कविता

पाहता वळून मागे

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
14 Jun 2020 - 11:22 am

पाहता वळून मागे
दिसते गर्दी चूकांची
सोडून मोती ते सारे
केली वेचणी फुकांची

डोळे भरून हिरवा
नाही पाऊस पाहिला
आतून सूर लावत
नाही मल्हार गायिला

जोडून छंद नवखे
कुठे स्वानंद शोधला
अर्थार्जनात केवळ
तो मी आनंद शोधला

मी जाऊन मंदिरात
ना अहंकार सांडला
देऊन दान भक्तीचा
कसा बाजार मांडला

इवलेच पोट माझे
हे उशिराच कळाले
क्षण अनमोल सारे
ते हतातूनी गळाले

कविता

आई घरी जायला निघते तेव्हा...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
13 Jun 2020 - 9:35 am

आई घरी जायला निघते तेव्हा,
प्रवासासाठी म्हणून केलेले तिचे पराठे थोडे जास्तच होतात, चुकून.
फ्रिजमध्ये केलेली असते माझ्या आवडीची
केळफुलाची भाजी, रसाची आमटी..
बाबांकडून खवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण..
डब्बा भरलेला असतो तिखट पु-या, चकलीनं..
दाण्याचं कूट, जीरेपूड, धणेपूड..
कधी करते कोण जाणे!

कवितामुक्तक

तुकोबांचे निवडक अभंग

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
12 Jun 2020 - 7:23 pm

|| पांडुरंग पांडुरंग ||

तुकोबा ग्रेट म्हणजे ग्रेट होते राव ! तुकोबांचे अभंग इतके साध्या सोप्प्या भाषेत मनातलं बोलुन जातात कि आपल्याला अजुन जास्त भारी बोलताच येत नाही. आणि हे इतके सोप्पे असल्याने ते कधीही कुठेही आठवतात !
ह्या इंटरनेटने अन गुगल ने शोधाशोध करायची अफलातुन सोय करुन दिली असल्याने अभंगातील एखादा चरण किंव्वा धृवपद जरी आठवत असेल तरी अख्खा अभंग शोधता येतो . नाहीतर हार्ड कॉपी उघडुन पहाण्यचा योगच आला नसता ! संपुर्ण तुकाराम गाथा विकिसोर्स वर ज्याने उपलब्ध करुन दिलीये त्याचे आभार मानावेत तितके थोडे आहेत !

वाङ्मयकविताआस्वाद

वादळ

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
12 Jun 2020 - 1:04 pm

छप्पर उडून गेल्यानंतर
पाऊस घरात येतो
तोंडचा घास नाहीसा होतो

भणाणता आलेले वादळ
सारं उध्वस्त करीत जातं
वाटेत येईल ते पाडत जातं

मग ते काहीही असो
घर खांब छप्पर झाड माड
आणि मनही.

मुक्त कविताकरुणकवितामुक्तक

जुना वाडा

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
12 Jun 2020 - 11:34 am

एक जुना वाडा
भंगलेले तुळशी वृंदावन
विरलेली स्वप्नं
अन् उदास माझं मन

परसातल्या चाफ्याला
आता येत नाहीत फुलं
अंगणात कधीच
खेळत नाहीत मुलं

ओसरीवरचा चौफाळा
वाऱ्यासोबत रडणारा
दारातील पिंपळ
दिवसभर झडणारा

गंजलेले तावदान
कुजलेली खिडकी
धुळीने माखलेली
उतरंडीची मडकी

माळवदातील घरटं
चिमणीने सोडलंय
दारावरचं आडनाव
केंव्हाच मोडलंय

आठवणीकविता

कशास मग ते मोठे व्हावे?

