आंतरराष्ट्रीय सौजन्य!!!

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
8 Jun 2009 - 9:01 pm

गाडी चालवणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. अमेरिकेत आल्यावर गाडीशिवाय पर्याय नाही हे लक्षात येताच मी परवाना मिळवला आणि गाडी चालवायला लागले. गेलं दिड वर्ष मी कुठेही न धडपडता लोकांना सुखाने गाडी चालवू देते आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या तुळतुळीत रस्त्यांवरून. सांगायचा मुद्दा असा की इतके दिवस माझ्या गाडी चालवण्याबद्दल कोणीही आक्षेप घेतला नाही.. मात्र चालवून झाल्यानंतर गाडी लॉक करण्याबद्दल मात्र एका चायनीज माणसाने सॉल्लीड आक्षेप घेतला (त्याला आपण 'ली' म्हणू).
सांगते ... त्याने माझ्या कार लॉक करण्यावर आक्षेप घेतला कारण सेकंदाचा १० वा भाग इतका वेळ वाजणार माझ्या गाडीचा लॉक होतानाच हॉर्न. :) ज्याला हाँक असं म्हणतात.

साधारण सकाळी मुलाची बस ८.३० ला येते. बाहेर वातावरण चांगलं असलं.. म्हणजे पाऊस नसला, थंडी नसली, किंवा लख्ख सूर्यप्रकाश असला आणि लेकाचं वेळेत आवरून घरातून बाहेर पडायला उशिर झाला नसला तर मी लेकाला घेऊन त्या स्कूल बसच्या पिकअप पॉईंटवर चालतच जाते. पण साधारण इथलं वातावरण असं की, आठवड्यातले २ दिवस थंडी २ दिवस पाऊस.. त्यामुळे गाडी न्यावीच लागते. अशीच एकदा गाडी पार्क केली, लॉक केली आणि लॉकिंग हाँक झाल्यावर घराकडे निघाले. तर पाठीमागून "एक्सक्युज्मी...!" अशी हाक आली. वळून पाहिलं.. तर ली होता. माझ्याजवळ येऊन मला म्हणाला, "यू लॉक योर कार अँण्ड इट हाँक्स विच इज इरिटेटींग फॉर मी.." मी विचारलं ,.." का?" म्हणाला, "मी दचकून जागा होतो त्या हॉर्न ने.. मला वाटतं आपण हाय वे वर आहोत आणि कोणीतरी हाँक करतं आहे.." मी म्हणाले ," पण मी मुद्दाम नाही करत, गाडी लॉक केली की हाँक होते.. मी काय करू?" मग मला म्हणाला, "रिमोटचं बटन एकदाच दाबलं की गाडी लॉक होते, दुसर्‍यांदा दाबतेस तेव्हा फक्त हाँक होते.. तू दुसर्‍यांदा बटन दाबू नको.. मला खूप त्रास होतो.. मी दचकून उठतो." मी म्हणाले, "मी प्रयत्न करेन.. " झालं! विषय संपला. ही गोष्ट मी नवर्‍याला संध्याकाळी सांगितली. तो म्हणाला, "ठीक आहे.. सोडून दे."
हे सगळं होऊन साधारण ८-१० दिवस झाले.. आणि पुन्हा एकदा चुकून माझ्याकडून लॉक करताना हाँक झालं. मी घरात येऊन साधारण ५ मिनिटे झाली आणि हा माणूस पॅटीओच्या काचेतून डोकावून आत पाहू लागला. मी दार उघडलं. नशिबाने नवरा होता घरी अजून. त्याला बघितल्या बघितल्या नवरा मराठीतून म्हणाला, "गाढवाला हकलून लावयला पाहिजे..." त्याने असं म्हणताच फस्स्कन् आलेलं हसू मी कसं बसं दाबलं. मग येऊन नवरा त्याच्याशी बोलू लागला. आपण दोघेही सभ्य आहोत याची जाणीव ठेऊन दोघेही एकमेकाशी बोलत होते. तोही हसत हसत सांगत होता "तिला २ दा बटन दाबू नको म्हणून सांग.. कारण मी एकदम दचकून जागा होतो. मला वाटतं मी हाय वे वर आहे .. आणि माझ्याकडून काहीतरी चुकलं म्हणून कोणीतरी मला हाँक करतं आहे.. माझी झोप मोड होते." नवरा म्हणाला, " फोर्ड कंपनीनेच जर आता तशी हॉकिंक सिस्टिम ठेवली आहे तर आम्ही काय करणार? आणि फक्त आमचीच कार हाँक नाही होत, इथे बर्‍याच आहेत कार्स ज्या लॉक होताना हाँक होतात.. कदाचीत दुसर्‍या एखाद्या कार मुळेही तुझी झोप मोडली असेल.. तुला आता माहितीये की आमची कार हाँक होते म्हणून तू आम्हाला सांगतो आहेस." चेहर्‍यावर अतिशय हसरे भाव ठेवत आणि अतिशय मृदू शब्दांत नवरा भांडत होता. आणि तो ही तितक्याच मृदूपणे नेहमीची हाय वे ची टेप लावत होता. हे पाहून माझी मात्र सॉल्लिड करमणूक होत होती. नवरा म्हणाला त्याला, " तू असं कर कानात कापसाचे बोळे घालून झोपत जा.." तर त्याचं उत्तर असं ," मग मला फायर अलार्म वाजला तर ऐकू येणार नाही किंवा माझ्या शेजारी झोपलेला माझा लहान मुलगा खोकला तर ऐकू येणार नाही.." त्याचं हे कारण ऐकून मात्र मला हसावं की रडावं हेच कळेना. फायर अलार्म वाजायला लागला की, अख्खी बिल्डिंग जागी होते.. असो.

