समाज

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४६

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
21 May 2015 - 1:41 pm

मागिल भाग..
आणि त्याची सुरवात ह्या आजच्या दिवसापासून केली पाहिजे. फक्त आजच्या दिवसापासून..कारण तोच आज ठामपणे आपल्या हातात आहे!
पुढे चालू...
===============================

संस्कृतीसमाजविरंगुळा

पानिपत

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
20 May 2015 - 10:45 pm

प्रिय अमोल,

काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा. कॉर्बेटमध्ये किंवा ताडोबात एखादा वाघ सामोरा येईल तर तो थरार अनुभवताना आपण सगळे एकत्र असावे.

संस्कृतीइतिहाससमाजप्रवासछायाचित्रणप्रकटनअनुभवमाहिती

चला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची) भाग ३ अंतीम.

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
20 May 2015 - 7:05 pm

पूर्वीची हवा भाग २

या नंतरचे व्यक्तीमत्व हे सध्या पुण्यात स्थाईक असले तरी अस्सल बदलापुर येथील आहे.त्यांचे नाव जरी हूड असले तरी..
निटेश सांगळे: तुम्ही काहीही वाचताय जरा नीट लिहून आणत जा.त्यांचे नाव सूड असे आहे काय सू$$$$$ड उगाच चुकीची नावे वाचता आणि मला कामाला लावता.

ध.स.: अस्का, नाही जरा नीट लिहित जारे पोरांनो एक दिवशी माझा आय डी उडवाल मिपावरून,

समाजविरंगुळा

सुंदरीचे ओझे

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
20 May 2015 - 5:28 pm

तान्झेन आणि इकीदो पायी प्रवास करीत होते. नुकताच मुसळधार पाउस पडून गेला होता. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी येतच होत्या. चालता चालता ते एका खेडेगावापाशी पोहचले. तिथे एक अरुंद ओढा होता. त्यातून चिखलाचे पाणी वहात होते. हे दोघे तिथे जरा थांबले.
तेवढ्यात, तिथे एक कमनीय बांध्याची, कोमल तनुची, तरुण, जपानी रमणी आली. पावसाने स्वच्छ झालेल्या हवेत तिचे मुखकमल अधिकच प्रसन्न दिसत होते. ती आपला फुलाफुलांचा रेशमी किमोनो सावरत ओढ्यापाशी थांबली. परंतु त्या बिचारीला, प्रयत्न करूनही तो ओढ काही ओलांडता येईना. तिची ती अवस्था पाहून, तान्झेन पुढे झाला.

धर्मवाङ्मयकथासमाजजीवनमानप्रकटनविचार

मदत हवी आहे.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
19 May 2015 - 1:33 pm

या वर्षी जुलै महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. या विषयावर एका पुस्तकाच्या शब्दांकनाचे माझ्याकडे आले आहे.एकाच वेळी दोन भाषांमध्ये हे पुस्तक तयार करताना माझ्यावर ताण आला आहे. या पुस्तकाची काही प्रकरणे लिहायला मला मदत हवी आहे. तयार झालेल्या प्रकरणांचे भाषांतर करण्यासाठी पण मदतीची आवश्यकता आहे.त्या खेरीज उपलब्ध असलेल्या विदाचे आलेख वगैरे बनविण्यासाठी पण मदत हवी आहे.मानधन आणि श्रेयनिर्देश मिळेल. कृपया संपर्क करा . रामदास ९५९४११०८६१ किंवा nathconsulting@gmail.com

समाजविचारप्रतिसादसद्भावना

शतशब्दकथा - शिवी

एस's picture
एस in जनातलं, मनातलं
18 May 2015 - 8:13 pm

"दादा गुंठामंत्री. काय त्यो रुबाब, त्ये अंगावरलं मणभर सोनं, काळ्या काचंवाली कार्पियो, ह्याप्पी बड्डेवाले फ्लेक्श. जिमिनीचा पयसा पान्यागत वहातोया."

विचारात गढलेल्या त्याला धूळ उडवीत येणार्‍या गाडीनं जागं केलं. लगबगीनं बंगल्याचं फाटक उघडलं गेलं. गाडीतून टक्कल उतरलं. मागून एक पोरगी आणि काही माणसं.

बाकीची मंडळी ढोसायला बाहेर गेली. "लिलावात उचलली. धा हजारात." पुसटसं ऐकलं त्यानं.

रात्र वाढली तसा तो त्याच्या खोपटात पडला. ते आवाज ओळखीचे होते त्याला. मध्ये पडायची हिंमत नव्हतीच कधी.

समाजप्रकटन

रातीत लाज ओली

अर्व's picture
अर्व in जे न देखे रवी...
18 May 2015 - 12:31 pm

रातीत लाज ओली
शेजेवरी पहुडली
गंधीत मोगऱ्याच्या
चंद्रसवे नहाली.

पावली पैंजणाचा
वैरी भार होता
निजल्या स्वप्न पंखी
दुबळा आधार होता

घरट्यातले दु:ख ते
माझे मलाच माहीत
भळभळत्या जखमाच नुसत्या
घाव कुठेच नाहीत.

माथ्यावरी विस्कटल्या
रेखा संचिताच्या
माझे मला कोंडले मी
चंद्रात कुंकवाच्या...

कवी : अर्व (निशांत तेंडोलकर)

भावकवितासमाज

चला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची) भाग २

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
16 May 2015 - 10:02 am

आधीची हवा

यातील काही बाबी बिनबियांच्या गोष्टी असल्या तरी काही बियांच्या आहेत, त्या त्या बिया कोल्हापूर कट्टेकर्यांना माहीती आहेत

या नंतरचे व्यक्तीमत्व हे थेट कोकणातील अस्सल लाल मातीतून आणि साक्षात लोकमान्य टिळकांच्या पावनभूमीतून आलेले आहे.म्हणजे बघा आजकाल वेगवेगळ्या टीव्ही मालिकांअमध्ये (विशेषतः १५-२० पे़क्षा कमी माणसं नसलेली कुटुंब काबीला वाल्या) एखाद स्निग्ध हसर्या चेहर्‍याची स्त्री भूमीका असते तशी ही व्यक्ती आहे.

समाजअनुभव

शेयर बाजारातला परतावा. मिथके आणि वस्तुस्थिती

प्रसाद१९७१'s picture
प्रसाद१९७१ in काथ्याकूट
15 May 2015 - 5:45 pm

ह्या धाग्यात टाकलेले टेबल कोणी मला नीट टाकुन देवु शकेल का?

शेयर बाजारा वर एक धागा आणि वरचे प्रतिसाद वाचले. त्यावरुन काही फार सोप्या सजेशन वाचण्यात आल्या, म्हणुन विचार केला की गेल्या ५ वर्षात नक्की काय झाले आहे ते बघावे. हा विदा आहे, ज्याचा त्याने बघुन त्यातुन अर्थ काढावा. ह्या तक्त्यातल्या सर्व कंपन्या प्रचंड मोठ्या वगैरे आहेत, आणि त्या जवळपास ५०-६० टक्के शेयर मार्केट रीप्रेसेंट करतात.

ज्या सुचना बघण्यात आल्या त्या थोडक्यात अश्या