

आधीच भर दिवाळीत एकही पदार्थ फराळाला नसल्याने वैतागलो होतो, त्यात तुम्ही एका मिनिटात त्या गेलेल्या सुखी जिवनाची रपेट घडवुन आणलीत.

सकाळी सहा आणि दुपारी तीन या वेळी ज्यांना न मागता कपभर गरम चहा मिळतो, तेचि पुरुष भाग्याचे.

आजीच्या हातचा रोज तीनचा चहा आठवुन काळी कॉफी पिताना किती त्रास होतो, विचारु नका!

चहा आणि कॉफी बद्द्ल अगदी माझ्याच भावना!

पुढच्या भागाची भुक लागली आहे, येउद्या.

-उपाशी.

स्वप्निल..'s picture

28 Oct 2009 - 1:07 am | स्वप्निल..

म्हणतो .. चहा आणि कॉफी बद्द्ल अगदी माझ्याच भावना!

>> आधीच भर दिवाळीत एकही पदार्थ फराळाला नसल्याने वैतागलो होतो, त्यात तुम्ही एका मिनिटात त्या गेलेल्या सुखी जिवनाची रपेट घडवुन आणलीत.

माझही अगदी असच झालंय ..

स्वप्निल

घाटावरचे भट's picture

27 Oct 2009 - 8:11 am | घाटावरचे भट

अत्यंत झकास लेख!! तसा काही आय अ‍ॅम नॉट अ चहा पर्सन बरं का, पण तुमचा लेख वाचून अगदी बघा हॅडच टु ड्रिंक गरमागरम चहा.

- भटोबा

बेसनलाडू's picture

27 Oct 2009 - 9:25 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

विष्णुसूत's picture

27 Oct 2009 - 8:16 am | विष्णुसूत

आवडला लेख.
लिहित रहा. मजा येते आहे.

सुबक ठेंगणी's picture

27 Oct 2009 - 8:39 am | सुबक ठेंगणी

पुढचे भाग वाचायला उत्सुक!
बाकी आमचीही खाण्याविषयीचे चविच्चर्वण इथे आणि चहाविषयीचे इथे जरूर वाचा.

JAGOMOHANPYARE's picture

27 Oct 2009 - 8:53 am | JAGOMOHANPYARE

तुम्हाला एक चहा बक्षिस..

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

चिंतामणराव's picture

27 Oct 2009 - 11:14 am | चिंतामणराव

असेच म्हणतो...

.....आमचा हरी आहेच...

विसोबा खेचर's picture

27 Oct 2009 - 9:28 am | विसोबा खेचर

रावशेठ,

खाद्यपुराण, चहापुराण फर्मास आहे. येऊ द्या अजून..

आम्हीही चहाचे प्रेमी, तेही मुंबैच्या इराण्याकडच्या! बोर्नव्हिटाचेही आम्ही प्रेमी. चहानंतर मात्र चुना-सातारी तमाखू जर भेटला नाय तर काय मजा नाय!

गोखल्या/आपट्यांकडची जायफळवाली कोकणस्थी आटीव कॉफीही आम्हाला प्रिय. केतकी गोखले नावाची आमची एक मैत्रिण होती. फार सुंदर कॉफी बनवायची. दिसायचीही सुरेख. नक्की कुणाला प्यावं - केतकीला की कॉफीला, हे कळत नसे! ;)

शिवसेनेतच राहू, की मनसेत जाऊ,शिवसेनेतच राहू, की मनसेत जाऊ असले तळ्यात-मळ्यात खेळणारा

हे मी चुकून मिसळपाववर जाऊ की मनोगतातच राहू असं वाचलं! बाय द वे, थांबा आता मिपावरच! :)

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Oct 2009 - 9:47 am | प्रकाश घाटपांडे

गावाकडे घरचच दुध असायच. गाई व म्हशीच दोन्ही. पण मुलांनी गाईच दुधच प्याव या अट्टाहासामुळे गाईचच दुध प्यायला लागायच. गरम केल्यावर त्याला एक प्रकारचा वास यायचा तो मला आवडायचा नाही. म्हणुन शहरातुन आणलेला कोको वा ड्रिंकिंग चॉकलेट असले की गाईच दुध पोटात जायच.
कॉफी बद्दल रविवार सकाळच्या अंकात प्रा प्रदिप आपटेंचा लेख उत्तम
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

नंदू's picture

27 Oct 2009 - 10:42 am | नंदू

एक उत्कृष्ठ हलकाफुलका लेख. मस्त.
पुढच्या भगाच्या प्रतिक्षेत.

नंदू

विसुनाना's picture

27 Oct 2009 - 11:17 am | विसुनाना

मझा आला.

संजोपराव,आपले खाद्यपेयजीवन असेच सुरू राहू दे.
पुढचे लेखांक वेगवेगळ्या लेखकांच्या शैलींमध्ये यावेत.
(जसे यावेळी पुलं आले आहेत - यापुढे जीए, नेमाडे, दळवी दिसावेत. तुम्हाला(च) शक्य आहे ते.)
असा प्रयोग झाला तर आणखी बहार येईल.

अवांतर-
१. विषय जुने (कधीकधी घिसेपिटे) असले तरी त्यावर फिरणारी लेखणी कुणाच्या हातात आहे त्यावर लेखनाचे यश अवलंबून असते.
२. विहिरीत सोडतात ती 'परडी' नाही का? {माझ्या स्मृतीप्रमाणे जलदेवतेची पूजाकरून एक लहानशी टोपली फुले भरून नदीत/विहिरीत सोडतात. टोपली=परडी (पारडी नव्हे.) चुभूद्याघ्या.}
३.दैदिप्यमान की देदिप्यमान?

विसोबा खेचर's picture

27 Oct 2009 - 11:20 am | विसोबा खेचर

दळवी दिसावेत.

हेच म्हणतो...

(दळवींचा फ्यॅन) तात्या.

सन्जोप राव's picture

27 Oct 2009 - 2:36 pm | सन्जोप राव

परडी.. परडी .
पारडी चुकून झाले, क्षमस्व.
दैदिप्यमान की देदिप्यमान? माझ्या मते 'दै' . जाणकारांनी प्रकाश टाकावा.
यापुढे जीए, नेमाडे, दळवी दिसावेत
बापरे! प्रयत्न करतो म्हणणेही शक्य नाही. पुढील काही भागांत सन्जोप राव दिसावेत ही इच्छा आहे.
सन्जोप राव
टीकाकारांना आपल्या अस्त्रानेच उत्तर देणारा तेंडुलकर हा आमचा नवीन आदर्श आहे!

चेतन's picture

27 Oct 2009 - 3:17 pm | चेतन

चहा छान झालाय..

>> बापरे! प्रयत्न करतो म्हणणेही शक्य नाही. पुढील काही भागांत सन्जोप राव दिसावेत ही इच्छा आहे.

जरुर..

"वर्तुळ" सारखा लेख परत आपल्या लेखणीतुन निघावा हि सदिच्छा...

चेतन

विसुनाना's picture

27 Oct 2009 - 3:36 pm | विसुनाना

देदिप्यमान आणि दैदिप्यमान दोन्ही चुकीचेच.
देदीप्यमान बरोबर.
पहा मोल्स्वर्थ:
देदीप्यमान [ dēdīpyamāna ] a S Exceedingly bright, brilliant, splendid, radiant. Usually but incorrectly written दैदिप्यमान & देदिप्यमान.

असो. उत्तराबद्दल आभार.

फ्रॅक्चर बंड्या's picture

27 Oct 2009 - 11:22 am | फ्रॅक्चर बंड्या

चहा जसा पाठीत जोरदार धबका मारुन शेजारच्या खुर्चीत कोसळणार्‍या दोस्तासारखा वाटला, तशी कॉफी कधीही वाटली नाही

आवडले...
लेख फार आवडला...

प्रभो's picture

27 Oct 2009 - 11:41 am | प्रभो

मस्त

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

दिपक's picture

27 Oct 2009 - 11:50 am | दिपक

भारी लेख... पुढील भागास उत्सुक.

Dhananjay Borgaonkar's picture

27 Oct 2009 - 12:21 pm | Dhananjay Borgaonkar

रावसाहेब्..लैलैलै भारी मजा आली लेख वाचुन..
भाग २ च्या प्रति़क्षेत..