सहज बोलता बोलता मैत्रीणींमध्ये हा विषय निघाला. मी सांगितल्यावर आणखी एका मैत्रीणीने तिलाही त्या माणसाचा तसाच अनुभव आल्याचे सांगितले. मग मला वाटलं, हा माणूस मनोरूग्ण असावा. त्यानंतर आणखी एका मैत्रीणिकडून समजलं की, त्या लीने चिडून तिथल्या एकाची गाडीची काच फोडली होती. का?? तर.. ती गाडी हाँक होत होती. आणि नंतर स्वतःच जाऊन ती काच दुरूस्त करून घेऊन आला होता. हे ऐकल्यावर मात्र तो मनोरूग्ण आहे यावर मी शिक्कामोर्तबच केलं. पण हे ऐकल्यापासून माझं धाबं मात्र दणाणलं. काय सांगावं चुकून रिमोट्चं बटन दोनदा दाबलं गेलं आणि हा आला आणि गाडीची मोडतोड करून गेला तर???? मी गाडी लॉक करताना आणखीनच काळजी घेऊ लागले.

आजकाल जरा वातावरण चांगलं असतं. थंडी खूपच कमी झाली आहे पावसानेही जरा उसंत घेतली आहे. त्यामुळे सकाळी मुलाला चालतच सोडायला जाते स्कूलबसच्या थांब्यापाशी. आजही मस्त चालत गेले. . बस गेल्यावर मी घरी आले. येऊन बसते न बसते तोच.. ली पॅटीओच्या काचेतून आत डोकावून पहाताना दिसला. मी उठून दार उघडलं..(अरेरे!! नवरा गेला होता ऑफिसला:( आता मलाच भांडायला हवं याच्याशी तेही थोबाडावर सौजन्य ठेऊन!!). "तू आत्ता १५ मिनिटांपूर्वी आलीस का घरी?" ली. मी म्हणाले"हो.. पण मी हाँक नाही केलं. कारण मी आज कार नेलीच नव्हती बाहेर." तो म्हणाला, "आर यू शुअर?" मी, "ऑफ्कोर्स, माझी कार बघ.. इंजिन थंड आहे. कारण काल रात्री मी पार्क केली ती अजूनही काढलेली नाही." मग ओशाळून म्हणाला,"ओह!! आय एम सॉरी.. पण मी हाँक ऐकला आणि दचकून उठलो..आणि...." मी मनात म्हंटलं,'झालं!!!! याची पुन्हा टेप सुरू झाली हायवे वाली.' मी मध्येच त्याला तोडत म्हणाले, "इथे खूप गाड्या आहेत हाँक करणार्‍या.. तुला माझी गाडी माहिती आहे म्हणून तू माझ्याकडे येतोस. तू त्यादिवशी सांगितल्यापासून मी रिमोटचं बटन फक्त एकदाच दाबते. पण मी बाकीच्या गाडीवाल्यांना नाही सांगू शकत ना .." आज माझ्याकडे हुकुमाचा एक्का होता. :) कारण माझी गाडी मी बाहेर नेलीच नव्हती. "यॅऽऽऽह, आय नो... तू जे करतेस त्याबद्दल तुझं खरंच खूप कौतुक आहे मला. मी खूप आभारी आहे तुझा याबद्दल.. पण मग कोण करतंय ते आता कसं कळणार? आपल्याला शोधावं लागेल." यातला 'आपल्याला' हा शब्द ऐकल्यावर माझं डोकंच सणकलं तरीही मृदू आवाजात म्हणाले, "हे बघ, मी सकाळी ६ ला उठते त्यामुळे बाहेर कोणी हॉर्न वाजवला काय, किंवा आणखी काय वाजवलं काय मला दचकायला होत नाही. त्यामुळे मला कोण हाँक करतंय हे