'परा'कोटीला पोचलेल्या खरडवह्या : रसग्रहण

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
19 May 2009 - 6:27 pm

आमचा खरडवह्यांचा अभ्यास,व्यासंग आपण जाणताच. दिवसातले अनेक तास आम्ही ह्या अभ्यासासाठी खर्च करतो. ह्या अभ्यासात आम्हाला भावलेल्या काही खरडवह्यांची ओळख आपणास करुन द्यावी म्हणुन ही लेखमाला.

बिपिन कार्यकर्ते ह्यांची खरडवही.

आ हा हा काय वर्णावे ह्या खरडवही विषयी ? सध्या ह्या खव मध्ये कंपुबाज खेकडा, हृदयाला हात घालणारे भट साहेबांचे शब्द आणी 'हम दो हमारे(खरेतर हमारी) दो' यांचे एक रेखाचीत्र असे संमीश्र मिश्रण बघायला मिळेल.

काही लोकांना बिकांच्या सल्ल्यापेक्षा त्यांनी डकवलेली खव मधील भट साहेबांची कविताच जास्ती आवडली. मग त्यांनी ती सरळ उचलुन आपल्या वेबसाईटवर डकवुन टाकली, अगदी बिकांनी कवितेखाली लिहिलेल्या 'थँक यू भटसाहेब.' ह्या ओळीसकट.

सहसा ह्या खव मधली चित्रे वगैरे बदलली जात नाहीत. अगदी २/३ महिन्यातुन कधीतरी एकदा. बर दिवसभरात कमीत कमी ५०/६० खरडींचे रोजचे आवागमन येथे चालते. खरडी बहोतकरुन बिकांच्या कंपुबाज मित्रांच्या असतात. विविध बेत, एखाद्याची 'खेचण्याचे प्लॅन्स' वगैरे आखणे चालु असते.

'राजकारण, अफवा पसरवणे, विरोधकांनी चालवलेली बदनामी, नवाबी शौक' ह्या विषयाच्या खरडींना वाहिलेली खव असे साधारण ह्या खरडवहीचे वर्णन करता येईल. कधी कधी ह्या खव मध्ये नंदन, सहजराव, लिखाळपंत ह्यासारखी नावाजलेली मंडळी सुद्धा हजेरी लावुन जाताना आढळतात.
----------------------------------------------------------------------------------------------
भडकमकर मास्तरांची खव.

काही दिवसांपुर्वी दिवसाला सगळ्यात जास्ती वेळा मिपामधील काही विशीष्ठ सदस्यांकडुन उघडली जाणारी खरडवही असा हिचा सन्मानाने उल्लेख करावा लागेल. एखाद्या संस्थळाला दिवसभरात मिळणार नाहीत येव्हडे 'हिटस' ह्या खवला त्या 'कुपितल्या' काळात मिळत होते.
त्या काळी ह्या खवने मिपाला अनेक लेख, विडंबने आणी काथ्याकुट मिळवुन दिले हे मी अभिमानानी सांगु इच्छीतो.

सध्या ह्या खरडवहीत कुठलेच छायाचीत्र नाही. कधी काळी इथे मास्तरांच्या छोट्याश्या राजकन्येचे छायाचीत्र होते पण सध्या ती जागा मास्तरांनी मिपावर केलेल्या लिखाणाच्या दुव्यांनी घेतली आहे.

कधीकाळी मनसोक्त धिंगाणा अनुभवलेली ही खरडवही सध्या शांत शांत असते, ह्याला काही प्रमाणात मास्तरांचे रेग्युलर न येणे सुद्धा कारणीभुत आहेच.मास्तरांच्या खव मध्ये सहसा वैयक्तीक चर्चा आढळुन येत नाहीत. गाणी,चित्रपट, समिक्षा, दंतवैद्यकीय आणी नाटक ह्या विषयांना साधारणत: ही खरडवही वाहिलेली आहे.

आजही एकेकाळी ह्या खरडवहीत घातलेला धुडगुस आठवला की हसुन हसुन डोळ्यातुन पाणी येते.मास्तरांच्या खव मध्ये प्रदिप, चतुरंग, नंदन, डॉ.दाढे ह्या सारखे रथी महारथी हजेरी लावताना दिसतात. त्याच बरोबरीने मी, टार्‍या सारखे टारगटही हक्कानी मास्तरांना आमच्या खरडींनी लाज आणायचा प्रयत्न करत असतात. एकुणच समतोल अशी ही खव म्हणता येईल.
----------------------------------------------------------------------------------------------
विसोबा खेचर यांची खरडवही.

शब्दच तोकडे पडणार हो वर्णन करताना, फुल्ल टु गॅरंटी.

एकतर ही खरडवही उघडताना अंमळ वेळच लागतो, ब्रॉडबॅंड सुद्धा ६४ स्पीडचे भासायला लागते. परंतु एकद का ही खव उघडली की मग सौंदर्याचे एक एक ऍटमबॉम्ब फुटायला सुरुवात होते. मदनीका कोणीही असो, तिची कमीत कमी ३ चित्रे खरडवहीत लावायचीच हा तात्यांचा संकल्प आहे. ही चित्रे बदलली गेली की 'मिपाची मालकीण बदलली' अशी अफवा पसरते म्हणे. पण एकुणच तात्यांना दाक्षीणात्य सौंदर्य प्रिय असल्याची खात्री हि खरडवही पटवुन देते.

मिपाची सद्य परिस्थीती, कोणाचे कोणाशी वाजले आहे, नविन मैत्रीकिडा आला आहे का, संपादकांवर कोणी आरोप केले आहेत का, नवीन आलेल्या सदस्याची व्यक्तीगत माहिती (हुश्श) हे सगळे सगळे एकाच जागी समजण्याचे ठिकाण म्हणजे ही खरडवही. मिपावरील एक मोलाचा दस्ताऐवज असाच तीचा उल्लेख केला पाहिजे.

ह्या खरडवहीत जवळ जवळ ७०% मिपाकरांचा वावर आढळतो. "तात्या हे काय आपल्याला पटले नाही" पासुन "तात्या, यु आर सो स्वीट" पर्यंतच्या विविध गुणदर्शनाच्या खरडी आढळतात.

तक्रारी, मदत मागणे, आपण लिहिलेल्या लेखाच्या लिंका डकवणे ह्यासाठी वाहिलेली खरडवही असा हिचा साधारण उल्लेख करता येईल.
----------------------------------------------------------------------------------------------
विनायक प्रभु यांची खरडवही.

ह्या खरडवहीतील ७५% हुन जास्ती खरडी ह्या सामान्य माणसाच्या डोक्यावरुन जातील ह्याबद्दल शंकाच नाही. गुर्जींचे लेखच नाही, तर खरडवही सुद्धा क्रिप्टीकने भरलेली.

सध्या ह्या खरडवहीत गुर्जी लहान लहान लेकरांना 'मार्गदर्शन' (कशाचे हा चोंबडा प्रश्न आम्हालाही पडलेला आहे) करत आहेत असा फोटु डकवलेला आहे.

ही खरडवहीसुद्धा तात्यांप्रमाणेच सर्व प्रकारच्या मिपाकरांच्या आवागमनाच्या खुणा दर्शवते. अगदी १५/२० मिनीटासाठी आलेला एखादा जुना मिपाकर सुद्धा ह्या खरडवहीत हजेरी लावुन गेलेला आढळतो.

गुर्जींनी विचारलेल्या क्रिप्टीक प्रश्नांची उत्तरे अथवा गुर्जींना विचारले गेलेले प्रश्न ह्यांनी हि खरडवही भरुन वाहताना दिसते. मानवी शरीराचे विविध अवयव व त्यांची क्रिप्टीक नावे, वेगवेगळी आसने (योगा पासुन भोगा पर्यंत) ह्यांची परिपुर्ण माहिती मिळण्याचे ठिकाण म्हणजे ही खरडवही. ह्या खरडवहीतील अवलिया व गुर्जी ह्यांचे परस्पर संवाद प्रेक्षणीय.

