वाहन पार्श्चभाग लिखाण अर्थात बंपर स्टिकर

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
17 Jul 2009 - 10:16 am

आता बहूतेक जण म्हणतील की यावर बरेच धागे लिहून झाले, हा फूटकळ धागा आहे, मी आपणाला ओळखत नाही त्यामुळे (निगेटिव्ह का होईना पण) प्रतिक्रीया देणार नाही वैग्रे वैग्रे. तरी पण वाचा आणि आनंद घ्या. असो.

रत्याने जातांना वाहनांच्या पार्श्चभागी लिखाण अर्थात बंपर (तसेच) नेम प्लेट, ट्रकचे फाळके, मागील काच, मडगार्ड रबर वर अनेक (महाभागांनी) अनेक तर्‍हेचे लिखाण केलेले असते.
अजाणतेपणी आपण त्या कडे बघतो किंवा बघत नाही. काही काही लिखाण मनास भिडते तर काही वेळा मनोरंजन होते. रहदारीच्या वैतागात आपल्याला ते लिखाण नकळत सुखावून जाते.

मी खाली काही तसले बघीतलेले लिखाण टाकलेले आहे. आपल्याला वाहनांवरील जो काही तसला मजकूर आवडला असेल किंवा आपण त्याचा फोटो काढला असेल तर तो आपण येथे टाकावा जेणे करून आपण तसले लिखाण संपादीत अवस्थेत राहू शकेल.

धन्यवाद.

मी बघीतलेले वाहन ------------------ मजकूर

रिक्षा : --------------------------- Love एक खर्चा
रिक्षा : ---------------------------- O नेते
फाय व्हिलर : -----------------------घुम रही है गली गली ===== १२१६ भरके चली (१२१६ हा त्या वाळूने भरलेल्या फाय व्हिलर चा नंबर होता.)

ट्रक : ----------------------------- HORN OK PLEASE (हे नेहमीचेच. ह्यावरचा हा अ‍ॅनिमेशन पट तर धमाल आहे. An Irish-Indian collaboration, Horn OK Please is a stop motion short movie which follows a day in the life of a taxist in Bombay. Life ain't easy, but the way of karma is just around the corner.
The director and producer is Joel Simon with Vaibhav Kumaresh as director of animation. )

ट्रक मडगार्ड रबर ------------------------ TATA (हे पण नेहमीचेच)

खडी डबर चा ट्रक --------------------- पहेले खंडेराव बोलो फिर दरवाजा खोलो
एस. टी. ---------------------------- (पुढिल काचेवर --- डिझेल वाचवणे हे ड्रायव्हरच्या हातात आहे. (माझा मित्र त्यापुढे म्हणत असे की --- डिझेल वाचवणे हे ड्रायव्हरच्या हातात तर कंट्रोलरच्या पायात आहे. ))

......आणखी नंतर टाकेनच.

प्रवासभाषासमाजमौजमजास्थिरचित्रअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

17 Jul 2009 - 10:28 am | पाषाणभेद

Bumper Sticker spotted in Erie, Colorado.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विकास's picture

17 Jul 2009 - 7:48 pm | विकास

वरील छायाचित्रातील "Just ask the Indian" मधील इंडीयन म्हणजे भारतात ज्यांना रेड इंडीयन म्हणतात (हा शब्द प्रयोग येथे चांगला समजला जात नाही म्हणून मग "इंडीयन" अथवा "नेटीव्ह अमेरिकन्स" असे म्हणतात).

मला त्या बंपर स्टीकर्सचे कारण समजले नाही मात्र कदाचीत त्यात असे म्हणायचे असेल की इथल्या नेटिव्हांनी युरोपातून आलेल्या लोकांवर विश्वास ठेवला, त्यांच्या सरकारवर पण विश्वास ठेवला आणि नंतर काय झाले ते माहीत आहेच...

असेच अमेरिकेवरील अजून एक मजेशीर अमेरिकेतीलच बंपरस्टिकर:

बुशचे राष्ट्राध्यक्षपद ज्या दिवशी संपणार होते त्यावरून पण बंपर स्टिकर्स आणि संगणकासाठी काउंट डाऊन सुरू होते:

धनंजय's picture

18 Jul 2009 - 4:12 am | धनंजय

१८व्या आणि १९व्या शतकात अमेरिकेच्या केंद्र सरकारने नेटिव्ह अमेरिकनांच्या जमातींशी एक-एक करार करून ते मोडले, त्याचा संदर्भ असेल. (अगदी शेवटी आजचे जे ओक्लहोमा राज्य होते, ते "इंडियन टेरिटरी" म्हणून स्वतंत्र ठेवण्याचा करार केला होता - तोही गेलाच.)