शोधून काढायची अजिबात गरज नाहीये. तूच शोध." हे ऐकल्यावर बहुतेक त्याला त्याची बोलण्यातली चूक समजली. म्हणाला," खरंय. पण मी तुझा खूप आभारी आहे.. तू अगदी लक्षात ठेऊन हाँक करणं टाळते आहेस... तुझं खूप कौतुक वाटतं मला. मी तुझ्यासाठी काय करू शकतो.. काही मदत हवी असेल तर नक्की सांग." मनांत आलं,"घरी येणं बंद कर " असं सांगावं. पण त्याचा हा पराभूत पावित्रा बघून मी पण जरा नमतं घेत म्हणाले, "हे बघ, तू काहीही करण्याची आवश्यकता नाही. जस्ट फर्गेट इट." तो पुन्हा पुन्हा 'थँक यू व्हेरी मच' असं मच्मचंत आपलं म्हणत म्हणत निघून गेला. मी जरा निश्वास टाकला आणि चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात आले. इतक्यात आई म्हणाली, "अगं तो बघ तुझा चायनीज मित्र बहुतेक मिठाई घेऊन आलाय ." मी पाहिलं तर हातात दोन कसलीशी पॅकेट्स घेऊन हा पॅटीओच्या काचेतून आत डोकाऊन पहात होता. जरा हसूच आलं. पण जाऊन दार उघडलं. ते पॅकेट्स माझ्यासमोर धरत म्हणाला, "दिस इज फॉर यू. तू इतकं करते आहेस माझ्यासाठी.. तुला थँक्स कसं म्हणावं हे कळेना.. म्हणून हे घेऊन आलो तुझ्यासाठी. तू पोर्क खातेस का? " मी म्हणाले , "नाही. मी पोर्क खात नाही." तर पुन्हा एकदा ओशाळून म्हणाला, " ओऽऽऽह...! आय एम सॉरी!! आर यू व्हेजी टेरीयन??" मला चायनीज लोकांची व्हेजीटेरियन ची व्याख्या जरा वेगळी असते हे माहिती आहे. त्यामुळे ठसक्यात मी सांगितलं, " येस्स! प्युअरली व्हेजीटेरीयन...! नो मीट." त्याला जरा दु:ख झालं.. पण पुन्हा एकदा, "आय एम सॉरी.. आय जस्ट वाँट टू अ‍ॅप्रिशियेट यू. मला तुझ्यासाठी काहीतरी करायला आवडेल.. काही लागलं तर नक्की सांग." असं म्हणाला. मी म्हणाले, "तुला हे सगळं करायची गरज नाहीये. जस्ट रिलॅक्स. त्यातून काही मदत लागली तर मी सांगेन.." असं लवकर सुटका करून घेण्याच्या दृष्टीने म्हणाले कारण माझा चहा गॅस वर उकळत होता. तर, " दॅट वुड बी माय ऑनर..थँक्स..थँक्स अ लॉट!" असं म्हणत तो निघून गेला. आमच्या मात्र हसू हसून पोटात दुखायला लागलं. आई म्हणाली.. "तू हाँक करत नाहीस म्हणून तो तुझ्यावर फिदा झालाय..तू पोर्क खात नाहीस तर कदाचीत संध्याकाळ पर्यंत तो तुझ्यासाठी काहीतरी व्हेजीटेरियन खाऊ घेऊन येणार..!!" हे ऐकून आणिकच हसू आलं. मी नंतर मात्र बुचकळ्यात पडले. म्हणजे हा माणूस खरंच मनोरूग्ण आहे की, ओव्हर वेल मॅनर्ड आहे हेच समजेना. आभार प्रदर्शन.. हे असं??? बघू आता पुढे काय काय अनुभव येतात या ली माणसाचे...!

