!!! जाणत्या राजाला मानाचा मुजरा !!!

घाशीराम कोतवाल १.२'s picture
घाशीराम कोतवाल १.२ in जनातलं, मनातलं
13 Mar 2009 - 10:16 am

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।

नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।

यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।

आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।

धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।

देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।

हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।

महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली।

कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला

।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

छत्रपती शिवाजीराजे भोसले

अधिकारकाळ जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०

राज्याभिषेक जून ६, १६७४

राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत

राजधानी
रायगड

पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले

पदव्या गोब्राह्मणप्रतिपालक

जन्म फेब्रुवारी १९१, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे

मृत्यू एप्रिल ३, १६८० रायगड

उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले

वडील शहाजीराजे भोसले

आई जिजाबाई

पत्नी सईबाई,सोयराबाई,पुतळाबाई,काशीबाई,सकवारबाई

संतती छत्रपती संभाजीराजे भोसले,
छत्रपती राजारामराजे भोसले

राजघराणे भोसले

राजब्रीदवाक्य
'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'

चलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)
१ - जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.

माहितिचा स्त्रोत विकिपिडिया .कॉम

थोरल्या आबा साहेबांना मानाचा मुजरा!!!

कथाबालकथाधर्मइतिहाससमाजविचारशुभेच्छाप्रतिसाद

प्रतिक्रिया

मृगनयनी's picture

13 Mar 2009 - 10:23 am | मृगनयनी


गोब्राह्मण-प्रतिपालक...क्षत्रियकुलावतंस...बहुजनोद्धारक...राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा!

हर हर महादेव!!!

:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मृगनयनी's picture

13 Mar 2009 - 12:39 pm | मृगनयनी

श्री शिवछत्रपतींची राजमुद्रा :

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

अवलिया's picture

13 Mar 2009 - 10:24 am | अवलिया

जय भवानी ! जय शिवाजी !!

--अवलिया

मराठमोळा's picture

13 Mar 2009 - 10:26 am | मराठमोळा

!!! छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!!

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

मैत्र's picture

13 Mar 2009 - 10:38 am | मैत्र

प्रौढ प्रताप पुरंधर, गोब्राह्मण-प्रतिपालक, क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!

अमोल नागपूरकर's picture

13 Mar 2009 - 10:49 am | अमोल नागपूरकर

!!! छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!!

अनंता's picture

13 Mar 2009 - 11:17 am | अनंता

जय -भवानी , जय- शिवाजी !!

शक्तिमान's picture

13 Mar 2009 - 11:48 am | शक्तिमान

प्रौढ प्रताप पुरंधर, गोब्राह्मण-प्रतिपालक, क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!

महाराजसाहेबांच्या चरणि आमचाही मानाचा मुजरा!
बाकी, ह्या दिव्यपुरुषाबाबत आम्ही यःकिंचित माणसांनी काय बोलावे? झेप नाही आमची! बस्स, गर्दन झुकवुन, लवुन मनोभावे मुजरा करणे इतकंच आम्ही करु शकतो महाराजांसमोर.

सह्याद्रीच्या कणाकणाला आपल्या पदस्पर्शाने पुलकित केलेल्या, बारा मावळावरची मरगळ झटकुन मर्दांच्या मर्दानगीला स्वराज्यप्राप्तीची धार चढवणार्‍या, आया-बहिणींना मानानं वागवणार्‍या, सार्‍या प्रजेवर पोटच्या पोरावर करावे असे प्रेम करणार्‍या ह्या जाणत्या राजाला मानाचा मुजरा!!!!!!!!!!!!

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Mar 2009 - 12:53 pm | घाशीराम कोतवाल १.२

राजे आम्ही शुद्र मानव तुमच्या जयंती निमित्त भांडतो
पण आपण केलेले कार्य फार थोर आहे
आपणास साष्टांग दंडवत मानाचा मुजरा
आणी काहि बोलणे योग्य नाही

**************************************************************

दिपक's picture

13 Mar 2009 - 12:48 pm | दिपक

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या चरणी माझाही मानाचा मुजरा !

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Mar 2009 - 12:52 pm | घाशीराम कोतवाल १.२

गर्जा महाराष्ट्रमाझाच
मस्त आहे हा पोवाडा शाहिर साबळेंचा पोवाडा आहे हा
अंगावर रोमांच उभे राहतात हा
पोवाडा ऐकुन
**************************************************************

रम्या's picture

13 Mar 2009 - 12:57 pm | रम्या

..माझाही मानाचा मुजरा!!!

जय भवानी ! जय शिवाजी !! जय शंभूराजे !!!
आम्ही येथे पडीक असतो!

सालोमालो's picture

13 Mar 2009 - 2:22 pm | सालोमालो

ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे|
माझीया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे|

सालो

अविनाशकुलकर्णी's picture

13 Mar 2009 - 2:23 pm | अविनाशकुलकर्णी

आमचाही मानाचा मुजरा!

विसोबा खेचर's picture

13 Mar 2009 - 2:28 pm | विसोबा खेचर

आमचेही कोटी कोटी दंडवत..

(नतमस्तक) तात्या.

अनामिका's picture

13 Mar 2009 - 5:35 pm | अनामिका

तव शौर्याचा एक अंश दे !
तव धैर्याचा जरा स्पर्श दे !
तव तेजांतिल एक किरण दे !
जीवनांतला एकच क्षण दे !
त्या दीप्तीतुनि दाहि दिशा द्रुत उजळुनि टाकू !
पुसू पानिपत !
पुन्हां लिहाया अमुचे भारत,व्यास-वाल्मिकी येतील धावत !!

समस्त मिपाकरांस शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
शिवरायांना मानाचा मुजरा!

"अनामिका"

सुभाष's picture

13 Mar 2009 - 6:13 pm | सुभाष

तव शौर्याचा एक अंश दे !
तव धैर्याचा जरा स्पर्श दे !
प्रज्ञा फारच स्फुर्तिदायक काव्य आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Mar 2009 - 6:20 pm | परिकथेतील राजकुमार

जय भवानी जय शिवाजी !!

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य