सहज..
जाळ्यावर विणले जाळे
शब्दांनी कसंरतं केली.
मी काहि केले नाही
अन्,सहजी कविता झाली.
जाळ्यावर विणले जाळे
शब्दांनी कसंरतं केली.
मी काहि केले नाही
अन्,सहजी कविता झाली.
कसं जमतं तुला, मनाला आवरणं?
किती सहज, हे तुझ असं विचारणं?
उत्तर द्यायला माझं पुरत भांबावणं
कितीएक क्षण नुसतचं गप्प राहण
गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला?
की सगळचं हे सहज शक्य होतय मला?
थोपवताना भावना घामाघूम जीव आपला
तुझ्यालेखी थट्टेचा, का विषय ठरला?
फुरंगटुन मी आणखीच व्हावं अबोल
समजवण्याच्या मिषानं तू यावं जवळ
लपवताना थरथर, मन उघडं पडावं
जे हवच होतं तुला, तुझं तु समजून घ्यावं
कापडाच्या दुकानात
एक कापड आवडलं
पण घेतलं नाही
दुकानदाराला सांगितलं
धागा छान आहे
रंग उत्तम आहे
नक्षीही सुरेख आहे
फक्त 'टेक्श्चर' चांगलं नाही
नंतर विचार केला, तेंव्हा
काही माणसं डोळ्यासमोर तरळली;
त्यांचही असंच आहे....
विठ्ठलाचा पुत्र
रुक्मिणीचा बाळ
संन्याशाचे पोर
म्हणूनी अस्पृश्य
नका देऊ अन्न
नका देऊ पाणी
नका देऊ थारा
पहा हा अस्पृश्य
सावली पडता
दूर हो म्हणती
शिव्या शाप देती
म्हणती अस्पृश्य
दुषणे ठेविली
भिक्षा नाही दिली
मुंज नाही केली
ठेविले अस्पृश्य
ज्ञानराज श्रेष्ठ
भक्तराज श्रेष्ठ
योगीराज श्रेष्ठ
परि तो अस्पृश्य?
गीता उपदेशी
बोले ज्ञानदेवी
ज्ञान करी मुक्त
परि तो अस्पृश्य?
विठोबाचा प्राण
विसोबाचा गुरू
हसी तो फसी या हिंदी सिनेमातलं 'ज़हनसीब' हे अत्यंत आवडतं गाणं ऐकत असताना सुचत गेलेल्या ओळी. विडंबन नाही, पण ज़हनसीब च्या चालीवर बसणारी ही कविता.
कधी कधी
कधी कधी
मी गातो एकट्याने
कधी कधी
अजूनही
अजूनही
आठवते एक गाणे
कधी कधी धृ
कधी काळी त्या ओळी माझ्या मला वाटल्या
मनाच्या गोष्टीही त्या शब्दांमध्ये दाटल्या
धूळीच्या राशी त्या दिवसांवर आता साठल्या
तरी पुन्हा
तरी पुन्हा
उलगडतो तीच पाने
कधी कधी १
(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना )
अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना
उघडे तसेच फेस्बुक
लॉगौट.. मन धजेना ..
मी फेस्बुकासमोरी
फेस्बुक-अॅडिक्ट आहे ..
मी हेच सांगताना
रुसुनी कधी बसावे
मी का इथून उठावे
समजूत का पटेना
धरसी अजब अबोला
तुज मौन सोडवेना ..
का पोस्ट मी लिहावी
चर्चाहि होत आहे
मेजवानी वाचका त्या
जाणून उत्सुकाहे
काही अटीतटीने
कुढता अढी सुटेना
कॉमेंट ये स्टेटसला
ऐसी स्थिती इथे ना ..
दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी,
सहजाच्या अलगद वार्याने रूपातुनं ती बोलावी.
सांगायाचे जे जे असते शब्दातुनं ते समजावे,
काव्य जरी ते ना ठरले तरी अर्थातुन ते तोलावे.
विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको,
माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको.
कुणी म्हणो तिज काव्य/मुक्तिका कुणी म्हणो तिज रचना ही,
कुणी म्हणो तिज शेरं-शायरी कुणी म्हणो तिज काहिही!
काव्याचे हे मर्म असे की भिडल्या वाचुन मुक्ति नव्हे!
भिडण्यास्तव ते करता यावे अशी कोणती युक्ति नव्हे!!!
चाईनीज बॉम्ब
जोरात फुटला
कानाचा परदा
कुणाचा हो फाटला.
फटाक्यांचा धूर
आकाशी दाटला
खोखलत-खोखलत
कुणाचा प्राण गेला.
आधी केली साफ -सफाई
मग पसरविला कचरा
दिवाळीचा सण मोठा
असा साजरा केला.
मी लोकलयात्री
स्टेशनावरी उभा ठाकतो
ट्रेनागमना पुढे वाकतो
युद्धासाठी सज्ज जाहतो
मी लोकलयात्री
गर्दी बघता चमकून जातो
तरीही क्षणात मी सावरतो
मग अंगीचे बळ जागवतो
मी लोकलयात्री
बसण्या जागा मृगजळ जरी
उभे रहाण्याचे बळ जरी
ट्रेन रिकामी बघून हर्षतो
मी लोकलयात्री
एकच गलका उडे क्षणातच
कुणी कधीचे कुठे क्षणातच
मेंढरापरी गर्दीत घुसतो
मी लोकलयात्री
नवे चेहरे रोज पुढ्यात
नवे वास मम नाकपुड्यात
रोज नव्याशी जुळवून घेतो
मी लोकलयात्री