झाडी बोली (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)
प्रत्येक भाषेचे "प्रमाण" किंवा "ग्रांथिक" व "बोली" असे दोन भाग आढळून येतात. मराठीत पुण्याच्या आसपास बोलली जाणारी ’पुणेरी" भाषा ही ग्रांथिक मानली जाते. मराठीतील विविध बोली भाषा उदा. कोल्हापुरी, वायदेशी, नगरी, बागलाणी, खानदेशी, अहिराणी, बालेघाटी, वर्हाडी, गंगथडी, बैतुली, नागपुरी, मालवणी, कोंकणी, कारवारी इ. आपल्याला (निदान ऐकून तरी) माहीत असतात.व याचीही कल्पना असते की या बोली भाषा महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागांमध्ये प्रचलित आहेत व त्यांची नावे त्या त्या भागांवरून पडली आहेत. उदा. मालवणच्या आसपास बोलली जाते ती मालवणी बोली.