"अभिजीत" ने छेडलेल्या "तसल्या नजरा" व त्याला पडलेले अनेक प्रतिसाद याच्या अनुषंगाने हा लेख.
मला आलेल्या " विरोपाचे " स्वैर मराठी भाषांतर ......... [ हे मी लिहलेले नाही ..]
[ वेळ सकाळी ६ च्या दरम्यान ....]
तो : वाढदिवसाच्या शूभेच्छा ...
ती : ओह .. हो . थँक यू सो मच . मी अजून झोपेतून उठत आहे ...
तो : ओह, म्हणजे तुला सगळ्यात पहिल्यांदा मी फोन केला ...
ती : नाही ना ! "त्या" ने मला रात्री १२ वाजताच 'विश' केले.
तो : हा 'तो' कोण ?
ती : कमॉन यार , अजून कोण ? नितीन ...
तो : अस्सं असं , मग आजचा काय प्रोग्राम आहे ?
ती: नितीन मला म्हणाला की तो मला वाढदिवसाचे 'सरप्राईज गिफ्ट' देणार आहे. त्यानंतर आम्ही फुलांचे प्रदर्शन पहायला जाणार आहोत. मला खूप मस्त वाटत आहे कारण मी फुलांचे प्रदर्शन कधीही पाहिले नाही, माझ्यासाठी तेच 'गिफ्ट' आहे.
************************************
तो: हाय !!! तू 'पॅनकार्ड क्लब' मध्ये 'रॉक शो' बघायला गेली होतीस ना ? कसा झाला शो? कोण होते तुझ्या बरोबर ?
ती : नितीन ....
तो : ठीक आहे. दूसरे म्हणजे , तुझा 'रिझ्युमी' कोणी रेफेर केला 'इंफोसिस' साठी ? तू तर म्हणाली की तुझी तेथे काहीच ओळख नाही म्हणून ....
ती : हो. नितीनचा तिथे एक मित्र होता , त्याने 'रेफर' केला माझा 'रिझ्युमी' ....
तो : हो का? म्हणे ' H ऱ इंटरव्युवस' रात्री ८ वाजेपर्यंत चालू होते. मग तुझा घरी जायला प्रोब्लेम आला आसेल ?
ती : नाही . नितीन ने सोडले मला . तो ऑफिसमधून आला, मला घरी सोडले आणि मग त्याच्या रूमवर पोहचायला त्याला ११ वाजले. त्याने रात्री जेवण पण केले नाही. बिचारा नितीन ....
************************************
तो : अगं तू उद्या घरी चाललेली आहेस ना ? मग 'रिझर्वेशन' केले का नाहीस ?
ती : मी त्याला सांगीतले आहे , तो म्हणाला की त्याचे 'स्वारगेट' ला काहीतरी काम आहे, तेव्हा त्यासाठी गेल्यावर तो येताना जागा बूक करून येणार आहे. मी आता एकदम निवांत झाले ..
तो : हाय, तुझी 'आय बी एम' मधली 'रिटन टेस्ट' कशी झाली ?
ती : यार , नाही क्लीयर झाली . खरं तर मी व्यवस्थीत तयारी केली होती . नितीन माझ्या रूमवर आला होता. त्याने मला 'जावा' चे थोडे बेसिक्स सांगितले. त्यामुळे मी एकदम बिनधास्त झाले होते पण माझ्या नशिबात काहीतरी वेगळेच होते.
तो : ओके , मग रविवारी काय केले?
ती : आम्ही ' ओम शांती ओम' बघायला गेलो होतो. नितीन खरं तर 'हिंदी पिक्चर ' बघत नाही पण मी 'आय बी एम' च्या किस्स्यामुळे खूप निराश झाले आहे असे वाटून याने पिक्चर बघायचे ठरवले. मला एकदम मस्त वाटले आणि तो हिंदी पिक्चरला आला ह्याचे आश्चर्य वाटले. त्याला पण पिक्चर आवडला. त्यानंतर त्याने त्याच्या 'वाढदिवसाचे बिलेटेड पार्टी' दिली. आम्ही 'पिझ्झा हट' ला गेलो होतो.