नंदन's picture

27 Oct 2009 - 12:32 pm | नंदन

अस्सल रावसाहेबी लेख! खाद्यजीवनाबरोबरच 'भात आणि बिर्याणी'ची याद दिलवून देणारा. पंगतीतल्या पुढच्या पक्वान्नांची वाट पाहतो आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Oct 2009 - 12:33 pm | llपुण्याचे पेशवेll

छान छान. फारच सुरस आणि चमत्कारीक आहे हो तुमची भाषा. :)

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

भोचक's picture

27 Oct 2009 - 12:45 pm | भोचक

रावसाहेब चविष्ठ लेख.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

मिसळभोक्ता's picture

27 Oct 2009 - 1:27 pm | मिसळभोक्ता

शब्दकोडे सोडवताना न मागता अर्धा कप चहा बायकोने हातात आणून दिला की हातातला पेपर खाली ठेवून तिच्या कानशिलावरुन हात फिरवून कडाकडा बोटे मोडत 'कशी गं माझी बाय गुणाची!' म्हणावेसे वाटते!

क्या बात है !!!

आणि बिस्टॉल-विल्स-गोल्डफ्लेक नंतर क्लासिक माईल्ड्स नाही जोडलीत ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

श्रावण मोडक's picture

27 Oct 2009 - 2:11 pm | श्रावण मोडक

ही झलक तुमच्या लेखनाची. तिच्यावर कसे समाधान होणार?
भात आठवलाच!!!

ऋषिकेश's picture

27 Oct 2009 - 2:45 pm | ऋषिकेश

छान खुसखुशीत लेख..
आता चहा घेत घेत वाचला :)

--ऋषिकेश

किट्टु's picture

27 Oct 2009 - 3:30 pm | किट्टु

मस्त हलका फुलका लेख..... खुप आठवणी जाग्याकेल्यात.....
'चहा' केव्हाही बेस्ट....

इथे ओफिस मधे आपला दुधवाला 'चहा' मिळत पण नाही........ :''(
आणि तो 'डिप-डिप'वाला चहा कधीच आवड्ला नाही..... :(

पर्नल नेने मराठे's picture

27 Oct 2009 - 4:31 pm | पर्नल नेने मराठे

8| मला तर सवय झालीये ग आता डिप चि, घरी पण मिल्क पाउडर
व डिपच :( ताजे दुध फक्त कॉर्नफ्लेक्स साठी वापरते.
चुचु

आनंदयात्री's picture

27 Oct 2009 - 4:02 pm | आनंदयात्री

छान लिहलेय सर. बरेच दिवसांनी असे लिखाण वाचायला मिळाले जसे आठवडाभर मान मोडुन काम केल्यावर शुक्रवारी रात्री श्रमपरिहार करावा आणी शनवारी सकाळी फ्रेश करणारा कडक्क चहा मिळावा !!

धमाल मुलगा's picture

27 Oct 2009 - 8:49 pm | धमाल मुलगा

तसा मी काही फार चहावेडा नाही, आम्ही काऽऽपीवाले :) पण लेख मात्र भावला! अगदी पटला...

बाकी, खाली रामदासकाका म्हणतात तसं, सुट्टीदिवशीचा चहा/कॉफीचा एक कप पापक्षालनाचा अगदी हुकमी-रामबाण उपाय :)

दत्ता काळे's picture

27 Oct 2009 - 4:40 pm | दत्ता काळे

लेख फार आवडला.

स्वाती दिनेश's picture

27 Oct 2009 - 4:49 pm | स्वाती दिनेश

खूप दिवसांनी तुमची मेजवानी मिळाली रावसाहेब,
पुढचे भाग येऊ देत लवकर,
स्वाती

स्वाती२'s picture

27 Oct 2009 - 5:40 pm | स्वाती२

सुरेख! पुढचा भाग ?

