"आय टी " कंपन्या व "प्रोजेक्ट डिलीव्हरी अर्थातच मुल जन्माला घालणे ...... "

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
18 Feb 2008 - 8:06 pm

च्यायला ह्या "प्रोजेक्ट डिलीव्हरीच्या डेडलाईन " मुळे पार डोक्याची मंडई झाली पण काम काही संपतच नाही . त्या पच्छिम बंगालमध्ये चहाच्या मळ्यात राबणाऱ्या 'वेठबीगार' मजुरांच्या पेक्षा आमची अवस्था बेकार झाली आहे. ३२ तास झाले अजून घरी गेलो नाही. आमचा मॅनेजर , ती टेस्टींग टीम, तो ऑनसाईट को-ऑर्डीनेटर पार 'रक्ताची चटक लागलेल्या खविसासारखे' मागे लागले आहेत. दिवसभर त्या संगणकाकडे पाहून डोळे पार 'खंदिरगारासारखे' लाल झाले आहेत .....

तसे काम काही जास्त अवघड आणि अशक्य असे काही नाही पण वरच्या थरातील काही "बॉस" लोकांच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे आमची पूर्ण लागत आहे. पण करणार काय ? जे काही "प्रोटोकॉल " आहेत ते पाळावेच लागतील .....

यानिमीत्ताने विरंगुळा म्हणून मला पूर्वी आलेल्या एका 'मेलचे' मराठी भाषांतर मिपा. च्या रसिकांसाठी देत आहे....
कारण त्यामधून आमचे काम व त्यासाठी आमच्या संपर्कात येणारे लोक व त्यांची काम करण्याची पद्धत व त्यामागची भावना व समजूत याचे उत्तम वर्णन आहे ....

काही महत्वाच्या संकल्पना .........
प्रोजेक्ट डिलीवरी : मुल जन्माला घालणे .....
लेखाच्या सौंदर्याकरिता 'कार्यालयीन संज्ञांचे' मराठी भाषांतर टाळले आहे ...........

*प्रोजेक्ट मॅनेजर : या माणसाला वाटते की , ९ महिला मिळून एका महिन्यात एक मुल सहज जन्माला घालु शकतात ....

*डेवेलपर [ म्हणजे बोडक्याचे आम्ही ] :
आम्हाला असे नेहमी वाटते की एक मुल जन्माला घालण्यासाठी कमीत-कमी १८ महिने आवश्यक आहेत ....

*ऑनसाईट को-ऑरडीनेटर : ह्याला असे वाटते की एक बाई एका महिन्यात आरामात ९ मुलांना जन्माला घालू शकते .....

*क्लायंट : ह्याला "आपल्याला मुल नक्की कशासाठी हवे आहे ?" याचीच कल्पना नसते ....

*मार्केटींग मॅनेजर : त्याला असे वाटते की तो 'पुरूष व स्त्री' उपलब्घ नसताना सुध्धा मुल जन्माला घालू शकतो ..........

*रिसोर्स ऑप्टिमायझेशन टीम : यांना 'पुरूष व स्त्री' ची आवश्यकता वाटत नाही , ते शून्य मनूष्यबळाच्या अवस्थेतसुध्धा मुल जन्माला घालू शकतात अशी त्यांची खात्री असते .........

*डॉक्युमेंटेशन टीम : त्यांना मुल जन्माला आले काय आणि नाही काय ? सगळे सारखेच असते . त्यांचा संबंध फक्त त्या ९ महिन्यांच्या घडामोडींचे 'कागदोपत्री रेकॉर्ड' बनवण्यापूरताच असतो .....

*क्वालिटी ऑडीटर : हा मनुष्य "मुल जन्माला घालण्याच्या पद्धतीविषयी "कधीच समाधानी नसतो. त्याला नेहमी असे वाटते की अजून चांगल्या पद्धतीने मुल जन्माला घालता येउ शकते .....

*टेस्टर : ही व्यक्ती [ साधारणता सुस्वरूप कन्या ] नेहमी मुलाच्या आईला ते मुल अजून १००% टक्के परिपूर्ण नाही हे पटवून देण्याच्या मागे लागला असतो. त्याला नेहमी असे वाटते की अजूनसुध्धा मुलामध्ये काहीतरी कमी [ बग ] नक्कीच आहे .....

*टीम लीडर : ह्याला कुठल्या प्रकारचे मुल जन्माला घालण्यासाठी 'एकूण किती पुरूष व स्त्रीया लागतील व मुल जन्माला घालण्यासाठी नक्की किती वेळ लागेल ?" याची कल्पना असते. पण हा मनुष्य ही माहिती कधीच कुणाला सांगत नाही ....

मांडणीविनोदमुक्तकजीवनमानमौजमजाआस्वादभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

संजय अभ्यंकर's picture

18 Feb 2008 - 9:47 pm | संजय अभ्यंकर

एवढे तास काम करुन माणसची कार्यक्षमता तर संपतेच, परंतु व्याधीही मागे लागतात.
बाxxxx तो साहेब (आणि ती डेडलाईन), त्याला फाट्यावर मारुन घरी जाणे हाच उपाय.

वयाच्या तिशीत मी असले उपद्व्याप करित असे. पण असे लक्षात येऊ लागले की:
१)डेड लाईन जन्मात कधी संपत नाही.
२)कं. पगार देते म्हणजे नोकरांनी राबलेच पाहेजे, ही व्यवस्थापनाची ठाम समजुत असते.

(टाटाचा इंडिका प्लांट उभा रहात असताना, दिवाळिच्या सुमारास ती कुप्रसिद्ध डेडलाईन आली.
तिथल्या एका उच्चपदस्थाने (बॉसने), सगळ्यांची दिवाळीची सुट्टी रद्द करुन, त्यांना धक्याला लावले आणि स्वतः मात्र दिवाळी साजरी करायला, पोराबाळांसहित, गोव्याला निघुन गेला. ह्यात आमच्या काही सहकार्‍यांचीही दिवाळी बुडाली.)

३)जितके ज्यास्त तास काम तितक्या जास्त चुका. ४-५ तास काम करुन मिळवलेले यश, नंतरच्या ६ तासात आपण गमावतो.
आणी दुसर्‍या दिवशी सकाळी आदल्यादिवशीच्या चुका सुधारत बसतो.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

खरे मूल जन्मा येताना असे विचार करणारे कोण ते ? याचा शोध घ्यावा आता. अस स्शोधन विशय दिल्या बद्द्ल खुस झालो आम्ही

धमाल मुलगा's picture

19 Feb 2008 - 12:26 pm | धमाल मुलगा

डॉन भाऊ, माझी सहानुभुती रे!

ज्याच॑ जळत॑ त्यालाच कळत॑ म्हणतात ते खोट॑ नाही.
तुम्ही जात्यात दिसताय...आम्हीही सुपात आहोत..पुढच्या महिन्यात आहे आमचा जोरदार शिमगा!!!

मग काय, प्रोजेक्ट मॅनेजरच्या बैलाला...

असो, बाकी ते मेल मात्र यच्चयावत I.T. हमाला॑च॑ आवडत॑ आहे बहुधा :)

आपला
- ध मा ल. (सुपातला)