दृष्टांत
मला रोज रात्री स्वप्नं पडतात. कधी साधी, कधी विचित्र. पण रोज. नेमाने.
बरेचदा मला स्वप्नं लक्षातही रहात नाहीत. सकाळी उठून डोळे उघडले की रात्रीची काहीच याद उरत नाही.
आता मग असा प्रश्न पडू शकतो की स्वप्नं लक्षात रहात नसतील तर स्वप्नं पडतात हे कसं काय लक्षात रहातं?
गुड क्वेश्चन.
कारण स्वप्नात जे काही दिसतं, त्याचे अधिभौतिक परिणाम झालेले असतात. माझ्यासमोर, माझ्या अंगावरच.
माझा फ्यूज उडालेला असतो. साध्या रानटी भाषेत किंवा मराठीत (एकूण एकच) सांगायचं झालं तर माझा वीर्यपात होऊन सगळं काही गारेगार झालेलं असतं.