अॅन अफेअर वुईथ यू ..!
संवाद सूत्र प्रथम अध्याय: व्हर्जन २.०
मला तू आवडतेस.
बssरं...
हसताना हे असे डोळे बारीक करतेस, ते आवडतं.
हम्मss..
हे असले, तांदूळ निवडण्यासाठीच खास बनवलेले,
बकवास फ्रेम्सचे चष्मे घालून वाचत बसतेस, ते आवडतं.
ऐकतेय.. चालू दे तुझं..
'मग ? काय काय झालं आज?' असं विचारलं की तुझ्या घरची, कामावरची, काही खरी, बरीचशी काल्पनिक गा-हाणी सुरु करत नाहीस, हे..
जोक फालतू वाटला की काही काळ चेहरा मख्ख ठेऊन, बर्याच नंतर, फुटल्यासारखी हसत बसतेस, हे एक..
मेलोड्रॅमॅटीक रुसव्यांच्या वगैरे भानगडीत न पडता डायरेक्ट शब्दांनी फटकावतेस, हे..