क्रिप्टीक ह्या एकमेव विषयाला वाहिलेल्या ह्या खरडवहीत धनंजय, बिका, देवबाप्पा, मुक्तसुनीत ह्यांचा वावर एक वेगळीच खुमारी आणतो हे निश्चीत. टारझन व गुर्जी ह्यांची प्रश्नोत्तरे ज्ञानदंपदा वाढवणारी.
-----------------------------------------------------------------------------------------------
प्रमोद देव ह्यांची खरडवही.

अगदी 'देवाची खरडवही' असा उल्लेख करावा इतकी सात्वीक अशी ही खरडवही आहे.

सध्या ह्या खरडवहीत देवबाप्पा व त्यांच्या देवी ह्यांचे तरुणपणीचे छायाचीत्र डकवलेले आहे. फोटोच्या वरतीच देवबाप्पांना नुकत्याच रशियात प्राप्त झालेल्या पदवीबद्दल माहिती आहे.

कविता,गाणी, राजकारण, गृहकार्य, ऑफिसमधला त्रास.. अगदी कशा कशाचे म्हणुन ह्या खरडवहीला वावडे नाहिये. असे जरी असले तरी संगीत ह्या विषयावर मात्र मोठ्या प्रमाणात चर्चा आढळते.

इतर काही खरडवह्यांप्रमाणेच ह्या खरडवहीत सुद्धा मिपाकरांचा मुक्त वावर जाणवतो. एकुणातच सार्‍या खरडी ह्या थोडी आदब वगैरे राखुन, वयाला मान वगैरे देउन लिहिलेल्या आढळतात. (अपवाद अर्थातच आम्ही आणी धम्मु) कवी आणी कवियत्रींच्या मोठ्या प्रमाणातील वावरा बरोबरच विनायक प्रभुंचा ह्या खरडवहीमधील मोठ्या प्रमाणावर वावर अचंबीत करणारा. प्रा. डॉ. आणी देवबाप्पांचे सख्य अगदी जाणवण्या इतपत.

एकुणच खव बघताना मिपावरील एका जेष्ठ व संतुलीत व्यक्तिमत्वाची हि खरडवही आहे हे जाणवते.
-----------------------------------------------------------------------------------------------
चला ह्या भागात इतकेच. काहि सुधारणा हव्या असल्यास निश्चीत कळवा.
('ह्या असल्या टुकार लेखमाला लिहायचे पालथे धंदे बंद करा' असे मात्र कळवु नका.)

वावरसंस्कृतीमौजमजाआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

19 May 2009 - 6:29 pm | अवलिया

'ह्या असल्या टुकार लेखमाला लिहायचे पालथे धंदे बंद करा' ;)

--अवलिया

सागर's picture

19 May 2009 - 6:45 pm | सागर

नाना

तुमचे नाव नाही म्हणून रागावलात वाटते ;)

चालू दे रे राजकुमारा...
आणि नानांच्या खरडवहीबद्दल पण लिही... म्हणजे नाना शांत होतील :)

अवलिया's picture

19 May 2009 - 6:47 pm | अवलिया

हा हा हा
नंतरचा ;) पाहीला नाही का?
आणि लेखमालेपेक्षा एका लेखात "सगळे" यावे असे सुचवले लेखमाला नको असे लिहुन :)
तसेही मी हल्ली पराच्या भितीने खव साफ ठेवतो... च्यायला, कुठुन कुठे पोहोचतो हा प्राणी ;)

--अवलिया

सागर's picture

19 May 2009 - 6:51 pm | सागर

बघा ना नाना,
तुमच्या धडाकेबाज सुरुवातीने बरेच जण ५ मिनिटाच्या आत तुटून पडले
(मार्ग कोणता यापेक्षा निकालावर जास्त लक्ष देणारा) सागर
अवांतरः ही फिलॉसॉफी राज मुळे आणि वेडन्स्डे या चित्रपटामुळे पटत आहे :)

अवलिया's picture

19 May 2009 - 6:54 pm | अवलिया

स्ट्रॅटेजी बॉस ! मॅनेजमेंट म्हणजे काय असते दुसरे ?
साध्य महत्वाचे, साधन नाही.

