नमस्कार मंडळी,
माझं पहिलं ई-पुस्तक 'अरण्यबंध'काल बुकगंगा.कॉम वर प्रकाशित झालं.
हे पुस्तक म्हणजे प्रसिद्ध बंगाली पुस्तक "आरण्यक"( लेखक श्री बिभूतीभूषण बंदोपाध्याय) चा मराठी अनुवाद आहे.
पुस्तकाविषयी थोडक्यात :
कोलकात्यासारख्या महानगरात वाढलेला सत्यचरण एका जमिनदाराच्या मालकीच्या जंगल महालाचा इस्टेट मॅनेजर म्हणून रुजू होतो. पण त्या निर्जन अरण्यात आल्यानंतर आल्यापावली परत जाण्याचा विचार ते त्या अरण्याच्या प्रेमात पडणं, या परिवर्तनाचा आलेखं मांडणारं हे पुस्तक.....
या सोबत ओघाने येणारी निसर्गवर्णनं, भेटलेली माणसं... आणि बरंच काही....
माझं हे पहिलंच पुस्तक असल्याने रसिक मिपाकरांनी वाचून दिलेला अभिप्राय माझ्यासाठी खूप मोलाचा ठरेल . शक्य झाल्यास बुकगंगा.कॉम वरही अभिप्राय नोंदवावा ही विनंती.
प्रतिक्रिया
19 Nov 2018 - 12:05 pm | मुक्त विहारि
पुस्तक लिहून प्रकाशित केल्या बद्दल अभिनंदन....
19 Nov 2018 - 1:19 pm | नूतन
मनःपूर्वक आभार
19 Nov 2018 - 12:26 pm | पुंबा
वा!!
ह्या कादंबरीविषयी बरंच ऐकलंय.
हार्दिक अभिनंदन. किंडलवर मिळेल का हे पुस्तक?
19 Nov 2018 - 1:22 pm | नूतन
हो, पुस्तक बुकगंगा ई रिडर वरुन डाउन लोड करताना किंडल पर्याय निवडावा. अर्थात माझ्याकडे किंडल नसल्यामुळे मी स्व्तः करुन पाहिलेले नाही
19 Nov 2018 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
अभिनंदन !
19 Nov 2018 - 1:23 pm | नूतन
मनःपूर्वक आभार
19 Nov 2018 - 1:25 pm | समीरसूर
आपल्या पहिल्या पुस्तकाला अदंड यश लाभो ही सदिच्छा! नक्की वाचणार!
माझं पहिलंच पुस्तक जून २०१८ मध्ये प्रकाशित झालं. ही इंग्रजी कादंबरी आहे. 'Wavy Bob' असं या कादंबरीचं नाव आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध अनुभवांवर आणि समस्यांवर आधारित ही कादंबरी आहे. कृपया वेळ मिळाल्यास नक्की वाचा. ही कादंबरी अॅमेझॉनच्या सगळ्या साईट्सवर छापील आणि ई-बुक आणि किंडल व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. तसेच फ्लिपकार्ट, इन्फीबिम वगैरे साईट्सवर देखील उपलब्ध आहे.
19 Nov 2018 - 3:05 pm | नूतन
मनःपूर्वक आभार.
पुसतक नक्की वाचेन.
19 Nov 2018 - 1:32 pm | प्रमोद देर्देकर
आरण्यक नाटक या वरूनच घेतलं य काय ?
19 Nov 2018 - 3:08 pm | नूतन
ते वेगळं आहे.ते महाभारतावर आहे
19 Nov 2018 - 1:55 pm | अनिंद्य
आरण्यक मराठीत !
पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन !
19 Nov 2018 - 2:07 pm | शित्रेउमेश
अभिनंदन....
19 Nov 2018 - 2:36 pm | वरुण मोहिते
आणि अनेक शुभेच्छा.. तसेच समीरासूर ह्यांचे पुस्तक पण वाचण्यात येईल.
19 Nov 2018 - 3:10 pm | नूतन
धन्यवाद अनिंद्य,शित्रेउमेश,वरूण
19 Nov 2018 - 3:40 pm | गतीशील
छापील पुस्तक सुद्धा आहे का? मला e पुस्तके वाचायला आवडत नाही. छापील असेल तर उत्तम. नसेल तर मी ते प्रिंट काढून घेईन पण वाचेन नक्की.
19 Nov 2018 - 7:17 pm | नूतन
सध्या तरी इ बुक आहे. मागणीनुसार छापील प्रत काढणं व्यवहार्य झाल्यास
प्रयत्न करेन
19 Nov 2018 - 7:55 pm | नूतन
सध्या तरी इ बुक आहे. मागणीनुसार छापील प्रत काढणं व्यवहार्य झाल्यास
प्रयत्न करेन
19 Nov 2018 - 6:46 pm | दुर्गविहारी
अभिनंदन! हे पुस्तक नक्की वाचायचा प्रयत्न करेन.
आणि भविष्यात आणखी पुस्तके आपल्या किबोर्ड मधून उतरावीत हि शुभेच्छा.
19 Nov 2018 - 7:10 pm | जयंत कुलकर्णी
अभिनंदन.... मनापासून.
19 Nov 2018 - 7:20 pm | नूतन
अभिनंदन आणि शुभेच्छांबद्दल दुर्गविहारी आणि जयंत कुलकर्णीचे मनापासून आभार
20 Nov 2018 - 6:56 am | प्रमोद देर्देकर
बूकगंगा वर तर तुमचे नाव अर्चना बळवंत पटवर्धन असे दिसतंय मला वाटले की नुतन सावंत हे खरे नाव आणि तुम्ही
मिपावर सुरंगी ह्या आयडीने लिखाण केले असेल. पण हा ही दुसरा आयडी घेतलेले नाव आहे होय.
बाकी किंडलची लिन्क द्या की.
Category: ललित https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5066327929679063062
20 Nov 2018 - 7:14 am | सुधीर कांदळकर
अनेक, अनेक शुभेच्छा.
20 Nov 2018 - 7:50 am | प्रमोद देर्देकर
बूकगंगा वर तर तुमचे नाव अर्चना बळवंत पटवर्धन असे दिसतंय मला वाटले की नुतन सावंत हे खरे नाव आणि तुम्ही
मिपावर सुरंगी ह्या आयडीने लिखाण केले असेल. पण हा ही दुसरा आयडी घेतलेले नाव आहे होय.
>>>>>
क्षमा असावी नुतन सावंत आणि नुतन या दोन आयडी मध्ये गफलत झाली.
सं.पा. मं. माझा वरिल आणि हा असे दोन्ही प्रतिसाद कृपया काढुन टाकाल काय?
20 Nov 2018 - 11:05 am | कलम
हार्दिक अभिनंदन!
20 Nov 2018 - 11:42 am | कंजूस
अजून मराठी लेखन वाचून दाखवणारी अॅप्स चांगली निघायची आहेत.
21 Nov 2018 - 12:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
21 Nov 2018 - 2:58 pm | नूतन
सर्वांचे मनःपूर्वक आभार