विषय : समभागांचे (शेअर्सचे)ट्रेडिंग.
डिस्क्लेमर : खाली दिलेली पद्धत हा एक दिशा दर्शक आहे. त्यातील जोखीम ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार, अनुभवानुसार जोखावी. तसेच ह्या पद्धतीत काही बदल करून मग ट्रेड करणे आवश्यक आहे असे जाणवल्यास योग्य तो बदल नक्की करावा.
प्रथम एक भाग शेअर्स हि गुंतवणूक आणि ट्रेडिंग ह्यांचे एक combinition आहे. मग गुंतवणूक आणि ट्रेडिंगचा रेशिओ किंवा प्रमाण कसे ठरवावे कसे? आपले जेवढे वय तेवढी गुंतवणूक आणि बाकी उरली ती ट्रेडिंगमध्ये टाकावी.
उदा. वय ३० असेल तर ३०% गुंतवणूक आणि ७०% ट्रेडिंग. असो
तर बरेच जण मला ट्रेडिंगबद्दल विचारतात. त्यात सुरुवात कशी करायची हा हि एक प्रश्न असतो.(आणि ट्रेडिंग मधून बक्कळ मिळतात हा गैरसमजहि.)
सुरुवात करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे
- आठवडा की महिनाभराचा ट्रेड ते ठरवणे
- त्या अनुषंगाने डेटा संकलन
खरेदी करिता (खिशात जेवढे पैसे आहेत तेवढेच बरे का...no debit please )
जर आठवडाभराचा ट्रेड असेल तर मागील आठवड्याचे लो आणि क्लोज शोधणे. जो पर्यंत आदल्या आठवड्याचा जो काही लो आहे त्याच्या खाली क्लोज आहे तो पर्यंत खरेदी ना करणे (किंवा ५% खरेदी करत राहणे) ज्या क्षणी आदल्या आठवड्याच्या लो पेक्षा वर क्लोज आला तो क्षण भाग्याचा इथून पुढे तो थोडा वर जाईल पण हे कन्फर्मेशन नाही कारण पण बस येताना दिसतेय...येते आहे...आली हा क्षण लवकरच येणार हे दर्शवणारी परिस्थिती निर्माण होत आहे. मग पुन्हा २-३ आठवड्यानंतर येणारा क्लोज लो पेक्षा वर आल्या नंतर ती कन्फर्मेशन समजावी आणि खरेदी करावी.
आता विक्री करिता (खिशात असतील तेच शेअर्स.....no auction please )
जो पर्यंत क्लोज आदल्या हाय पेक्षा वर येतोय तो पर्यंत ५% शेअर्स आदल्या हाय पेक्षा वर सोडत राहा.
हे केवळ दिशादर्शक आहे जाणकार ह्यावर आपले अभिप्राय देतीलच कदाचित त्यातून एक नवीन पद्धत विकसित होईल.
प्रतिक्रिया
13 Nov 2013 - 10:40 am | आंबट चिंच
तुम्ही इथे नविन दिसताय राव नाहीतर हाच धागा जर रामदास वगैरे किंवा इतर मि. पा. च्या जुन्या सदस्यांनी टाकला असता तर किमान ५० च्या वर दिप्पणी आल्या असता आता पर्यंत.
13 Nov 2013 - 1:55 pm | अव्यक्त
ज्ञानव महोदय, आपण ज्या अगम्य भाषेत बोलत आहात ते सगळं डोक्यावरून गेलं जरा तपशीलवार सांगता का मर्त्य मानवाच्या बोलीभाषेत ?
13 Nov 2013 - 2:13 pm | शैलेन्द्र
पद्धत चांगली, पण तिचा मार्केटच्या हाय्/लो/क्लोजशी ताळमेळ बसवल्यास यशाची हमी वाढेल..
14 Nov 2013 - 8:47 am | ज्ञानव
होय आहे मी नवीन
@आंबट चिंच : धन्यवाद, जास्तीतजास्त प्रतिक्रिया मला अपेक्षित नाहीतच कारण मी इतर धाग्यांवर चाललेली "मन्थने"
वाचत आलोय. एका विषयावरील चार लोकांनी एकत्रपणे चर्चा, माहिती आदानप्रदान करावी एवढीच माफक इच्छा आहे.
@अव्यक्त धन्यवाद, लिखाण आणि मुद्देसूद लिखाण हा माझा प्रांत नाही.पण कोणते शब्द,मुद्दे,वाक्य अगम्य आहेत ते सांगा मी खुलासा करतो कारण नुसतेच अगम्य आणि मर्त्य मानव वगैरे शब्द समजण्याइतका मी चतुर नाही त्याबद्दल क्षमस्व.
@शैलेंद्र धन्यवाद, पद्धत नुसतीच चांगली नाही तर यशस्वी आहे. पण त्या करिता काही सोफ्टवेअर्सची गरज असते जसे अमी ब्रोकर (खूपच उत्कृष्ट जर तुमचे स्वतःचे फोर्म्युलेज बनवलेत तर.) कारण त्याच्या मदतीने क्लोजची पोझिशन झटकन समजते म्हणजे लो पेक्षा वर आहेका हाय पेक्षा खाली आहेका आणि मग त्याची वेरीएशंस काढता येतात.
