दिवसांवर दिवसांच्या राशी
जीवन म्हणजे खर्डेघाशी
फोडासम जपलेले शैशव
खपली धरते तळहाताशी
तुझ्या बटांशी खेळुन जावे,
वार्याची इतकी बदमाशी?
बांधू जेथे घरटे आपण
तिथेच मथुरा,तिथेच काशी
भुकेल्यांस भाकरी नसे, अन्
खाणारे खाऊन उपाशी
तुझ्याविना जगण्याची शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?
जरी वादळे येती ज़ाती
लाटांना भिडतात खलाशी
प्रतिक्रिया
20 Feb 2008 - 11:53 am | बेसनलाडू
कृपया शेवटचा शेर -
जरी वादळे येती ज़ाती
लाटांना भिडतात खलाशी
असा वाचावा.
(सुधारक)बेसनलाडू
अवांतर - प्रतिसाद आलेला नसताना प्रकाशित साहित्यकृतीचे संपादन करण्याची सोय आहे ना तात्या? असे संपादन कसे करायचे, याबद्दल मार्गदर्शन कराल काय?
20 Feb 2008 - 12:18 pm | विसोबा खेचर
प्रतिसाद आलेला नसताना प्रकाशित साहित्यकृतीचे संपादन करण्याची सोय आहे ना तात्या?
हो, आहे खरी! परंतु मला त्याबद्दल अधिक तांत्रिक माहिती नाही. नीलकांतराव काय तो खुलासा करतील..
कृपया शेवटचा शेर -
जरी वादळे येती ज़ाती
लाटांना भिडतात खलाशी
असा वाचावा.
(सुधारक)बेसनलाडू
तूर्तास, तशी सुधारणा केली आहे.
काही गैरसोय झाली असल्यास क्षमस्व!
धन्यवाद,
तात्या.
20 Feb 2008 - 12:09 pm | तात्या विन्चू
भुकेल्यांस भाकरी नसे, अन्
खाणारे खाऊन उपाशी
हे फार छान जमल आहे......
20 Feb 2008 - 12:12 pm | विसोबा खेचर
छान कविता...
बांधू जेथे घरटे आपण
तिथेच मथुरा,तिथेच काशी
तुझ्याविना जगण्याची शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?
या ओळी सुंदर...!
तात्या.
20 Feb 2008 - 12:29 pm | नंदन
फोडासम जपलेले शैशव
खपली धरते तळहाताशी
हा आणि 'उपाशी'चा शेर आवडले. आजच तीन दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर जावे लागल्यामुळे गझल अगदी समयोचित वाटली :)
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
20 Feb 2008 - 12:47 pm | स्वाती दिनेश
बेला,
बांधू जेथे घरटे आपण
तिथेच मथुरा,तिथेच काशी
हे विशेष आवडले.
स्वाती
20 Feb 2008 - 7:58 pm | अविनाश ओगले
तुझ्या बटांशी खेळुन जावे,
वार्याची इतकी बदमाशी?
जरी वादळे येती ज़ाती
लाटांना भिडतात खलाशी
हे शेर उत्तम.
20 Feb 2008 - 8:04 pm | ऋषिकेश
हाए हाए!!
भाई वा!
मस्तच!! गझल अतिशय आवडली!!
-ऋषिकेश
21 Feb 2008 - 7:47 am | वरदा
बांधू जेथे घरटे आपण
तिथेच मथुरा,तिथेच काशी
हे मनापासून आवडंलं....खूप छान आहे गझल....
21 Feb 2008 - 7:53 am | चकली
गझल आवडली. छान जमलीय !
चकली
http://chakali.blogspot.com
21 Feb 2008 - 9:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बेला,
गझल आवडली !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे