चतुरंग यांची खरडवही.
खरडवहीत स्वागत आहे! मनसोक्त खरडा. सवडीने उत्तरे देईनच. (म्हणजे वाटले तर देईन नाहीतर सवड न्हवती असे समजा ;)) आणी छानसा बुध्दीबळाचा पट घेउन आपल्या स्वागताला हजर असणारी अशी हि खरडवही.
अक्षरश: मिपावरील सगळ्या थरातील सदस्यांचा ह्या खरडवहीतील वावर खरडवही मालकाच्या लोकप्रीयतेची साक्ष देणारा.
फुलपाखरी अश्रुपात वगैरेला खरडवहीत बिलकुल थारा दिसत नाही. अथ पासुन इथपर्यंत फक्त 'हे हे हे' आणी 'ठॉ !!' करायला लावणार्या खरडींनी भरलेली अशी हि खरडवही.
विडंबनापासुन ते संपादकीय तक्रारींपर्यंत आणी विश्वनाथ आनंदपासुन मार्क्स पर्यंतच्या सर्व विषयांनी भरलेल्या विविध खरडींचा साठा येथे आढळतो. जेष्ठ आणी गंभीर वाटणार्या काही काही मिपा सदस्यांच्या इथल्या गंमतीशीर खरडी वाचुन मजा येते.
येथे तुम्हाला रोज खरडींचा पुर आलेला आढळणार नाही पण ज्या येतील त्या खरडी अत्यावश्यक असतील येव्हडे नक्की. 'मनात आले म्हणुन खरडले' ह्या शैलीतल्या खरडी येथे बिलकुल आढळणार नाहीत.
साधी सरळ खरडवही असे हिचे वर्णन करता येईल. येथे गुढ, राजकारणी खरडी आढळणार नाहीत. सगळा सरळ मामला.मुखपृष्ठावर घोडे, उंट स्वागताला हजर असले तरी ह्या खरडवहीतील खरडींची चाल मात्र हत्तीसारखी अगदी सरळ आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
आनंदयात्री यांची खरडवही.
चारी बाजुला आनंदी आनंद पसरलेली आणी पसरवणारी अशी ही खरडवही आहे. मिपावर घडु पाहणार्या बर्याचशा मोहिमांचे 'खल' ह्या ठिकाणीच चालते.
'अंदीटलु'पासुन 'काय रे भाड्या' पर्यंत सुरुवात करणार्या विविध प्रकारच्या खरडींनी येथे नुसता पुर आलेला असतो. मिपावरील सर्वात जास्ती खरडींचा साठा असलेली ही खरडवही आहे हे आम्ही आनंदाने आणी अभिमानाने नमुद करुन इच्छीतो.
खरडवहीची रचना अत्यंत साधी पण वेधक. एखादी सुंदर कवीता अथवा गजल डकवलेली, आजकाल येथे एक नाजुक फुलाचे चित्र पण दिसुन येते. यात्री साहेबांचे विविध मुड त्यांच्या खवमध्ये दिसुन येत असतात. खवच्या अग्रभागी लावलेला 'मेसन्स'चा लोगो नाना विविध तर्कांना वाव देणारा.
ह्या खरडवही माध्यमातुन आनंदयात्री ह्यांनी छोटा डॉन व धमाल मुलगा यांच्याशी साधलेले संवाद त्यांच्या 'व्यासंगाची' जाणीव करुन देणारे व अंतरजालावरील होतकरुंच्या ज्ञानात त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे भर टाकणारे.
'मोहिमेच्या तयारीपासुन' नविन वाचलेल्या पुस्तकाच्या रसग्रहणापर्यंत कुठल्याही विषयाचे ह्या खरडवहीला वावगे नाही.
सर्व मित्रांना, (आत्यांना) हक्कानी बागडायला दिलेली खरडवही असे हिचे वर्णन करता येईल.
-----------------------------------------------------------------------------------------------
३_१४ विक्षिप्त अदिती हिची खरडवही.
'जहबर्या !' ह्या एकाच शब्दात ह्या खरडवहीचे वर्णन करावे लागेल. ह्या खरडवहीच्या अग्रभागी कधीकाळी कंपुबाज़ खेकडा मानाने नांग्या वर करुन उभा होता. सध्या ती जागा व्यंगचीत्र, भुमीतीचे खेळ आणी माशा मारण्याचे साधन ह्यांनी घेतली आहे हे सांगताना आम्हाल अतीव दु:ख होत आहे.
मिपावरच्या चालु घडामोडींचा सविस्तर वृतांत मिळणारे हे ठिकाण. मुक्तसुनीत, श्रावण मोडकांपासुन अगदी काल परवा खरडवही चालु झालेल्या सदस्याचाही मुक्तवावर हे ह्या खरडवहीचे वैशीष्ठ्य.
