राम राम मंडळी,
आपल्याला सर्वांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की मिसळपाव डॉट कॉमच्या अक्षर-सामर्थ्यदात्याने, म्हणजेच गमभन ने आता कात टाकली असून त्याची पुढील आवृत्ती 'गमभन ०८.०२.२०' ही आता प्रकाशित झाली आहे आणि मिसळपावला जोडली गेली आहे!
मंडळी, या सर्वाचे श्रेय आमचे मित्र व मिसळपावचे एक सभासद श्री ओंकार जोशी यांना जाते. त्यांच्या बुद्धीमत्तेला आणि अथक परिश्रमांना जेवढी दाद द्यावी तेवढी कमीच आहे! हे केवळ ओंकार हा आमचा मित्र आहे म्हणून आम्ही म्हणत नाही, तर खरोखरच तशी वस्तुस्थिती आहे!
आज आंतरजालावर ओंकार जोशी यांची गमभन ही मुक्त अक्षरदाताप्रणाली मिसळपावसारख्या मराठी संकेतस्थळांना अक्षरश: वरदायी ठरली आहे. अन्यथा, मिसळपाववर मराठी लेखन करणे शक्य झाले नसते!
पूर्वी एका ठराविक संकेतस्थळावरची ही मराठी लेखनाची एकाधिकारशाही ओंकार जोशींच्या कर्तृत्वामुळे आज निकालात निघाली आहे आणि म्हणूनच मिसळपावसारखी अनेक संकेतस्थळे केवळ कृतज्ञतेच्या भावनेतून,
"अक्षरदाता सुखीभव!"
असे म्हणतील!
ओंकारचे पुन्हा एकदा मनापासून कौतुक आणि त्याला शतश: धन्यवाद! त्याचे 'गमभन' हे उत्तरोत्तर अधिकाधिक यशस्वी होवो, हीच अगदी मनापासूनची प्रार्थना...
मिसळपाव डॉट कॉम तर्फे गमभन करता कृतज्ञतेची भावना व्यक्त करून हे दोन शब्द संपवतो...
-- तात्या अभ्यंकर.
ता क - मिसळपावच्या मुखपृष्ठाकरता आणि एकंदरीतच मिसळपावच्या तांत्रिक कामांकरताही ओंकार जोशी या पुढे विशेष लक्ष घालतील! आता साक्षात गमभनकारच जेथे मिसळपावच्या पाठीशी आहेत तेव्हा चिंता कशाची?! :)
आणि नीलकांत?
नीलकांतरावांच्या मेहनतीला आणि मिसळपावकरता त्यांनी ज्या पोटतिडकीने काम केले आहे/करत आहेत त्याकरता तर मिसळपावकडे कुठलेही शब्दच नाहीत! आहे ती केवळ अन् केवळ कृतज्ञतेची भावना! मिसळपाव त्यांचंच आहे...!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
24 Feb 2008 - 6:49 pm | विसोबा खेचर
ही चाचणी आहे..ही चाचणी आहे..ही चाचणी आहे..ही चाचणी आहे..ही चाचणी आहे..ही चाचणी आहे..ही चाचणी आहे..ही चाचणी आहे..ही चाचणी आहे..ही चाचणी आहे..ही चाचणी आहे..ही चाचणी आहे..ही चाचणी आहे..गमभनचा विजय असो.. :)
मंडळी, च्यामारी आता काय लिवायचं ते लिवा बिनदास्त! नवा एडिटर बशिवला आहे, त्यात कलर-बिलर, आक्षरांचा आकार, वगैरे समदंसमदं हाये! तवा आल दी बेष्ट...:)
आपला,(चाचणीखोर!) तात्या.
24 Feb 2008 - 6:49 pm | प्रमोद देव
ॐकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
मिसळपावच्या नव्या स्वरूपाचे मनःपूर्वक स्वागत. त्याबद्दल नीलकांत,ॐकार आणि तात्याचे वैयक्तिक अभिनंदन!
एक सूचना: मिपाच्या मुखपृष्ठावर आता मिसळच मिसळ दिसतेय. तेव्हा इथल्या दोन बशांमधील एक बशी कमी केल्यास ते जास्त नीटनेटके दिसेल असे वाटते. तरीही इतर सदस्यांचे त्याबाबतीतले मत लक्षात घेऊन योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल ही खात्रीही.मिपाचा उत्कर्ष असाच उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो हीच हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो.
24 Feb 2008 - 7:27 pm | विकास
नमस्कार,
तात्यांचे, ओंकार जोशींचे आणि नीलकांतचे अभिनंदन. हे स्थळ वापरणे अजूनच सुलभ झाले आहे.
एक अडचण - मलाच होत आहे का इतरांनापण ते माहीत नाही. पण मी लिहीत असताना, जर ब्राउजर स्क्रोल केला तर नंतर अक्षर देवनागीरीच्या ऐवजी रोमन लिपीत टंकणे आपोआप सुरू होते. मग वर जाउन ते बदलावे लागते. (हाच प्रकार पूर्वी मनोगतावर अनुभवला आहे!)
