ऑलिम्पिक !
92 सालचे बार्सीलोना ऑलिम्पिक सुरु असतानाची गोष्ट. त्यावेळी बार्सीलोना आणि ऑलिम्पिक ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ कळत नव्हते. कोणीतरी,कुठेतरी,काहीतरी खेळतायेत एव्हढंच कळायचं. दूरदर्शनवर रात्री दिवसभरातल्या सामन्यांचे हायलाइट्स दाखवायचे. त्यात बरोब्बर साडेदहा वाजता संसद अधिवेशनाचे वृत्तांकन करणाऱ्या दहा मिनिटाच्या 'पार्लियामेंट न्युज ' सुरु व्हायच्या. 'आज मी पार्लमेंट नंतर सुद्धा ऑलिम्पिक बघणार' असं म्हणणारा मी बातम्या संपेपर्यंत झोपलेला असायचो.असो. तर त्या ऑलिम्पिकमध्ये मला आवडलेला खेळ म्हणजे उड्या मारण्याचा !