जीवनमान

साडेसातीतले वास्तविक उपाय!

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
24 Jan 2020 - 9:48 am

मित्रहो! आज दिनांक २४/१/२०२० रोजी सकाळी ९.५४ पासून शनी मकर राशीत प्रवेश करेल.याचाच अर्थ असा की वृश्चिक राशीची साडेसाती संपेल आणि कुंभ राशीची साडेसाती सुरु होईल.म्हणजेच एकूणात धनु,मकर,कुंभ या तीन राशींना साडेसाती असेल.

साडेसाती आली की सोशल मिडियावर "घाबरुन जाऊ नका.शनीला अभिषेक करा,शनिवार करा अडचणी कमी होतील वगैरे वगैरे त्यात लिहिलेलं आढळेल.एवढंच नाही तर पुढे शनी हा हाडाचा शिक्षक आहे, तो कष्ट देऊन शिकवतो तिथपासून ते आपल्या पूर्वकर्मांची फळेच साडेसातीत मिळत असतात"वगैरे तत्वज्ञान वाटल्याचेही आढळेल.

जीवनमानफलज्योतिषसल्ला

सुखी झोपेचा साथी

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
21 Jan 2020 - 11:19 am

शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशींना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्सचे स्थान महत्वाचे आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून पन्नासहून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात. त्यापैकी थायरॉइड, इन्सुलिन, अ‍ॅड्रिनल आणि जननेन्द्रीयांची हॉर्मोन्स ही सर्वपरिचित आहेत. याव्यतिरिक्त अन्य काही हॉर्मोन्स शरीरात अल्प प्रमाणात तयार होतात आणि त्यांचेही कार्य महत्वाचे असते.

जीवनमानआरोग्य

कुणी स्पेस देता का रे स्पेस?

अबोलघेवडा's picture
अबोलघेवडा in जे न देखे रवी...
21 Jan 2020 - 9:49 am

(वैयक्तिक सुखांपुढे इतर सगळं तुच्छ वाटणाऱ्या जोडप्यांना समर्पित)

सुखांची बिलकुल कमी नाही, मस्तच चाललंय आमचं
स्पेस मात्र मिळत नाही, काय बरं आता करायचं

येता जाता सिनेमे बघून, खुशालचेंडू जिणं जगतोय
महिन्याकाठी पोशाखांवर भरमसाठ खर्च करतोय
चंगळवादी मन झालंय, आयुष्य झालाय बाजार
स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार?

स्मार्टफोन हाती नसला की, जीव होतोय कासावीस
विकत घ्यायला जातो तेव्हा, करत नाही घासाघीस
ऐषारामात जगतोय आम्ही, माहीत नाही माघार
स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार?

कविताजीवनमान

'एका मुलीची' गंमत

Cuty's picture
Cuty in जनातलं, मनातलं
20 Jan 2020 - 5:28 pm

छोटंसं टुमदार गाव ! अगदी खेडं नाही आणि शहर नाही. वेळ सायंकाळची. सोनेरीकेशरी प्रकाश सर्वत्र पसरलेला. गावातून जाणारा एकमेव मध्यवर्ती डांबरी रस्ता. लहान मुले शाळेतून पाठी दप्तर टाकून, उड्या मारत किलबिलत घरी जात आहेत. वर आकाशात कावळ्यांचीदेखील शाळा सुटली आहे.त्यांची विजेच्या तारेवर कावकाव चालली आहे. बगळ्यांच्या माळा शांतपणे उडत आहेत. रस्त्याच्या कडेने छोट्या झुडुपांवर चिमण्यांची चिवचिव सुरू आहे. एका कडेने शिस्तीत गायवासरे लगबगीने शेतातून घरी जात आहेत. त्यांच्या गळ्यांतील घंटा वाजत आहेत. त्याचवेळी दूरवर देवळात घंटानाद होत आहे.

समाजजीवनमानलेखविरंगुळा

सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
11 Jan 2020 - 5:41 am
वाङ्मयविडंबनजीवनमानमौजमजालेखअनुभवआरोग्यविरंगुळा

मटार ,बटाटा, टोमॅटो

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
10 Jan 2020 - 12:59 pm

सालाबादप्रमाणे थंडीचा मोसम आला. मुंबईची थंडी म्हणजे औट घटकेचं राज्य ! तेवढीच मजा लुटावी म्हणून बासनातले स्वेटर ,शाली बाहेर काढल्या आणि सकाळी सकाळीच कुठलीही सबब न ऐकता , जरा हट्टानेच , स-पति फेरफटका मारायला बाहेर पडले. मस्त फिरून प्रसन्न मनाने घरी निघालो. एव्हाना ताज्या तजेलदार, नानाविध प्रकारच्या भाज्या हातगाड्यांवर लादून जाणारे विक्रेते ठायी ठायी दिसू लागले होते. आज अंगात जरा जास्तच ऊत्साह संचारला होता. पावलं आपोआपच हिरव्यागार मटारच्या शेंगांच्या ढीगांनी भरलेल्या गाडीसमोर येऊन थांबली. आणि सोसासोसाने मटारची खरेदी झाली.

