बाप्पा
बाप्पा
धीन ता धीन धीन ता धीन ता धीन धीन ता धीनधीनधीनाक धीनधीनधीनाक
बाप्पा
धीन ता धीन धीन ता धीन ता धीन धीन ता धीनधीनधीनाक धीनधीनधीनाक
" अशी जवळ ये ना "
नाही म्हणायचं होत तिला पण तिच्या तोंडातून शब्दच बाहेर नाही पडले . तो जवळ येतच गेला ....
" आई " ती कळवळली . एक जोरदार फटका पडला होता . हि बसायची जागा आहे कि फटाके मारायची आईला तर काही कळत नाही .
" अग कार्टे किती वेळ लोळत पडली आहेस उठ आणि आवर तुझं "
छे किती भारी स्वप्न होत आणि आईनं काय वाट लावली त्याची . परत असं पालथं झोपायचं नाही किती जोरात मारलय सगळी बोट उठली असतील . लाल झालं असेल . बघावं म्हटलं तर तेही सोपं नाही असू दे . ती पार्श्वभाग चोळत मनात म्हणाली .
आमचं कुलदैवत ~ पुलदैवत
पुलंची जन्मशताब्दी असं वाचल्यावर जरा आश्चर्यचकित झालो. पुलं आज असते तर 100 वर्षाचे झाले असते. पण झाले असते? पुलं गेलेच कुठे आहेत..ते अजूनही त्यांच्या पुस्तकातून, वेगवेगळ्या व्यक्तीरेखांतून आजूबाजूलाच आहेत. परवा कोकणात फिरतांना अंतू बरवा दिसले..हेदवी ला शिवराम गोविंद दिसले, बेळगाव- कारवार ला रावसाहेब दिसले. पुलं त्यांच्या पुस्तकांमधून, नाटकांमधून अजूनही आपल्याला भेटतातच की. शेवटी एवढेच म्हणेन की..
अत्यंत सफाईदार वळणे घेत इन्स्पेक्टर पाटलांची पोलीस व्हॅन 'ग्रीन वाइल्ड रेसोर्ट' मध्ये शिरली तेव्हा इन्स्पेक्टर पाटील सकाळपासून घडलेल्या घटना आठवत होते. आज सकाळी सहा वाजता जेव्हा इन्स्पेक्टरांना फोन आला तेव्हा ते मॉर्निंग वॉक करून नुकतेच घरी पोचलेले होते. रिसॉर्ट मध्ये खुनाची केस हि फार गंभीर बाब होती. एक तर ग्रीन वाईल्ड हे फार मोठं आणि नावाजलेलं रिसॉर्ट होतं आणि दुसरं म्हणजे खुनाच्या बातमीनं रिसॉर्ट मध्ये वास्तव्यास असलेल्या इतर लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची दाट शक्यता होती. सकाळच्या नाश्त्यासाठी पण न थांबता पाटील सगळ्यात आधी खून झालेल्या स्थळी पोहोचले.
नमस्कार मंडळी,
माझं पहिलं ई-पुस्तक 'अरण्यबंध'काल बुकगंगा.कॉम वर प्रकाशित झालं.
हे पुस्तक म्हणजे प्रसिद्ध बंगाली पुस्तक "आरण्यक"( लेखक श्री बिभूतीभूषण बंदोपाध्याय) चा मराठी अनुवाद आहे.
पुस्तकाविषयी थोडक्यात :
कोलकात्यासारख्या महानगरात वाढलेला सत्यचरण एका जमिनदाराच्या मालकीच्या जंगल महालाचा इस्टेट मॅनेजर म्हणून रुजू होतो. पण त्या निर्जन अरण्यात आल्यानंतर आल्यापावली परत जाण्याचा विचार ते त्या अरण्याच्या प्रेमात पडणं, या परिवर्तनाचा आलेखं मांडणारं हे पुस्तक.....
या सोबत ओघाने येणारी निसर्गवर्णनं, भेटलेली माणसं... आणि बरंच काही....
“कबूल का करत नाहीस ? एकदाचं मान्य करुन मोकळी हो . रोजचं तीळ तीळ मरणं . त्यापेक्षा, एकदाच हो, आहे माझं तुझ्यावर प्रेम, तुझ्याशिवाय़ काहीच सुचत नाही, म्हण आणि मोकळी हो .”
तो आज फार बोलत होता, माझी घुसमट पाहवत नव्हती त्याला. पण, मी एकटी ने मान्य करुन काय होणार होतं? जो मला हे मान्य करायला सांगतोय तो मात्र कुणा दुसरीतच अडकलाय आणि हो प्रामाणिकपणे
हे पहिल्याच भेटीत सांगितलं. मग तरीही मी त्याच्यात का अडकली असेन? गुंतणं आपल्या हातात नसतं, हेच खरं.
"तुम्हीच मिसेस शांभवी सरपोतदार ना?" इन्स्पेक्टर पाटील ह्यांचा आवाज शांभवीच्या अवाढव्य बंगल्यात घुमला.
"अं...हो मीच शांभवी सरपोतदार." शांभवीनं अत्यंत खालच्या आवाजात उत्तर दिलं. 'अमितचा खून झालाय' हे अथर्वनं बोललेलं वाक्य अजूनही तिच्या डोक्यात फिरत होतं. कशीबशी सावरून जणू काही आपल्याला काही झालंच नाहोये हे अथर्वला भासवत ती जरी खाली हॉल मध्ये पोहोचलेली असली तरी तिचं हृदय एवढ्या जोरात धडधडत होतं कि आता ते फुटून बाहेर पडतंय की काय असं तिला वाटत होतं.
"काय झालं मिसेस शांभवी सरपोतदार? म्ही फारच बिथरलेल्या दिसताय." इन्स्पेक्टर पाटील एक डोळा बारीक करत म्हणाले.
- डॉ. सुधीर रा. देवरे
रोशनी, जवाहर आणि अखिलेश या तिघांचीही हत्या करण्यासाठी बॅट्रॅकटॉक्सिन वापरण्यात आलं आहे हे ऐकून चारु नखशिखांत हादरली होती. रोहित बँगलोरला डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये आलेला असतानाची सारी चर्चा क्षणांत तिच्या नजरेसमोर फिरुन गेली!
"मिसेस द्विवेदी, तुम्ही डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये असिस्टंट म्हणून काम करता, राईट?"
"येस!" चारु स्वत:ला सावरत उत्तरली.
"तुम्ही आणि शेखर अमेरीकेहून परत येताना कोलंबियात थांबून बॅट्रॅकटॉक्सिन घेवून मुंबईला आलात, करेक्ट?"