स्थ्ळ - वैकुंठ
शीन - हातात 'मादक आणी जहाल'चा मग सहजच घेऊन महालात श्री विष्णू पहुडले आहेत ६० इंची एल्सीडीवर प्रोग्रॅम सुरु आहे जोरजोरात हसण्याचे आवाज येताहेत!
(महालात प्रवेश करत)
नारद : "नारायण, नारायण!"
विष्णूंचं लक्ष नाही असं पाहून पुन्हा एकदा मोठ्याने
"नाऽऽरायण! नाऽऽरायण!!"
टीवीवरची नजर ढळू न देता विष्णू एका हातानेच थांबायची खूण करतात!
एवढ्यात कार्यक्रमाचे प्रायोजक 'मिपाकर स्वयंभोचक संघाची' अॅड सुरु होते आणी विष्णू टीवी म्यूट करतात.
"हा हा हा! मेलो मेलो!! कॉकटेल उडाली ..ठ्यॉ!! बसा बसा मुनिवर!!"
"काय हे देवा? एवढे का हसताय?"
हसून हसून डोळ्यातून येणारे पाणी पुसत "अहो मुनिवर हसू नको तर काय करु, आजपासून "डॉक्टर आणी कंपाउंडर" ही मालिका सुरु झाली! अहो काय सांगू हसून मेलो! बसा त्या काऊचवर, तुम्हीही बघा! काय ते काळू-बाळू वग फुलवतात!!" "घ्या!" खार्या काजूंची बशी समोर करत विष्णू म्हणतात!
टाळी वाजवून "कोण आहे रे तिकडे, एक लार्ज भरा मुनींसाठी!"
सिंहासनाकडे जाणार्या मुनिंना विष्णू सांगतात : " अं हं तिकडे नाही मुनिवर इकडे, इकडे ह्या काऊचवर! 'ते सिंहासन' आता कंडम झालं!"
नारद : "काऊच? हा काय प्रकार आहे?"
विष्णू : "अहो ज्यावर बसून बसून तुम्ही सुदृढ होत जाता आणी मग उठताना गुढघेदुखीने "आउच" असा आवाज येतो ना त्याला काऊच म्हणतात! असो विनोद सोडा.
हा आमच्या दुबईच्या शेखकाकांनी भेट पाठवलाय ह्या रमजानला!"
नारद डोळे मोठ्ठे करत : " आं..रमजान!?"
विष्णू : "मुनिवर, अहो सर्वधर्मसमभाव नको का? मग काय बिघडलं ही भेट घेतली तर?"
काऊचवर बसत कोपर्यात वेटोळे करुन पडलेल्या शेषाकडे बोट करुन मुनिवर : "आणी हे काय? हा शेष असा का पडलाय? आणी तुम्ही ह्या गादीवर का पहुडलाय?"
"हां हां, तो शेष ना? आता तो 'नि:शेष' झालाय! शूऽऽ शूऽऽ गादी नाही म्हणायचं ह्याला 'स्लीपिंग सिटिम' आहे ही!!"
"काय? कसली सिस्टिम?"
"स्लीपिंग सिस्टिम! स्लीपिंग सिस्टिम! 'स्लीपिंग ब्यूटी' माहीते ना तुम्हाला? तशीच 'स्लीपिंग सिस्टिम!""
"आता हे काय नवीन खूळ देवा!"
"अहो मुनिवर अगदीच कसे हो तुम्ही भोट्म? अहो ते भूतलावरचं मल्टीलेवल मार्केटिंग ऐ़कून आहात ना, ते एकेक लेवल पार करत थेट स्वर्गात पोचलं आणि मग मला ही सिस्टिम मिळाली! काय मऊ आहे म्हणून सांगू, कित्येक युगात असली गाढ झोप लागली नव्हती!!"
"ही घेतलीत कुणाकडून पण?"