मांडणीजीवनमानआस्वादमाहिती

माझं हॉटेलिंग..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
7 Jan 2020 - 12:05 pm

माझं लहानपण सांगलीत गेलं. बापटबाल आणि पटवर्धन हायस्कूल ह्या माझ्या शाळा. माझं कुटुंब साधं, बाळबोध. अशा घरात बाहेरचं खाणं ही अशक्यप्राय गोष्ट होती.तरीही मी हॉटेलात जाण्याचा पराक्रम केला.

मी मॅट्रिकला असतानाची गोष्ट! त्यावेळी सांगली गाव आजच्याइतकं विस्तारलेलं आणि पुढारलेलं नव्हतं. गजानन मिल, काळी खण, प्रताप टॉकीज हे गावाच्या बाहेर आहेत असे वाटे. हरभट रोड, कापडपेठ किंवा मेन रोड, गणपती पेठ आणि गाव भाग हेच मुख्य गाव. राममंदिर,ओव्हरसिअर कॉलनी हे भाग आजच्याइतके गजबजलेले नव्हते. गावात हॉटेल्स फारशी नव्हती.

जीवनमानप्रकटनअनुभव

पंखा

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
3 Jan 2020 - 11:34 pm

।। पंखा ।।

एप्रिल- मे मधील दहावीचे सुट्टीतले वर्ग सुरू होते. गरागरा फिरणाऱ्या पंख्याखाली बसूनही घामाच्या धारा लागलेले विद्यार्थी , त्या धारांशी रुमालांनी लढत होते. मधेच वहीच्या पुठ्ठ्यांनी वारा घ्यायचा फुका प्रयत्न. आजकालचे पुठ्ठेही तसे तकलादूच. मुलंमुली भिजलेल्या चोळामोळा झालेल्या रुमालाने कसेबसे स्वतःला गोळा करत करत अभ्यासाकडे नेत होते. एरवी तसाही गणिताने घाम फुटतोच त्यात उन्हाळ्याच्या नवीन समीकरणांची भर पडली होती!

मुक्तकसाहित्यिकजीवनमानप्रकटनविचारलेखअनुभवविरंगुळा

फिटेल का हे ऋण माझे

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
31 Dec 2019 - 5:16 pm

फिटेल का हे ऋण माझे

विवंचना आत दाटली

याच काळजीने मीच माझी

वर जागा शोधली

रोप मीच लावले

बघून स्वप्न उद्याचे

काय ठावं , याच जागी

इथेच सुळी चढायचे

रोज रोज तोच सूर्य

तीच आग ओकतो

रोज रोज मीच का पण ?

तेच तेच भोगतो

मीच जर का अन्नदाता

रिक्त का रे चूल माझी ?

घेतला नांगर हाती

हीच का रे भूल माझी ?

ऐकतो सरकारनामे

अभय कर्जांना दिले

फासली पाने पुन्हा ती

भाव तैसेच राहिले

=====================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

जीवनमानबळीराजाला श्रद्धांजलीषंढ सरकारचा ( कुठलेही असो ) निषेध

सखी शेजारिणी तू खात राहा..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
23 Dec 2019 - 12:27 pm

माझी एक शेजारीण होती. म्हणजे ती आहे अजून,पण माझ्या शेजारी ती आता नाही. माझी शेजारीण जेव्हा माझ्या शेजारी राहायची तेव्हा माझ्या घरी सारखी यायची. गप्पा मारायला. येताना घरातलं काम घेऊन यायची. भाजी निवडणे, बिरड्या सोलणे, कपड्यांची दुरुस्ती असं काहीतरी. प्रचंड बडबडी, मन लावून टीव्ही पाहणारी. लक्ष्मीकांत बेर्डे किंवा दादा कोंडके केळ्याच्या सालीवरुन पाय घसरुन पडला किंवा अर्धी चड्डी घालून आला तरी डोळ्यांत पाणी येईपर्यंत खळखळून हसणारी.

जीवनमानलेख