तो : मग तुझे 'बिलेटेड गिफ्ट' काय होते ? ती : ते तर मी त्याच दिवशी दिले. मी त्याला बरोबर रात्री १२ वाजता फोन केला , तो दिवसभर बिझी असल्यामुळे आम्ही संध्याकाळी भेटलो तेव्हा मी त्याला एक मस्त 'टाईम पिस' गिफ्ट दिला. तो वेलेच्या बाबतीत एकदम बेफिकीर आहे म्हणून मी मुद्दमच ते दिले. त्यामुळे त्याला नेहमी माझी आठवण येइल. तेव्हा त्याने मला पार्टी दिली नाही कारण तो लगेच ऑफिसमध्ये परत गेला ....
****************************************************
तो : हाय , तुझ्या 'शॉपर स्टॉप' च्या प्रोग्रमचे काय झाले ? ती : हॅलो, मी तुला नंतर फोन करते....
तो : तु मला नंतर फोन केलाच नाहीस ? म्हणून मी तुला आत्ता फोन केला . ती : हो यार , तु जेव्हा फोन केला तेव्हा मी नितीनबरोबर 'संभाजी पार्क' मध्ये होते. त्याचा सकाळ-सकाळ मूड खराब झाला होता, त्याचे त्याच्या भावाशी भांडण झाले होते. अशा वेळी त्याला एकटे सोडणे मला चांगले वाटले नाही म्हणून मी माझा शॉपिंग प्लान रद्द केला
****************************************************
तो : हाय , काय झाले ? आज एकदम खूष दिसत दिसत आहेस ?
ती : आहेच. आज माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. नितीन ला अमेरिकेत 'ऑनसाईट प्रोजेक्ट ' साठी पाठवणार आहेत. त्याच्या कष्टांचे आज त्याला फळ मिळाले. तो खूप दिवस याची वाट बघत होता. तो अजून १५ दिवसांनी निघणार आहे .
तो : तू त्याला खूप 'मिस' करशील.
ती : खरचं. मी त्याच्यावर खूप अवलंबून आहे. मला संजूचे आभार मानायला हवेत कारण त्याच्यामुळेच माझी नितीनशी ओखख झाली. नितीनशिवाय पहिले काही दिवस या अनोळखी शहरात कोणी मित्र, नातेवाईक आणि महत्वाचे म्हणजे नोकरी नसताना राहणे अशक्य होते. त्या कठीण दिवसात त्याने माझी खूप काळजी घेतली. तो खूप परिपक्व, समजूतदार आणि काळजी घेणारा मित्र आहे.
तो : तो तुझ्यावर प्रेम करतो. .........
ती : मला माहीत आहे...........
तो : आणि तू ? तुझे त्याच्यावर प्रेम नाही ?
ती : मला तशी आवश्यकता वाटत नाही ....
तो : चल काहीतरीच काय ? तुला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही ?
ती : प्लीज ... तसे म्हणू नको.मी त्याला 'माझे त्याच्यावर प्रेम आहे अथवा असेच काही' असेसे कधीच म्हणले नाही.
तो : कमॉन , तो काय मूर्ख आहे की ज्याला तुझ्या वागण्यावरून काहीच कळत नाही ? त्याला एकटे सोडू नको....
ती : मी त्याला माझ्या घरच्या वातावरणाबद्दल सगळे सांगितले. त्याला माहित आहे माझे वडिल कसे आहेत ते, त्यांना मी दूसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केलेले अजिबात खपणार नाही. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे व मी त्यांना दूखवण्याचा विचार पण करू शकत नाही. ते माझ्यासाठी योग्य मुलगा हूडकत आहेत.
तो : हम्म ... मला तुझे वागणे आणि बोलणे बिलकूल समजले नाही ....