हरी ॐ ! हरी ॐ !! हरी ॐ !!!

--अवलिया

उमेश__'s picture

19 May 2009 - 7:19 pm | उमेश__

सहमत

सूहास's picture

21 May 2009 - 2:08 pm | सूहास (not verified)

"खरडवह्या ऊचकपाचक महाम॑डळा"च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल "गटारकथेतील बेडुककुमार" या॑चे"कपु॑बाज विरोधी महाम॑डळातर्फे हार्दीक अभिन॑दन....

व पुढील वाटचालीस (म्हणजे बेडुक ऊड्या॑ना) शुभेच्छा...

सुहास
ए गप रे........

विजुभाऊ's picture

21 May 2009 - 2:26 pm | विजुभाऊ

अती आदरणीय सुहासभाऊ
मिपाचा एक सदस्य म्हणून सांगु इच्छितो
कोणाला उगाच गटारातील बेडूक म्हणून हिणवण्याचा काय उद्देश आहे तो समजला नाही. कदाचित आपल्याला तेवढे कळण्याइतपत लिहितेवेळेस उमज नसेल पण
तुमच्या प्रतिसादातून "हिणकस आसूयेची" झाक लख्ख दिसून येते.
कृपया वैयक्तीक शेरेबाजी शक्यतो टाळावी

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

सूहास's picture

21 May 2009 - 2:33 pm | सूहास (not verified)

१) कोण आपण ????...आणी फु़कटची वकीली करु नये.मिपावर ख व ऊचकपाचक करणार्‍॑याची,तर मग मात्र आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा....

"""हिणकस आसूयेची"""
हा हा हा जोक ऑफ द मिलेनियम...

सुहास
हे एक अजुन..........

विसोबा खेचर's picture

21 May 2009 - 3:48 pm | विसोबा खेचर

कोणाला उगाच गटारातील बेडूक म्हणून हिणवण्याचा काय उद्देश आहे तो समजला नाही. कदाचित आपल्याला तेवढे कळण्याइतपत लिहितेवेळेस उमज नसेल पण
तुमच्या प्रतिसादातून "हिणकस आसूयेची" झाक लख्ख दिसून येते.
कृपया वैयक्तीक शेरेबाजी शक्यतो टाळावी

विजूभाऊंशी सहमत आहे. सूहास यांनी नोंद घ्यावी अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी लागेल..!

तात्या.

रेवती's picture

19 May 2009 - 6:35 pm | रेवती

चांगली चालू दे तुझी लेखमाला!
बंद करू नकोस.
विप्र सर व देवकाका यांच्या खरडवहीबद्दल वाचताना छान वाटले.
(बाकी तुझा ख. व. अभ्यास जोरात दिसतोय...) ;)

रेवती

मिंटी's picture

19 May 2009 - 6:44 pm | मिंटी

असेच म्हणते......

चांगली चालु देत तुझी लेखमाला..... अजिबात बंद करु नकोस. :)

धमाल मुलगा's picture

19 May 2009 - 6:51 pm | धमाल मुलगा

चालुद्या तुमचे पालथे धंदे!

बाकी, हल्ली प.रा. ह्यांचे खवउचकापाचक केंद्र जोरात चालु आहे असं दिसतंय.
असो, एकच करा, मापात पाप करु नका. उगाच डोक्याला पिडा होइल.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

निखिल देशपांडे's picture

19 May 2009 - 6:59 pm | निखिल देशपांडे

चालुद्या तुमचे पालथे धंदे!
पुढचे भाग लवकर लवकर येवु द्यात

==निखिल

शाल्मली's picture

20 May 2009 - 1:35 am | शाल्मली

चांगली चालू दे तुझी लेखमाला!
बंद करू नकोस.

असंच म्हणते.
येऊदे अजून..

--शाल्मली.

अनंता's picture

19 May 2009 - 6:43 pm | अनंता

उर्फ चुचुताईच्या खव्चे वर्न्न क्रायला विसर्लास क रे परा?

वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

सँडी's picture

19 May 2009 - 7:03 pm | सँडी

तुमचाच लंबर आहे! =))

मस्त लिहिलयं! :)

नितिन थत्ते's picture

19 May 2009 - 7:10 pm | नितिन थत्ते

मला अजून पर्नल शब्दाचा अर्थ कळलेला नाही.
पूर्वी ही कर्नल सारखी पदवी असावी असे वाटे.
नंतर त्यांचे प्रतिसाद वाचून मज्यशि मय्तरी क्रनार्का सारखे काहीतरी पर्नल असावे असे वाटून घेतले आहे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

उमेश__'s picture

19 May 2009 - 7:17 pm | उमेश__

काय रे पर्‍या तुला असे रिकामटेकडे काम करायला वेळ कसा मिळतो???

निखिल देशपांडे's picture

19 May 2009 - 7:36 pm | निखिल देशपांडे

परा उगिच लेखमाला केली, आता अर्धे लोक त्यांचा खरडी उडवणार बघ

==निखिल

क्रान्ति's picture

19 May 2009 - 7:39 pm | क्रान्ति

म्हणतात व्यासंग! मस्त लिहिलंस परा! अजून येऊ दे.
:) क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 May 2009 - 7:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चालू द्यात तुमचे पालथे धंदे, भोचककुमार!

'खव-उचकपाचक-शिरोमणी' हा किताब एका ज्येष्ठ आणि वयोवृद्ध (आजच बड्डे आहे ना?) मित्राकडून काढून घेऊन तुला देण्यात यावा अशी लक्षवेधी सूचना मी आगामी लोकसभेत जरूर मांडेन.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 May 2009 - 12:15 am | बिपिन कार्यकर्ते

हॅहॅहॅ!!! दुसर्‍यांचे पालथे धंदे बघता बघता आपणही बरेच करताय!!!

बिपिन कार्यकर्ते

ब्रिटिश टिंग्या's picture

20 May 2009 - 12:35 am | ब्रिटिश टिंग्या

हे खरडवही वापरणे , चांगले दिसते आहे... मजा आहे...

अमोल खरे's picture

20 May 2009 - 12:43 pm | अमोल खरे

मी त्याला अणुमोदण देतो.

प्राजु's picture

19 May 2009 - 8:16 pm | प्राजु

लगे रहो..

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

19 May 2009 - 10:31 pm | चतुरंग

एकमेकांच्या खवमधे खरडण्याऐवजी थेट पराच्याच खव मध्ये खरडूयात म्हणजे ज्याला कुणाला खरड लिहायची असेल त्याचे/तिचे नाव टाकायचे पण खरड मात्र परालाच करायची!
त्याचा बिचार्‍याचा त्रास तरी वाचेल इतक्या खव चाळण्याचा, कसें! ;)

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

19 May 2009 - 11:37 pm | भडकमकर मास्तर

आईशपथ.. कस्ली भन्नाट आय्डिआ आहे....
=))

अवांतर : पराचा लेख छान होणार...
आत्ताशी सुरुवात झालीय.. पराचा खवव्यासंग फार मोठा आहे...
अजून येउद्यात...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

ब्रिटिश टिंग्या's picture

20 May 2009 - 12:02 am | ब्रिटिश टिंग्या

चालु द्यात तुमचे पालथे धंदे!
तसेही डाव्यांना फारसे काम नाहीये.... नाही का बिका? ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

20 May 2009 - 12:13 am | बिपिन कार्यकर्ते

अहो पण तुम्ही डाव्यांना काम देणार होता ना? काय झाले त्याचे.

अवांतर: गरजूंनी माझी आणि टिंग्याची खव चाळावी... जरा डीप जावे लागेल.