मी भारतीय, तो चिनी आणि आम्ही राहतो अमेरिकेत. आता भारत , अमेरिका आणि चायना या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर समझोता होईल ना होईल.. पण हे आंतररष्ट्रीय सौजन्य मात्र मला अनोखं वाटलं आणि म्हणून त्याला मी शब्दबद्ध केलं!

- प्राजु

हे ठिकाणवावरमुक्तकमौजमजाप्रकटनअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

9 Jun 2009 - 12:46 am | श्रावण मोडक

पुढं काय होतंय ते कळवत रहा.

हरकाम्या's picture

9 Jun 2009 - 2:03 am | हरकाम्या

अहो ताई लेख जरावाईच ल्हाण कराहो वाचताना पार झोप लागायची
वेळ आली .

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jun 2009 - 2:28 am | llपुण्याचे पेशवेll

गम्मत आहे. :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

अनामिक's picture

9 Jun 2009 - 3:35 am | अनामिक

म्हंटलं तर गम्मत, म्हंटलं तर डोक्याला ताप... नाही का?
हा हा हा!!!

-अनामिक

मुक्तसुनीत's picture

9 Jun 2009 - 3:36 am | मुक्तसुनीत

किस्सा रोचक आहे.

"चिंकी" आणि तद्भव शब्द हे इतर अनेक शब्दांसारखे विशिष्ट वंशातील लोकांना उद्देशून आणि त्या वंशाचा अपमान करणारे आहेत असा रूढ समज आहे. संदर्भासाठी हा दुवा पहावा. असे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. हे शब्द वापरणे अशिष्टसंमत आहे. किंबहुना , कुठल्याही घटनेचे वर्णन करताना त्यातील व्यक्तींच्या वर्ण/जाती/वंशाचा उल्लेख अनावश्यक ठरतो.

(संपादक - अपमानास्पद शब्द काढून टाकून संपादन केले आहे.)

टिउ's picture

9 Jun 2009 - 4:29 am | टिउ

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे...पण बर्‍याचदा हे शब्द वापरण्यामागे अपमान/वंशभेद या भावना नसतात/नसाव्यात असं वाटतं. तरीही असले उल्लेख टाळावे या तुमच्या मताशी सहमत!

बाकी किस्सा भारीच आहे...मी तर म्हणेन असले शेजारी असतील तर रात्री दोन तीनदा घरातनंच गाडी लॉक/अनलॉक करावी! सौजन्याची ऐशी तैशी!!!

कालिन्दि मुधोळ्कर's picture

9 Jun 2009 - 5:01 am | कालिन्दि मुधोळ्कर

चिंकी इ. शब्द हे अपमानकारक आहेत हा आपला मुद्दा अत्यंत बरोबर आहे. ह्या लेखात वारंवार ह्या श्ब्दाचा उल्लेख वाचून आश्चर्य वाटले.