'म्त्रि क्र्न्र क ?' या सारखे प्रश्न विचारण्यासाठी आसुसलेल्या मैत्रीकिड्यांच्या विरुद्ध येथुन चालवल्या गेलेल्या मोहिमा अभ्यासपुर्ण. अनेक माहितीपुर्ण, मेंदुला चालना देणार्या खरडींचे आगार. मिपावरील 'राजकीय मोहिमा' चालवल्या जाणार्या काही प्रमुख केंद्रांपैकी एक असे हिचे वर्णन करावे लागेल.ह्या खरडवहीतील अदिती व छोटा डॉन, धम्मु यांच्या चर्चा अभ्यासनीय. अदिती व आनंदयात्री ह्यांच्या 'लढाया' वाचनीय.
आवर्जुन भेट द्याव्यात अशा ज्या काही खरडवह्या आहेत त्यापैकी एक अशी ही खरडवही. सध्या अदिती संपादक नसल्याने पुन्हा एकदा ह्या खरडवहीला 'वाचनीय' असे स्वरुप आले आहे. ;)
----------------------------------------------------------------------------------------------
अवलिया यांची खरडवही.
नावाप्रमाणेच अवलिया खरडवही. हिचे अंतर्बाह्य स्वरुप कसे आणी केंव्हा पालटेल ह्याची शाश्वती नाही. एका कलंदर (आणि बिलंदर) माणसाची खरडवही.
सध्या ह्या खरडवहीच्या मुखपृष्ठावर मोहक असीन विराजमान आहे. त्या खालोखाल सध्या अवलियांनी भेट देणार्या प्रत्येकाची नाष्ट्याची सोयही करुन ठेवलेली आढळते, हे पदार्थांचे फोटो ठरावीक काळाने बदलत असतात. सध्या खरडवहीत केव्हाही भेट दिली तर ज्यांना उत्तरे दिली नाही अशा खरडी वाट पहात असतात.
मात्र अवलिया ऑनलाईन असताना अचानक भेट दिल्यास ह्या खरडवही मधील अवलिया व पर्नल अका चुचु ह्यांचे संवाद वाचनीय (?) व अभ्यासपुर्ण आढळतील. तर कधी कधी प्रा. डॉ. आणि अवलियांच्या गप्पा बहरात आलेल्या दिसतात. कधी बिपीन शेट उंटाचे की उंटीणीचे दुध पितात यावर चर्चा होत असते, तर कधी पराशी मुलींना पटवायच्या मार्गांची चर्चा होत असते. सरळ साध्या विषयांपासुन तर कुटनीती.... या खरडवहीला कोणताही विषय वर्ज्य नाही. वयाचे बंधन नाही. अरे तुरे पासुन अहो जाहो, नान्स पासुन नानासाहेब, अव्लेया पासुन अवलियाजी काहीही बोला, कोणतेही बंधन नसलेली सर्व वयाचे सक्रिय आणि निष्क्रिय सदस्य कधी ना कधी ज्या वहीत खरडत असतात अशा पैकी एक खरडवही.
कधी कधी ज्यांच्याशी अवलियांच्या गप्पा होत असतात त्या सर्वाच्या खरडगप्पा नीट पाहिल्या तर अनेक गुढ गोष्टी कळतात. ज्यांचा खुलासा अनेक वेळेला दोन तीन दिवसांनी होतो. मात्र अगदी जागरुकतेने ह्या पहाव्या लागतात, कारण अशा खरडींचे आयुष्य दोन मिनिटांपेक्षा जास्त नसते. वाचता आली तर नशीब!
कोणे एकेकाळी भरभरुन वाहणारी ही खरडवही आजकाल मात्र ओकीबोकी असते ह्याचे आतुन खुप दु:ख होते. एकेकाळी ह्या वहितील प्रभु गुर्जी व अवलिया यांची जुगलबंदी वाचताना जी मजा यायची ती आठवण अजुनही ताजी आहे.
पुन्हा एकदा ही खरडवही 'हरीभरी' होवो आणि आतल्या खरडी सर्वांना वाचायला उपलब्ध राहो हीच इच्छा.
----------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
25 May 2009 - 12:45 pm | विजुभाऊ
गाढा व्यासन्ग............
बहुतेक ही लेख माला(?) विद्यापीठात संदर्भासह स्पष्टीकरणात लागणार
भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
25 May 2009 - 12:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"हॅहॅहॅ, कल्जि घेने" परा! आपण माझ्या खवचे वर्णन करताना बहुदा शेखे (शेकडा खेकडा) यांच्या भगतगणाचा किमान शब्दांत कमाल अपमान केलेला दृष्टीपथात येत आहे. चालू द्यात तुमचे पालथे धंदे; तुम्ही, मी आणि माझा आंतरजालीय मित्र (आंतरजालावर कोणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे मला ठावकी आहे.) आंदोबाशेट विडंबनकारजी यांच्यात आपण लढाई लावून देऊ शकत नाही.
