श्रद्धा क्रमांक:-१)वेद/पुराण स्तोत्र आणि मंत्रामधून, मंत्रांना असलेल्या स्वरांमुळे येणाऱ्या लहरींचा भौतिक,जैविक स्वरूपाचा परिणाम आपल्या (शरीरावर) होतो
श्रद्धा क्रमांक:-२)वेद/पुराण मन्त्र व स्तोत्र म्हटल्यामुळे त्या त्या स्तोत्रा/मंत्रात-असलेल्या देवता विशिष्ट शक्तीच्या स्वरूपात आपल्याजवळ येतात.
श्रद्धा क्रमांक:-३) मंत्र स्तोत्र म्हणताना अथवा दुसऱ्याने म्हणलेले आपण ऐकताना मनाला एक प्रकारची शांतता लाभते, मनावरील ताण थकवा दूर होतो,व त्यामुळे ज्या देवतेचे आपण मन्त्र स्तोत्र म्हणतो तिची कृपा आपल्यावर होते असे आपल्याला वाटते, व या असे वाटण्याच्या मनात असलेल्या श्रद्धेमुळे आपल्याला (लढायचे) बळ,शक्ती,मनोधैर्य मिळते.
वरील पैकी पहिल्या दोन श्रद्धा निरपवादपणे खऱ्या ठरलेल्या नाहीत,तरी दुसरे कोणीही ह्या श्रद्धा बाळगत असतील तर ते "त्यांचे स्वातंत्र्य" आहे,जे मला मान्य आहे. मी तिसऱ्या श्रद्धेचा चहाता व भोक्ता व गरजू आहे. पुढच्या दोन व्हिडीओ मध्ये मी त्याबद्दल बरीच मते मांडली आहेत. एका छोट्या स्तोत्राचे पठणही केले आहे. आपण ऐकून आपली मते मांडावी.
व्हिडीओ 1:- मन्त्र आणि स्तोत्र याचे आपल्यावर होणारे (नक्की) परिणाम
https://youtu.be/cntlinl6zk0
व्हिडीओ 2:- विष्णूचे स्तोत्र मंत्र.
https://youtu.be/LxAQ9AjqrIo
प्रतिक्रिया
28 Mar 2020 - 2:58 pm | अत्रुप्त आत्मा
युट्यूब लिंक्स च्या एम्ड कोपीज करून त्या धाग्यात लावायच्या होत्या पण ते सर्व मी विसरलो, कृपया तसे संपादक आदींनी करून द्यावे.
19 Jun 2020 - 12:18 am | अत्रुप्त आत्मा
खेळ जमला. आता फक्त हे वरती धाग्यात लाऊन द्याल का संपादक महोदय. :)
19 Jun 2020 - 2:35 am | कोहंसोहं१०
तुम्हाला श्रद्धा क्रमांक ३ चा वैयक्तिक अनुभव आला असल्यास श्रद्धा क्रमांक १ त्याचे कारण असू शकेल. थोडक्यात श्रद्धा क्रमांक १ आणि ३ हे कारण आणि परिणाम.
श्रद्धा क्रमांक २ हा संपूर्णपणे वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. लकी असाल तर संकटकाळी अचानक मदतीचा अनुभव येतो किंवा कधीकधी आपल्या नकळतच संकट टळून पण जाऊ शकते
19 Jun 2020 - 10:12 am | अत्रुप्त आत्मा
तुमच्या मतानुसार तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते तुमच्या पुरते लागूही आहे. त्यात तुमचा तुम्ही आनंद मानावा. धन्यवाद.
19 Jun 2020 - 3:29 am | nutanm
MI vishesh shraddhalu nahi. aai mule kahisashi shraddha manat aste. Shraddha 1ani 2 cha kadhitari far KAMI anubhav aalela Ahe. .shraddha 3cha anubhav ya divalit Kahi karnamule man shant navte , bechain hote teva laxmipujan zalyavar arti mhantana mi sahaj 2/3ch aartya mhanayche tharvale asun 8/10 artya pustakatun vachun mhanat gele man barechse shant hot gele achanak bare vatle. Pan nantar khup divsani parat asech zalyawar artya devasamor basun mhantlya pan tashi shantata vatli nahi.
