घसरता रुपया सावरण्यासाठीचे उपाय...

अव्यक्त's picture
अव्यक्त in काथ्याकूट
28 Nov 2013 - 12:49 pm
गाभा: 

घसरता रुपया सावरण्यासाठीचे "साधे" उपाय
***********************************
१) दरमहा आपण फक्त एक लिटर पेट्रोल वाचवूया.
*कसे तेही सांगतो. फार काही नाही. सुट्टीच्या दिवशी जवळच
कुठे जायचे तर पायी किवा सार्वजनिक वाहतुकीने जावे.
(०.३ लिटर बचत नक्की.)
*पार्किंगमधेच गाडी चालू करून बाहेर काढण्या पेक्षा इमारती
बाहेर आणून सुरु करू. (०.३ लिटर बचत नक्की.)
*सिग्नल ला गाडी बंद ठेवू (०.१ लिटर बचत नक्की )
*रस्त्याने जाताना निष्कारण ब्रेकवर पाय दाबून ठेवल्याने
इंधन जास्त जळते. तुम्ही पहा ना, अनेक गाडीचे ब्रेक लाईट
कायम लागलेले असतात. गाडी तरी कडे avarage देणार?
हि सवय टाळूया. (०.२ लिटर बचत नक्की.)
*चाकात हवा वरचेवर चेक करावी. कमी हवेमुळे इंधन जास्त जळते. पाच रुपयाच्या हवेतून किमान दहा चे
इंधन वाचेल. (०.२ लिटर बचत नक्की.)
अशी एकूण एक लिटर बचत नक्की होईल. महिना सुमारे ७० रु. धरा.
--------------------
२) विदेशी टूथ पेस्ट बंद करून स्वदेशीपेस्ट एक महिना वापरून पहा.
नाही रुचले तर पुन्हा नेहमीची तुमची वापरा. पण त्या एक महिन्यात
तरी स्वदेशी पेस्ट वापरल्याने विदेशात जाणारा पैसा वाचेल.
एक पेस्ट सुमारे चाळीस रुपयाची, एका कुटुंबाला एक पेस्ट लागते,
तरी यातून स्वदेशी वापरली तर किमान दहा रुपये वाचतील.
----------------------
हे साधे दोन उपाय आहेत. पण यातून किती मोठे काम उभे राहू शकते पहा.
कल्पना करा... किती मोठे काम होईल हे !!
सगळ्या गोष्टी सरकारने कराव्या असे म्हणून केवळ
टीका करीत बसण्या पेक्षा आपल्या परीने आपण एक पाऊल पुढे टाकू !!
इंधन आणि पेस्ट मधून इतके काम होतेय.. यात तुम्ही अजून कोल्ड्रिंक, लिपस्टिक,
पिझ्झा अशा विविध वस्तू add करू शकता !!
उगीच वाद घालण्यापेक्षा.....पहा विचार करा..!!

टिप :-- मी कोणी अर्थतज्ञ नाही.. हा लेख मी लिहिलेला नसून facebook वर माझ्या वाचण्यात आला आणि मनाला पुष्कळ भावला… आणि हे उपाय जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचावे हाच प्रामाणिक हेतू आहे. म्हणून इथे share करत आहे. "रुपयाचे dollar च्या तुलनेतील अवमुल्यन" हे आपण नुसतं वृत्तपत्रात वाचतो. आपण सामान्य जनता रुपयाचा भाव वाधारण्यात हातभार लावू शकतो. अजून काही साधे साधे उपाय आठवतात काय आपल्या मिपाकरांना…असतिल तर share करा इथे.

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

28 Nov 2013 - 1:58 pm | सुबोध खरे

टाटा मोटारी विकत घ्या. मारुती ने नफ्याच्या २७ % (४४८ कोटी रुपये परकीय चलनात) सुझुकीला स्वामित्वशुल्क (ROYALTY) दिले http://www.indianexpress.com/news/taxman-queries-royalty-paid-by-maruti-....
टाटा, महिंद्र सोडून बाकी मोटारींच्या बाबतीत पण हे सत्य आहेच.
हाच न्याय बर्याच गोष्टीना लावता येईल.