आणि खालील प्रमाणे हाय लो बरोबरच ताळमेळ घातलेला आहे.
१)जर आदल्या दिवशीचा /आठवड्याचा/महिन्याचा क्लोज त्याच्या आदल्या दिवशीचा /आठवड्याचा / महिन्याच्या लो पेक्षा वर आला तर ट्रेंड बदलतो.
२)जर आदल्या दिवशीचा /आठवड्याचा/महिन्याचा क्लोज त्याच्या आदल्या दिवशीचा /आठवड्याचा / महिन्याच्या हाय पेक्षा खाली आला तर ट्रेंड बदलतो.
14 Nov 2013 - 9:38 am | ज्ञानव
सेल झी एन्टरटेन : बाजार भाव २८१
स्टोप लॉस २८४
14 Nov 2013 - 10:27 am | ज्ञानव
कवर झी एन्टरटेन : बाजार भाव २७६
नफा (२८१-२७७) : ५
ब्रोकरेज : .६०
---------------------------------
निव्वळ नफा (१.५%): ४ .४० /-
(वरील सर्व ट्रेड एन एस इ वर केले आहे. युनिट्स १ फक्त
14 Nov 2013 - 12:27 pm | अनिता ठाकूर
फारच किचकट आहे. त्यामुळे एक तर ह्या विषयाची मुळातुनच आवड पाहिजे किंवा तर चिकाटी पाहिजे. शिवाय, हे 'लो', 'हाय' रोज, सतत कुठे पहावयाचे? त्यासाठी, आपल्या संगणकावर विशिष्ट software घ्यायला हवे का?
10 Dec 2013 - 8:12 am | ज्ञानव
वरील साईट वर सर्व माहिती उपलब्ध आहे. जर ट्रेडिंग करावयाचे असेल तर बाजारात काही softwares उपलब्ध आहेत त्यांचा वापर करणे सोयीचे ठरू शकते.
10 Dec 2013 - 1:24 pm | विअर्ड विक्स
technical analysis va tantrik vishleshanavar ek lekhmala kadhaavi. Mi jarur vachen....
10 Dec 2013 - 1:53 pm | ज्ञानव
प्रयत्न करतो.
10 Dec 2013 - 2:11 pm | विवेक्पूजा
वाचनखूण साठविली आहे... धन्यवाद.....
10 Dec 2013 - 2:59 pm | कंजूस
मुळात मराठीत व्यवस्थित चालणाऱ्या वेबसाईट ईन मीन पंचवीसच्या आत .
त्यात कोणी जरा नवीन लिहितोय तर लिहू द्या की .
प्रत्येक धागा विरंगुळा /जनातलं मनातलं कसा असेल .
आमच्या भटकंतीला पण काहिंना उगाच धोंडे ठेचकाळत तंगडतोड वाटते .दुर्लक्ष करणे .
10 Dec 2013 - 7:31 pm | राजेंद्र मेहेंदळे
लेखातल्या संकल्पना समजुन घ्यायचा प्रयत्न करतोय.
असे वाटते की लेखात वापरलेल्या टर्मस ची व्याख्या तळटीपेत समजाउन दिल्या लेख वाचणे सोपे जाईल.
१. मागील आठवड्याचे लो आणि क्लोज
२.आदल्या आठवड्याच्या लो पेक्षा वर क्लोज आला
३. ५% शेअर्स आदल्या हाय पेक्षा वर सोडत राहा
10 Dec 2013 - 9:16 pm | ज्ञानव
१) मागील आठवड्याचे लो आणि क्लोज : प्रत्येक दिवसाला मार्केट सकाळी ९.१५ वाजता सुरु होते तेव्हा अगदी पहला सौदा (म्हणजे कुणीतरी विकलेले समभाग कुणीतरी विकत घेतो)ज्या किमतीला होतो ती किंमत म्हणजे ओपन मग ती जस जशी वर जाते तशी ती त्या दिवशी किती वर गेली तो हाय तसेच खाली गेली तो लो आणि दुपारी साडेतीन वाजता मार्केट बंद झाल्यावर पुन्हा दुपारी ३.४० ते ४.०० ह्या काळात एकाच किंमंत धरून सुरु असते ती किंमत म्हणजे क्लोज.
२) आता लो पेक्षा क्लोज वर म्हणजे : लो पेक्षा क्लोजची किंमत जास्त असा त्याचा अर्थ.
३)५% शेअर्स म्हणजे जर १०० शेअर्स असतील तर ५ शेअर्स आदल्या दिवशीच्या जो काही हाय असेल त्याच्या वर जर आजची किंमत गेली तर ते ५ शेअर्स विकून मोकळे व्हा.
(जसा दिवसाचा ओपन हाय लो क्लोज असतो तसाच आठवड्याचा आणि महिन्यांचा हि असतो.)
(हुश्श ! मला मुद्देसूद समजावता येत नाही त्यामुळे चुकले माकले समजून घ्या हि विनंती.)