अर्थकारण

डेबिट कार्डचा वाईट अनुभव

अव्यक्त's picture
अव्यक्त in काथ्याकूट
16 Dec 2013 - 1:24 am

मला आलेला डेबिट कार्डचा वाईट अनुभव….

माझे HDFC बँकेचे debit कार्ड मी emergency मध्ये june महिन्यात CANARA बँकेच्या ATM मध्ये वापरले.. काही तांत्रिक बिघाडामुळे मी काढलेल्या २० ० ० /- रुपयांपैकी १ ५ ० ० /- रुपये बाहेर आले आणि ५ ० ० /- रुपये कमी आले. मी HDFC शी email करून पिच्छा पुरवला पण त्यांनी CANARA बँकेचा report मागवून २ ० ० ० /- रुपये बाहेर आले होत्ते म्हणून मलाच खोट्यात पाडले… अशा प्रकारांची दाद कोठे मागावी ? कसा पाठपुरावा करावा ? अश्शी बॅंकेकडून होणारी फसवणूक कशी थांबवावी.?
म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काल सोकावतो… मार्गदर्शन अपेक्षित आहे.

गुंतवणूक आणि गुंतागुंत

ज्ञानव's picture
ज्ञानव in जनातलं, मनातलं
12 Dec 2013 - 10:49 am

कार्यशाळा संपली की एक अनुभव असा येतो की बरेच जण मला भेटून "आम्हालाही गुंतवणूक शिकवा ओ कशी करतात ती....." इथपर्यंत ठीक आहे मी म्हणतो; पण काही जण म्हणतात "टेक्निकल अन्यालीसीस शिकवा बुवा ते आलेखन (Charting ) आणि काय काय असते ते...." चला शिकवतो पण मग खात्रीने ते तुम्ही आत्मसात कराल ? आणि तुम्हाला बर्यापैकी पैसे मिळतील ? कदाचित मिळतील एखाद्याला, पण सर्वांना नक्कीच नाही. कारण ते खूप गुंतागुंतीचे किचकट क्लिष्ट असे आहे आणि त्याही पेक्षा कुठले निकष कुठे आणि कसे वापरायचे ह्याला त्यात बरेच नियम - उपनियम हि आहेत.

अर्थकारणलेख

शेअर मार्केट आणि मी.

ज्ञानव's picture
ज्ञानव in जनातलं, मनातलं
9 Dec 2013 - 12:12 pm

वास्तविक शेअर मार्केट हा सगळ्यांचा वादाचा, समज - गैरसमजाचा असा विषय आहे. पण मला कळलेले मार्केट (जे प्रत्येकाचे वेगवेगळे असणार कारण ते चक्रधर स्वामींच्या दृष्टांतासारखे आहे. )थोडेसे असे की ज्यात दोन प्रकारचे पैसे कमावण्याचे मार्ग लोक ढोबळपणे अवलंबतात.
अत्यंत किचकट ट्रेडिंग प्रणाली पासून लांब राहून मी माझे काही ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचे साधे प्रयोग केले ते हि मांडतो आहे.

तर

१) गुंतवणूक योग्य मार्केट २) ट्रेडिंग योग्य मार्केट.

अर्थकारणमाहिती

बीटकॉईन: डिजीटल वा व्हर्च्युअल करन्सी, सत्य की मिथ्था ??

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
9 Dec 2013 - 10:32 am

मी शाळेंत असताना एकदा तीव्र नाणेटंचाई निर्माण झाली, सुट्ट्या पैशांच्या कमतरतेवर उतारा म्हणुन मुंबईत 'बेस्ट' ने स्वतःची अशी कुपन्स छापली होती ........ मला जाणवलेली ही चलन विषयक पहिली समस्या. नंतर बरीच स्थित्यंतरे झाली, विद्यार्थी दशेंतील स्वप्नवत जगांतुन खर्या जगात येणे झाले आणि अर्थशास्त्राच्या पुस्तकांतुन पिडणार्या चलन फुगवटा आणि व्यवहारांत भेडसावणार्या चलन तुटवडा यांच्यासारख्या गंभीर समस्यांची ओळ्ख झाली. त्यातुन पुढे सरकतो नाही तोच नव्या शतकाच्या उदयाबरोबरच संगणकाच्या क्रुपेमुळे आभासी जगाची अनुभुती येउ लागली.

डे ट्रेड.....सो एक्सायटिंग

ज्ञानव's picture
ज्ञानव in जनातलं, मनातलं
8 Dec 2013 - 1:48 pm

किती हि तोटा झाला तरी सगळ्या ट्रेडर्सचा जिव्हाळ्याचा विषय. तेव्हा डे ट्रेड करावा की नाही ? हा प्रश्न तितकासा महत्वाचा नाही त्यांना ज्यांना करायचाच असतो त्यांना. पण मग कसा करावा हा डे ट्रेड.

चला, शोधून काढू.

प्रथम कोणत्या शेअर मध्ये डे ट्रेड करावा त्याचे दोन नियम आहेत.