ती : शनिवारी मी घरी चाल्ले आहे, मला बघायला एक मुलगा येणार आहे.
तो : वा. छानच. पहिली वेळ ना तुझी. बेस्ट ऑफ लक .... कोण आहे तो ? काही अंदाज ?
ती : जावू दे यार , ते महत्वाचे नाही . माझे पालक खूष आहेत हीच माझ्यासाठे महत्वाची गोष्ट आहे .........
********************************************************
तो : काल मी तुला फोन लावला पण बऱ्याच वेळ तो एंगेज होता .शेवटी मी कंटाळून ११ वाजता झोपलो.
ती : हो. मी नितीनशी बोलत होते. त्याला माझ्या लग्नाची काळजी वाटत आहे. त्याला वाटते की मला माझ्या अपेक्षा पूर्ण करणारा मुलगा मिळेल का नाही ? मी खूष असेन का नाही ? मला हे ऐकून खूप वाईट वाटले, पण मी मी तर काय करू ? मी त्याला समजावले की त्याला काळजी करण्यासारखे यात काही नाही, जे काही माझे पालक ठरवतील ते माझ्यासाठी चांगलेच असेल.....
तो : तुझे लग्न झाल्यावर नितीनला कसे वाटेल ? त्याला एकटे एकटे वाटणार नाही ?
ती : काळ हे सर्वोत्तम औषध आहे. त्याला त्याची सवय होईल. मी त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी तो जगतच होता ना? मी त्याला हेच समजवण्यापलिकडे काहीही करू शकत नाही .
*********************************************************
शेवटी "ती" तीच्या वडीलांनी पसंत केलेल्या [ आणि स्वाभाविकच "ती" ला पसंत असणाऱ्या ] मुलाबरोबर लग्न करते. पहिले काही दिवस तिचा नितीन बरोबर " जी टॉक" वर कॉटॅक्ट असतो. हळूहळू ती नितीनला विसरून नव्या "त्या" बरोबर खूष राहते. पण नितीनला "ती" ला विसरणे इतके सोपे नसते.... किंबहूना अशक्य असते....
*** मुली असे का करतात ???????????????? ***
* ती जेव्हा शहरात नवीन होती तेव्हा तीला नितीनची गरज होती.
* तीला राहण्याची व्यवस्था करण्यासाठी नितीनची मदत हवी होती.
* त्याने तीचा "रिझ्युमी" बनवला. तो तिला मुलाखतीच्या ठीकाणी सोडायला आला.
* त्याने तिला तिच्या मुलाखतीसाठी मदत केली. तीला स्वताचे कौशल्य, ताकद वाढवण्यासाठी मदत केली.
* ती च्यासाठी त्याने तीचा "मॉक-इंटरव्युव" घेतला .
* त्याने तिचे "रिझ्युमी" त्याचा कामात वेळ काढ़ून सगळीकडे पाढवले.
* ति च्या अपयशात तीला ईमानदारीने साथ दिली.
* ती च्या खूषीसाठी तो तिला शॉपींग, पिक्चर, बागेत घेउन गेला.
*त्या चा देवावर विश्वास नसताना तो तिच्यासाठी तिच्याबरोबर देवळात जायचा.
* जेव्हा ति च्या पालकांनी लग्नासाठी घाई केली तेव्हा रडण्यासाठी ती ला त्याच्या खांद्यांची आवश्यकता होती.
* लग्नासाठी तयार होताना तीला त्याची मदत हवी होती.
* त्याने लग्नाला यावे असा तिचा हट्ट होता [ कारण तो तिचा खरा मित्र आहे ]
***त्याने ह्या सर्व गोष्टी एकदा सुध्धा 'नाही' न म्हणता अतिशय प्रामाणिकपणे केल्या कारण ....***
* त्याचे तिझ्यावर प्रेम होते.
* त्याला तीच्यविषयी काळजी वाटत होती .
* त्याच्या आजच्या ज्या काही यशामागे तिच्या प्रेरणेचा वाटा आहे असे तो मानत होता .
