बागेत काही 'खारी' अशा येतात, कि त्यांचा धुमाकूळ किंवा खादाडी खूपच कमी वेळेची असते... काही सेकंदाची, फार-फार तर एक-दोन मिनिटांची... पण त्या आपल्या फळांवर खूप खोल दात मारुन जातात.. कुठे कुठे केर करुन जातात... आणि नंतर तुम्हाला ती फळे टाकून देताना परत-परत आठवत राहतात :/ :/ मी त्या वेळी घराच्या दुसर्या मजल्यावर होते... लोणी कढवून तूप बनवत होते... खिडकीतून 'बदामा'च्या झाडाच्या फांदीवर अशीच 'ती' (खार :/ ) मला नजरेस पडली... ती बहुधा तिथे रोजच येत असावी...इकडेतिकडे पहात होती... बदामवर बदाम फस्त करत होती ती... आमची नजरेला नजर झाली... पाच-दहा सेकंद ती माझ्याशी काही तरी बोलली...नजरेने... बहुतेक मला खिजवले असेल :/ :/ आता माझी सटकली आणि मी पळत बाल्कनीत गेले.. नंतर ती मला कधीच भेटली नाही...पण अनेक वेळा तिचा तो चेहरा मला आठवत राहिला... अगदी मघाशी सफरचंदाच्या झाडावर जाळी टाकताना देखील !!
(प्रेरणा)
प्रतिक्रिया
23 Jul 2016 - 5:21 am | एस
म्हणून टाकल्या टाकल्या तुम्ही इथे पडलात काय? ;-)
23 Jul 2016 - 5:24 pm | आनन्दा
धप्प
23 Jul 2016 - 5:14 pm | पैसा
=))
23 Jul 2016 - 5:28 pm | वटवट
खळ्ळ्ळ्ळ.....
23 Jul 2016 - 9:16 pm | श्रीरंग_जोशी
-)
मोनुला
24 Jul 2016 - 3:54 am | रुपी
हा हा :)
प्रतिसाद चुकून एकदाच पडला ;)
24 Jul 2016 - 8:22 am | Bhagyashri sati...
छान लिहलय
24 Jul 2016 - 3:21 pm | ज्योति अळवणी
पाच दहा सेकंदांच्या गप्पा झाल्या तरीही जाळी टाकलीच का सफरचंदाच्या झाडावर
26 Jul 2016 - 1:16 am | रुपी
हो ना..
बघण्यापुरतासुद्धा एकही बदाम शिल्लक नाही ठेवला ना, मग निदान सफरचंदं तरी वाचवावीत म्हटलं..