हुप्प्या's picture

9 Jun 2009 - 7:23 am | हुप्प्या

पॉलिटिकल करेक्टनेसच्या नावाखाली आपण अतिरेकी हळवे, संवेदनाशील वगैरे झालो आहोत. चिंकी हा शब्द अपमानकारकच वाटला पाहिजे असे नाही. तशात मिसळपाव वाचणारे किती चिनी भाई आहेत? अगदी कुणाला तोंडावर कुठलेसे शेलके विशेषण म्हणणे वेगळे आणि असे लिहिणे वेगळे.
थोडक्यात चिंकी वगैरे म्हटले की बरीच स्वभाववैशिष्ट्ये पटकन लक्षात येतात. उगाच जडजंबाल पण पॉलिटिकली करेक्ट कशाला लिहायचे?
भारतीयही गुल्टी, बिहारी व घाटी म्हणतातच. त्यात त्या गटाचा निव्वळ अपमान करायचा असतो असे समजणे चुकीचे आहे.

मुक्तसुनीत's picture

9 Jun 2009 - 7:33 am | मुक्तसुनीत

या न्यायाने "निग्रो" , "म्हारड्या" वगैरे वगैरे शब्दांमधून सुद्धा काय काय वैशिष्ट्ये व्यक्त होतात तेही ऐकायला आवडेल :-)

घाटावरचे भट's picture

9 Jun 2009 - 8:21 am | घाटावरचे भट

'चिली चिकन' हा शब्द कसा वाटतो? साऊंड्स व्हेरी मच पॉलिटिकली करेक्ट. आणि तसेही ते लोकही आपल्याला 'करी' म्हणतातच की.

टारझन's picture

9 Jun 2009 - 9:09 pm | टारझन

'चिली चिकन' हा शब्द कसा वाटतो?

=)) =)) एकदम चोक्कस ... मस्त रे भटा .. जुणा शब्द आहे हा .. आम्ही चायनिज च्या हातगाडीवर कामं करणार्‍या णेपाळी-मणिपुरी पोरांना असंच म्हणायचो ..

प्राजु ताई .. लेख आवडला आहे .. क्लास ...अजुन येउन देत गं

(नजरकैद) टा.रू.सावरकर

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jun 2009 - 6:26 pm | llपुण्याचे पेशवेll

मुसुरावांशी सहमत.

अवांतरः 'म्हारड्या' या शब्दातून प्रचंडी रडी माणसे आठवतात. आम्ही आमच्या एका भयंकर रड्या मित्राला 'महारड्या' म्हणायचो. पण आमच्या शाळेतल्या बाईना आम्ही त्याला 'म्हारड्या' म्हणतो असे वाटायचे. :)
म्हणून एकदा बाईनी चांगलेच झाडले होते मला.

(पॉलिटीकली करेक्ट)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

कदाचित पंधरावीस वर्षांपूर्वी तितकासा जाणवलाही नसता.
आज परिस्थिती फार बदलली आहे. 'चिंकी' हा शब्द चिन्यांसाठी वापरतात हे मला माहीत होते, मी ही वापरायचो पण तो इथे अवमानकारक शब्दात मोडतो हे मला अमेरिकेत असून ठाऊक नव्हते. हा माहिती असण्याचा प्रश्न आहे. चुकीची सवय पडू नये आणि कुठे भलत्याच ठिकाणी हा शब्द बोलला जाऊ नये ह्या हेतून ही दुरुस्ती मला अतिरेक वाटत नाही. (तसे खाजगी संभाषणातून आपण सर्वच जण बरेच शब्द वापरत असू, म्हणून सगळेच सर्रास लिहायचे म्हटले तर आफत ओढवेल!)

चतुरंग

टिउ's picture

9 Jun 2009 - 4:30 am | टिउ

प्रकाटाआ

चतुरंग's picture

9 Jun 2009 - 4:57 am | चतुरंग

आपल्या कारमागे हायवेवरती अचानक मोठ्याने हॉर्न वाजवला, म्हणून कोणातरी आडदांड विक्षिप्त अमेरिकनाकडून ह्या माणसाचा अपमान झाला असावा! त्या अपमानाने आणि भीतीने ह्याच्या मनात घर केल्याने येईल जाईल त्याला गाडीचा हॉर्न वाजवू नको अशी सूचना देत असेल हा! :? :W
(खुद के साथ बातां : रंग्या, ह्याला 'हॉर्नी ली' असे म्हणायला काय हरकत आहे? B) )

चतुरंग

अनामिक's picture

9 Jun 2009 - 6:01 am | अनामिक

हा हा हा... खुद के साथ बाता लै भारी!