१) ज्याचा व्हॉल्यूम अवरेज ५००००० आहे असा कोणताही शेअर. त्याच बरोबर
२) ज्याची वर खाली करण्याची शक्ती (व्होलाटेलीटी )किंवा स्प्रेड (हाय - वजा - लो ) भरपूर आहे.
उदा. एस बी आय... आय सी आय सी आय

अर्थकारणअनुभव

मिसळपाववर नवे दालन.

ज्ञानव's picture
ज्ञानव in काथ्याकूट
8 Dec 2013 - 9:12 am

पाककृती,भटकंती साहित्य वगैरे टिपिकल मराठी विषयांव्यतिरिक्त अर्थ विषयक घडामोडी आणि चर्चा ह्याकरिता मिपावर एक दालन उघडण्यात यावे जेणे करून अर्थ साक्षरता वाढीस लागेल असे मला वाटते. तसेच ह्यापूर्वी प्रसिद्ध झालेले अर्थविषयक धागे ह्या दालनात आणून रचून ठेवावेत असे वाटते.
सर्व क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करणाऱ्या मराठी माणसासाठी ते एकच क्षेत्र असे आहे जिथे तो "दादा" बनून वावरू शकतो तुम्हाला काय वाटते?

(जर हा धागा इथून उडवला गेला नाही तर द्या तुमचे मत आणि उघडा नवे दालन )

घसरता रुपया सावरण्यासाठीचे उपाय...

अव्यक्त's picture
अव्यक्त in काथ्याकूट
28 Nov 2013 - 12:49 pm

घसरता रुपया सावरण्यासाठीचे "साधे" उपाय
***********************************
१) दरमहा आपण फक्त एक लिटर पेट्रोल वाचवूया.
*कसे तेही सांगतो. फार काही नाही. सुट्टीच्या दिवशी जवळच
कुठे जायचे तर पायी किवा सार्वजनिक वाहतुकीने जावे.
(०.३ लिटर बचत नक्की.)
*पार्किंगमधेच गाडी चालू करून बाहेर काढण्या पेक्षा इमारती
बाहेर आणून सुरु करू. (०.३ लिटर बचत नक्की.)
*सिग्नल ला गाडी बंद ठेवू (०.१ लिटर बचत नक्की )
*रस्त्याने जाताना निष्कारण ब्रेकवर पाय दाबून ठेवल्याने
इंधन जास्त जळते. तुम्ही पहा ना, अनेक गाडीचे ब्रेक लाईट

समभागांचे (शेअर्सचे)ट्रेडिंग.

ज्ञानव's picture
ज्ञानव in जनातलं, मनातलं
11 Nov 2013 - 11:09 am

विषय : समभागांचे (शेअर्सचे)ट्रेडिंग.

डिस्क्लेमर : खाली दिलेली पद्धत हा एक दिशा दर्शक आहे. त्यातील जोखीम ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार, अनुभवानुसार जोखावी. तसेच ह्या पद्धतीत काही बदल करून मग ट्रेड करणे आवश्यक आहे असे जाणवल्यास योग्य तो बदल नक्की करावा.

अर्थकारणमाहिती

अर्थक्षेत्र.....एक उपेक्षित क्षेत्र

ज्ञानव's picture
ज्ञानव in जनातलं, मनातलं
6 Nov 2013 - 1:39 pm

दिवाळी ते मे महिना कसली नि कसली शिबिरे चालू असतात. व्यक्तिमत्व विकास शिबीर, क्रिकेट शिबीर, टेनिस शिबीर, तबला पेटी नृत्य गायन ह्याचा रतीब चालूच असतो म्हणजे पर्यायाने खेळ गायन पाककृती कलादालन (मीपवारही अर्थ दालन असावे असे वाटते.) वगैरे बरेच काही विषय पैसे देऊन हाताळले जातात. बरे पालक पण किती चोखंदळ असतात देव जाणे कारण शेजारचा जातो म्हणून माझा जातो इथपासून ते "आहो तेवढाच आम्हाला मोकळा वेळ मिळतो!!" पर्यंतची मुक्ताफळे मी पालकांकडून ऐकत आलो आहे.

अर्थकारणविचार

हिंदुस्थानचे मंगळ अभियान आणि सामान्य नागरिकांचे जीवन !

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
5 Nov 2013 - 5:24 pm

आपल्या देशाने मंगळावर यान पाठवले आहे ही बातमी आता तुम्हा सर्वांना माहित झालीच असेल... तर सर्व प्रथम मी त्या सर्व शास्त्रज्ञ मंडळी / तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करतो ज्यांनी त्यांची बुद्धीमत्ता वापरुन ही योजना साकरली आहे.
-
-
-
पण मला या निमित्त्यानी काही प्रश्न विचारावेसे वाटत आहेत, तुम्हालाही काही प्रश्न विचारावेसे वाटत असतील तर हा धागा त्यासाठीच टाकला गेलेला आहे.