मूळ कवीता आशयसंपन्न आहे,हा फक्त साचा तिथून उचलला आहे...
*******
नेहमीच मुदलातून वाचण्याची नाही हौस
अफवा मूळ शोधण्याचा मज नाही सोस
मूळ बातमी शोधण्यात कसली आलीय (?) मौज
भरपेट मीठ मसाला सुद्धा मिळत नाही रोज
सोसायटीत (मला)ओळखीत कुणीच नाही
जालात तर नाव सुद्धा घ्यायचे नाही
विधायक पाहण्यात तर मला रस नाही
दिप पणती भेटण्याचा मला आनंद नाही
विघ्नसंतोषी तरी प्रसिद्धीचा सुटेना वसा
मंगल दाखवून तुम्हीच दिला घुस्सा
अनुमान खालावले तर्कबुद्धी खुंटली
आत्ता मात्र हाव सुद्धा प्रखर वाढली
शोधतो वृत्तीला, जो प्रश्न वाढवेल
शोधतो मताला, जिथे दुभंग सापडेल
शोधतो जखमांना, तिथे खपली(च) निघेल
शोधतो जागेला, जिथे शिरकाव मिळेल
नोंद: पावट्याचे ब्लॉग सोडून जोगव्यासाठी साठी मिपावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. पावट्याचे मनोगत आणि कथा मांडण्याचा कवितेच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.
प्रतिक्रिया
17 Aug 2019 - 12:13 am | डॉ सुहास म्हात्रे
भारी ! सतत फुसकुल्या सोडणार्या काही आयडींना चपखल बसते आहे. ;) =))
17 Aug 2019 - 8:39 am | ज्ञानोबाचे पैजार
भारी लिहिले आहे ... लैच आवडले
भलत्याच त्वेशाने लेखणी चालवली आहे...
पैजारबुवा,
17 Aug 2019 - 9:33 am | पाषाणभेद
लयच सिरेस झालंय बगा.
18 Aug 2019 - 5:38 pm | प्रचेतस
मूळ पीठ कुठलं आहे?
18 Aug 2019 - 5:55 pm | यशोधरा
मेर्कू भी येच इन्फर्मेशन होना!
18 Aug 2019 - 7:54 pm | नाखु
मुळाक्षरे
इथे आहे,पण मूळ कवीतेचे हे विडंबन नाही तर छिद्रानवेशी आत्म्याची कथा आहे.
खुलाश्यातील खलाशी नाखु
18 Aug 2019 - 8:50 pm | प्रचेतस
=))