आज झाड़ फार खुष होत. त्याच्या छोटयाश्या कोवळशा फांदीला नवीन पालवी फुटली होती. झाडाला अगदी नातवंड झाल्याचा आनंद होत होता. बाकीच्या पान, फांदया, नवीन बाळानतीणी सारख्या त्या कोवळ फांदीचे कौतुक करीत होत्या. त्यातही ते छोटेसे कोवळ पान खुप सुंदर दिसत होत. पोपटी रंगांच ते पान लहान गोंडस बाळा सारख वाटत होत.
दिवसागणिक ते पान हळू हळू वाढत होत. पोपटी रंग जाऊन हिरवा रंग बाळस धरत होत. मुबलक सूर्यप्रकाश आणि पाण्याने त्याच तेज वाढत होत. त्याचा फांदीशी असलेला संबंध अधिकाधीक दृढ़ होत होता. हिरवा रंग अधिकाधीक घट्ट होत होता. झाड़ नियमित पणे त्या मोठ्या होणाऱ्या पानाच कोड कौतुक पुरवत होत. सकस आहार, मुबलक पाणी आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात ते पान तरूण होत होत.
त्या तरुण पानाला आता आपल्या सुदृढतेचा गर्व वाटू लागला होता. आता त्याला आपण इतर पाना पेक्षा सुंदर आहोत , ताक़दवान आहोत असा अहंकार चढू लागला होता. त्या पानाला आता स्वतंत्र व्हायच होत. आपल स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायच होत. कधी आपण झाडापासून विलग होतो अस झाल होत. ते योग्य संधीची वाट बघत होत. त्या झाडावर एके दिवशी एक अळी फिरताना पानाला दिसली. ही अळी आपल काम नक्की करेल अस पानाला वाटल. त्याने त्या अळीला आपल्याला झाड़ा पासून विलग होण्याची इच्छा प्रकट केली. इतर पानाना धक्काच बसला. त्यानी त्या पानाला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण ते पान काहीही एकणयाच्या पलीकडे गेल होत. पुन्हा एकदा विचार करून पहा अळीने पानाला सावध केल. पान आपल्या निश्चयावर ठाम होत. झाड़ उघड्या डोळ्यांनी हे सर्व बघत होत. त्याला खुप वाईट वाटत होत. ते मुक़ाश्रू ढाळत होत. शेवटी जड़ अन्तकरणाने झाडाने अळीला परवानगी दिली. अळीने मग आपल्या कामाला सुरुवात केली. हळू हळू ते पानाचा देठ कुरतडू लागल. पानाला अतीव वेदना होऊ लागल्या पण ते निमूट पणे सहन करीत होत. स्वतंत्र व्हायच्या वेगळ्या व्हायच्या ध्यासाने ते त्याही वेदना सहन करीत होत. झाडाला पानाच्या वेदना बघवत न्हवत्या ते पानाला गोंजारत होत त्याच दुःख कमी करण्याचा प्रयत्न करीत होत. अखेरीस अळीने शेवटचा घाव घातला आणि पान झाडापासून विलग झाल आणि वार्यावरती उडू लागल. पानाला हर्षवायु व्हायचच बाकी होत. आता ते मुक्त झाल होत. अधिक शक्तिशाली झाल्याचा अभिमान पानाला वाटत होता. पण पानाचा हा आनंद काही काळच टीकला. अचानक वारा पडला आणि ते पान वेगाने जमीनीच्या दिशेने वेगाने येऊ लागल. आता पानाला थोड़ी भीती वाटू लागली. पानाला घट्ट धरणारा देठ आता पानाबरोबर न्हवता. पानाला आता कुठलाच आधार न्हवता.
इथे झाडाला त्या आपल्या अंगाखांद्यावर खेळणार्या पानाची खुप आठवण येत होती. पानाच्या रिक्त जागे कड़े पाहून ते अश्रू गाळत होत. पण त्या झाडाला आता उदास होऊन चालण्य सारख न्हवत. त्याच्यावर इतर पानांची फुलांची फलांची जवाबदारी होती.
