नेहमीच असा प्रश्न पडतो मला की मी का नक्की का जगतोय?
असं कोणतं काम करायचंय ज्याची आतुरतेने वाट बघतोय?
हजारो अपेक्षा होत्या माझ्याकडून त्यांना मी जागलो का?
ज्यांना जसे हवे होते तसाच त्यांच्याशी वागलो का?
आजपर्यंतच्या आयुष्यात किती जला णांच्या उपयोगी पडलो?
माझी मदत हवी होती अश्या किती घरांच्या पायऱ्या चढलो?
कितीतरी मनं मी दुखावली असतील… कितीतरीजण मला दुरावले असतील….
माझ्या अश्या वागण्याला तेच लोक काळाच्या ओघात सरावले असतील
आपल्याच धुंदीत जगलो … हवा तसाच वागलो....
कोणी कधी काही समजावले तर त्यालाच टाळू लागलो .....
ते सगळेजण गप्प राहिले म्हणजे मीच बरोबर असा अर्थ नाही…
आता कुठे मला कळतंय की मी जगायला अजूनही समर्थ नाही ….
वेळ हातून गेलेली नाही …खूप काही करता येईल........
ह्याच प्रयत्नात कदाचित …. जगण्याचा खरा अर्थ समजून जाईल .....
प्रतिक्रिया
19 Oct 2013 - 12:44 pm | मुक्त विहारि
"ते सगळेजण गप्प राहिले म्हणजे मीच बरोबर असा अर्थ नाही…"
...पण हे बर्याच मुद्दाम गहन विचार करणार्यांना पटत नाही...
तोच अतर लोच्या आहे....
19 Oct 2013 - 1:03 pm | अग्निकोल्हा
_/\_
तुफान. अतिशय आवडली कविता, तुमचे नाव माहित नाहीये पण एका व्यक्तिला मी ही कविता त्या व्यक्तिसाठी माझी वैयक्तिक भावना म्हणुन जशीच्या तशी फॉर्वर्ड करत आहे (-माम्लेदारचा पन्खा - http://www.misalpav.com/node/25870 असा वॉटरमार्क टाकुन).
19 Oct 2013 - 10:06 pm | धन्या
त्या व्यक्तीला शष्प फरक पडणार नाही.
19 Oct 2013 - 1:31 pm | माम्लेदारचा पन्खा
माझ्याच भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द सुचतील ते वापरले …कविता म्हणजे तरी काय असते? खोल पाण्यात बुडताना हाती लागलेली एखादी गोष्ट ज्यामुळे तरंगत राहून किनारा गाठायची आशा तरी निर्माण होते … कधी लाकडी ओंडका सापडतो किंवा मग नुसताच हवेचा पोकळ बुडबुडा !!
19 Oct 2013 - 1:35 pm | मुक्त विहारि
"खोल पाण्यात बुडताना हाती लागलेली एखादी गोष्ट ज्यामुळे तरंगत राहून किनारा गाठायची आशा तरी निर्माण होते … कधी लाकडी ओंडका सापडतो किंवा मग नुसताच हवेचा पोकळ बुडबुडा !!"
जे काही सापडेल ते टाका...
तुम्हाला हिरेच मिळतील असे वाटत आहे..
19 Oct 2013 - 10:58 pm | सुधीर
खोल पाण्यात बुडताना हाती लागलेली एखादी गोष्ट ज्यामुळे तरंगत राहून किनारा गाठायची आशा तरी निर्माण होते … कधी लाकडी ओंडका सापडतो किंवा मग नुसताच हवेचा पोकळ बुडबुडा !!सही, आवडलं!
19 Oct 2013 - 10:18 pm | धन्या
कविता आवडली.
खुप माणसं थोडयाफार फरकाने असंच आयुष्य जगत असतात. त्यातले काही तळ गाठल्यावर भानावर येतात, काहींना तरीही शुद्ध येत नाही. जे भानावर येतात त्यांच्या हातून निसटलेली वर्ष सभोवताली फेर धरुन नाचतात. जणू काही ती वर्ष त्या व्यक्तीला वाकुल्या दाखवतात.
हे असलं आयुष्य जगणं अगदी टोकाचं असेल तर आत्मकेंद्रीपणाची व्यक्तिमत्व विकृती ठरते.
20 Oct 2013 - 3:05 am | खटपट्या
स्वतःचे मनोगत वाचल्यासारखे वाटत आहे. खूपच छान