* तो तिला आपले आयुष्य मानत होता.
* तो तिच्यासाठी बदलला.
* केवळ तिझ्यामुळे आज तो खूष होता, आपले दूख्ख विसरला होता.
* त्याचासाठी ती महणजे "आयडीयल भारतीय नारी " होती .
* तिला आवडतो म्हणून त्याने "क्रिष्णा" चा फोटॉ पाकिटात ठेवायला सूरवात केली.
* त्याने "साप्ताहीक सुट्टीला " ऑफीसमध्ये जाणे बंद केले केवळ तिच्यासाठी ...
* ऑनसाईट जाणे त्याचे स्वप्न होते पण आज तो पूण्यात नोकरी हूडकत होता फक्त तीच्यासाठी.
* "ती" त्याच्यावर अवलंबून होती जणूकाही ती "त्या" च्या शिवाय जगली नाही आणि जगू शकत नाही.
'त्या' ला वाटत होते की त्याचा जन्म फक्त 'ती' ची काळजी घेण्यास झाला आहे. तीला अवलंबून राहण्यास आवडायचे आणि त्याला काळजी करण्यास, शेवटी ते सो कॉल्ड "प्रेमात पडले" आणि त्याच्या जिवनातील शोकांतिकेला सूरवात झाली. ती ला आपल्यासाठी सर्वोत्तम जोडीदार हवा होता पण ती ची आपल्या पालकांना दूखवण्याचे तयारी नव्हती. त्या ला माहित होते की ती त्याला कधिच मिळणार नाही तरीपण तो ती ची काळजी घेत होता.[ कारण ती कुठेही असली, आणि कुणासोबतही असली तरी खूष असावी असे त्याला वाटत होते ....]
***शेवटी काय तर ??? ***
'ति'चा साखरपूडा झाला , आयुष्य चालुच आहे ....
दिर्घकाळ चालणारे फोनकॉल्स छोटे झाले आहेत,आयुष्य चालुच ....
" शूभ प्रभात" चे एस एम एस आता "हॅप्पी वीकएंड" वर आले आहेत, आयुष्य चालुच आहे........
त्याच्या याहूच्या इनबॉक्स मध्ये एक सुध्धा 'ती'चा न वाचलेला मेल नाही, आयुष्य चालुच आहे.......
कंटाळवाण्या आठवड्याच्या कामानंतर "बरिश्ता" मध्ये कॉफी करण्यास कोणी नाही, आयुष्य चालूच नाही...
'त्या'ने पून्हा धूम्रपान सूरू केले, आयुष्य चालूच आहे.........
आज 'तो' फक्त फ्लॅशबॅकचे आयुष्य जगतो ....
'त्या'ला नोकरीत बढती मिळाली, 'तो' मॅनेजर झाला, 'ती' २ मुलांची आई झाली, आयुष्य चालूच आहे....
कालांतराने 'त्या'ला पण एक सुशील, सुंदर, कर्तबगार, प्रेमळ पत्नी मिळाली, आयुष्य चालूच आहे...
*फार थोडे जण असतील की ज्यांच्या आयुष्यात हे घडलेले नाही ... आणि ते नाही म्हणायची हिंम्मत करतात ... हे बहूदा प्रत्येकाच्या आयुष्यात घडते ....*
प्रतिक्रिया
12 Feb 2008 - 10:32 pm | स्वाती राजेश
यालाच जीवन म्हणतात...
12 Feb 2008 - 10:46 pm | वरदा
कितीतरी मुलींचही होतंच की..मुलाचे आईवडील लग्नाला होकार देत नाहीत..मग तो शेवटी नाही म्हणतो लग्नाला...शिवाय लग्न करून त्याचे आईवडील छळ करतात ते मुलींचेच... मुलाने त्यांचं न ऐकता प्रेमविवाह केला म्हणुन...
आता त्याने प्रेम केलं तसंच तिनंही प्रेम केलं असेल पण ते प्रॅक्टीकल नव्हतं..तिला वाढवलेल्या आई वडिलांच्या इच्छेचा तिने आदर केला ही तिची चूक का? मग तिथूनही बोलणार कशा या मुली पळून जातात म्हणून..
हे कुणाच्याही बाबतीत होतं कितीतरी मुलं खूप भटकल्यावर सांगतात माझ्या घरी कधीच चालणार नाही टाटा बाय बाय...
स्वाती म्हणते तेच खरं हेच आयुष्य आहे...लोक भेटत रहातात कधी चांगले तर कधी वाईट वागत रहातात आणि आपण पुढे जात रहातो..जमेल तेव्हा मदत करतो पण म्हणून परतफेडीची अपेक्षाच करणं चुकीचं असतं ह्यात मुलं आणि मुली असा सुर नका हो लावू...तुमच्याच ओळखीत कितीतरी साध्या आणि असं न करणार्या मुली असतील की.....
13 Feb 2008 - 8:55 pm | छोटा डॉन
आपण वर व्यक्त केलेली सर्व मते मला मान्य आहेत पण हे सर्व होणार ही शक्यता जवळजवळ माहीत असून सुध्धा मुलाकडून अथवा मुलीकडून ही चूक घडतेच. हे पण बरोबर आहे की 'प्रेमाच्या कल्पनेच्या मनोराज्यात रमणे" व "प्रॅक्टिकल लाईफ " यात खूप अंतर आहे. कारण शेवटी "लाईफ इज ऍन ऍडजस्टमेंट ". प्रत्येक केलेल्या मदतीबद्दल परतफेडीची अपेक्षा करणे चूकच आहे.
पण मला असे वाटते की "जेव्हा एखादी व्यक्ती आपले पूर्ण तन / मन / धन लावून जर कूणावर प्रेम करत असेल आणि त्याची जर समोरच्या व्यक्तीला व्यवस्थीत कल्पना असेल तर ती व्यक्ती इतक्या 'पोलाईटपणे नकार ' कसा देऊ शकते ???" तीच्या मनात काहिच भावना नसतील काय ? नसतील तर आत्तापर्यंत झाले ते सर्व "नाटकच " म्हणावे लागेल ......
13 Feb 2008 - 12:02 am | ऋषिकेश
मस्त वास्तवदर्शी कथानक
-ऋषिकेश
13 Feb 2008 - 9:27 pm | वरदा
जेव्हा एखादी व्यक्ती आपले पूर्ण तन / मन / धन लावून जर कूणावर प्रेम करत असेल आणि त्याची जर समोरच्या व्यक्तीला व्यवस्थीत कल्पना असेल तर ती व्यक्ती इतक्या 'पोलाईटपणे नकार ' कसा देऊ शकते ???" तीच्या मनात काहिच भावना नसतील काय ? नसतील तर आत्तापर्यंत झाले ते सर्व "नाटकच " म्हणावे लागेल ......
आता हे समोरच्या व्यक्तीला माहीत आहे हे कशावरून हा पहीला प्रश्न मला पडतो..काही जण अगदी सहज मैत्रीण म्हणूनही मदत करणारे भेटतात्...आणि खरोखर खूप मदत करतातही..तिने कसं समजावं की नक्की हा आपल्यावर प्रेम करतो...
दुसरी गोष्ट ती कदाचीत तितकंच प्रेम करतही असेल त्याच्यावर पण तिला माहीती आहे की ह्याचा अंजाम चांगला होणार नाहीये...तिला माहितेय की हे सगळं अजिबात शक्यच नाहीये..मग हेच रडून आहे रे माझही प्रेम पण हे नाही जमणार असं सांगितलं की तो म्हणणार तू तयार असशील तर आपण पळून जाऊ जे तिला करायचं नाहीये...काही मुलं त्याही वर जाऊन तिला प्रेशराईज करू शकतात्...त्यातुन तिच्या आई वडिलांना मनस्ताप होऊ शकतो..तिच्या घरी कुणी हार्ट पेशंट असु शकतं....त्यासाठी तिला हे सगळं टाळायचंय्....मग ती काय करेल? सांगेल माझं प्रेमच नाहीये...मग हे जास्तं सोप्प होईल ना....