अवांतर: मनापासून हसायला आलं रे!
25 May 2009 - 1:14 pm | अनंता
प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातील आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
25 May 2009 - 1:58 pm | आनंदयात्री
छान !!
कोणत्या न कोणत्या मिपा रिलेटेड (प्रतिशब्द?) लेखमालेत आमचा उल्लेख तर आलाच आणी भरभरुन कोडकौतुक पण झाले .. उ त्त म .. गंगेत घोडे न्हाले एकदाचे !!
25 May 2009 - 2:07 pm | मिंटी
परा झकास रे...... मस्त लिहिला आहेस हा पण भाग. सहीच.... आता लौकर पुढचा पण भाग येऊ देत. :)
अवांतर :
मिपा रिलेटेड (प्रतिशब्द?)
मिपाशी संबंधीत....... हा प्रतिशब्द चाकु शकेल का ?
25 May 2009 - 2:21 pm | श्रावण मोडक
???
म्हणजेच पुढचा भाग कधी?
25 May 2009 - 2:22 pm | आनंदयात्री
पुढल्या भागात साहेब !!
खोका पोचायला देरी झाली ..
25 May 2009 - 2:41 pm | निखिल देशपांडे
पुन्हा एकदा ही खरडवही 'हरीभरी' होवो आणि आतल्या खरडी सर्वांना वाचायला उपलब्ध राहो हीच इच्छा.
आमची पण हिच इच्छा.....
बाकी परा हा पण भाग मस्तच लिहिला आहेस.... सर्व ख व चे अगदी योग्य वर्णन.
==निखिल
25 May 2009 - 2:59 pm | बिपिन कार्यकर्ते
मिष्टर परा, तुमचे पालथे धंदे तुम्हाला जाम भोवणार आहेत. चालु द्या. नंतर सांगू नका. म्हणून म्हणतो, "अत्त्च कल्जि घेने". ;) पुढचे भाग टाका पटापट.
बिपिन कार्यकर्ते
25 May 2009 - 3:11 pm | अवलिया
हम्म :)
--अवलिया
25 May 2009 - 3:19 pm | सूहास (not verified)
"खरडवह्या ऊचकपाचक महाम॑डळाचा" आणखी एक प्रश॑सनीय अभिनव ऊपक्रम..
अ॑वातर : अजुन टारूभाउ चे नाव कसे आले नाही...
अतिअवा॑तर : का टारुचे नाव घेतोय ?शाब्दिक फटका बसायचा...
सुहास
25 May 2009 - 3:25 pm | ऋषिकेश
मस्त ,... लेखमाला हवी तरी अशी.. पालथी !!!!! :)
अजून येऊ दे
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
25 May 2009 - 6:01 pm | धमाल मुलगा
>>लेखमाला हवी तरी अशी.. पालथी !!!!
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ!!!! ॠषीकेश, सध्या मुक्कामपोष्ट पुणे-३० का? ;)
सही जा र हो परा के कावळे :P
पण नेहमीप्रमाणं दणका नाय जाणवत बॉ. काय भानगड आहे?सध्या कावेरीकाठच्या वार्या कमी केल्या आहेत की काय? ;)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
26 May 2009 - 8:14 am | सुबक ठेंगणी
परा के कावळे =)) =))
अवांतरः माझी खरडवही कधी चालू होणार??? (चालू ह्या शब्दातील 'च' चा उच्चार चोमडी मधल्या च सारखा करावा!)
26 May 2009 - 10:22 am | सुबक ठेंगणी
अरे ध.मु. आणि अदिती!
मला स्वत:ची आणि इतरांच्या खरडवह्या पहाता येतात पण दुस-यांच्या खरडवह्यात काहीही लिहिता येत नाही! (म्हणून इथे लिहित्येय!) हे म्हणजे पाव मिळाला असून मिसळ नसण्यासारखे आहे...कोणीतरी प्लीज एफ. १. :S
25 May 2009 - 5:43 pm | Suhas Narane
अस्च लिहीत जा.
आम्ला इतहास महीएत पद्तो
25 May 2009 - 7:47 pm | क्रान्ति
मन लावून केलेला खव अभ्यास आवडला.
अवांतर :- इतिहासाचा अभ्यास असाच करत होतास का शाळेत असताना? ;;)
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
26 May 2009 - 9:22 am | विसोबा खेचर
गाढा व्यासंग!
:)
तात्या.
26 May 2009 - 12:11 pm | प्रकाश घाटपांडे
आमच्या मते खव ही मनाची त्या त्या वेळची स्पंदने असतात. क्वॉन्च कुनाशी जमन आन क्वॉन्च कुनाशी कवा फाटन काय पर्मेसोराला बी सांगता येनार नाय
बाकी चालू द्यात
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.