कोलोराडो मधल्या स्टिकरचे ताज्या बातम्यांपैकी असेही कारण असू शकेल - अमेरिकेच्या केंद्र सरकारकडे नेटिव्ह राष्ट्रांची काही अमानती संपत्ती (इंडियन ट्रस्ट - अमेरिकेच्या केंद्रीय गृहखात्याचे संकेतस्थळ) होती. ती कुठे कधी कशी नाहिशी झाली, त्याबद्दल कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. याविषयी कोर्ट-खटले चालू आहेत.

नेटिव्ह अमेरिकनांना साधारणपणे "गोर्‍या" सरकारबद्दल फार अविश्वास असतो.

चिरोटा's picture

17 Jul 2009 - 10:34 am | चिरोटा

"बुरी नजर देखनेवाले तेरा मूह काला"हा बर्‍याच वेळा दिसतो.
"देखो मगर प्यार से"
"१३ मेरा ७" रिक्षाच्या मागे.
८० च्या दशकात "हम दो हमारे दो",९०% रिक्षांच्या मागे लिहिलेले असायचे.
आणि एस्.टी च्या मागे "तांबी वापरा" असे लाल अक्षरात.
"आपकी जिंदगी बिस्कूटपे ड्रायव्हर की जिंदगी ब्रेकपे"

भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विकास's picture

17 Jul 2009 - 7:52 pm | विकास

आणिबाणीच्या काळात एसटी बसेस (तेंव्ह दुसर्‍या नसायच्याच म्हणा!) आणि कधीतरी ट्रक्सवरः

"कठोर परीश्रमाला पर्याय नाही"

टारझन's picture

17 Jul 2009 - 10:38 am | टारझन

वा !! छाण धागा आहे !! मस्त रे पाषाणभेदा !!

अवांतर :
नविन नियम लागू झाल्याने मनमोकळा प्रतिसाद लिहू शकत नाही मित्रा !
ह्या विभागात एक लय भारी प्रतिदास टाकणार होतो !!
पण असो .. तुझे दुर्दैव .. लेट काढलास धागा !!

(नमोगती मिपाकर) टारझन
सद्ध्या सुतकी चेहरे करून बसलो आहोत !!

छोटा डॉन's picture

17 Jul 2009 - 11:50 am | छोटा डॉन

टारुभाऊ, ब्रेक मारा ब्रेक ...!!!
मजेशीर प्रतिसाद. असो.

आम्ही एक ट्रक पाहिला होता काही काळापुर्वी, त्यावर लिहले होते "चपला घाला आणि चालु लागा" , आम्हाला त्याचा अर्थ काही केल्या समजला नाही पण तुम्हाला म्हणुन सांगतो आहे ...
बाकी असे अजुन बरेच आहे पण ....

------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)

टारझन's picture

17 Jul 2009 - 4:22 pm | टारझन

आम्ही एक ट्रक पाहिला होता काही काळापुर्वी, त्यावर लिहले होते "चपला घाला आणि चालु लागा" , आम्हाला त्याचा अर्थ काही केल्या समजला नाही पण तुम्हाला म्हणुन सांगतो आहे ...

=)) =)) =)) =))
आपणांस आमचे मन कळते , हे कळोन आणंद झाला ! ह्यातलंच काही तरी लिहीणार होतो , पण हल्ली भक्तिमान लोकं फार झालेत , ते म्हणतात समर्थन करणारेच काड्या सारतात :) असो "सॉरी भक्तिमान" म्हण पाहू !!

आणि हो , तुला भक्तिमान माहित नसला तर त्याच्या नावाने रोज खरडींतून बोंबा ठोक !! अरे कुत्र पण विचारत नाही रे पलिकडच्या गल्लीत .. मग चर्चेत घ्यायला काही करायला नको ?

टिप : भक्तिमान हे माझ्या भक्तिचे प्रतिक आहे, त्याचा कोणी आपल्याशी संबंध लावल्यास आणि त्याची लाल झाल्यास आम्ही जबाबदार नाही .
टिप रिकामी झाली .

डाण्या खरं तर तुला खरड करणार होतो , पण खरडींचे नियम अजुन स्ट्रिक्ट आहेत .. म्हणूनंच इथं खरडलं ..

- (चाटूंचा महामेरू) भक्तिमान

सूहास's picture

17 Jul 2009 - 5:06 pm | सूहास (not verified)

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

एका दुधाच्या टॅ॑करमागे मी " शिवाजी विद्यापीठ " लिहीलेले पाहिले होते.
आणी एका ट्रक मागे " लायनीत घे ना भौ" पाहिले होते..

