इतिहासाचे एक पान...

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
20 Jul 2009 - 4:12 pm

२० जुलै १९६९ !

आज पासून चाळीस वर्षामागे मानवाने चंद्रावर आपले पहिले पाऊल ठेवली,
अपोलो -११ दरमजल करुन २० जुलै १९६९ ला नील आर्मस्ट्रांग, एडविन एल्ड्रिन व मिशेल कॉलिंस ह्यांना घेऊन पोहचले तो मानवी जिवनाच्या वाटचालीतील एक उतुंग क्षण ! आपली धरती सोडून आपण आकाशाच्या पण पलिकडे चंद्रावर पोहचलो. नील आर्मस्ट्रांगने सर्व प्रथम चंद्रावर पाय ठेवले.. ह्या गोष्टिला आता ४० वर्ष झाली... मानवी जिवनातील एका महत्वाच्या टप्पावर मागील चाळीस वर्षापुर्वी आपण होतो व आता भारतीय चंद्रयान २०१२ मध्ये मानवासह जाणार आहे त्याचीच वाट पाहतो आहे.. तिरंगा तर येथे आहेच पण भारतीय पाऊल ही चंद्रावर पडावे ही लहानपणापासून मनात असलेली इच्छा... इस्त्रो लवकरच पुर्ण करेल अशी आशा !!!!

येथे एक एडविन एल्ड्रिड चे वाक्य लिहण्याचा मोह टाळता येत नाही आहे...

एडविन एल्ड्रिन

"- मैं दावे के साथ कह सकता हूं कि यदि हमारे राजनेता एक लाख किलोमीटर की ऊंचाई से इस धरती को देखें तो उनका नजरिया पूरी तरह से बदल जाएगा। ऊपर से धरती छोटे से गोले के रूप में दिखाई देती है। कहीं कोई सीमाएं नजर नहीं आतीं, कहीं कोई बेतुके तर्क सुनाई नहीं देते। धरती केवल नीली और श्वेत दिखाई देती है, न कि पूंजीवादी या साम्यवादी और न ही गरीब या अमीर। "

**********
मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले खरे पण त्यामुळे शेकडो वर्षापासून चालत आलेली मिथ / कथा / कल्पना / चंद्राला हात लावण्याची इच्छा / गोष्टीतला चंदामामा.. हे खरच सगळे संपले की अजून ही चंद्र आपल्याला खुणवतो.. हे जेव्हा तुम्ही पोर्णिमेंच्या रात्री जेव्हा पुर्ण चंद्र पहाल तेव्हाच कळेल..

संस्कृतीवावरप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाप्रतिसादअभिनंदन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

20 Jul 2009 - 4:16 pm | अवलिया

वा राजे चांगली आठवण करुन दिलीस. धन्यवाद :)

अवांतर - आज आम्ही पण चंद्रावर जाणार... तुला नाही. टुकटुक

--अवलिया
=============================
क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)

विंजिनेर's picture

20 Jul 2009 - 4:23 pm | विंजिनेर

- मैं दावे के साथ कह सकता हूं

लय भारी...

स्वगतः ह्या एल्ड्रिनला हिंदी-विंग्रजी ५०-५०चे होते का १००चे? च्यायला कोण कुठला तो, आपल्यापेक्षा शुद्ध हिंदी बोलतो आहे की लेकाचा

दशानन's picture

20 Jul 2009 - 4:26 pm | दशानन

=))

अरे लेका त्याचे वाक्य मी शोधत होतो तोच मला भास्कर वर हिंदी मध्ये ते वाक्य भेटले.. तेच चांगले वाटले म्हणून डकवले.. त्यामायला त्या फडतुस इंग्रजी पेक्षा तरी बरेच की कमीत कमी भारतीय भाषेत लिहले आहे.. उच्च / हुच्च मिपाकरांच्या बरोबर येथे गावरान व अडाणी मिपाकर आहेत राव ;)

विसरु नका कोणाला ही... सगळ्यांना बरोबर घेउन चला.. जो येत नाही त्याची बकोटी धरुन बरोबर घ्या.. पण आपल्यात घ्या :D

विकास's picture

20 Jul 2009 - 4:33 pm | विकास

त्यामायला त्या फडतुस इंग्रजी पेक्षा तरी बरेच की कमीत कमी भारतीय भाषेत लिहले आहे.. उच्च / हुच्च मिपाकरांच्या बरोबर येथे गावरान व अडाणी मिपाकर आहेत राव...

अहो पण आत्ताच तुम्ही सांगितले ना की "ना गरीब या अमीर..." वगैरे काहीतरी (हिंदीत, मी माझे हिंदी खाजगी ठेवतो :-) ;) )

बाकी मला वाटले वरून भाषांमधे पण काही फरक नाही हे सांगायला म्हणून असे आपण हिंदीतील वाक्य दिले!

दशानन's picture

20 Jul 2009 - 4:36 pm | दशानन

अरे अरे... कोणीतरी मदतीला धावा रे माझ्या ;)

विकास राव आले... पळा पळा !

=))

* मराठी मध्ये भाषांतर करा राव कोणी तरी :)

अवलिया's picture

20 Jul 2009 - 4:40 pm | अवलिया

अरे कुठे पळशील लेका पळुन पळुन... राहु दे .. वि़कासराव आपलेच आहेत. विसरलास का तो मागचा किस्सा ? :?