"हॅ हॅ हॅ! आमच्या गरुडानंच घेतलीन एजन्सी! आपल्या आपल्यातच करायचं असतं म्हणे ते मार्केटींग!!"
एवढ्यात चोचीत एक सीडी घेऊन गरुड येतो. ब्लू रे प्लेअरमध्ये सीडी टाकतो.
नारद : "हे काय आहे गरुडा?"
"ती मार्केटिंगची अॅड. सीडी बघा. थक्क व्हाल आणी ह्या स्लीपिंग सिस्टिमवर पडाल!"
एवढ्यात पलीकडून पावलांची चाहूल येते, तसा गरुड डिवीडी प्लेअर बंद करतो.
लक्ष्मी : "अय्या, मुनिवर तुम्ही कधी आलात?"
नारद : " मला येऊन बराच समय झाला देवी!"
"हो का! अग्गोबाई माझं लक्षच गेलं नाही. ह्यांच्यासाठी मिरची भजीची नवीन पाकृ ट्राय करत होते ना!"
नारद : "अरे वा! मग आम्हालाही एक प्लेट येऊद्याकी!"
टीपॉयवर पडलेली वेगवेगळ्या पोझमधल्या मादक ललनांची रेखाचित्रे बघत लक्ष्मी : "अग्गोबाई! ही कसली चित्रं? ही कुणी काढली? आणी इथे कशी?" विष्णूंकडे डोळे मोठे करुन!
गडबडीने विष्णू : "हां हां ते ना, अगं आपले दंतवैद्य कडमडकर नाहीत का ते एक गुणी बाळ आहे! कलाकार माणूस आहे. परवाच्या पृथ्वीभेटीत त्यानं सहज म्हणून रेखाटलीन म्हणे. माझी दाढ भरायला गेलो होतो तेव्हा दाखवलीन मला चित्रं, म्हटलं असूदेत काही दिवस जरा विरंगुळा!!"
लक्ष्मी " हुं! कलाकार म्हणे! असेनाका तुम्हाला कशाला हवीत असली चित्रं? काहीतरी चाळे मेले!!"
आता वाद उफाळून येणार असं दिसताच साळसूदपणे विष्णू : "पण मुनिवर तुम्ही आज अंमळ गंभीर दिसताहात! काय झालं तरी काय?"
एक मोठ्ठा सुस्कारा टाकत नारद : "ह्म्म्म्म्...काय सांगायचं देवा! पृथ्वीवरच्या पुरुषांवर मोठा अवघड प्रसंग ओढवणार आहे लवकरच."
"का काय झालं?"
"अहो देवा पूर्वी हुंडाबळी जात असे ऐकून आहात ना? आता बायकांना म्हणे ४९८ की काय असे कुठलेसे कलम मिळाले आहे म्हणे त्यामुळे सगळ्या नवर्यांची पाचावर धारण आहे!"
लक्ष्मी घाईघाईने : "खरं की काय? काय आहे हो कलम मुनिवर?"
विष्णू : "आं .....??"
नारद : "ह्या कलमाने एका सेकंदात नवर्याशी संबंध कलम केले जातात! आणि त्याला कायमचे वेठबिगारीच्या गर्तेत लोटून दिले जाऊ शकते. ह्या कलमाने समस्त स्त्री जातीच्या हातात एक विघातक अस्त्र मिळाले आहे! हा काय आत्ताच मी "तप्तपदी घटस्फोट मंडळा"च्या कार्यालयातूनच येतोय. हुतुतु म्हणून कोणी महान विद्वान आहेत त्यांनी सुरु केलंय म्हणे हे कार्यालय! भली मोठी रांग तर दिसत होती त्रस्त पुरुषांची बाहेर!"
विष्णू कावराबावरा चेहेरा करत : "हं आहे खरा गंभीर मामला!"
लक्ष्मी आनंदित होत : " बरं झालं. असं काहीतरी आहे हे तरी समजलं. चला आत्ता जातेच लगोलग आणी आणते सगळी माहिती!" लगबगीने आत आते.
