पांढर धुकं काळ धुकं
आज नेहमीप्रमाणे सकाळी ७.३० वाजताची ७४० घेतली. रस्त्यावर धुकं पसरलेलं होत. दिल्ली केंटचा भागात वस्ती विरळ असते, त्या मुळे रस्त्यावर धुकं ही जास्ती दाट होत. धुक्याचा रंग जवळपास काळाच होता त्या मुळे २०-२५ मीटर पुढचे दिसत नव्हते. एक प्रकारची उदासी वातावरणात पसरलेली होती. एसी बसच्या खिडकीतून धुकं बघता-बघता बालपणाचे दृश्य डोळ्यांसमोर तरंगले. धुकं तेंव्हा ही पडायचं पण रंग मात्र पांढरा शुभ्र असायचा. धुक्याच्या परद्याला भेदून सूर्याची सोनेरी किरणे अंगावर पडायची तेंव्हा मन प्रसन्न व्हायचं. कधी-कधी धुक्यात सप्तरंगी इन्द्रधनु ही दिसायचे. पण आज सूर्याची सोनेरी किरणे ही काळपट वाटत होती.