सुहास

शक्तिमान's picture

18 Jul 2009 - 7:10 pm | शक्तिमान

=)) =)) =)) एक णंबर्स!! :P

प्रशु's picture

17 Jul 2009 - 11:17 am | प्रशु

मुंबईत सध्या "मुलगी शिकली, प्रगती झाली" असे रिक्शांच्यावर लिहिलेले सापडते........

विश्वेश's picture

17 Jul 2009 - 11:18 am | विश्वेश

एक रिक्शा वर मी "ढगाळ वातावरण " असे लिहिलेले पाहिले होते ... शप्पत ... माला अजुन का ते कळाले नाही

विजुभाऊ's picture

17 Jul 2009 - 11:26 am | विजुभाऊ

१२ के फूल ३४ की माला
याचा अर्थ मला कळालाच नाही.
एका रिक्षावर मी "इतिहास मत पूछो" असे वाचले

टवाळचिखलू's picture

17 Jul 2009 - 11:30 am | टवाळचिखलू

१ ) http://www.misalpav.com/node/698 - प्राजु
२) http://www.misalpav.com/node/3734 - निसर्ग
३) http://www.manogat.com/node/3399 - माधव कुळकर्णी

सुप्रिया's picture

17 Jul 2009 - 11:32 am | सुप्रिया

चिटके तो फटके!
एका रिक्शाच्या मागे मी पाहिलं होतं.

-सुप्रिया
देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.

mamuvinod's picture

17 Jul 2009 - 12:24 pm | mamuvinod

धक्का लागी बुक्का
एक मोटरसायकलस्वाराचे विचार

बघतो काय रागाने? मागे टाकले वाघाने
एक जिपवाला

राजे तुम्हि पुन्हा जन्माला या

कपिल काळे's picture

17 Jul 2009 - 1:31 pm | कपिल काळे

सांग लीला अ ३० का ? ( ट्रकवाला सांगलीचा असावा)
पुरंदरची रानी. ---आणखी येक टरकवाला.
कविता, सोनम, मीलन, रानी, बच्चू --खडीचा डंपर
थांब लक्समी कुक्कु लावते-- पाण्याचा ट्यांकर.
बुरी नजरवाले तेरा मुह काला
ए रिक्षावाला नाही ओ रिक्षावाले म्हना-- कुठे लिहिलेले असेल ते वोळखा?

दादांचा आशिर्वाद.
तात्यांची कृपा.--- हे कुठे लिहिलेले आहे ते ही वोळखा.

धमाल मुलगा's picture

17 Jul 2009 - 2:54 pm | धमाल मुलगा

हल्लीच पाहिलेलं एकः

गाडीच्या मागे शिवरायांचं चित्र आणी खाली लिहिलेलं "बघतो काय? मुजरा कर!"

----------------------------------------------------------------------------------------
एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी ||
रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी ||
ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!

तर्री's picture

17 Jul 2009 - 4:15 pm | तर्री

१.स्पिड किल्स सो किल स्पिड.
२.१३ मेरा दिल १
३.अयोध्येचा राजा ( प्रभू रामचन्द्रांच्या चित्रासहित, लालबाग च्या राजाच्या चाली वर )
४.सित्त ? ( अर्थ सांगा ?)
५. ए३० का ऊ ७ ?( ऊसामध्ये येणार का?)
६. विदर्यांथ्यांची रिक्शा , नका पाहू परिक्षा ( य म का सहित )

श्रावण मोडक's picture

17 Jul 2009 - 6:12 pm | श्रावण मोडक

४.सित्त ? ( अर्थ सांगा ?)
धुळ्याकडं भांग खाऊन टु्ण्ण होणे याला सित्त म्हणतात. मुळात तो सित्ताराम या शब्दावरून आला आहे. हा शब्द भांगखोरांमधला अभिवादनाचा शब्द असल्याचे ऐकलेले आहे. त्यातून पुढे 'सित्त' झाले. एखाद्याने दुसऱ्याला 'सित्त?' असे विचारले की, त्याचा अर्थ, "टुण्ण?" असा असतो. :)
आता तुम्ही कुठं काय पाहिलंत हे मात्र माहिती नाही. त्यामुळं अर्थाची छटा वेगळी असावी.