नारदाच्या कानाशी लागत विष्णू : "मुनिवर अहो हा काय प्रकार आहे? ह्यातून तोडगा कसा काढायचा?"
नारद : " हॅ हॅ हॅ! आलात की नाही शरण? अहो सोप्पं आहे! तुम्ही लेको ते एकपत्नीव्रत वगैरे खुळं डोक्यात घेउन बसता आणी सगळे लोचे होतात!"
विष्णू : "मग, आम्ही करावं तरी काय?"
नारद : " देवा, अहो दिसली जरा छान बाई की 'हिच्यावर आमचा फार जीव!' असं म्हणायचं. चार चार बायका करुन आणायच्या! सवती मत्सराने त्यांना दिवसरात्र काही सुचेनासे होते. सगळ्याच एकमेकींचा विचार करत बसतात आणी आपली मज्जाच मज्जा! कसलं कलम ४९८ अन कसलं काय, द्या टाळी!!"
विष्णू : "माताय! हे मला सुचलंच नव्हतं!! बरं झालं आयडिया दिलीत!! आपण ह्याला कलम ४२० म्हणूयात!!!"
दोघेही मोठ्याने हसतात!! एवढ्यात लक्ष्मी येते आहे असं बघून नारद काऊच वरुन उठत म्हणतात
"बरंय तर देवा काळजी घ्या! प्रणाम देवी तुम्हीही काळजी घ्या. मी निघतो आता!"
पायात चपला सरकवत निघतात.
विष्णू आणी लक्ष्मी एकदम : "आं..हे काय चपला? खडावा कुठे आहेत?"
नारद : "नाही हल्ली मी गोंडेदार कोल्हापुरीच घालून जातो सगळीकडे, बर्या पडतात! चला निघतो. नारायण! नारायण!"
प्रतिक्रिया
11 Sep 2009 - 9:00 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
झबर्डस्ट!!! रंगाशेठ, केवळ झबर्डस्ट!!! काही काही गोष्टी मात्र अगदी सनातन आहेत हां... म्हणजे पावले वाजली की डिव्हीडी बंद करणे, गोंडेदार.....
रंगा, जबरीच रे... जियो मेरे शेर!!!
बिपिन कार्यकर्ते
11 Sep 2009 - 9:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =)) =)) =))
लै लै लै लै भारी ....
अदिती
13 Sep 2009 - 11:23 pm | टारझन
के व ळ अ प्र ति म !!!!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
क्रमशः कुठे दिसत नाही ते ?
12 Sep 2009 - 4:37 pm | गणपा
(नाडी सप्ताहा नंतर आता हास्य सप्ताह चालु झाला वाटते)
लगे रहो रंगाशेठ..
12 Sep 2009 - 10:12 am | प्रकाश घाटपांडे
काय सुंदर बतावनी हाय! सुरवातीला आम्ही शीन च्या ऐवजी शनी वाचल म्हनल काय ग्रहांची भानगड दिसतिया. नवग्रह संमेलन हाय कि काय?
आन ते खडावांच काय?खडावा म्हन्ल कि आम्हाला ते नाट्य गीत आठवत !( छोटागंधर्वांचे- अर्थाते हे ज्ञान आमाला बाप्पांकडुन मिळाल) काय बोबड बोलतात ना ते गान म्हंताना
पायी खदावा चुचु चुचु कदिती..... याय शाय जोदी जदतादी | जोकदाद शिदि बांदो ऽनी
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
11 Sep 2009 - 9:22 pm | श्रावण मोडक
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
प्रचंड हसून झाल्यानंतर हुश्श!
मेलो, खपलो, वारलो, चचलो हे सगळं होऊन गेलं की असं होतं की काय?
11 Sep 2009 - 9:36 pm | विकास
मेलो, खपलो, वारलो, चचलो हे सगळं होऊन गेलं की असं होतं की काय?