19 Jun 2020 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा
@shraddha 3cha anubhav ya divalit Kahi karnamule man shant navte , bechain hote teva laxmipujan zalyavar arti mhantana mi sahaj 2/3ch aartya mhanayche tharvale asun 8/10 artya pustakatun vachun mhanat gele man barechse shant hot gele achanak bare vatle. Pan nantar khup divsani parat asech zalyawar artya devasamor basun mhantlya pan tashi shantata vatli nahi. >>>असे होण्याचे त्याचे कारण म्हणजे ,एक तर लक्ष्मीपूजन हा रोजच्यापेक्षा वेगळा असलेला दिवस. त्या वेगळेपणाचा मनावर झालेला पहिला परिणाम. मग पूजा धूप दीप या वातावरणाचा एक अंतर्मन प्रसन्न करणारा परिणाम. या दोन परिणामांमुळे तुम्हाला आरत्या म्हणाव्या वाटल्या. व त्यांनी मनाचं झटकन विरेचन झालं व मन हलकं झालं.
पण नन्तर पुन्हा मनावर ताण आला असता तुम्ही आरत्या म्हणायचा प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळून आला नाही..कारण तो दिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवसासारखा नव्हता! आपण 15 ऑगस्ट,26 जानेवारीला समूहात राष्ट्रगीत म्हणतों त्याचा मनावर होणारा परिणाम घरी एकट्याने खोलीत दार बंद करून तेच राष्ट्रगीत म्हणून होत नाही... तसच हेही आहे.
19 Jun 2020 - 3:46 am | nutanm
Shirshkat tantra che spelling chukun lihile aahe, site var navin lihit aslyamule spelling mistake hotayat ,marathit lihayche pan mobile typing karat aslyamule mahit nahi.
19 Jun 2020 - 10:32 am | शा वि कु
दोन्ही व्हिडीओ भारी आहेत.
श्लोक/मंत्र केवळ वाचताना सुद्धा लायबद्धतेमुळे क्रमांक 3 चा परिणाम होतो. तुंबाडचे खोत मधली नदीची आरती वाचताना हे जाणवलेले.
19 Jun 2020 - 11:37 pm | अत्रुप्त आत्मा
@श्लोक/मंत्र केवळ वाचताना सुद्धा लायबद्धतेमुळे क्रमांक 3 चा परिणाम होतो. >>> येस. होतो असा परिणाम. आपल्या मनात मन्त्र श्लोकांची जी आवड असते ती असा परिणाम घडवून आणत असते.
20 Jun 2020 - 12:15 am | कोहंसोहं१०
मला मध्ये एकदा पडलेला प्रश्न गुरुजींना विचारायचा होता तो म्हणजे साधारणपणे (वैयक्तिक प्रश्न नाही) गुरुजी स्वतःसाठी किंवा स्वतःच्या परिवारासाठी कोणत्या नियमित पूजा करतात का की पौरोहित्य याकडे केवळ व्यवसाय म्हणून बघून केवळ ग्राहकांसाठीच पूजा करतात?
20 Jun 2020 - 12:32 am | एस
आपला दृष्टिकोन आवडला. मंत्र असो वा ईश्वर अस्तित्त्व, यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना ती स्वतःपुरती बाळगण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असलेच पाहिजे. आपण ज्या वातावरणात, संस्कारांत वाढतो, त्याचा आपल्या आचार-विचारांवर अमीट असा ठसा उमटतो. हिंदूंना हिंदू मंत्र पवित्र वाटतील, तितके कुराणातले आयते किंवा ख्रिश्चनांच्या प्रार्थना त्यांचा अर्थ समजला तरी तितक्या जवळच्या वाटणार नाहीत. हेच उलटही सर्व प्रकारच्या पार्श्वभूमीच्या व्यक्तींना लागू आहे. जोवर अशा श्रद्धा वैयक्तिक पातळीवर मर्यादित आहेत तोवर त्यांचा कोणाला त्रास व्हायचे कारण नसावे.
20 Jun 2020 - 1:18 pm | संजय क्षीरसागर
> श्रद्धा क्रमांक:-३) मंत्र स्तोत्र म्हणताना अथवा दुसऱ्याने म्हणलेले आपण ऐकताना मनाला एक प्रकारची शांतता लाभते, मनावरील ताण थकवा दूर होतो,व त्यामुळे ज्या देवतेचे आपण मन्त्र स्तोत्र म्हणतो तिची कृपा आपल्यावर होते असे आपल्याला वाटते, व या असे वाटण्याच्या मनात असलेल्या श्रद्धेमुळे आपल्याला (लढायचे) बळ,शक्ती,मनोधैर्य मिळते.
या देवता कुठे असतात ?
त्यांची भाषा तुम्हाला कुणी सांगितली ?
त्या कृपा करतात म्हणजे नक्की काय करतात ?
मंत्र न म्हणणार्यांवर हा कृपावर्षाव होत नसेल, तर
त्या देवता फक्त स्वतःच्या स्तुस्तीसाठी उत्सुक आहेत असा अर्थ होतो.
> मी तिसऱ्या श्रद्धेचा चहाता व भोक्ता व गरजू आहे.
धाग्यावर हे व्यावसायिक प्रमोशन कशापायी ?
20 Jun 2020 - 2:19 pm | अत्रुप्त आत्मा
20 Jun 2020 - 3:02 pm | संजय क्षीरसागर
प्रश्ण कळत नाही का उत्तर माहिती नाही ?
20 Jun 2020 - 3:42 pm | संगणकनंद
या प्रश्नांची उत्तरे तुम्हीही दिली नाहीत अजून.
प्रश्ण कळत नाही का उत्तर माहिती नाही ?
20 Jun 2020 - 11:51 pm | संजय क्षीरसागर
करतायं त्यांचं नांव त्याचू आहे.
ते कुठल्याही चर्चा किंवा प्रतिसाद न वाचता,
प्रतिसाद देतात हे त्यांनी स्वतः कबूल केलंय.
मानवी मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे
मी न्यूयॉर्क टाइम्सची लिंक देऊन सिद्ध केलं आहे
त्याचू स्वतःला कंप्युटरतज्ञ म्हणवतात, म्हणून
त्यांना कंप्युटरची कार्यप्रणाली इथे लिहा
म्हणजे केवळ एका प्रतिसादात मी अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग्जचा दावा सिद्ध करतो
हे सुद्धा सांगितलं आहे
पण त्याऐवजी ते प्रत्येक धाग्यावर,
स्वतःचं नांव सार्थ करुन दाखवण्याच्या मागे लागलेत.
अर्थात, कंप्युटरची कार्यप्रणाली वगैरे गोष्टी तुम्हाला कितपत कळतील हा प्रष्ण आहेच.
तस्मात, तुम्ही त्यांचे प्रतिसाद कॉपी/पेस्ट करुन, खरे त्याचू
आपणच आहोत असा दिखावा करु नका.
________________________________________
तुम्ही ज्या देवतांचे मंत्र म्हणता
त्या कुठे असतात याचा तुम्हाला पत्ता नाही.
त्यांची भाषा काय आहे आणि ती तुम्हाला कशी कळली ?
याचं तुमच्याकडे उत्तर नाही.
त्यामुळे तुम्ही ज्या भाषेत मंत्र म्हणता
ती भाषा त्यांना कळते असं समजणं
हा केवळ भाबडेपणा आहे
आणि तुमच्या एकूण कार्यक्रमातून
कुठल्या तरी इष्ट देवांची कृपावृष्टी,
आणि ती सुद्धा `ऐकणार्यावर ' होईल
हा तर गैरसमजाचा कहर आहे
__________________________________
आता किमान दोन गोष्टी करा :
त्याचूसारखे किंवा त्यांचे प्रतिसाद कॉपी /पेस्ट करु नका,
कारण मंत्र तुम्ही म्हणतायं, आणि
तुमचा काही अभ्यास असेल तर.
सभ्यपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करा.