प्रसाद१९७१'s picture

28 Nov 2013 - 2:20 pm | प्रसाद१९७१

त्या पेक्षा टाटा आणि महिंद्रा परदेशातील कंपन्या विकत घेण्या साठी अब्जावधी डॉलर खर्च करत आहेत ते बंद करायला सांगा की!!!

अग्निकोल्हा's picture

28 Nov 2013 - 3:21 pm | अग्निकोल्हा

चायला आफ्रिका अन चीनमध्ये यांचे नवीन प्लांट, का तर मनुष्यबळ स्वस्त.

सुनील's picture

28 Nov 2013 - 2:04 pm | सुनील

कशाला सावरायचा?

निर्यातप्रधान उद्योगांसाठी चांगलेच आहे की घसरेला रुपया.

प्रसाद१९७१'s picture

28 Nov 2013 - 2:18 pm | प्रसाद१९७१

कशाला सावरायचा >>>>

+१००००००

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Nov 2013 - 2:05 pm | राजेंद्र मेहेंदळे

मागे एक स्वदेशी म्हणुन चळवळ चालु झाली होती. त्यात मेंबर लोक मिटींग वगैरे घेउन देशी उत्पादने वापरायचा पुरस्कार करायचे.पण शेवटी मला तो मल्टी लेवल मार्केटींगचाच फंडा वाटला. चालु आहे का ती अजुन?

स्वदेशी हा एम्वेच्या कॉपी टु कॉपी माशी टु माशी अवतार होता.
तो कधीच बंद झाला.
एम्वे मात्र अजुन सुरु आहे आणि चक्क फॉर्च्युन ५०० मध्ये आहे..

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Nov 2013 - 2:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

परकीय चलन भारतात येण्यासाठी प्रयत्न करणे. यामुळेही रुपया वधारू शकेल. उदा. इस्त्रो श्रीहरीकोटाहुन जर्मनी,कॅनडा,इंग्लंडचे इ. देशांचे उपग्रह लाँच करणार

वासु's picture

28 Nov 2013 - 3:01 pm | वासु

पण आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत आहे.

निवेदिता-ताई's picture

29 Nov 2013 - 7:15 pm | निवेदिता-ताई

:)

मी_आहे_ना's picture

28 Nov 2013 - 3:46 pm | मी_आहे_ना

मीसुद्धा गेले २ वर्षं कोलगेट ऐवजी मिसवाक आणि जिलेट सोडून सुपरमॅक्स ब्लेड्स वापरतोय. (१ जिलेट फ्यूजन कारट्रिज च्या ऐवजी हे सुपरमॅक्सचे ४ लागले तरी स्वस्तात काम)

क्लिंटन's picture

28 Nov 2013 - 5:34 pm | क्लिंटन

मीसुद्धा गेले २ वर्षं कोलगेट ऐवजी मिसवाक आणि जिलेट सोडून सुपरमॅक्स ब्लेड्स वापरतोय.

मी पण गेली पाच वर्षे इंग्रजीतील संकेतस्थळे सोडून केवळ मिपाच वापरतोय.

यसवायजी's picture

29 Nov 2013 - 6:26 pm | यसवायजी

रच्याकने, लॅप्टॉप कुठल्ला वापरताय? ;)

निवेदिता-ताई's picture

29 Nov 2013 - 7:17 pm | निवेदिता-ताई

डेल कुठला आहे....स्वदेशी की विदेशी

लिना's picture

28 Nov 2013 - 4:14 pm | लिना

खुप छान धागा आहे.
स्वदेशी / विदेशी उत्पादन संदर्भात एक लिन्क आढळली
https://docs.google.com/document/d/1rzzvlMcDgrfSS-X6MriouHF0hHQG3rYNfhnx...

सुहासदवन's picture

28 Nov 2013 - 5:13 pm | सुहासदवन

बहुतेक वेळा अश्या प्रकारचा तुलनात्मक आढळतो आणि त्यात स्वदेशी विरुद्ध विदेशी अशी तुलना असण्याऐवजी हिन्दुस्तान युनिलिवर विरुद्ध इतर ब्रान्डस अशी असते.

