✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वाहन पार्श्चभाग लिखाण अर्थात बंपर स्टिकर

प
पाषाणभेद यांनी
Fri, 07/17/2009 - 10:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14536 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

नविन

पाषाणभेद
Fri, 07/17/2009 - 10:28 नवीन
Image removed. Bumper Sticker spotted in Erie, Colorado. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

ह इंडीयन वेगळे

विकास
Fri, 07/17/2009 - 19:48 नवीन
वरील छायाचित्रातील "Just ask the Indian" मधील इंडीयन म्हणजे भारतात ज्यांना रेड इंडीयन म्हणतात (हा शब्द प्रयोग येथे चांगला समजला जात नाही म्हणून मग "इंडीयन" अथवा "नेटीव्ह अमेरिकन्स" असे म्हणतात). मला त्या बंपर स्टीकर्सचे कारण समजले नाही मात्र कदाचीत त्यात असे म्हणायचे असेल की इथल्या नेटिव्हांनी युरोपातून आलेल्या लोकांवर विश्वास ठेवला, त्यांच्या सरकारवर पण विश्वास ठेवला आणि नंतर काय झाले ते माहीत आहेच... असेच अमेरिकेवरील अजून एक मजेशीर अमेरिकेतीलच बंपरस्टिकर: Image removed. बुशचे राष्ट्राध्यक्षपद ज्या दिवशी संपणार होते त्यावरून पण बंपर स्टिकर्स आणि संगणकासाठी काउंट डाऊन सुरू होते: Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

बंपर स्टिकरचे कारण

धनंजय
Sat, 07/18/2009 - 04:12 नवीन
१८व्या आणि १९व्या शतकात अमेरिकेच्या केंद्र सरकारने नेटिव्ह अमेरिकनांच्या जमातींशी एक-एक करार करून ते मोडले, त्याचा संदर्भ असेल. (अगदी शेवटी आजचे जे ओक्लहोमा राज्य होते, ते "इंडियन टेरिटरी" म्हणून स्वतंत्र ठेवण्याचा करार केला होता - तोही गेलाच.) कोलोराडो मधल्या स्टिकरचे ताज्या बातम्यांपैकी असेही कारण असू शकेल - अमेरिकेच्या केंद्र सरकारकडे नेटिव्ह राष्ट्रांची काही अमानती संपत्ती (इंडियन ट्रस्ट - अमेरिकेच्या केंद्रीय गृहखात्याचे संकेतस्थळ) होती. ती कुठे कधी कशी नाहिशी झाली, त्याबद्दल कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. याविषयी कोर्ट-खटले चालू आहेत. नेटिव्ह अमेरिकनांना साधारणपणे "गोर्‍या" सरकारबद्दल फार अविश्वास असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

नेहमीचा

चिरोटा
Fri, 07/17/2009 - 10:34 नवीन
"बुरी नजर देखनेवाले तेरा मूह काला"हा बर्‍याच वेळा दिसतो. "देखो मगर प्यार से" "१३ मेरा ७" रिक्षाच्या मागे. ८० च्या दशकात "हम दो हमारे दो",९०% रिक्षांच्या मागे लिहिलेले असायचे. आणि एस्.टी च्या मागे "तांबी वापरा" असे लाल अक्षरात. "आपकी जिंदगी बिस्कूटपे ड्रायव्हर की जिंदगी ब्रेकपे" भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

आणिबाणीच्या काळात

विकास
Fri, 07/17/2009 - 19:52 नवीन
आणिबाणीच्या काळात एसटी बसेस (तेंव्ह दुसर्‍या नसायच्याच म्हणा!) आणि कधीतरी ट्रक्सवरः "कठोर परीश्रमाला पर्याय नाही"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

वा !! छाण

टारझन
Fri, 07/17/2009 - 10:38 नवीन
वा !! छाण धागा आहे !! मस्त रे पाषाणभेदा !! अवांतर : नविन नियम लागू झाल्याने मनमोकळा प्रतिसाद लिहू शकत नाही मित्रा ! ह्या विभागात एक लय भारी प्रतिदास टाकणार होतो !! पण असो .. तुझे दुर्दैव .. लेट काढलास धागा !! (नमोगती मिपाकर) टारझन सद्ध्या सुतकी चेहरे करून बसलो आहोत !!
  • Log in or register to post comments

हा हा हा ...