अहो कदाचीत यालाच वैकुंठवासी होणे म्हणत असावे ;)
11 Sep 2009 - 9:27 pm | प्रभाकर पेठकर
व्वा! मस्त आहे. मजा आली वाचताना. कल्पनाशक्तीला अजून जरा ताण द्या राव. तुमच्या प्रतिभेला आवर घालू नका.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
12 Sep 2009 - 2:49 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
12 Sep 2009 - 7:19 am | सहज
प्रतिभेला आवर घालू नका.
खल्लास!!!
11 Sep 2009 - 9:35 pm | विकास
O:)
एकदम मजेशीर!
11 Sep 2009 - 9:52 pm | प्राजु
सॉल्लिड!!! मजा आली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Sep 2009 - 9:52 pm | sujay
ह ह पु वा
=)) =)) =)) =)) =)) =))
12 Sep 2009 - 6:42 am | सुबक ठेंगणी
=)) =)) =)) =))
सकाळी सकाळी ठार मेले!
11 Sep 2009 - 9:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लय भारी...!
11 Sep 2009 - 10:12 pm | संजय अभ्यंकर
नानांकडून विनोदी लेखनाची स्फुर्ती मिळालेली दिसतेय!
चेस खेळून कंटाळलात काय?
=)) =))
लै भारी!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
11 Sep 2009 - 10:55 pm | अवलिया
दणक्यात रंगाशेट !!!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
मेंबर
काळु बाळु वग पार्टी
आमचे म्यानेजर - रंगाशेट मेंढरेरेटर
आमच्या कडं णिवाशी आणि हाणिवाशी लोकांला येकाच रेटने टिकट विकले जाते.
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
11 Sep 2009 - 11:12 pm | भडकमकर मास्तर
हेहेहेहेहे..मजेदार
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
12 Sep 2009 - 12:05 am | चित्रा
छान ठसकेदार संवाद.
मजा आली वाचायला.
12 Sep 2009 - 1:20 am | घाटावरचे भट
हा हा हा... मस्तच!!!
12 Sep 2009 - 2:39 am | नंदन
खुसखुशीत प्रासंगिक विडंबन मस्तच.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
12 Sep 2009 - 4:23 am | पाषाणभेद
:-)
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
12 Sep 2009 - 5:28 am | मिसळभोक्ता
"हे रंगाशेट ! ह्यांच्यावर आमचा फार जीव !"
एवढेच म्हणतो.
-- मिसळभोक्ता
12 Sep 2009 - 9:06 am | दशानन
अग्गाग्गाग्गा !
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) ||||||| =)) =))
=)) ||||||| =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
धमाका धमाका धमाका !!!!!
जबरा !
ह्या चाररंगाच्या माणसामध्ये लै रंग लपलेले आहेत ह्याचा अंदाज खरडवही मध्ये येत होता.. त्यातला एक रंग आज उतू गेलेला दिसतो आहे =))
जबरदस्त !
12 Sep 2009 - 12:45 pm | विमुक्त
लय भारी!... खूप हसलो...
12 Sep 2009 - 1:32 pm | परिकथेतील राजकुमार
माताय !!! =)) =))
रंगाशेठ एकदम सिक्सरच की हो ;)
रंगाशेठ म्हणजे आमच्या आवडत्या लेखकांपैकी एक.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
12 Sep 2009 - 2:29 pm | भाग्यश्री कुलकर्णी
लै भारी.
12 Sep 2009 - 7:14 pm | मीनल
+१
मीनल.
15 Sep 2009 - 8:35 pm | सूहास (not verified)
=)) =)) =)) =)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=)) =))
=)) =)) =)) =))
सू हा स...
15 Sep 2009 - 8:48 pm | अनिल हटेला
ज ह ब र्या !!! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
17 Sep 2009 - 6:50 pm | अजुन कच्चाच आहे
अगाबाब्बो!!
सगळे मिपालेख लक्ककन् डोळ्यासमोर उलगडत गेले.
.........
अजून कच्चाच आहे.