हिन्दुस्तान युनिलिवर १९३३ ला स्थापन झालेली भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असून, ६७% शेअर्स युनिलिवर ह्या डच कंपनी कडे आहे.
ह्याचा अर्थ आपण ह्या कंपनीच्या उत्पादनाकडे विदेशी म्हणून काना डोळा करायचा असा अजिबात होत नाही.

ह्या कंपनीत वस्तू उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि तिथे काम करणारे कामगार दोन्ही भारतीय आहेत मग ग्राहक भारतीय का नकोत?
हीच युनिलिवर कंपनी भारतातील सर्वात मोठी निर्यात करणारी कंपनी देखील आहे.

उगाच विदेशी विदेशी करीत HUL च्या वस्तूंना विरोध करायचा आणि मग ह्या सारख्या इतर कंपन्यांमध्ये विदेशी भांडवल उपलब्ध होत नाही म्हणून ओरड कशाला?

हिन्दुस्तान युनिलिवरची भारतीय बाजारपेठेवर असणारी पकड इतर मार्गाने सुटत नाही म्हणून जर हा मार्ग असेल तर माहीत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Nov 2013 - 6:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

थोडक्यात सांगायचे तर जर रुपयाची किंमत जगाच्या बाजारात वाढायला हवी असेल तर खालच्या मुख्य गोष्टी तरी आवश्यक आहेतः

१. भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त असायला हवी... किमान आयात फार डोईजड असायला नको. आयात कमी करणे काही वेळेस अत्यंत कठीण पडते, उदा. इंधनाच्या तेलाची आयात. त्यावेळेस आयातीस सबळ स्थानिक पर्याय शोधणे हा एक उपाय असू शकतो.

२. भारत सरकारचे उत्पन्न हे त्याच्या खर्चाच्यापेक्षा जास्त अथवा कमीत कमी ९५-९८% टक्के असायला हवे... यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी सरकारला कर्ज काढावे लागणार नाही किंवा झेपेल एवढेच काढावे लागेल. हे होण्यासाठी उत्पन्न वाढवणे जेवढे महत्वाचे तेवढेच खर्च भ्रष्टाचारमुक्त पद्ध्तीने योग्य कारणासाठी खर्च होणे अपेक्षित आहे (ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्सेस).

३. सरकारची आर्थिक आणि व्यापारी नीति अशी पाहिजे की परदेशी गुंतवणूकदारांना इतर देशांपेक्षा भारतात गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे आणि जास्त निर्धोक वाटले पाहिजे.

हे वरील सर्व सर्वस्वी सरकारच्या आर्थिक आणि व्यापारी धोरणांवर अवलंबून असते.

सर्वसामान्य नागरिकांकरिता लेखात जे उपाय सुचवेले आहेत त्यासाठी मराठीत एक चपखल म्हण आहे:
दात कोरून पोट भरत नाही.

प्रसाद१९७१'s picture

29 Nov 2013 - 4:59 pm | प्रसाद१९७१

लोढा नी ३२०० कोटी रुपयांना लंडन मधे property घेतली ( आज ची च बातमी आहे ). असे जर होणार असेल तर रुपया पडेल नाही तर काय.

क्लिंटन's picture

29 Nov 2013 - 5:15 pm | क्लिंटन

लोढा नी ३२०० कोटी रुपयांना लंडन मधे property घेतली ( आज ची च बातमी आहे ). असे जर होणार असेल तर रुपया पडेल नाही तर काय.

हे तितकेसे पटले नाही.लोढानी लंडनमध्ये प्रॉपर्टी घेतली ठिक आहे.पण ती प्रॉपर्टी भविष्यात एक तर विकली जाईल किंवा इंग्लंडमधील बिझनेस वाढवायला त्या प्रॉपर्टीचा उपयोग होईल. लोढांच्या व्यवसायाचे स्वरूप लक्षात घेता ती प्रॉपर्टी चांगला दर आल्यानंतर विकली जाईल याचीच शक्यता जास्त.आणि लोढा ती प्रॉपर्टी तोट्यात नक्कीच विकणार नाहीत.मग आज जरी परकीय चलन देशाबाहेर गेले असले तरी भविष्यात त्यापेक्षा जास्त चलन देशात येईल त्याचे काय? तीच गोष्ट टाटांनी जाग्वार आणि कोरस या कंपन्या विकत घेतल्या त्याविषयीही बोलता येईल.