ह्या सगळ्या शक्यता झाल्या...असंच असेल असं नाही पण वाद टाळण्यासाठी खोटं बोलणं अगदीच काही चुक नाही...
13 Feb 2008 - 9:58 pm | विसोबा खेचर
वरदा,
तुझे दोन्ही प्रतिसाद आवडले, छान मनमोकळे वाटले.
छोट्या डॉन साहेबांनीही छान लिहिलं आहे.
स्वातीताईशी सहमत..
छोटे डॉनराव, और भी लिख्खो..
तात्या.
13 Feb 2008 - 11:40 pm | छोटा डॉन
तू मांडलेल्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत .....
जन्मभर मनस्ताप करून घेण्यापेक्षा एकदा खोटे बोलणे कधीही उत्तम .....
13 Feb 2008 - 10:58 pm | प्राजु
ह्या सगळ्या शक्यता झाल्या...असंच असेल असं नाही पण वाद टाळण्यासाठी खोटं बोलणं अगदीच काही चुक नाही...
हे मात्र अगदी खरं आहे. बर्याच वेळेला खोटं बोलावं लागतं.
वरदाच प्रतिसाद आवडला.
- प्राजु
14 Feb 2008 - 9:49 am | प्रभाकर पेठकर
'त्याने' आणि 'तिने' डोळस प्रेम करावे.
जेंव्हा तो तिच्यासाठी इतकं काही करतो आहे आणि तीही आनंदाने ते करवून घेते आहे तेंव्हा (आजकालच्या जमान्यात तरी) 'तिला' 'त्याच्या' भावनांची अजिबात कल्पना नव्हती, नसेल असे मानणे दांभिकपणाचे होईल. मुलांपेक्षा मुलींना 'सिग्नल्स' जास्त झटकन कळतात हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. जो पर्यंत 'त्याने' प्रेम शब्दांत व्यक्त केलेले नाही तो पर्यंत आपणही 'नकार' शब्दात व्यक्त करायचा नाही. पण त्याच्या 'त्या' भावनांचा पुरेपुर फायदा मात्र करून घ्यायचा ह्याला स्वार्थ ह्या शिवाय दूसरा पर्यायी शब्द नाही. हे असे ,मुलाने किंवा मुलीने, कोणीही वागणे गैरच ठरावे. आपल्या घरात ज्याचा/जिचा स्विकार होऊ शकेल किंवा होऊ शकणार नाही, आपल्या घरातील एखाद्याला हार्टचा त्रास आहे किंवा नाही ह्याची त्याला/तिला पूर्वकल्पना असतेच. त्यानुसारच स्वतःचे वर्तन ठेवावे अशी सर्वसाधारण अपेक्षा असते.
ज्याचे/ जिचे ज्याच्यावर/जिच्यावर प्रेम असते त्याने/तिने त्याच्या/तिच्या जवळ ते लवकरात लवकर व्यक्त करावे आणि आपण चुकीच्या रस्त्यावर जात नाही आहोत ह्याची खात्री करून घ्यावी. प्रत्यक्ष आयुष्यातही एखादा पत्ता शोधताना आपण इतरांना विचारत विचारत आपण चूकीच्या रस्त्यावर तर जात नाही नं ह्याची खात्री करीत पुढे जातो. प्रेमाच्या गावी जातानाही 'त्या' व्यक्तीला विचारुन आपण योग्य त्या वाटेवर आहोत ह्याची खात्री करून घ्यावी म्हणजे अतिदूर गेल्यावर 'पत्ता चुकल्याच्या' भावनेला आपण अडखळून तोंडघशी पडत नाही.