विकास राव करा बरे त्याचे मराठीत रुपांतर... :) की सांगु 'त्यांना' तुमचा नवा धागा कशावर आहे ते ? प्रतिसाद आधीच तयार ठेवतील म्हणजे... ;)

--अवलिया
=============================
क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)

विकास's picture

20 Jul 2009 - 5:22 pm | विकास

त्या आर्मस्ट्राँगचे एक पाउल पडले तरी संपुर्ण मानवजातीचे असे म्हणणार. पण माझा एक शब्द पडला तर तो केवळ विकासचाच असे का? संपुर्ण मानवजात जाउंदेत किमान मिपापरीवाराचा का नाही? :-)

बाकी थोडे गंभीरः सोपानदेव चौधरींच्या खालील ओळी आठवल्या:

स्फुटनिकांचा संचार चंद्रलोकावर, कागदी बाण उडवणार्‍या आम्हाला काय त्याची तमा?
आम्ही फक्त गात राहीलो, "कोणता मानू चंद्रमा, भुवरीचा की नभीचा?"
नभीचा चंद्र राहीला नभांतरी आणि भुवरीच्या चंद्रावरच आमची स्वारी...

आणि आता वाटते की आता जर त्यांनी देशाची चांगल्या अर्थाने प्रगती पाहीली असती तर असेच वाटले असते का?

दशानन's picture

20 Jul 2009 - 10:15 pm | दशानन

हि तुमची नैतिक माघार समजवी का आम्ही :?

+++++++++++++++++++++++++++++
काय ? देवाला गंध, फुल वहाणे, देवळाला पैशाची वगैरे मदत करणे म्हणजे भ्रष्टाचार वाटतो तुम्हाला? वा ! आनंद वाटला आपल्याला भेटुन. ;)

अवलिया's picture

20 Jul 2009 - 4:27 pm | अवलिया

राजे चंद्रावर हवा नसतांना तो झेंडा फडफडतो कसा हो ?

(निरागस) अवलिया

=============================
क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)

दशानन's picture

20 Jul 2009 - 4:31 pm | दशानन

थांबा, आलोच नील ला विचारुन येतो ;)

निखिल देशपांडे's picture

20 Jul 2009 - 4:38 pm | निखिल देशपांडे

राजे...
आजच्याच दिवशी माणुस चंद्रावर पहिल्यांदा पोहचला होता त्याची आठवण करुन दिल्या बद्दल धन्यवाद
बाकी तुम्ही रोजच चंद्रावर जात असाल नाही???

थांबा, आलोच नील ला विचारुन येतो
अरे नील भुजबळ तुमच्या ओळखिचा आहे तर!!!
==निखिल

विमुक्त's picture

20 Jul 2009 - 6:01 pm | विमुक्त

सिनेमा मधे हवा नसताना पण नायिकेचे केस कसे झुलत असतात.... अगदी तसच....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2009 - 10:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>राजे चंद्रावर हवा नसतांना तो झेंडा फडफडतो कसा हो ?
सहमत आहे. एक दोन दिवसापूर्वीच असा लेख सकाळ की लोकमत मधेही वाचण्यात आला. झेंडा फडफडण्याबद्दल आक्षेप आहेच.

-दिलीप बिरुटे

Nile's picture

20 Jul 2009 - 10:22 pm | Nile

अहो प्रा.डॉ. ते मीथ कवाच बस्ट केलं!

विजुभाऊ's picture

21 Jul 2009 - 3:00 pm | विजुभाऊ

त्यासाठी स्प्रिन्गा वापरत्यात

प्राक्तनास अर्थ असतो म्हणून ते जगणे व्यर्थ जात नाही

विनायक प्रभू's picture

20 Jul 2009 - 5:08 pm | विनायक प्रभू

पायला तर 'गट्री' मित्रमंडळाची 'याने' चंद्रावर पोच्णार हायेत की.

दशानन's picture

20 Jul 2009 - 6:12 pm | दशानन

अर्ध्या रस्त्यात पोहचली सुध्दा ;)

रामदास's picture

20 Jul 2009 - 10:26 pm | रामदास

प्रिय बाबा, मि तूमची इ मेल वाचली.
चंद्रावर माणूस गेल्याची इन्फो तुमी छन लिहीली आहे.
मि माझ्या प्रो़जेक्ट मधे युज करील.
बट डॅड आय मस्ट हॅव रोलेक्स ऑयस्टर मून फेज. अँड दॅट टू ऍट अर्लीएस्ट.
मम्मा सेज लिहीणं वगैरे इज ऑल बुलशीट इफ यु कांट अफोर्ड इट.
डॅडा. प्लीज मेक योर रायटींग दॅट वर्थ.
आय मस्ट हॅव रोलेक्स ऑयस्टर मून फेज
(http://www.misalpav.com/node/2477)

सागर's picture

21 Jul 2009 - 12:45 pm | सागर

राजे,
चांगली आठवण करुन दिलीत.
या निमित्ताने भविष्यकाळाचा आढावा घेण्यास छान संधी मिळाली.
आधी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवले. त्यानंतर ४० वर्षांनंतर आजपर्यंत चंद्रावर ३०० मिलियन एकर जमीन विकली गेली आहे.
स्त्रोत : http://www.lunarland.com
ज्यांना घ्यायची असेन त्यांनी आत्ताच जमीन घेऊन ठेवा चंद्रावर...
वर दिलेले संकेतस्थळ हे चंद्रावर जमीन विकणारे एकमेव अधिकृत आहेत. कोण जाणे तुमच्या नातवाला चंद्रावर तुम्ही विकत घेतलेल्या जागेवर बिर्‍हाड थाटायची संधी मिळेल :)

चंद्र आहे साक्षीला हेच खरे.... ;)
(चंद्रप्रेमी) सागर