पुरस्कार परत करण्याचा आनंद मिळाला नाही ही खंत!
पुरस्कार परत करण्याचा आनंद मिळाला नाही ही खंत!
सायंकालची वेळ. दरवाजा उघडून बाईंनी बाबारावांना आत घेतले. हुप्प चेहरा पाहून काहीतरी बिनसले आहे हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. नातवंडाला घेऊन त्याचा डॅड परतला. एका हातात चॉकलेट अन दुसऱ्या हाताने मोबाईलवरील कार्टून पाहात त्याने शूज उतरवले.
‘चार्वाकवादावरचा लेख पेपरात आल्याने सकाळी उसाही दिसणारे बाबाराव आत्ता रुसलेले का?’ असा मुलाने हात करून आईला प्रश्न केला. ‘काय की’ म्हणून त्यांनी तोंड फिरवले.
‘काय रे, ते शूज रॅकवर कोण ठेवणार? तुझा बाप?’ बाबारावांचा नातवावर राग निघाला.