मुलींनीही जो मुलगा आवडत नाही, ज्याला आपल्या घरात स्विकारणार नाहीत किंवा आवडत असला तरी ज्याच्याशी लग्न केल्याने आपल्या घरातील कोणास हार्ट ऍटॅक येण्याचा ECG रिपोर्ट आपल्या हाती असेल तर, त्या मुलास उभयतांच्या नात्यातील स्वतःच्या भूमिकेची स्व्च्छ कल्पना द्यावी, अंधारात ठेवू नये. शुद्ध मैत्रीचे प्रपोजल मांडावे. ते स्विकारले तर उत्तमच आहे आणि नाकारले तर भिन्न मार्ग (दोघांनीही) अनुषंगावे.
मुलांनीही ज्या मुलीत त्यांना तसा इंटरेस्ट असतो त्यांनी लवकरात लवकर आपल्या भावना स्पष्ट शब्दात तिच्या जवळ व्यक्त करून तिचा कल समजून घ्यावा. तिने तुम्हास प्रियकर म्हणून स्विकारले तर नंतरची कांही वर्षेतरी दोघांनाही स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असा अनुभव येईल परंतु कुठल्याही कारणाने तिने नकार दिला तर खचून जाऊ नये. मनात राग धरून आपल्या तथाकथित प्रेमातील उथळपणाचे प्रदर्शन तर अजिबात करू नये. तुमच्या इतकीच तीही एक व्यक्ती आहे आणि तिलाही तिची स्वतःची मते आहेत. (कदाचीत तुम्हाला न पटणारी) त्यांचा आदर करावा. मुलीने नुसत्या मैत्रीचा आग्रह धरला तर, ती म्हणाली नाही तरी त्यात, शारीरिक सुखाला यत्किंचितही जागा नसते/नसावी हे ध्यानात असू द्यावे. पण त्या मैत्रीच्या नात्यात मुलीने जर शारीरिक संबंधांना हिरवा सिग्नल दाखवला तर मात्र अशा मुली पासून चार हात दूरच राहावे. (इथे मनाचा निग्रह भयंकर लागतो)
एवंच काय तर प्रेम डोळे उघडे ठेवून करा.
14 Feb 2008 - 11:44 am | सतिश गावडे
बरेच वेळा थोड्याफार फरकाने अगदी असच घडत...
14 Feb 2008 - 6:27 pm | वरदा
की एक कुणी दोशी असेल असं नाही...फक्त मुलीच असं करतात हे म्हणणं चूक आहे. माझ्या कॉलेजमधल्या एका मुलाचे ३ वर्षे एका मुलीबरोबर अफेअर होते आणि शेवटच्या वर्षात अचानक तो दुसर्या मुलीशी लग्न करून कॉलेजला आला. सगळेच चमकले. का तर म्हणे त्याची आजी खूप म्हातारी होती आणि तिला नातवाचं लग्न बघायचं होतं तेही त्यांच्याच नात्यातल्या कुणी मुलीशी...त्याने तिला साधी कल्पनाही दिली नाही की तो लग्न करणारे ह्याची. हे असं मुलंही करतात..तिचं बिचारीचं अभ्यासातंलं लक्ष एवढं उडालं की १ वर्ष वाया गेलं...
15 Feb 2008 - 8:26 pm | सुधीर कांदळकर
त्याने प्रथम ही मदत सौजन्य म्हणून देखील केली असेल. ती शहरात नवीन असल्यामुळे. तिचे रूप, तिचे विचार, तिचा स्वभाव त्याला आवडले की नाही हे दिलेले नाही. केवळ मुलगी आहे म्हणून कोण उठसूठ प्रेमात पडत नाही.
त्या चा देवावर विश्वास नसताना तो तिच्यासाठी तिच्याबरोबर देवळात जायचा.
हे विचित्र वाटले. पुरूष एवढा बदलू शकतो? तो एवढा कणाहीन आहे?
तिने त्याच्यासाठी काय केले? काही नाही? मग ती स्वार्थी आहे. आणि तो मूर्ख आहे. आणि तिचा निर्णय अपेक्षितच आहे.