छोटा डॉन
Fri, 07/17/2009 - 11:50 नवीन
टारुभाऊ, ब्रेक मारा ब्रेक ...!!! मजेशीर प्रतिसाद. असो. आम्ही एक ट्रक पाहिला होता काही काळापुर्वी, त्यावर लिहले होते "चपला घाला आणि चालु लागा" , आम्हाला त्याचा अर्थ काही केल्या समजला नाही पण तुम्हाला म्हणुन सांगतो आहे ... बाकी असे अजुन बरेच आहे पण .... ------ छोटा डॉन आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

आम्ही एक

टारझन
Fri, 07/17/2009 - 16:22 नवीन
आम्ही एक ट्रक पाहिला होता काही काळापुर्वी, त्यावर लिहले होते "चपला घाला आणि चालु लागा" , आम्हाला त्याचा अर्थ काही केल्या समजला नाही पण तुम्हाला म्हणुन सांगतो आहे ...
=)) =)) =)) =)) आपणांस आमचे मन कळते , हे कळोन आणंद झाला ! ह्यातलंच काही तरी लिहीणार होतो , पण हल्ली भक्तिमान लोकं फार झालेत , ते म्हणतात समर्थन करणारेच काड्या सारतात :) असो "सॉरी भक्तिमान" म्हण पाहू !! आणि हो , तुला भक्तिमान माहित नसला तर त्याच्या नावाने रोज खरडींतून बोंबा ठोक !! अरे कुत्र पण विचारत नाही रे पलिकडच्या गल्लीत .. मग चर्चेत घ्यायला काही करायला नको ? टिप : भक्तिमान हे माझ्या भक्तिचे प्रतिक आहे, त्याचा कोणी आपल्याशी संबंध लावल्यास आणि त्याची लाल झाल्यास आम्ही जबाबदार नाही . टिप रिकामी झाली . डाण्या खरं तर तुला खरड करणार होतो , पण खरडींचे नियम अजुन स्ट्रिक्ट आहेत .. म्हणूनंच इथं खरडलं .. - (चाटूंचा महामेरू) भक्तिमान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हुच्च...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 07/17/2009 - 17:06 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) एका दुधाच्या टॅ॑करमागे मी " शिवाजी विद्यापीठ " लिहीलेले पाहिले होते. आणी एका ट्रक मागे " लायनीत घे ना भौ" पाहिले होते.. सुहास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

...

शक्तिमान
Sat, 07/18/2009 - 19:10 नवीन
=)) =)) =)) एक णंबर्स!! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

रिक्शा

प्रशु
Fri, 07/17/2009 - 11:17 नवीन
मुंबईत सध्या "मुलगी शिकली, प्रगती झाली" असे रिक्शांच्यावर लिहिलेले सापडते........
  • Log in or register to post comments

एक रिक्शा

विश्वेश
Fri, 07/17/2009 - 11:18 नवीन
एक रिक्शा वर मी "ढगाळ वातावरण " असे लिहिलेले पाहिले होते ... शप्पत ... माला अजुन का ते कळाले नाही
  • Log in or register to post comments

१२ के फूल

विजुभाऊ
Fri, 07/17/2009 - 11:26 नवीन
१२ के फूल ३४ की माला याचा अर्थ मला कळालाच नाही. एका रिक्षावर मी "इतिहास मत पूछो" असे वाचले
  • Log in or register to post comments

आणखी काही ...

टवाळचिखलू
Fri, 07/17/2009 - 11:30 नवीन
१ ) http://www.misalpav.com/node/698 - प्राजु २) http://www.misalpav.com/node/3734 - निसर्ग ३) http://www.manogat.com/node/3399 - माधव कुळकर्णी
  • Log in or register to post comments

चिटके तो

सुप्रिया
Fri, 07/17/2009 - 11:32 नवीन
चिटके तो फटके! एका रिक्शाच्या मागे मी पाहिलं होतं. -सुप्रिया देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
  • Log in or register to post comments

धक्का लागी बुक्का

mamuvinod
Fri, 07/17/2009 - 12:24 नवीन
धक्का लागी बुक्का एक मोटरसायकलस्वाराचे विचार बघतो काय रागाने? मागे टाकले वाघाने एक जिपवाला राजे तुम्हि पुन्हा जन्माला या
  • Log in or register to post comments

