(डास)

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
1 Apr 2009 - 11:51 pm

या तनुचा माझ्या करशी दररोजचा घास तुझा
डोंबिवली वा धारावी, घरभर हा वास तुझा

तू जळी अन् तू नाली, इवलासा श्वास तुझा
ए.सी.च्या खालीसुद्धा रंगतो तो रास तुझा

मॉर्टीन असो वा कछवा, धसका जीवास तुझा
गुणगुणता कानी करती सगळे दुस्वास तुझा

नाना रुपे बळावे अवतार तो, भास तुझा
डेंग्यू अन् मलेरियाचा आजारी खास तुझा

तारशील भवसागरी? मागे घे डास तुझा
झोपु दे जरासे रात्री, प्रभु मी रे दास तुझा

प्रेरणा: क्रान्ति ताईंचा दास

कविताविडंबनजीवनमानराहणीमौजमजाप्रकटनप्रतिसादप्रतिभा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

1 Apr 2009 - 11:55 pm | मुक्तसुनीत

बेला ! बर्‍याच दिवसांनी आलात ! लई भारी !

प्राजु's picture

1 Apr 2009 - 11:59 pm | प्राजु

जोरदार आगमन!!!
लगे रहो!!

आवांतर : (डासांच्या त्रासाच्या वेदनेतून काव्य प्रसवलं असावं हे..)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

1 Apr 2009 - 11:59 pm | चतुरंग

बेला, बरेच दिवसांनी तुला विडंबनाचा डास चावला! ;)

चतुरंग

मीनल's picture

2 Apr 2009 - 12:04 am | मीनल

मी `दासा`चे रसग्रहण केले. =D>
आता या `डासा`चे मी काय रसग्रहण करणार. कारण डासच `रस` ग्रहण करतात ना! :))

मीनल.

चंद्रशेखर महामुनी's picture

2 Apr 2009 - 12:17 am | चंद्रशेखर महामुनी

या डासा ने... लै चावलं बघा...

नाटक्या's picture

2 Apr 2009 - 12:44 am | नाटक्या

बेलाशेठ आज काम नाही वाटतं? विकांतासाठी थोडा वेळ ठेवा...

शितल's picture

2 Apr 2009 - 1:08 am | शितल

विडंबन आवडले. :)

रेवती's picture

2 Apr 2009 - 1:52 am | रेवती

मजेशीर विडंबन!
=))

रेवती

क्रान्ति's picture

2 Apr 2009 - 6:03 am | क्रान्ति

काय मस्त धम्माल विडम्बन! अगदी झकास.
=)) =)) =)) =))
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

अनिल हटेला's picture

2 Apr 2009 - 6:23 am | अनिल हटेला

एकदम मजेशीर विडंबन !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मराठमोळा's picture

2 Apr 2009 - 7:47 am | मराठमोळा

काय पण ते डासांचे महाभाग्य म्हणावे..
बेलाच्या विडंबनात प्रभुचे स्थान मिळावे..
डासांच्या दुनियेत हे महाकाव्य ठरावे..
विडंबनाचे डास तुम्हास असेच चावत रहावे..

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Apr 2009 - 10:14 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच!

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

दशानन's picture

2 Apr 2009 - 11:05 am | दशानन

हिहिहिहिहिहिहिहिहिह !

मस्तच !

क्लासिक !

जयवी's picture

2 Apr 2009 - 1:10 pm | जयवी

विडंबनाचा डास चावला :)

श्रावण मोडक's picture

2 Apr 2009 - 2:17 pm | श्रावण मोडक

हीहीहीहीहीहीहीहीहीहीहीही!!!

राघव's picture

2 Apr 2009 - 3:26 pm | राघव

काय त्रास आहे.. डासाचा हो ;)

राघव

पल्लवी's picture

2 Apr 2009 - 6:19 pm | पल्लवी

वा वा...
काय पण सुचलंय !! हे हे हे !!!

मनीषा's picture

2 Apr 2009 - 7:53 pm | मनीषा

हे विडंबन आवडलं .

मदनबाण's picture

3 Apr 2009 - 4:41 am | मदनबाण

हे हे हे... झक्कास्स्स्स्स्... :)

मदनबाण.....

मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
जालावरुन सभार...

ऋषिकेश's picture

3 Apr 2009 - 11:29 am | ऋषिकेश

साला एक मच्छर लड्डु को कवी बना देता है ;)
खुसखशीत विडंबन :)

- ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2009 - 11:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेला , विडंबन झकास ! :)

मनातल्या मनात : आम्ही नमोगतींच्याही उत्तम लेखनाला मनापासून दाद देतो.

सुधीर कांदळकर's picture

5 Apr 2009 - 3:02 pm | सुधीर कांदळकर

मजा आली.

सुधीर कांदळकर.

लवंगी's picture

5 Apr 2009 - 3:08 pm | लवंगी

=)) =)) =))

बबलु's picture

6 Apr 2009 - 3:07 am | बबलु

बेलाशेठ... जबर्‍या बरं का !!!

....बबलु

पाषाणभेद's picture

6 Apr 2009 - 7:49 am | पाषाणभेद

प्र. के. अत्रेंची आठवण झाली.
- पाषाणभेद