Skip to main content

फुलपाखरू

ढेरी पॉम पॉम - बडबड गीत

लेखक माहितगार यांनी शनिवार, 12/04/2025 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
१ जेमिनीने दिलेल्या बडबडगीत व्हर्शनमध्ये जरासे बदल करून ढेरी पॉम पॉम गोलू मोलू माझी ढेरी, आई म्हणते कशी ढेरी पॉम पॉम ! पण मोठी छान हो, माझ्या बाबांची ढेरी , तरीही नाही म्हणत त्यांना काय तो मान! माय मम्मा इज पिकींग अ चेरी!! आई म्हणते कशी ढेरी पॉम पॉम ! आत्ता काय आईचीच ढेरी झाली गोलू मोलू, बाळ येणार म्हणून दिसते ती लोलू-पोलू! बाळाची ढेरी पण गोलू मोलू असेल, त्याच्यासोबत पॉमपॉम खेळत मज्जेत हसेल! आई म्हणते कशी ढेरी पॉम पॉम ! नवीन बाळ येणार घरात, आनंद झाला माझ्या मनात! त्याच्यासाठी गाणी गाईन, बोबड्या भाषेत बडबडून घेईन! आई म्हणते कशी ढेरी पॉम पॉम ! २ ढेरी गोलू मोलू (जेमिनी एआयने दिलेली व्हर्शन)

सजणूक दे फुलोर्‍याची

लेखक माहितगार यांनी रविवार, 19/12/2021 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
वेड असो वा प्रिती वसंतात मने जुळती पण, प्रणय उचंबळून येता हा दोष कुणाचा साथी? हरखुन सळसळणारे हास्य आपुल्या गाली अलवार सांगते तेव्हा संगित नाचते ताली नवनीत क्षण सरण्यापूर्वी पाकळी पाकळी मखमली रूतलेल्या हुंकारांना अंधारात सुलगव खुशाली खुलती सुगंध कायेचे कोवळी फुले सु'मनाची स्वप्नांचे पंख पांखरुनी सजणूक दे फुलोर्‍याची * येथून सु'डंबण प्रेर्ना

वस्त्र विणताना..

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 12/10/2021 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
वस्त्र विणताना, मन धागा गुंफताना..हवा रंगांचा कोमल बाज, गहिवर स्पर्श साज! रेशीम पाण्याची धार, त्यात चंद्राची साद.. अलगद सांडलेले, प्राजक्त देठ सहवास.. चोचीत धरलेले, आकाश मोतियाचे भास! वाऱ्याची मंगल गुज, हिरवळ मखमल पाऊल वाट.. सागराची तुफान गाज, मातीवर रेंगाळलेली वेडी लाट! -भक्ती

फुलपाखरू

लेखक मन्या ऽ यांनी मंगळवार, 09/06/2020 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
फुलपाखरू एक होते रंगेबेरंगी फुलपाखरू .. त्याचे 'मन' ऐसे नाव.. ईवलेसे नाजुक पंख तयाचे त्यावर सुंदर नक्षी संस्कारांची. फुलपाखराच्या पंखावरचे काही रंग लाल-गुलाबी स्वप्नांचे बालपणीच्या आठवणींचे उमलणार्या फुलांचे चांदण्या रातींचे तर काही रंग आहेत.,मात्र निळे-काळे नको त्या कटु आठवणींचे भळभळत्या जखमांचे चुलीतल्या विस्तवाचे.. त्याच कटु आठवणींने बळ तयाच्या पंखास दिले संकटावर मात करुन त्यास नव्या उमेदीने जगण्यास शिकवले!.. -दिप्ती भगत (१३जून, २०१९)