सांग लीला

कपिल काळे
Fri, 07/17/2009 - 13:31 नवीन
सांग लीला अ ३० का ? ( ट्रकवाला सांगलीचा असावा) पुरंदरची रानी. ---आणखी येक टरकवाला. कविता, सोनम, मीलन, रानी, बच्चू --खडीचा डंपर थांब लक्समी कुक्कु लावते-- पाण्याचा ट्यांकर. बुरी नजरवाले तेरा मुह काला ए रिक्षावाला नाही ओ रिक्षावाले म्हना-- कुठे लिहिलेले असेल ते वोळखा? दादांचा आशिर्वाद. तात्यांची कृपा.--- हे कुठे लिहिलेले आहे ते ही वोळखा.
  • Log in or register to post comments

हा हा हा...

धमाल मुलगा
Fri, 07/17/2009 - 14:54 नवीन
हल्लीच पाहिलेलं एकः गाडीच्या मागे शिवरायांचं चित्र आणी खाली लिहिलेलं "बघतो काय? मुजरा कर!" ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!
  • Log in or register to post comments

१.स्पिड

तर्री
Fri, 07/17/2009 - 16:15 नवीन
१.स्पिड किल्स सो किल स्पिड. २.१३ मेरा दिल १ ३.अयोध्येचा राजा ( प्रभू रामचन्द्रांच्या चित्रासहित, लालबाग च्या राजाच्या चाली वर ) ४.सित्त ? ( अर्थ सांगा ?) ५. ए३० का ऊ ७ ?( ऊसामध्ये येणार का?) ६. विदर्यांथ्यांची रिक्शा , नका पाहू परिक्षा ( य म का सहित )
  • Log in or register to post comments

खान्देश

श्रावण मोडक
Fri, 07/17/2009 - 18:12 नवीन
४.सित्त ? ( अर्थ सांगा ?) धुळ्याकडं भांग खाऊन टु्ण्ण होणे याला सित्त म्हणतात. मुळात तो सित्ताराम या शब्दावरून आला आहे. हा शब्द भांगखोरांमधला अभिवादनाचा शब्द असल्याचे ऐकलेले आहे. त्यातून पुढे 'सित्त' झाले. एखाद्याने दुसऱ्याला 'सित्त?' असे विचारले की, त्याचा अर्थ, "टुण्ण?" असा असतो. :) आता तुम्ही कुठं काय पाहिलंत हे मात्र माहिती नाही. त्यामुळं अर्थाची छटा वेगळी असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

धन्यवाद ,

तर्री
Fri, 07/17/2009 - 20:44 नवीन
धन्यवाद , श्रावणजी .... हा शब्द त्याच आर्थी वापरलेला आसणार, नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

एक जुनेच वाक्य

llपुण्याचे पेशवेll
Fri, 07/17/2009 - 16:57 नवीन
एका ट्रकच्या मागे लिहीले होते, "असं काय बघतोस रागानं ओव्हरटेक केली आहे वाघानं" पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

'वाहनाच्या

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/17/2009 - 17:17 नवीन
'वाहनाच्या मागच्या बाजुस' असे सर्वांना कळेल अशा भाषेत लिहिता येत असतानाही मुद्दामुन 'पार्श्वभाग' हा शब्द वापरुन आमच्या श्लील आणी संस्कारी मनाला आघात पोचवल्याबद्दल पाषाणभेद ह्यांचा निषेध करुन मी इथे हा प्रतिसाद संपवतो. ©º°¨¨°º© पराश्लील ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

या

मदनबाण
Fri, 07/17/2009 - 18:47 नवीन
या ट्रकच्या 'पार्श्वभाग' वर काय लिहले असेल याचा विचार करतोय्,जमल्यास चित्र झूम करुन पहावे!!! http://2.bp.blogspot.com/_uAkB9CS_dXE/SfRqgr-lh2I/AAAAAAAADrE/4VuDoc79NHA/s400/india_truck.jpg मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

इथे

क्रान्ति
Sat, 07/18/2009 - 07:28 नवीन
बहुतेक "पाउल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे" असे काहीसे लिहिले असावे! ;) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सुरक्षित अंतर...

