वाचायला(च) गेलो,
लिहून काय आलो?
आमंत्रण नव्हते तरी
ज्ञान पाजळून आलो ..
ना अर्थ आशयाचा
बोली.. लावून आलो .
कावलेल्या समयी
भडास काढून आलो ..
होते कोण न कोण
बघतोच मी कशाला ?
बिना वातीचेच (मुद्दाम)
कंदील लावून आलो ?
धागे जरी भिकार
डोके फिरवून आलो..
जाऊ मुळी न देता
संधी साधून आलो .
(जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)
प्रतिक्रिया
29 Jun 2019 - 6:40 pm | यशोधरा
आमंत्रणाविना, तरीही
पाजळून ज्ञान आलो..
असं चालेल का? पाजळून च्या ऐवजी मिरवून पण म्हणू शकता!
29 Jun 2019 - 7:37 pm | नाखु
हेच लिहीलं होतं पण मोबल्या स्वयंसुधारक मोठ्ठा घोटाळा करुन ठेवतोय.
त्याखाली जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित ही ओळसुद्धा गंडली
खुलासेदार वाचकांची पत्रेवाला नाखु
29 Jun 2019 - 7:46 pm | यशोधरा
नव्या बाटलीतल्या जुन्या दार्वांचा उल्लेख पण करायचा होता!!
29 Jun 2019 - 7:06 pm | ज्ञानोबाचे पैजार
मी पण धाग्यावर
प्रतिसाद द्यायला आलो
तुमचे विडंबन वाचून
खुश होउन गेलो
पैजारबुवा,
29 Jun 2019 - 7:17 pm | जॉनविक्क
अनेक सन्माननीय मिपा सभासदांच्या परिस्थितीचे नेमकं चित्रण।
29 Jun 2019 - 7:26 pm | कंजूस
खिक्क।
29 Jun 2019 - 7:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे लई भारी !
ते लई भारी !
नाखूबुवांचं ईडंबन
लईच भारी !!
=)) =)) =))
29 Jun 2019 - 8:13 pm | सतिश गावडे
कविता/गजल/विडंबन जे काही आहे ते झक्कास जमलं आहे.
3 Jul 2019 - 2:50 pm | प्रशांत
+१
29 Jun 2019 - 8:24 pm | चामुंडराय
भारीच नाखु काका
सद्यकालीन " हे पिऊन आले, ते करून आले " च्या पार्श्वभूमीवर हे खासच, स्पेशल नाखु टच :)
29 Jun 2019 - 9:21 pm | जालिम लोशन
-)):
1 Jul 2019 - 9:41 am | नाखु
प्रकट वाचकांचे आणि मूक वाचकांचे आभार
1 Jul 2019 - 10:59 am | टर्मीनेटर
धागे जरी भिकार
डोके फिरवून आलो..
जाऊ मुळी न देता
संधी साधून आलो .
हे खासच :)
2 Jul 2019 - 11:58 am | उपयोजक
जमलंय!!! :-)
3 Jul 2019 - 11:04 am | प्राची अश्विनी
विडंबन मस्त!
7 Jul 2019 - 7:27 pm | नाखु
किमानपक्षी आपण तरी वैयक्तिक पातळीवर न घेतल्या बद्दल विशेष आभार
कुठलाही सल्लागार नसलेला सामान्य मिपाकर वाचकांची पत्रेवाला नाखु
3 Jul 2019 - 12:44 pm | प्रचेतस
चाहत्यांच्या जगात तुमच्या
स्थाण मागत आलो
इतकी रांग पाहून
(गुपचुप)नंबर लावून गेलो.
3 Jul 2019 - 12:53 pm | यशोधरा
=))
3 Jul 2019 - 2:49 pm | प्रशांत
वल्ली चांगला प्रयत्न सुरु ठेवा
3 Jul 2019 - 3:15 pm | जॉनविक्क
गल्ली चुकली काय ?
3 Jul 2019 - 8:29 pm | सस्नेह
मिपाचालकांची ? गल्ली चुकली ?
3 Jul 2019 - 9:05 pm | जॉनविक्क
बहुतेक मलाच काही त्यांच्या वाक्यांचा संदर्भ लागत नसावा, असो. माझे विधान अथवा प्रतिसाद डिलीट केला तरी चालेल. काही अडचण नाही. :)
3 Jul 2019 - 9:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
जुने "वल्ली" = आताचे "प्रचेतस", हे समजल्यावर तुमचा गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. :)
6 Jul 2019 - 3:33 pm | जॉनविक्क
हे डुप्लिकेट आयडीचे प्रकरण आहे होय, आत्ता लक्षात आलं कि मिपाचालकांची गल्ली कधी का चुकत नसते ते. असो.
आपल्या विस्तृत माहितीबद्दल अतिशय धन्यवाद. -/\-
6 Jul 2019 - 6:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
(शिक्षण मोड सुरू)
हे "डुप्लिकेट आयडी"चे प्रकरण नाही.