रामदास's picture

27 Oct 2009 - 5:59 pm | रामदास

ही सुरुवात आवडली.आता पुढे काय .
रविवारचा चहात मात्र पंथभेद आहेत.
रविवारचा पहीला चहा आपणच करावा.दमलेल्या बायको शक्य तितक्या मधुर आवाजात झोपेतून उठवावे.
(रात्री पेल्यात बर्फ कच्चा पडला असेल तर आवाज मधुर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात).आपण बनवलेला चहा तीने साप्ताहीक भविष्य वाचत प्यावा .आपण चेहेरा निरखत रहावं.एक चहा आठवड्याभराचं पाप धुवून काढतो.

पर्नल नेने मराठे's picture

27 Oct 2009 - 6:03 pm | पर्नल नेने मराठे

सही =))
चुचु

किट्टु's picture

27 Oct 2009 - 8:25 pm | किट्टु

=))

काय पण विचार आहेत... आवडलं

चतुरंग's picture

27 Oct 2009 - 8:35 pm | चतुरंग

आमच्या सौ चा-कापी काहीही घेत नाहीत. त्यामुळे तिला चहाचा कप देऊन चेहेरा निरखत रहाणं आम्हाला शक्य नाही पण आम्ही चहा घेत तिच्याशी मनसोक्त गप्पा मारतो! ;)

बाकी चहाच्या पेल्यातली वादळं चहाच्या पेल्यानंच संपवण्याचा तुमचा रोमँटिक विचार आवडला! >:D<

चतुरंग

सन्जोप राव's picture

27 Oct 2009 - 8:38 pm | सन्जोप राव

रवीवारचा पहिला चहा आपलाच असतो. (डोके आपलेच दुखत असते!) बायकोने आणून द्यावा तो दुसरा - अडीचावा चहा. बायकोचे राशीभविष्य वाचून संपले असले तर आपल्या वाट्याला शब्दकोड्यांसाठी पेपर येतो.
सन्जोप राव
टीकाकारांना आपल्या अस्त्रानेच उत्तर देणारा तेंडुलकर हा आमचा नवीन आदर्श आहे!

चतुरंग's picture

27 Oct 2009 - 7:39 pm | चतुरंग

बर्‍याच दिवसांनी अशी मोकळी सोडलेली लेखणी छान वाटली.
आम्ही तसे पक्के चहाबाज. पूर्वी शब्दकोडी सोडवताना आणि सध्या रविवारी सक्काळी सक्काळी मिपावर येताना असा आमच्या हाती गरमागरम चहाचा कप येतो त्यामुळे आम्ही भाग्यवानात जमा आहोत असे म्हणायला हरकत नाही! :)

किंचित अवांतर - आम्ही काही दिवसांपूर्वी केलेले गोडघाशे लेखन तुम्हाला इथे वाचता येईल.

चतुरंग

संदीप चित्रे's picture

27 Oct 2009 - 7:43 pm | संदीप चित्रे

मजा आली संजोपराव ! काही काही वाक्यं तर खूपच आवडली.
>> आदल्या दिवशीचा उरलेला सत्यनारायणाचा प्रसाद दुसर्‍या दिवशी जितका चविष्ट लागला, तितकाच कडक रोटीबरोबरचा पाकिस्तानी हाटेलात सकाळीसकाळी खाल्लेला झणझणीत लालभडक खिमाही. घासागणिक एक असे तुपाची टोपी घातलेले गरमगरम मोदक ज्या रसिकतेने हाणले, त्याच रसिकतेने कडाक्याच्या थंडीत पंजाबमधल्या ढाब्यावर कुरकुरीत भाजलेली मसालेदार कोंबडीही चापली.

>> चहा जसा पाठीत जोरदार धबका मारुन शेजारच्या खुर्चीत कोसळणार्‍या दोस्तासारखा वाटला, तशी कॉफी कधीही वाटली नाही.

>> चहा-कॉफी हे मानाचे गणपती सोडले तर कोको, बोर्नव्हिटा, ड्रिंकिंग चॉकलेट, हॉर्लिक्स वगैरे काही राखीव खेळाडूही होते, पण त्यांच्याशी कधी फारशी दोस्ती झाली नाही.

ही वाक्यं फक्त नमुन्यादाखल देतोय... सगळा लेखच खूप आवडलाय !