बिपिन कार्यकर्ते

पण या लेखामुळे माझीही उत्सुकता चाळवली गेलीये.. पाहूयात "परा"कडून थोडीशी प्रेरणा घेऊन!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

20 May 2009 - 12:54 am | बिपिन कार्यकर्ते

काय आपण अजून एकही खव चाळली नाही? अरेरे!!! आपण आयुष्यात काही तरी हरवत आहात!!! मी जेव्हा माझा मित्र पीटर पीटरसनला खव बद्दल सांगितले तेव्हा आधी त्याचा विश्वासच नाही बसला. पण जेव्हा त्याने माझे म्हणणे ऐकून खव बघितल्या तेव्हा त्याला अगदी व्यसनच लागलं. सतत खव मधेच असायचा. तुम्हीही एकदा करून बघा. आजच ऑर्डर करा. तुमच्या स्क्रीनवर खाली काही नंबर आहेत, त्यातला तुमच्या शहराचा क्रमांक निवडून लगेच डायल करा.

जॉन जॉनसन टेलिशॉपिंगवाले

भडकमकर मास्तर's picture

20 May 2009 - 9:04 am | भडकमकर मास्तर

एकदा मी फिरायला बाहेर पडलो असताना मला प्रोफेसर धनुष्कोडी भेटले. रस्त्यातच थांबून आमच्या गप्पा सुरू झाल्या.... त्यांच्या आत्येसासूबाई वेलिंग्टनला असतात्.त्यांच्यासाठी बाकरवड्या घ्यायला ते आले होते असे त्यांनी मला सांगितले..... खूप ऊन असल्याने मी त्यांना म्हणालो, चला जरा चहा घेऊ. मग मी आणि प्रोफेसर चहा घ्यायला थांबलो. बाबल्याच्या दुकानात चहा छान मिळतो. मी प्रोफेसरांना बाबल्याची ओळख करून दिली. बाबल्याला आनंद झाला... "असे छोटे छोटे आनंद वाटायला हवेत " प्रोफेसर म्हणाले. मलाही खूप बरे वाटले. छोट्याछोट्या आनंदावरून आठवण झाली आणि मी प्रोफेसरांना म्हणालो," आपण मिसळपावावर असता की नाही?" त्यांना कळेना...

मी त्यांना मिसळपाव आणि खरडवही म्हणजे काय ते समजावून सांगितले.... त्यांना माझे म्हणणे पटले... बोलताबोलता खूप वेळ गेला होता. आम्ही आत्येसासूबाईंसाठी आणलेल्या सगळ्या बाकरवड्या संपवल्या.... मला अपराधी वाटले. पण ते म्हणाले, " छोटेछोटे आनंद वाटायला शिकले पाहिजे" मलाही आनंद झाला.... जाताजाता मी म्हणालो, " खरडवह्या चाळणे आरोग्यास चांगले असते.." तेही हसून म्हणाले, " खरडवह्या चाळल्याच पाहिजेत.. आरोग्य चांगले ठेवलेच पाहिजे"...

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 May 2009 - 9:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मास्तर,
१. बाकरवडी म्हणजे खायची का मिपावरचा सभासद?
२. तुमच्याकडे एवढ्या गोष्टींचा आणि अनुभवाचा साठा आहे आणि तो तुम्ही आमच्याबरोबर वाटून घेता याचा मला खूप आनंद होतो.
३. तुमच्यासारखे ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आणि वयोवृद्ध (हे अगदीच मनावर नका घेऊ) सभासद मिपावर नियमितपणे वेळात वेळ काढून लिहितात ही मिपासाठी अभिमानाची आणि आम्हां तरूणांसाठी शिकण्यासारखी गोष्ट आहे.

बास आता, यापुढे फेकंफाक नाही करता येत आहे! :-D

दशानन's picture

20 May 2009 - 9:44 am | दशानन

लै भारी!

थोडेसं नवीन !

बाकरवडी's picture

20 May 2009 - 8:22 pm | बाकरवडी

:/ :/ :/ :/ :/

:B :B :B बाकरवडी :B :B :B

प्रकाश घाटपांडे's picture

24 Aug 2010 - 11:23 am | प्रकाश घाटपांडे

मास्तर सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजन घालन्याची बी सोय हाये हे प्रोफेसरांना सांगितले कि नाय?
हल्ल्ली आमी सर्व प्रकारच्या दु:खांवर फुंकर घालून मिळेल अशी सोय करावी म्हंतो.

