'तंबोरा' एक जीवलग - २
कालच्या लेखात तंबोर्याबद्दल माहिती लिहिली ती तंबोर्याची निमिती, जडणघडण आणि भाग या संबंधीची होती. आज जे लिहिणार आहे ते मला आलेल्या तंबोर्यासंबंधीच्या अनुभवाविषयी. लहानपणी तंबोरा हातात आला तो परंपरेनं. आई गायची म्हणून. मला खरं म्हणजे शिकायचं होतं. गाणं करायचं नव्हतं पण शिक्षणाचे वातावरण नव्हते. मला शिकवण्यासाठी फारशी उमेदही कुणी दाखवली नाही. कुणी म्हणजे आईनेच. तिचे आपले एकच " तू गाणंच कर व्यवस्थित" तोच आपला पोटापाण्याचा व्यवसाय. स्वराला पक्की होतेच, गळ्यात गोडवाही होता. बुद्धी तेज चालायची. हे सगळं गाण्याच्या पथ्यावर गेलं आणि शिक्षण राहिलं.