अच्छे चाचा कच्चे चाचा
"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... " तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.