तिथे ते पान वेगाने मातीत आपटल. क्षणभर पानाला काही कळले नाही. पण दुसऱ्या क्षणी उभी राहिली ती केवळ वेदना तीक्ष्ण वेदना. अंग अंग भर पसरणारी कण कण दुखावणारी वेदना. मातीत पडून त्याची काया आता मातकट झाली होती. शरीर गलिच्छ झाल होत मन रिक्त झाल होत. आता हळू हळू शनै शनै पानाला ग्लानी येऊ लागली. खाद्य पाण्याची आवश्यकता जाणवू लागली. त्याला मूर्च्छा येऊ लागली. दिवसेंदिवस त्या पानाच तेज कमी होवू लागल. हिरव्या रंगावर पिवळट कोड उमटल ते कोड शरीरभर पसरल आणि काही दिवसांनी ते पान पूर्ण पिवळ झाल. त्याच्यावर वार्धकयाच्या खुणा दिसू लागल्या. त्याला आता झाडाची आठवण येत होती पण काही इलाज न्हवता.आणिक काही दिवस सरले ते पान आता मातक़ट होवू लागल. त्याच्या शिरा नसा आता दिसू लागल्या होत्या अंगावर जाळी पडत होती. त्याचा अखेरचा प्रवास आता सुरू झाला होता. त्या पानाला आपली चूक कळली होती. त्या पानाने आता मृत्यु पूर्व आकांत सुरू केला पण आता केवळ अंतिम क्षणाची वाट बघण्याचा एकच उपाय पानाकडे होता.
आता वसंत ऋतु सुरू झाला होता. पक्षी घरटी बांधणयाचा खटपटीत होते. घरटी बाँधण्या साठी योग्य शाखा हेरत होते. त्या करीता बारीक काटक्या, कापूस, काथ्य शोधत होते. अश्याच एका पक्षाच्या जोडीने त्या जीर्ण गलितगात्र मरण अनतीत पानाला उचलले. पानाने जड़ डोळ्यांनी ते पाहिले. आता आपले प्रारब्ध काय आहे है त्याला कळत न्हवते. त्या पक्षाने त्या पानाला झाडावरच्या काटक्यात हळूच पसरले. आपल्या सृजना साठी तो पक्षी नवीन मऊशार बिछाना करीत होता. पानाचा अंतिम श्वास आता जवळ आला होता. त्याची शेवटाची वेळ आली होती. पान आता वेदनेच्या पलीकडे गेले होते. पानाने अखेरीस प्राण त्यागला. योगा योगाची गोष्ट म्हणजे ते तेच झाड़ होते ज्याचा ते पान कधी अविभाज्य भाग होते. त्या पानाच्या निर्मीताचा आनंद त्या झाडाने पानाच्या रूपाने आधी घेतला होता आता तेच पान मृत्यु नंतर पक्षाच्या पिल्लाच्या निर्मीतेचे एक भाग ठरणार होते. सृजनतेचे निर्मीतीचे एक वर्तुळ आता पूर्ण होऊ घातले होते.
प्रतिक्रिया
24 Nov 2018 - 12:23 am | श्वेता२४
खूपच आवडलं
24 Nov 2018 - 2:08 pm | पद्मावति
सुंदर!
24 Nov 2018 - 2:46 pm | विनिता००२
खूप मस्त लिहीलेय :)
24 Nov 2018 - 2:58 pm | मार्मिक गोडसे
मस्तच
25 Nov 2018 - 6:43 pm | सविता००१
छानच लिहिलय
25 Nov 2018 - 8:25 pm | प्रमोद देर्देकर
बाप रे एका पानावर हा एक अख्खा निबंध लिहू घातला की तुम्ही.
आवडलं..