पाषाणभेद in जे न देखे रवी... 12 Jun 2020 - 1:04 pm छप्पर उडून गेल्यानंतर पाऊस घरात येतो तोंडचा घास नाहीसा होतो भणाणता आलेले वादळ सारं उध्वस्त करीत जातं वाटेत येईल ते पाडत जातं मग ते काहीही असो घर खांब छप्पर झाड माड आणि मनही. मुक्त कविताकरुणकवितामुक्तक प्रतिक्रिया +1 12 Jun 2020 - 4:33 pm | गणेशा आणि मग.. घरात साठलेला पाऊस मनात साठत नाही... मनालाही त्याचे काही अप्रूप राहत नाही... पडलेल्या भिंती.. उडालेले छप्पर.. काहीच उरत नाही.. रात्र ओली दुःखाची अन दिवस सरत नाही... खरं आहे. छान लिहीले! 12 Jun 2020 - 8:13 pm | पाषाणभेद खरं आहे. छान लिहीले!
प्रतिक्रिया
12 Jun 2020 - 4:33 pm | गणेशा
आणि मग..
घरात साठलेला पाऊस
मनात साठत नाही...
मनालाही त्याचे काही
अप्रूप राहत नाही...
पडलेल्या भिंती.. उडालेले छप्पर..
काहीच उरत नाही..
रात्र ओली दुःखाची
अन दिवस सरत नाही...
12 Jun 2020 - 8:13 pm | पाषाणभेद
खरं आहे.
छान लिहीले!