मस्त कलंदर
Fri, 07/17/2009 - 19:29 नवीन
लहानपणी आईच्या नोकरीमुळे बर्‍याच शाळा बदलल्या.. त्या निमित्ताने दर दोन आठवड्याला प्रवास व्हायचा.. मी लहान म्हणून आपली गाडी लागली की नाही हे पाहायचे नि बसमध्ये शिरून आई नि तिच्या कडेवरच्या भावासाठी जागा पकडणे हे माझे काम असायचे... तेव्हा प्रत्येक बसवर "सुरक्षित अंतर ठेवा" म्हणजे बसमधल्या प्रवाशांनी बसताना सुरक्षित अंतरावर बसावं यासाठी लिहिलेलं असावं असं मला सारखं वाटायचं (म्हणजे काय.. भांडणं होणार नाहीत ना!!!).... नि असं असतानाही ही माणसं एवढी गर्दी का करतात हे मला तेव्हा न सुटणारं कोडं होतं... पुढे तिसरी चौथीत गेल्यावर कधीतरी याचा खरा अर्थ कळाला!!! :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

एस. टी. च्या मागे

बहुगुणी
Fri, 07/17/2009 - 22:13 नवीन
खूप वर्षांपूर्वी एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून) खालील ओळी लिहिलेल्या वाचल्या: तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा (नाही तर दोघांना खड्ड्यात घालवा!)
  • Log in or register to post comments

पुण्यात

पांथस्थ
Fri, 07/17/2009 - 22:29 नवीन
पुण्यात एका रिक्षामागे गब्बरचे वाक्य --- "कब है होली?" ... रिक्षाचालक आमच्यासारखाच शोले प्रेमी असावा... - पांथस्थ
  • Log in or register to post comments

एका रिक्शाच्या मागे

शशिधर केळकर
Fri, 07/17/2009 - 23:12 नवीन
सौ में अस्सी बेईमान फिर भी 'मेरा भारत महान'!
  • Log in or register to post comments

स्व च्छ ता रा खा

नेटकिडा
Sat, 07/18/2009 - 03:42 नवीन
लहानपणी एस. टी. ने प्रवास करताना जवळपास प्रत्येक एस. टी. मध्ये स्व च्छ ता रा खा असे लिहिलेले (छापलेले) असायचे. मी ते स्वच्छ तारा खा असेच वाचायचो. थोडे मोठे झाल्यावर लक्षात आले कि ते स्वच्छता राखा असे आहे.
  • Log in or register to post comments

काय एक एक डोकी चालतात...

टुकुल
Sat, 07/18/2009 - 03:55 नवीन
स्व च्छ ता रा खा =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेटकिडा

आणखी एका ट्र्कचे मागे

नाखु
Sat, 07/18/2009 - 10:22 नवीन
कुंवारि लडकी को मत छेड ये पाप होगा... तु भी किसी दिन लडकी का बाप होगा... मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments

कालच वाचले - एका ट्र्क मागे

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 07/18/2009 - 11:03 नवीन
किचडमे पाव डालोगी तो धोना पडेगा, ड्रायवर को दील दोगी तो रोना पडेगा _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

मजेशीर

जागु
Sat, 07/18/2009 - 11:28 नवीन
मजेशीर धागा.
  • Log in or register to post comments

"मजेशीर

टारझन
Sat, 07/18/2009 - 11:49 नवीन
"मजेशीर धागा " वा ! हे आवडले .. कोणत्या ट्रक मागे लिहीलंय हे ? कोल्हापुरात काही नादखुळे ट्रक फिरताना पाहिले .. त्यांच्या मागे "सजेशीर धागा " असे लिहीले होते - टार्‍या नादखुळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

ट्रक - "मेरी

शाहरुख
Sat, 07/18/2009 - 12:07 नवीन
ट्रक - "मेरी चली तो तेरी क्युं जली" रिक्षा - "देवा तू सगळ्यांचं भलं कर, पण सुरूवात माझ्यापासून कर" रिक्षा - "वन्डे च की ओ" (माझा यावर अजुन विचार चालू आहे) कोल्हापूरातील रिक्षा - तेंडुलकरचा फोटो आणि खाली "याचा नाद खुळा" रिक्षा - "हाय हे असं हाय बग"
  • Log in or register to post comments

.