-अनामिक

जृंभणश्वान's picture

9 Jun 2009 - 8:24 am | जृंभणश्वान

"खुद के साथ बातां" अशक्य आहेत !

अवलिया's picture

9 Jun 2009 - 6:47 am | अवलिया

हा हा हा
मस्त अनुभव :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

रेवती's picture

9 Jun 2009 - 6:57 am | रेवती

कधी कधी असे विचित्र स्वभावाचे लोक भेटतात व आपल्याला नसता त्रास होतो. पण असाकसा तो पॅटिओपर्यंत आला. त्याला सांग असं करू नकोस. सरळ बझ् करून ये! सध्या घरात तुझ्याबरोबर कुणी ना कुणी आहे म्हणून ठीके पण नंतर फारसं सुरक्षित नाहीये ते!
(आता प्राजु मलाच भित्रीभागुबाई म्हणणार!) :)

रेवती

लवंगी's picture

9 Jun 2009 - 8:23 am | लवंगी

प्राजु जरा जपुन. विचीत्र माणूस दिसतोय, जरा सांभाळून ग!!

सहज's picture

9 Jun 2009 - 7:46 am | सहज

अनुभवकथन आवडले. लगेच सुधारणा केली ते तर अजुन जास्त आवडले. हेच तर सौजन्य!

पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की लेखिका कवयित्री म्हणून प्रसिद्ध असली तरी गद्यलेखन तितकेच अतिशय प्रभावी.

मुक्तसुनीत's picture

9 Jun 2009 - 8:06 am | मुक्तसुनीत

सहज यांनी अचूक शब्दात वर्णन केले आहे. याहून जास्त चांगल्या शब्दात सांगता येणार नाही.

धनंजय's picture

9 Jun 2009 - 7:31 pm | धनंजय

विक्षिप्त शेजार्‍यांशी कसे वागायचे हा मोठा प्रश्न असतो. तरी सौजन्याने खूप प्रश्न सुटतात.
अनुभववर्णन आवडले.

मराठी_माणूस's picture

9 Jun 2009 - 9:00 am | मराठी_माणूस

हॉर्न ने इरिटेशन होते हि गोष्ट खरि आहे.
चिनि माणसाच्या जागि अमेरिकन असता तर चुक लगेच सुधारली गेलि असती आणि हा लेख आलाच नसता का असा मनात विचार येतो

संदीप चित्रे's picture

9 Jun 2009 - 9:37 pm | संदीप चित्रे

अमेरिकन माणूस असता तरीही लेख इथे आला असता असं मला तरी वाटतंय.

प्राजु's picture

10 Jun 2009 - 1:27 am | प्राजु

हो संदीप, नक्कीच आला असता.
पहिली गोष्ट, फोर्ड्ची गाडी लॉक होताना हाँक करते हे कोणत्याही अमेरिकन माणसाला माहिती आहे. त्यामुळे त्याने त्यावर आक्षेप घेतला नसता. याने कसा घेतला देव जाणे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

9 Jun 2009 - 10:21 am | विसोबा खेचर

आता भारत , अमेरिका आणि चायना या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर समझोता होईल ना होईल.. पण हे आंतररष्ट्रीय सौजन्य मात्र मला अनोखं वाटलं आणि म्हणून त्याला मी शब्दबद्ध केलं!

मस्त! :)

गाढव ओरड्ल्याचा आवाज येतो. असते हौस एकेकाची.....

काय करणार????

स्वाती दिनेश's picture

9 Jun 2009 - 11:44 am | स्वाती दिनेश

अनुभव छानच शब्दबध्द केला आहेस,
स्वाती

यशोधरा's picture

9 Jun 2009 - 11:48 am | यशोधरा

एकदा दोनदा झालं तर मजेशीर अनुभव म्हणता येइल ह्याला, सतत झालं तर मात्र वैतागवाणं होईल जरा. लिहिलंस चांगलं बाकी! :)

छोटा डॉन's picture

9 Jun 2009 - 11:51 am | छोटा डॉन

फारच मजेशीर सौजन्य आहे बॉ, मस्तपैकी हसु आले.

मात्र प्राजुताई, माझ्या मते माणुस चक्क "येडा ( हो येडाच, आयला सायकिक हा काय शब्द आहे ? सायंटिस्ट सारखा उच्चभ्रु वाटतो लेकाचा )" आहे असे दिसते आहे. जास्त त्याला भाव व किंमत न दिल्यास उत्तम ...
भारतात कसे, असे काही झाले की मस्तपैकी "२ तडाखे" देता येतात आरामात, तिकडे आंतरराष्ट्रीय कायदा वगैरे येतो ना ...
काळजी घ्या ...!!!

बाकी किस्सा मस्त आणि खाऊ तर त्याहुन मस्त ;)
लेख आवडला ...

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jun 2009 - 3:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्राजु, मजा आली वाचायला!!

... सायंटिस्ट सारखा उच्चभ्रु वाटतो लेकाचा)"

आक्षेप आक्षेप आक्षेप! या विद्वेषाचा त्रिवार निषेध!

नंदन's picture

9 Jun 2009 - 11:58 am | नंदन

'ली'च्या लीला अगाध आहेत :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आनंदयात्री's picture

9 Jun 2009 - 11:59 am | आनंदयात्री

मस्तच अनुभववर्णन !! मज्जा आली वाचतांना.

दशानन's picture

9 Jun 2009 - 12:10 pm | दशानन

लै भारी !

थोडेसं नवीन !

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jun 2009 - 12:24 pm | परिकथेतील राजकुमार

हा हा हा भारीच ग प्राजुतै.
अनुभव एकदम भारी वाटला वाचायला.

अवांतर :- त्या ली ला 'आणी हो' चे २/३ लेख भाषांतर करुन वाचायला दे ;) बघ काही फरक पडतोय का.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

टारझन's picture

10 Jun 2009 - 7:22 am | टारझन

अवांतर :- त्या ली ला 'आणी हो' चे २/३ लेख भाषांतर करुन वाचायला दे ;) बघ काही फरक पडतोय का.

काय जोक मारून र्‍हायला बे ... ? "आणि हो" चे उच्च मराठीत लिहीलेले लेख
"सुलभ मराठीत" भाषांतर करायलाच ज्ञानेश्वरांना परतावं लागेल .. आणि तु "ली" च्या भाषेत भाषांतर करायला लावतो ? तुला काही हाड ?
=)) =))

वा! छानच लिहीला आहेस किस्सा. मात्र ऐकण्यातली मजा औरच होती.

ऋषिकेश's picture

9 Jun 2009 - 2:07 pm | ऋषिकेश

हा हा हा!
मस्त किस्सा! मजा आली

बाकी एखाद्याला चिंकी, काळा वगैरे सहजतेने आलेले लेखनात चुकीचे आहेत असे वाटत नाहि. असे शब्द लिहिण्याने कोणी वर्णद्वेषी आणि न लिहिण्याने कोणी वर्णद्वेष न बाळगणारा होतात असे मला वाटत नाहि.. बोलताना/लिहिताना काय भाव आहेत हे महत्त्वाचे.. उगाच अ‍ॅफ्रो-अमेरिकन्स म्हणायचं आणि वागणूक वर्णभेदाचीच ठेवायची यापेक्षा तो काळा आहे तरीही तो आपल्यासारखा माणूस आहे ते लक्षात घेणं महत्त्वाचं असं वाटतं (काळा हे केवळ उदाहरण)

माझा अनुभव असा आहे की काळे स्वतः अनेकदा ब्लॅक/निग्रो ही वचने सहज उच्चारतात

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

सखी's picture

9 Jun 2009 - 8:25 pm | सखी

माझा अनुभव असा आहे की काळे स्वतः अनेकदा ब्लॅक/निग्रो ही वचने सहज उच्चारतात
मी असं ऐकलं आहे की त्यांना एकमेकांनी ब्लॅक/निग्रो म्हंटलेले चालतं, पण दुस-या वर्णाच्या कोणीही म्हंटलेले खपत नाही - ब-याचदा त्यावरुन वादळही उठतात/उठवली जात असावी.
प्राजु - लेख आवडला, पण वर कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे तुही त्याला ठणकावुन सांग की मुख्य दारातुनच त्याने यावे, नाहीतर यासाठी तूच त्याची कंप्लेंट करु शकते :)

सुनील's picture

9 Jun 2009 - 6:04 pm | सुनील

मजेशीर किस्सा!!

बाकी चिन्यांना जसे आपल्याला "चिंकी" म्हणतात ते ठाऊक आहे तसेच काळ्यांनाही आपल्याला भारतीय लोक "कल्लू" म्हणतात हे ठाऊक आहे. तेव्हा असे शब्द अनवधानानेदेखिल वापरात येऊ नये याची काळजी घ्यावी.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शाल्मली's picture

9 Jun 2009 - 9:19 pm | शाल्मली

हा हा..
मजेदारच अनुभव आहे हा अगदी!
तो माणूसही भन्नाटच दिसतोय.
एव्हाना त्याने तुला काहीतरी 'प्युअरली व्हेजीटेरीयन' खाऊ आणून दिलाच असेल ना? मग त्याबद्दलही काही लिही ना..

--शाल्मली.

पिवळा डांबिस's picture

9 Jun 2009 - 11:50 pm | पिवळा डांबिस

म्हणजे सध्या प्राजुताईचा एकदम चिनी पोपट झालाय म्हणा की!!!!:)
यालाच "चिनी मकाव"म्हणतात वाटतं!!!!:)

आता मी तर ठरवलंय की जेंव्हा प्राजुला भेटायला जाणार तेंव्हा तिच्या घरासमोर गाडी उभी करून पहिल्यांदा दोन्-चार वेळा कर्कश्य हॉर्न वाजवणार!!!
बघूया तर खरी गंमत!!!

बाय द वे, प्राजुताई, ते तुला भेट मिळालेलं चिनी नॉनव्हेज जरा इकडे यूपीएस कर ना!!!!
:)

प्राजु's picture

10 Jun 2009 - 12:09 am | प्राजु

आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद.

तो विक्षिप्त अजून तरी आला नाहीये. आणि काही वेजी खाऊही आणून नाही दिला. ..
पण आता मात्र तो आला की, मी त्याला सांगणार आहे की, बाबा.. मला असा त्रास देऊ नको नाहीतर मी ९११ ला फोन करेन.
डांबिसकाका, तुम्ही याच इकडे आणि खरंच हाँक करा त्याच्या घरासमोर.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2009 - 12:58 am | बिपिन कार्यकर्ते

वा!!! मस्तच लिवलंय. पण जरा सांभाळून. सौजन्य महागात पडेल...

बिपिन कार्यकर्ते

चित्रा's picture

10 Jun 2009 - 1:16 am | चित्रा

अनुभव चांगला शब्दबद्ध केला आहे. (मलाही अशीच रिमोटचे बटन दोनदा दाबण्याची सवय झाली होती, हळूहळू ती कमी करीत आणली आहे, रात्री मात्र अजिबात करीत नाही).

दिपाली पाटिल's picture

10 Jun 2009 - 1:59 am | दिपाली पाटिल

त्या चिंक्या कडे फोर्ड नसेल ना म्हणुन तो जळत असावा. :D :D :D

दिपाली :)

प्रियाली's picture

10 Jun 2009 - 5:51 am | प्रियाली

प्राजु, किस्सा आवडला.

आमच्या मिडवेष्टात कोणी हाँकच करत नाही. गाडीचा हाँक येणे म्हणजे गाडी लॉक केली आहे असा सर्वसाधारण समज आहे. आम्ही बिनधास्त दोनदा बटण दाबतो.

कोणाची बिशाद नाही काही बोलण्याची कारण कोणी नसतेच अर्ध्या मैलाच्या अंतरात. ;)

जयवी's picture

14 Jun 2009 - 2:11 pm | जयवी

मस्त किस्सा :)