प्रदीप's picture

27 Oct 2009 - 7:58 pm | प्रदीप

लेख. असेच अजून येऊदे.

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Oct 2009 - 8:52 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री राव, चहा पिण्याचे अतिशयोक्त वर्णन फारसे आवडले नाही.

निमीत्त मात्र's picture

27 Oct 2009 - 9:27 pm | निमीत्त मात्र

मस्त लेख...साक्षात यमराज बोलवायला आला तरी आधी त्याच्या रेड्यावर डब्बलशीट बसून त्याला चहा पाजेन.. अश्या परिचीत शैलीत लिहिला आहे.

घोटाघोटांनिशी आयुष्याचा अर्थ पटत जातो!

क्या बात है! अगदी रेषेवरची अक्षरेमधे देण्यासारखा लेख. आत्ताच बुकिंग करुन ठेवा पुढच्या दिवाळीत तुमचा लेख नक्की.

बाकी संदीपखरेनाही चहा पिता पिताच, 'चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही..' ह्या ओळी सुचल्या असाव्यात.

फार छान लेख.

आता पुढच्या भागात सिंगल माल्टचे घोट आले पाहिजेत..

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Oct 2009 - 10:43 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री मात्र, प्रतिसाद आवडला.

बाकी संदीपखरेनाही चहा पिता पिताच, 'चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही..' ह्या ओळी सुचल्या असाव्यात.

तसेच 'कानशिलावरुन हात फिरवून कडाकडा बोटे मोडत 'कशी गं माझी बाय गुणाची! म्हणावेसे वाटते!' या ओळीवरून 'कसे सरतील सये, तुझ्याविन दिस माझे' सूचले असावे.

वेताळ's picture

27 Oct 2009 - 11:20 pm | वेताळ

मस्तच....एन्ट्री मारताच सिक्स...झक्कास....अजुन खेळ बघायला आवडेल. :*

वेताळ

निमीत्त मात्र's picture

27 Oct 2009 - 11:28 pm | निमीत्त मात्र

अरेच्या..माझ्या प्रतिसादात काय उडवण्यासारखे होते बरे?
वेतोबा पप्पी मस्तच!! :)

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Oct 2009 - 11:29 pm | अक्षय पुर्णपात्रे

घेण्याची प्रथाच आहे. श्री डांबिस यांनीही असाच जाहीर पापा घेतला होता. श्री वेताळ एंट्री नव्हे रीएंट्री.

धनंजय's picture

28 Oct 2009 - 12:24 am | धनंजय

अधूनमधून गरमागरम चहा हे तर माझे दिवसाउजेडीचे व्यसनच! (रात्रीचे पेय म्हणून चहा तितका आवडत नाही.)

या लेखात भाईकाका दिसले. पण सन्जोप राव म्हणजे वेगवेगळ्या शैलींमध्ये तितकाच हातखंडा दाखवणार. मालिका वाचनीय असणार नि:शंक.

**("देदीप्यमान" हा शब्द संस्कृतात तसेच तत्सम म्हणून मराठीतही योग्य आहे. पण मराठीत बोलताना "दैदीप्यमान" शब्द अधिक संस्कृत धाटणीचा वाटतो. संस्कृत "राष्ट्रिक" ऐवजी मराठी बोलणार्‍याला "राष्ट्रीय" अधिक संस्कृत धाटणीचा वाटतो, आणि तोच आता मराठीत रूढ आहे. अशा प्रकारचे संस्कृतापेक्षाही-संस्कृत-वाटणारे शब्द मराठीत कालांतराने रूढ झाले तरी काही आपत्ती नाही. पण तेवढ्यावरून मराठीभाषकांनी एकमेकांना दोष देऊ नये असे वाटते.)**

अमोल नागपूरकर's picture

2 Nov 2009 - 3:03 pm | अमोल नागपूरकर

मौलाना आझाद ह्यान्चा 'अब चाय खत्म हुई ..' हा एक मस्त लेख आहे. जिथे दूधाची टन्चाई असते तिथे बिनदुधाचा (कोरा) चहा सुद्धा छान लागतो.

रश्मि दाते's picture

3 Sep 2012 - 12:06 am | रश्मि दाते

छान लेख