रुसण्याची मजा
मानवी भावभावना किती सुरेख असतात, नाही? त्यातही कित्येक वर्षांपासून चर्चिला जाणारा आणि पुढील अनेक वर्षात देखील अजिबातच शिळा न होणारा विषय म्हणजे प्रेम! त्यातही हे प्रेम जर प्रियकर प्रेयसी या प्रकारातले असेल तर मग विचारायलाच नको. आपण वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असलो तरी हा विषय टाळता येणं तसं अवघडच. बरं गंमत म्हणजे ह्या नात्यात काही ठराविक मार्गच नेहमी आपलेसे केले जातात. एकदा प्रेमात पडलात की कोणी काय करायचं आणि त्याहीपेक्षा काय नाही करायचं हे जवळपास ठरलेलंच असतं. म्हणजे बघा ना कितीही नवी पिढी असली तरी काही गोष्टी ह्या क्वचितच बदलतात. ह्या सुंदर नात्यात खूपशा भावना आहेत.