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
11 Jun 2020 - 11:01 am

आव नको की ठाव नको
जड टोपण नाव नको
सरड्या सारखे असुदे जीवन
कुंपणापर्यंतही धाव नको

उगीच तुम्ही मोठे व्हा
मोठे होणे जपत रहा
पडला का कुठे डाग
नीट ते शोधून पहा

पाषाणातून देव नको
टाकीचे मग घाव नको
चार चौघात फिरताना
मिळणारा तो भाव नको

मंदिराचा कळस मोठा
देवा सारखा मान खरा
नको अलिप्त मोठेपणा
मी पायरीचा दगड बरा

नको रेशमी वस्त्र भरजरी
समारंभात घालायला
असुदे मी रूमाल सुती
जखमेवरती बांधायला

कविता

मरण

कौस्तुभ भोसले's picture
कौस्तुभ भोसले in जे न देखे रवी...
10 Jun 2020 - 11:05 pm

काळाच्या उंबरठ्यावर
अस्पृश्य सावली हलते.
श्वासांच्या झुळूकेसरशी
प्राणज्योत मिणमिणते.

साऱ्यांच्या अधरांवरती
तुझ्या रूपाची नावे.
हा प्रवास अटळ माझा
नि मागे पडती गावे.

इवल्याशा ज्योतीचा
विझून भडका झाला.
जो इथवर घेऊन आला
तो क्षणात परका झाला.

-कौस्तुभ

कविता माझीभावकवितामाझी कवितामुक्त कविताकविता

पन्नाशीचा टप्पा

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
8 Jun 2020 - 10:50 am

आता आता दादा होते
कसे मग काका झाले
तरुणाच्या यादी मध्ये
बघा किती मागे गेले

दिसते आहे टक्कल
पांढर्‍या झाल्या मिश्या
हळू हळू मोठ्या होती
कश्या प्रौढत्वाच्या रेषा

शत्रूवर येऊ नये
तो प्रसंग येतो असा
तिशीची बाई म्हणते
काका जागा आहे बसा

पटापट हातातून
आयुष्य जात पळून
पन्नाशीचा टप्पा आला
मागं पहावं वळून

काय काय राहिलंय
केली पाहिजे यादी
काय माहित कधी
धरावी लागेल गादी

तू लक्ष नाही द्यायचे
कुरबुर केली कुणी
ऐकत बसावं मस्त
आवडती गाणी जुनी

कविता

प्रवासी

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
3 Jun 2020 - 5:05 pm

एका दिशेचा भेटला किनारा
प्राक्तनाची दौड बाकी
वाट दे तू सागरा.

नाव माझी हलकी जरी
मी खलाशी रानातला.
लाटांची वादळे प्रचंड
उरात लाव्हा तप्तला.

आकाशी दुंदुभी गर्जना करावी
वाऱ्यासवे वेगाची स्पर्धा हरावी.
उन्मळून पडले गर्ववृक्ष सारे
ओहोटीत गेले जीव सर्व प्यारे.

पाहुणा मग पाऊस आला
भरावया एक रिक्त प्याला.
प्याला-होडी ची गल्लत मोठी झाली
वल्हवणी आता पाण्यात शांत झाली.

हे भास्करा, नको होऊस तू लुप्त
लढणाऱ्यांना किती ठेवशील गुप्त.
चांदण्यांचे मर्म थोडे वाटून घे
निशेस सावलीची साथ दे.

कवितामुक्तक

गाण्यास पावसाच्या...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
1 Jun 2020 - 6:22 pm

गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे
थेंबास ओघळाया हलकेच गाल दे!

नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती
क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे!

होतील बघ सुरंगी लाजून गाल हे
भेटीत पावसाच्या हाती मशाल दे!

भिजल्या तनू-तनूवर येईल शिर्शीरी
स्पर्शांतल्या सरींना ऐनेमहाल दे!

शिणतीलही जराश्या गजर्‍यातल्या कळ्या
तेंव्हा उश्यास माझ्या दुमडून शाल दे!

—सत्यजित

gajhalgazalपाऊसमनमेघमराठी गझलशृंगारस्पर्शकविताप्रेमकाव्यगझल