सँडी
Sat, 07/18/2009 - 15:13 नवीन
आई तुझा आशिर्वाद. थांब लक्ष्मी कुंकु लावते. बुरी नजर वाले तेर मुँह काला. पप्पु दी गड्डी ए! चल सर्रक! मै वापस आवंगा! १३१४
  • Log in or register to post comments

अजून एक

श्रीयुत संतोष जोशी
Sat, 07/18/2009 - 18:18 नवीन
हे फक्त पुण्यातच असू शकतं Image removed. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

अरे पण

पाषाणभेद
Mon, 07/20/2009 - 07:42 नवीन
HORN OK PLEASE हा अ‍ॅनिमेशन पट कुणी बघीतला नाही काय? माझ्या तर टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाचा शेवटला चेहरा लक्षात राहीला. हा अ‍ॅनिमेशन पट "क्ले" अ‍ॅनिमेशन पट या कॅटेगरीतला आहे. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

मी

विशाल कुलकर्णी
Mon, 07/20/2009 - 10:12 नवीन
मी सातार्‍यात एक ट्रॅक्स पाहीली होती, तिच्या मागच्या काचेवर "सासरेबुवांची कृपा " असे लिहीले होते. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

;-)

विशाल कुलकर्णी
Mon, 07/20/2009 - 10:32 नवीन
;-)
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

विशाल कुलकर्णी
Mon, 07/20/2009 - 10:34 नवीन
;-)
  • Log in or register to post comments

अजून एक

ज्ञानेश...
Mon, 07/20/2009 - 13:32 नवीन
सांगली परिसरात एका ४०७ च्या मागे- "आबा कावत्यात!" आणि एक दर्दी ट्रकवाला- "सोना दिया सुनारको, पायल बना दिया.. दिल दिया दिलदार को, घायल बना दिया" :)) "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

दिल जलो का

पाषाणभेद
Mon, 08/03/2009 - 02:16 नवीन
दिल जलो का जलजलाट (दुसर कोण? रिक्शा) १३ मेरा ७
  • Log in or register to post comments

भीऊ नकोस

ऋष्या
Mon, 08/03/2009 - 10:47 नवीन
"भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे" (पुण्यात सहा आसनी रिक्षामागे) "जिनको जल्दी थी वो तो चले गये" ('जास्त घाई करू नका' असे सांगायचा ट्रक चा प्रयत्न)
  • Log in or register to post comments

ट्रकच्या पाठीमागे

मितभाषी
Wed, 07/28/2010 - 17:39 नवीन
ट्रकच्या पाठीमागे लिहिलेले. ०१. चलती है गाडी, उडती है धुल, जलते है दुष्मन खिलते है फुल. ०२. फिर मिलेंगे. ०३. कदंब कब कब सबन्द जब जब. . . भावश्या
  • Log in or register to post comments

ह्यो वाचलय का? शिकलेलि आई

नावातकायआहे
Wed, 07/28/2010 - 22:04 नवीन
ह्यो वाचलय का? शिकलेलि आई घरदार (पुढे कोनितरि खोड्ला व्हता)नेई
  • Log in or register to post comments

पुण्यात एका रिक्षाच्या मागे

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 07/29/2010 - 11:44 नवीन
पुण्यात एका रिक्षाच्या मागे "सासरेबुवांची कृपा" असे वाचल्याचे आठवते ;-)
  • Log in or register to post comments

एका ट्रकच्या मागे ०१. "मालक

मितभाषी
गुरुवार, 07/29/2010 - 11:52 नवीन
एका ट्रकच्या मागे ०१. "मालक दिलदार लेकिन चमचोसे परेशान". ०२. १७ गावचे पाणी पिलेली १९वी जात'ड्रायव्हर'.
  • Log in or register to post comments

मी डेक्कनला एका टु-व्हीलरच्या

मिलिंद
गुरुवार, 07/29/2010 - 21:30 नवीन
मी डेक्कनला एका टु-व्हीलरच्या मागे लिहिलेलं वाक्य लिहिलेलं पाहिलय --- Caution Both Hand Drive असं.. आता बोला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा