मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मन्त्र,स्तोत्र आणि आपण..

अत्रुप्त आत्मा · · जनातलं, मनातलं
श्रद्धा क्रमांक:-१)वेद/पुराण स्तोत्र आणि मंत्रामधून, मंत्रांना असलेल्या स्वरांमुळे येणाऱ्या लहरींचा भौतिक,जैविक स्वरूपाचा परिणाम आपल्या (शरीरावर) होतो श्रद्धा क्रमांक:-२)वेद/पुराण मन्त्र व स्तोत्र म्हटल्यामुळे त्या त्या स्तोत्रा/मंत्रात-असलेल्या देवता विशिष्ट शक्तीच्या स्वरूपात आपल्याजवळ येतात. श्रद्धा क्रमांक:-३) मंत्र स्तोत्र म्हणताना अथवा दुसऱ्याने म्हणलेले आपण ऐकताना मनाला एक प्रकारची शांतता लाभते, मनावरील ताण थकवा दूर होतो,व त्यामुळे ज्या देवतेचे आपण मन्त्र स्तोत्र म्हणतो तिची कृपा आपल्यावर होते असे आपल्याला वाटते, व या असे वाटण्याच्या मनात असलेल्या श्रद्धेमुळे आपल्याला (लढायचे) बळ,शक्ती,मनोधैर्य मिळते. वरील पैकी पहिल्या दोन श्रद्धा निरपवादपणे खऱ्या ठरलेल्या नाहीत,तरी दुसरे कोणीही ह्या श्रद्धा बाळगत असतील तर ते "त्यांचे स्वातंत्र्य" आहे,जे मला मान्य आहे. मी तिसऱ्या श्रद्धेचा चहाता व भोक्ता व गरजू आहे. पुढच्या दोन व्हिडीओ मध्ये मी त्याबद्दल बरीच मते मांडली आहेत. एका छोट्या स्तोत्राचे पठणही केले आहे. आपण ऐकून आपली मते मांडावी. व्हिडीओ 1:- मन्त्र आणि स्तोत्र याचे आपल्यावर होणारे (नक्की) परिणाम https://youtu.be/cntlinl6zk0 व्हिडीओ 2:- विष्णूचे स्तोत्र मंत्र. https://youtu.be/LxAQ9AjqrIo

वाचन 9943 प्रतिक्रिया 0