तर्री's picture

17 Jul 2009 - 8:44 pm | तर्री

धन्यवाद , श्रावणजी ....
हा शब्द त्याच आर्थी वापरलेला आसणार, नक्की.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Jul 2009 - 4:57 pm | llपुण्याचे पेशवेll

एका ट्रकच्या मागे लिहीले होते,
"असं काय बघतोस रागानं
ओव्हरटेक केली आहे वाघानं"
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

परिकथेतील राजकुमार's picture

17 Jul 2009 - 5:17 pm | परिकथेतील राजकुमार

'वाहनाच्या मागच्या बाजुस' असे सर्वांना कळेल अशा भाषेत लिहिता येत असतानाही मुद्दामुन 'पार्श्वभाग' हा शब्द वापरुन आमच्या श्लील आणी संस्कारी मनाला आघात पोचवल्याबद्दल पाषाणभेद ह्यांचा निषेध करुन मी इथे हा प्रतिसाद संपवतो.

©º°¨¨°º© पराश्लील ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

मदनबाण's picture

17 Jul 2009 - 6:47 pm | मदनबाण

या ट्रकच्या 'पार्श्वभाग' वर काय लिहले असेल याचा विचार करतोय्,जमल्यास चित्र झूम करुन पहावे!!!
http://2.bp.blogspot.com/_uAkB9CS_dXE/SfRqgr-lh2I/AAAAAAAADrE/4VuDoc79NH...

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

क्रान्ति's picture

18 Jul 2009 - 7:28 am | क्रान्ति

बहुतेक
"पाउल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे"
असे काहीसे लिहिले असावे! ;)

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

मस्त कलंदर's picture

17 Jul 2009 - 7:29 pm | मस्त कलंदर

लहानपणी आईच्या नोकरीमुळे बर्‍याच शाळा बदलल्या.. त्या निमित्ताने दर दोन आठवड्याला प्रवास व्हायचा.. मी लहान म्हणून आपली गाडी लागली की नाही हे पाहायचे नि बसमध्ये शिरून आई नि तिच्या कडेवरच्या भावासाठी जागा पकडणे हे माझे काम असायचे...
तेव्हा प्रत्येक बसवर "सुरक्षित अंतर ठेवा" म्हणजे बसमधल्या प्रवाशांनी बसताना सुरक्षित अंतरावर बसावं यासाठी लिहिलेलं असावं असं मला सारखं वाटायचं (म्हणजे काय.. भांडणं होणार नाहीत ना!!!).... नि असं असतानाही ही माणसं एवढी गर्दी का करतात हे मला तेव्हा न सुटणारं कोडं होतं...
पुढे तिसरी चौथीत गेल्यावर कधीतरी याचा खरा अर्थ कळाला!!! :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बहुगुणी's picture

17 Jul 2009 - 10:13 pm | बहुगुणी

खूप वर्षांपूर्वी एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून) खालील ओळी लिहिलेल्या वाचल्या:

तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं
माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं
याचा विचार करून गाडी चालवा
(नाही तर दोघांना खड्ड्यात घालवा!)

पांथस्थ's picture

17 Jul 2009 - 10:29 pm | पांथस्थ

पुण्यात एका रिक्षामागे गब्बरचे वाक्य --- "कब है होली?" ... रिक्षाचालक आमच्यासारखाच शोले प्रेमी असावा...

- पांथस्थ

शशिधर केळकर's picture

17 Jul 2009 - 11:12 pm | शशिधर केळकर

सौ में अस्सी बेईमान
फिर भी
'मेरा भारत महान'!

नेटकिडा's picture

18 Jul 2009 - 3:42 am | नेटकिडा

लहानपणी एस. टी. ने प्रवास करताना जवळपास प्रत्येक एस. टी. मध्ये स्व च्छ ता रा खा असे लिहिलेले (छापलेले) असायचे. मी ते स्वच्छ तारा खा असेच वाचायचो. थोडे मोठे झाल्यावर लक्षात आले कि ते स्वच्छता राखा असे आहे.

टुकुल's picture

18 Jul 2009 - 3:55 am | टुकुल

स्व च्छ ता रा खा
=)) =)) =))

नाखु's picture

18 Jul 2009 - 10:22 am | नाखु

कुंवारि लडकी को मत छेड ये पाप होगा...
तु भी किसी दिन लडकी का बाप होगा...

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jul 2009 - 11:03 am | ज्ञानोबाचे पैजार

किचडमे पाव डालोगी तो धोना पडेगा,
ड्रायवर को दील दोगी तो रोना पडेगा
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

जागु's picture

18 Jul 2009 - 11:28 am | जागु

मजेशीर धागा.

टारझन's picture

18 Jul 2009 - 11:49 am | टारझन

"मजेशीर धागा "

वा ! हे आवडले .. कोणत्या ट्रक मागे लिहीलंय हे ?