ते स्वतःच्याच आयडिच्या बदललेल्या नावाने (पक्षी : प्रचेतस) सद्या लिहितात. असा नावबदल केल्यास, जुने नाव (पक्षी : वल्ली) बंद होते. त्यानंतरचे नवे व आयडीचे नाव बदलण्यापूर्वी लिहिलेले, लेख व प्रतिसाद, नवीन नावावर (उदा : प्रचेतस) दिसू लागतात. मिपामालकांना विनंती करून हे करवून घेता येते.
एकाच व्यक्तीने, एकाच वेळी दोन आयड्या काढून त्या आलटून-पालटून वापरल्यास (पक्षी : प्रत्येक आयडी वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असा आभास निर्माण केल्यास), ते डुप्लिकेट आयडी"चे प्रकरण बनते.
(शिक्षण मोड बंद) ;) :)
7 Jul 2019 - 2:54 am | जॉनविक्क
हा हा हा... माहितीसाठी धन्यवाद. विषय काय होता आणि कसा संपला :), हे मिसळपाव.कॉम म्हणजे ना खरोखर एक मोठं गहन आहे गहन, याचा पार सामान्याला कधी लागूच शकणार नाही असं वाटतं. रत्न आहे हे अंजावरील.
तसेच अफलातुन प्रकरण आहे प्रचेतस उर्फ वल्ली ताईंचे.
7 Jul 2019 - 12:22 pm | धर्मराजमुटके
वल्ली ताई नाहीत दादा आहेत !
7 Jul 2019 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
7 Jul 2019 - 1:23 pm | जॉनविक्क
भितींवर डोके आपटल्याची स्मायली कल्पावी. मिसळपाव.कॉम एक भुलभुलैय्या आहे हेच खरे.
बाकी माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो असे म्हणतात ते उगीच न्हवे ;)
7 Jul 2019 - 4:50 pm | नाखु
वहिनी पाहिजे ताई नको याची काळजी घ्यावी हीच नम्र विनंती
3 Jul 2019 - 4:38 pm | खिलजि
जबराव जबराव जबराव
खिलजी खुश हुआ
एकदम भारी बोलले तो शोल्लीड भारी है ये
3 Jul 2019 - 8:29 pm | सस्नेह
जबराट इडंबन =))
3 Jul 2019 - 8:39 pm | धर्मराजमुटके
मी थिंक करत होतो की ही कविता मा. श्री. हार्दिक पंड्या" जी को सादर समर्पित है की कसे :)
4 Jul 2019 - 9:07 am | अत्रुप्त आत्मा
4 Jul 2019 - 1:09 pm | राघव
हाहाहा.. लय भारी..
मालकानु, आणखी थोडी भर घालायची परवानगी असावी..
---
कसल्या पिंका अन् कसलं काय..
प्रतिसादांचे मातीचे[च] पाय..
हळूच काही काड्या सारून आलो..
फकड्यांची संख्या वाढवून आलो..
आता नादच खुळा त्याचे करायचे काय?
आपलेच बूड अन् आपलेच पाय..!
ताटातले खरकटे वाढून आलो..
चवीने हाडूक चघळून आलो..!!
--
राघव
4 Jul 2019 - 2:47 pm | भीडस्त
हौर आंदेव
6 Jul 2019 - 8:36 am | नाखु
कोण कोण आले प्रतिसादा,
हळूच पाहण्या आलो!!
साक्षात मालकांना पाहून गहिवरलो!!
मिपा सदस्य तपाचे पुण्य कामी आलो!!
सर्व नववाचकांचे आभार
6 Jul 2019 - 9:26 pm | अभ्या..
बागडण्यास्तव गेलो,
कसा बिघडून आलो?
अक्षरही न उमगे तरी
डेटा जाळून आलो.....
.
ना गावठी ना शहरी
मनाचा आरसा जहरी
ओळख पटवण्या स्वतःची
स्वतःस माळून आलो....
.
घटकेचे प्रवासी सगळे
अर्ध्यात उमजून गेलो
उरल्या अर्ध्याच्या हिशोबात
सरत्या अर्ध्यास विसरुन आलो...
.
कुणाशी वा, कुणाशी संवाद
कुणाशी खुन्नस हे ठरवूनच गेलो,
म्यान तलवारी असताही
परक्या नथीतून टोचून आलो..
.
आता काही न कळेना..
कशासाठी कुठे गेलो?
कोण होतास तू, काय झालास तू
प्रश्नचिन्ह घेऊन आलो....
.
वाह वाह वाह वाह (हेही माझीच)
6 Jul 2019 - 11:22 pm | नाखु
दिलखुलास दाद दिली आहे.
या निमित्ताने उपस्थित राहिले, वल्लीशेठ आणि अभ्याराजे हे काय कमी आहे.
आणि चालकांना धागा दखलपात्र वाटला हे चेरी अॉन केक
आनंदित वाचकांची पत्रेवाला नाखु
7 Jul 2019 - 5:49 pm | मदनबाण
कच्चा माल चांगला असला कि इथे प्रतिभेची स्पर्धा दिसुन येते. :)
अभ्या ने सुद्धा भारी लिवलं हाय !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #Breathless #ShankarMahadevan #VeenaSrivani