समिधा's picture

20 May 2009 - 1:08 am | समिधा

अजुन येउदेत परा.....

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

बिपिन कार्यकर्ते's picture

20 May 2009 - 1:15 am | बिपिन कार्यकर्ते

अरे परा, तुला एवढा चांगला शेजार लाभलाय तर त्याचा अभ्यास कर ना.... हे कसले पालथे धंदे करतोस? असो. अभ्यास मात्र जबरदस्त आहे. चालु द्या. आमच्या बद्दल कधी तरी चांगलं लिहा, नाही तर आता तुमच्या साठीच एखादा प्लॅन करावा लागेल आता आम्हाला.... मित्रांनो ऐकताय ना रे?

कं. बिपिन कार्यकर्ते

कुंदन's picture

20 May 2009 - 12:18 pm | कुंदन

कॉ. बिपिन कार्यकर्ते असे वाचले आधी.... ;-)

ब्रिटिश टिंग्या's picture

20 May 2009 - 1:52 am | ब्रिटिश टिंग्या

http://www.misalpav.com/guestbook/newtracker?sort=desc&order=entries

हे घे रे!
कोणेकाळी आमचं पुस्तकही लोकप्रियतेच्या शिखरावर होतं रे....परंतु काही उच्चभ्रूंच्या वाईट संगतीमुळे एका बुधवारी आम्ही आमचं पुर्ण पुस्तकचं जाळुन टाकलं.... ;)

असो, सध्या नवनवीन पुस्तके बाजारात येत आहेत! तेव्हा त्यांचाच अभ्यास कर!

- टिंग्या

आनंदयात्री's picture

21 May 2009 - 2:27 pm | आनंदयात्री

>>कोणेकाळी आमचं पुस्तकही लोकप्रियतेच्या शिखरावर होतं रे....परंतु काही उच्चभ्रूंच्या वाईट संगतीमुळे एका बुधवारी आम्ही आमचं पुर्ण पुस्तकचं जाळुन टाकलं.... Wink

सांगत होतो ... पण तुम्हाला उकिरडे फुंकायचीच जास्त सवय ... असो !!
बाकी रिपोर्ट लै भारी आहे .. सध्या आमचीच खरडवही टॉपला दिसतेय .. आम्हाला मागे टाकायला लष्करे खरडालाच कुणावरतरी हल्ला करावा लागेल !!

ऋषिकेश's picture

20 May 2009 - 9:31 am | ऋषिकेश

वा वा.. मस्त
पुढील पालथे धंदे येऊ देत लवकर

(आरोग्यवान)ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

दिपक's picture

20 May 2009 - 10:14 am | दिपक

हेच राहिलं होतं.. या पराला काही औषध काही..

येउदेत अजुन :)

स्वाती दिनेश's picture

20 May 2009 - 11:39 am | स्वाती दिनेश

परा,पालथे धंदे चालू देत...
मास्तरांचा प्रतिसाद लय भारी...
स्वाती

विसोबा खेचर's picture

20 May 2009 - 11:46 am | विसोबा खेचर

खरडींची लेखमाला जोरदार आहे. आपल्या व्यासंगाला प्रणाम..! :)

आपला,
(तक्रार, चहाड्या-चुगल्या, कौतुक, अभिनंदन, सणावाराच्या शुभेच्छा इत्यादी खरडींना आणि व्य निं ना कंटाळलेला) तात्या.

मि माझी's picture

20 May 2009 - 4:08 pm | मि माझी

मिपावर नविन आले तेव्हा काहि कळायच नाहि काय चाललय... नंतर खरडवह्यांच्या वाचनाने खुप काही समजले.. ;)..

मी माझी..
चिंब भिजलेले .. रुप सजलेले.. बरसुनी आले.. रंग प्रितीचे..

लिखाळ's picture

20 May 2009 - 7:44 pm | लिखाळ

'परा'कोटील्या पोहोचलेल्या खवंवरचा लेख लै भारी !
मजा आली :)
पुढचे भाग टाक लवकर !