अवांतरः सुविचारांची कल्पना छान आहे! आजचा सुविचार, "आईवडिलांचा आणि गुरुजनांचा नेहमी आदर करावा! " वाचून फक्त एक बाळबोध विचार मनात आला की जे आईवडील नाहीत अथवा गुरूजन नाहीत त्यांचे काय करावे! :)
24 Feb 2008 - 7:44 pm | धोंडोपंत
ओंकार व नीलकांत,
हार्दिक अभिनंदन. मिसळपाव असेच उत्तरोत्तर अद्ययावत आणि आकर्षक होत जावो या सदिच्छा.
आपला,(आपला) धोंडोपंत
च्या मायला आमचं लेखन पण प्राध्यापकांसारखं रंगीत यायला लागलं की!
आपला,(रंगीबेरंगी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
24 Feb 2008 - 8:01 pm | संजय अभ्यंकर
तात्या,
ओंकार, नीलकांत व आपले आनेक आभार.
ह्या सुधारणा अमुलाग्र आहेत.
संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
24 Feb 2008 - 8:11 pm | संजय अभ्यंकर
एकदा केलेले लेखन पुन:संपादित केल्यास
error येत आहे व साईट उघडत नाही.
कृपया याचे निराकरण करावे.
संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
25 Feb 2008 - 10:22 am | ॐकार
ह्याचे कारण ड्रुपल मधील टॅब हे मोड्यूल आहे. इंटरनेट एक्सप्लोरर आणि टॅब मोड्यूल एकत्र असल्यास वरील अडचण येते. नीलकांतने टॅब मोड्यूल सध्या बंद केले आहे. ही अडचण पुन्हा उद्भवेल असे वाटत नाही.
24 Feb 2008 - 8:56 pm | अविनाश ओगले
एकदा केलेले लेखन पुन:संपादित केल्यास
error येत आहे व साईट उघडत नाही.
24 Feb 2008 - 9:29 pm | प्राजु
तात्या, ओंकार आणि निलकांत,
मिसळपाव चे नवे रूपडे गोंडस आहे. छान आहे.
अजून काही पुरेसे लेखन मी केले नाही. पण ते करताना काही अडचण आल्यास तसे लिहिन इथे.
धन्यवाद.
- प्राजु
24 Feb 2008 - 10:32 pm | पिवळा डांबिस
ॐ अक्षरदाता व सहाय्यकर्ता सुखी होवोत्!!!!!
आमची सही लहान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल तर असंख्य धन्यवाद!!!!:))
-डांबिस
29 Feb 2008 - 10:43 pm | llपुण्याचे पेशवेll
हे हिरवा -डांबिस वाटत आहे. (ह.घ्या.)
पुण्याचे पेशवे
25 Feb 2008 - 1:43 pm | सहज
ओंकार जोशींचे आणि नीलकांतचे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व दोघांना धन्यवाद, त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
25 Feb 2008 - 4:27 pm | अवलिया
राम राम
आयला दोन दिवस गावाला गेलो होतो
येवुन पहातो तर काय ढिंग च्याक टुंग
मस्त
चालुद्या जोरात हाणा तिच्यायला कचकन अन काय
नाना
29 Feb 2008 - 12:24 pm | सर्किट (not verified)
मॅकवर सफारीमध्ये मिसळपाव चालणे बंद झाले आहे. त्यामुळे आम्हाला येथेलिहिता येत नाही. हे मुद्दाम केले असल्यास ठीक आहे :-), अन्यथा लक्ष घालावेही विनंती.- सर्किट
29 Feb 2008 - 12:41 pm | सरपंच
बंद झाले म्हनजे काय झाले? उघडतच नाही की उघडून बंद पडते? कारणसध्या त्रास आहे तो IE मधे. मॅक आणि सफारी बद्दल काही कल्पना नाही. सविस्तर सांगाल का? खरं तर तुम्हाला सुध्दा कल्पना असेलच की असामुद्दमहून कुठलाच प्रयत्न झालेला नाही. :-) तरी सुध्दा काही सुचवता आले तर बघा.
29 Feb 2008 - 12:49 pm | सर्किट (not verified)
प्रतिक्रिया चा टेक्स्ट बॉक्स दिसत नाही. कुठेतरी एक ऍडिशनल स्पेस पडलीआहे असे व्ह्यू सोर्स वरून वाटते. (बाकी सगळे व्यवस्थित दिसते.) (बाकी मुद्दाम बंद करण्याविषयी आम्ही गंमत केली होती नीलकांतराव. एव्हढे सीरियसली घेऊ नका. बिरुटे साहेब नुकतेच कुठेतरी म्हणालेत ना, की सर्किटराव इतरांना नीट वावरू देत नाहीत, म्हणून !)- सर्किट
29 Feb 2008 - 7:40 pm | सुधीर कांदळकर
ॐकारराव व नीलकांत, अनंत धन्यवाद.
ढुंम्म होते व पडदा गुल होतो. रिव्हर्स गेअर टाकला की कधीकधी प्रतिक्रिया दिसते कधीकधी नाही. एक्सपी व आय ई ६ आहे.