कोल्हापुरात काही नादखुळे ट्रक फिरताना पाहिले .. त्यांच्या मागे "सजेशीर धागा " असे लिहीले होते

- टार्‍या नादखुळे

शाहरुख's picture

18 Jul 2009 - 12:07 pm | शाहरुख

ट्रक - "मेरी चली तो तेरी क्युं जली"

रिक्षा - "देवा तू सगळ्यांचं भलं कर, पण सुरूवात माझ्यापासून कर"

रिक्षा - "वन्डे च की ओ" (माझा यावर अजुन विचार चालू आहे)

कोल्हापूरातील रिक्षा - तेंडुलकरचा फोटो आणि खाली "याचा नाद खुळा"

रिक्षा - "हाय हे असं हाय बग"

सँडी's picture

18 Jul 2009 - 3:13 pm | सँडी

आई तुझा आशिर्वाद.
थांब लक्ष्मी कुंकु लावते.
बुरी नजर वाले तेर मुँह काला.
पप्पु दी गड्डी
ए! चल सर्रक!
मै वापस आवंगा!
१३१४

श्रीयुत संतोष जोशी's picture

18 Jul 2009 - 6:18 pm | श्रीयुत संतोष जोशी

हे फक्त पुण्यातच असू शकतं

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

पाषाणभेद's picture

20 Jul 2009 - 7:42 am | पाषाणभेद

HORN OK PLEASE हा अ‍ॅनिमेशन पट कुणी बघीतला नाही काय?

माझ्या तर टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाचा शेवटला चेहरा लक्षात राहीला.

हा अ‍ॅनिमेशन पट "क्ले" अ‍ॅनिमेशन पट या कॅटेगरीतला आहे.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विशाल कुलकर्णी's picture

20 Jul 2009 - 10:12 am | विशाल कुलकर्णी

मी सातार्‍यात एक ट्रॅक्स पाहीली होती, तिच्या मागच्या काचेवर "सासरेबुवांची कृपा " असे लिहीले होते.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

विशाल कुलकर्णी's picture

20 Jul 2009 - 10:32 am | विशाल कुलकर्णी

;-)

विशाल कुलकर्णी's picture

20 Jul 2009 - 10:34 am | विशाल कुलकर्णी

;-)

ज्ञानेश...'s picture

20 Jul 2009 - 1:32 pm | ज्ञानेश...

सांगली परिसरात एका ४०७ च्या मागे-
"आबा कावत्यात!"
आणि एक दर्दी ट्रकवाला-
"सोना दिया सुनारको, पायल बना दिया..
दिल दिया दिलदार को, घायल बना दिया" :))

"Great Power Comes With Great Responsibilities"

पाषाणभेद's picture

3 Aug 2009 - 2:16 am | पाषाणभेद

दिल जलो का जलजलाट (दुसर कोण? रिक्शा)
१३ मेरा ७

ऋष्या's picture

3 Aug 2009 - 10:47 am | ऋष्या

"भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे" (पुण्यात सहा आसनी रिक्षामागे)
"जिनको जल्दी थी वो तो चले गये" ('जास्त घाई करू नका' असे सांगायचा ट्रक चा प्रयत्न)

मितभाषी's picture

28 Jul 2010 - 5:39 pm | मितभाषी

ट्रकच्या पाठीमागे लिहिलेले.
०१. चलती है गाडी, उडती है धुल,
जलते है दुष्मन खिलते है फुल.

०२. फिर मिलेंगे.

०३. कदंब कब कब
सबन्द जब जब.
.
.
भावश्या

नावातकायआहे's picture

28 Jul 2010 - 10:04 pm | नावातकायआहे

ह्यो वाचलय का?

शिकलेलि आई घरदार (पुढे कोनितरि खोड्ला व्हता)नेई

विशाल कुलकर्णी's picture

29 Jul 2010 - 11:44 am | विशाल कुलकर्णी

पुण्यात एका रिक्षाच्या मागे "सासरेबुवांची कृपा" असे वाचल्याचे आठवते ;-)

मितभाषी's picture

29 Jul 2010 - 11:52 am | मितभाषी

एका ट्रकच्या मागे
०१. "मालक दिलदार लेकिन चमचोसे परेशान".
०२. १७ गावचे पाणी पिलेली १९वी जात'ड्रायव्हर'.

मी डेक्कनला एका टु-व्हीलरच्या मागे लिहिलेलं वाक्य लिहिलेलं पाहिलय ---
Caution
Both Hand Drive
असं.. आता बोला.