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

टारझन's picture

20 May 2009 - 10:01 pm | टारझन

झबर्‍या ..... लेका ... वेळेचा कसा सदुपयोग करतोयस !!
एक णंबर्स !!

लवकर येऊन द्या

आनंदयात्री's picture

21 May 2009 - 10:36 am | आनंदयात्री

हॅ हॅ हॅ ... लेखाचे नाव सिद्धहस्तांच्या खरडवह्या : एक तुलनामत्क लेखाजोखा असे हवे होते !!
देवाच्या कृपेने या लेखमालेत तरी नाव यावे अशी जळजळीत इच्छा लेखकापर्यंत पोचवण्यासाठी हा प्रपंच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 May 2009 - 11:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

देवाच्या कृपेने या लेखमालेत तरी नाव यावे अशी जळजळीत इच्छा लेखकापर्यंत पोचवण्यासाठी हा प्रपंच.

यात्री, तुम्हाला परांच्या म्हणायचं आहे का? देवांच्या कृपेने तुम्ही पहिल्या यादीत तरी आला नाहीत! ;-)

हॅ हॅ हॅ हॅ

अदिती
(मैत्रीण)

आनंदयात्री's picture

21 May 2009 - 11:15 am | आनंदयात्री

व्हय व्हय .. मपलं जरा चुकलचं .. देवाच्या ऐवजी "आकाशातल्या देवाच्या" असे समस्त मिपाकर जनतेने वाचावे ही पराकोटीची विनंती देवाच्या आज्ञेने करतो !!

विजुभाऊ's picture

21 May 2009 - 12:15 pm | विजुभाऊ

आन्द्याशी सहमत
कोणे एके काळी कोणाशी गट्टी फू करायची असेल तर लोक खरडवही बंद ठेवायचे म्हणे.

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

बिपिन कार्यकर्ते's picture

21 May 2009 - 12:55 pm | बिपिन कार्यकर्ते

काही लोकांना बिकांच्या सल्ल्यापेक्षा त्यांनी डकवलेली खव मधील भट साहेबांची कविताच जास्ती आवडली. मग त्यांनी ती सरळ उचलुन आपल्या वेबसाईटवर डकवुन टाकली, अगदी बिकांनी कवितेखाली लिहिलेल्या 'थँक यू भटसाहेब.' ह्या ओळीसकट.

भारी आहेस तू. यु हॅव अगदी ऍन एलिफंटाईन मेमरी बरं का!!! ;)

'राजकारण, अफवा पसरवणे, विरोधकांनी चालवलेली बदनामी, नवाबी शौक' ह्या विषयाच्या खरडींना वाहिलेली खव असे साधारण ह्या खरडवहीचे वर्णन करता येईल.

तू स्तुति करतो आहेस की....

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

24 Aug 2010 - 9:05 am | सहज

परा पुढचा भाग लिही.

च्यायला, ही पण लेखमाला वार्‍यावर सोडलेली दिसते. जित्याची खोड वाटते !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2010 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

परा व्हँपायरही असू शकतो!

Pain's picture

24 Aug 2010 - 12:49 pm | Pain

:D

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Aug 2010 - 10:38 am | बिपिन कार्यकर्ते

गेले ते दिन गेले....

प्रकाश घाटपांडे's picture

24 Aug 2010 - 11:51 am | प्रकाश घाटपांडे

परा खरडवह्यांचा सखोल अभ्यास हा लोकांच्या अंतर्मनाचा अभ्यास. इथे काळ काम वेग महत्वाचा. खरडवह्या 'साफ' व्ह्यायच्या आत त्याची नोंद ठेवणे किती कसरतीचे? अशा ह्या सखोल अभ्यासातुन पराचा कव्हा प्रा व्हईन हे त्याच त्याला बी कळनार नाय?

चिंतामणी's picture

24 Aug 2010 - 6:34 pm | चिंतामणी

'परा'कोटीला ची कोटी आवडली.

बाकी नेहमी प्रमाणे क्रमशः करत करत वेळ लावू नका.