भारतीय विद्यार्थी परदेशात पहिल्यांदा शिकायला जातात तेव्हा ते परकीय चलन घेऊन जातात. भविष्यात नोकरी करून तेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन भारतात पाठवतात हे लक्षात घेतले नाही तर या विद्यार्थ्यांनाही परकीय चलन देऊ नका असे म्हणता येईल!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Nov 2013 - 7:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

लोढांनी किंवा इतर कोणीही जर अशी गुंतवणूक कायदेशीर मार्गांनी केली असली आणि तिच्यातून त्यांना जास्त फायदा होत असेल तर त्यांचे सुजाण गुंतवणूकदार म्हणून कौतुकच करायला पाहिजे.

त्यांनी जर तेच पैसे भारतात गुंतवावे असे वाटत असले तर त्यांना परदेशापेक्षा भारतातली गुंतवणूक जास्त फायदेशीर होईल अशी भारतीय सरकारची आर्थिक आणि व्यापारी नीती असायला पाहिजे. मग लोढांसारखे भारतीयच काय पण परदेशीय सुद्धा भारतात गुंतवणूक करायला रांग लावतील.

देशातील गुंतवणूक वाढवायला आणि देशातील पैसा बाहेर जाण्याला प्रतिबंध करण्यासाठी खालील गोष्टी अजिबात उपयोगी नाहीत

१. जबरदस्तीचे कायदे: हेच १९९० पूर्वी चालले होते आणि देशातला काळा पैसा परदेशी बँकात जाऊन भारताचे प्रचंड आर्थिक नुकसान होण्यापलीकडे काही साधले गेले नाही.

२. परदेशी लोकांची, अनिवासी भारतीयांची किंवा अजून कोणाचिही विनवणी: कोणीही आपल्या पैशाची गुंतवणूक बेजबाबदारपणे आणि घाट्यात करावी अशी आशा करणे अजिबात शहाणपणाचे नाही. भारतीय स्थायिक लोकही सर्व शक्य असणार्‍या पर्यायांपैकी जी गुंतवणूक जास्तीत जास्त सुरक्षित आहे आणि जास्तीत जास्त परतावा देते तिचीच निवड करतात ना? मग इतरांकडून वेगळी अपेक्षा का करावी? किंबहुना तसे न करणे शहाणपणाचे नाही.

उपास's picture

29 Nov 2013 - 7:30 pm | उपास

अगदी हेच म्हणणार होतो..
ग्लोबलायझेशनचा एकांगी विचार करता येणार नाही आणि बदलत्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीत वैश्विक दृष्टीकोन बाळगण्याला पर्याय नाही. स्वदेशीचा विचार करताना आपण कूपमंडूक होत असू तर त्याला शून्य अर्थ आहे! जगाच्या स्पर्धेत उतरायला बळ कमवायचं हे महत्त्वाचं, स्पर्धा नाकारयची ते ही आपल्या सोयीनुसार हे हास्यास्पदच आहे.

क्लिंटन's picture

29 Nov 2013 - 9:15 pm | क्लिंटन

जगाच्या स्पर्धेत उतरायला बळ कमवायचं हे महत्त्वाचं, स्पर्धा नाकारयची ते ही आपल्या सोयीनुसार हे हास्यास्पदच आहे.

+१.

ग्रेटथिन्कर's picture

29 Nov 2013 - 9:40 pm | ग्रेटथिन्कर

सरळ दिगंबर व्हावं, रुपया अशी उसळी मारेल की बोलता सोय नाही...

विजुभाऊ's picture

1 Dec 2013 - 9:48 pm | विजुभाऊ

खलीस्थान चळवल चालू होती तेंव्हा एक जोक प्रचलीत होता.
खलीस्थान ला सर्वात प्रबळ देश बनवायचे असेल तर काय करावे लागेल
आलेल्या अनेक सुचनांपैकी विचाराला आलेली एक गंभीर सूचना:-

अमेरीकेवर स्वारी करा.
अमेरीका हरली तर आपण जगात सर्वात प्रबळ देश बनु.
आपन हरलो तर अमेरीकेचे एक राज्य बनून राहू. ( आपोआपच सर्वात श्रीमन्त देशाचा एक भाग होऊ)