फासले ऐसेभी होंगे - भावानुवाद - असेल अंतर असेही...

ॐकार's picture
ॐकार in जे न देखे रवी...
7 Feb 2008 - 4:55 pm

मूळ गझल

फासले ऐसे भी होंगे.......ये कभी सोचा ना था .....
सामने बैठा था मेरे.....और वो मेरा ना था!!!!!!

वो की खुश्बू की तरह.....फैला था मेरे चार सू......
मैं उसे महसूस कर सकता था......छू सकता ना था.....

रात भर उस ही की आहट कान में आती रही......
....झाँक कर देखा गली में....कोई भी आया ना था......

अक्स तो मौजूद थे पर ..... अक्स तन्हाई के थे....
आइना तो था मगर उस में तेरा चेहरा न था !!!!

आज उसने दर्द भी अपने अलहदा कर दिए.......
आज मैं रोया तो मेरे साथ वो रोया न था !!!

ये सभी वीरानियां......उसके जुदा होने से थीं....
आँख धुन्ध्लाई हुई थी.....शहर धुन्ध्लाया न था!!!!!

याद करके और भी तकलीफ होती थी "अदीम".......
भूल जाने के सिवा....अब कोई चारा ना था.....

- अदीम हाशमी

भावानुवाद

असेल अंतर असेही असा विचार साधा केला नव्हता
समोर माझ्या बसला होता पण तो काही माझा नव्हता

सुगंधापरी माझ्याभवती चहुकडे घमघमाट त्याचा
मला जाणवत होता निव्वळ, कुठेच तो स्पर्शाला नव्हता

केवळ त्याच्या हाका ऐकू येत राहिल्या मला रात्रभर
अनेकदा पाहिले मी, खरे कुणीच दारी आला नव्हता

उरली होती श्रांत आसवे - एकटेपणाची जी माझ्या
आणि आरसा-त्यातही मला तुझा चेहरा दिसला नव्हता

आता त्याने त्याच्यापासून विभक्त केल्यात वेदनाही
आता मी रडले पण त्याच्या डोळ्यांना ओलावा नव्हता

कारण त्याचा विरह ठरावा सगळे काही ओस पडाया
धूसर होती नजर, गाव तो काळोखात बुडाला नव्हता

अदीम म्हणतो - तुला पुन्हा आठवून झाल्या किती वेदना
विसरून जावे ह्याच्याविपरित उपाय दुसरा उरला नव्हता

-ॐकार

हे ठिकाणकलाकवितागझलभाषाप्रतिसादआस्वादप्रतिभाभाषांतर

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

7 Feb 2008 - 5:19 pm | धमाल मुलगा

ॐकार....
काळजाला हात घातलास रेssss
गुलाम अली आमचा जीव की प्राण अन् फासले॑ ऐसे भी..म्हणजे निव्वळ कातील!!!

जुने दिवस आठवले. अगदी खूप खूप जवळची मैत्रीण होती, माझ्या "तीच्या" पेक्षा सुद्धा जवळची... फक्त कोणा हलकटामुळे आम्ही दूर झालो. ते॑व्हा तिला ऐकवली होती ही गजल. त्यान॑तर मी परत ही गजल ऐकलीच नाही... शक्यच होत नाही पूर्ण ऐकण॑.

साला डोळे हे हरामी..परत ओलावले.

आपला,
- (गुलाम अली प्रेमी)
मुफलीस ध मा ल.

मनिष's picture

7 Feb 2008 - 5:41 pm | मनिष

ख़ुद चढ़ा रखे थे तन पर अजनबीयत के गिलाफ़
वर्ना कब एक दूसरे को हमने पहचाना न था।

धमाल मुलगा's picture

8 Feb 2008 - 10:17 am | धमाल मुलगा

वाह मनिष,
धन्यवाद. हे अशआर मला ठावूक नव्हते.

मजा आ गया !

आपला
- (उर्दूच्या नजाकतीचा दिवाना)
ध मा ल.

सख्याहरि's picture

7 Feb 2008 - 7:54 pm | सख्याहरि

ॐकार....
काळजाला हात घातलास रेssss
गुलाम अली आमचा जीव की प्राण अन् फासले॑ ऐसे भी..म्हणजे निव्वळ कातील!!!

आमच्याच भावना चपखल व्यक्त केल्या आहेत धमाल मुलाने!!

वाह वाह...
त्या बद्दल एक शेर-

अब मैं समझा तेरे रुक्सार पे तिल का मतलब
.....दौलत-ए -इश्क पे दरबान बिठा रक्खा हैं

रुक्सार म्हंजे गाल :)

कृपया याचा भावानुवाद कुणी तरी करावा.. (आमच्या पद्य अंगची जरा बोंबच आहे :) )

आपला,
- (गुलाम अली प्रेमी)
सख्याहरि

धनंजय's picture

7 Feb 2008 - 9:34 pm | धनंजय

ॐकारांचे वृत्त, रदिफ मला साधले नाही तरी हा यत्न बघावा :

तीळ जो गालावरी तव काय करितो समजलो
तो पाहारा देत बसला, रूप-दौलत राखतो

(खाली लिहिल्याप्रमाणे दौलते हुस्न आहे, असे आठवते. म्हणून बदल केला.)

सख्याहरी, मूळ शेर असा असावा...
अब मैं समझा तेरे रुक्सार पे तिल का मतलब
.....दौलत-ए -हुस्न पे दरबान बिठा रक्खा हैं

चूकभूल देणे घेणे

अग्दी बरोबर..

चूकभूल देणे घेणे
(खजील)सख्याहरी.

चतुरंग's picture

7 Feb 2008 - 9:31 pm | चतुरंग

गालावरीच्या त्या तिळाचा भाव हा समजे मला,
दरवान जणु राखण्या त्या दौलतीला ठेविला.

चतुरंग

सख्याहरि's picture

7 Feb 2008 - 8:54 pm | सख्याहरि

अनुवाद मस्त जमलाय. भाव पण आहे.
पण.... मजा नही आली.

पण या सगळ्या कविता गझली वाचुन आम्हास वाटते-

अशीच अमुची वाणी असती.. सुंदर कव्यभरी..
आम्ही ही कवी झालो असतो वदले सख्याहरी.....

काय म्हणता?
(काव्यभस्म)सख्याहरी

विसोबा खेचर's picture

7 Feb 2008 - 10:59 pm | विसोबा खेचर

अरे पण भल्या गृहस्थांनो,

मला एक कळत नाही की,

अब मैं समझा तेरे रुक्सार पे तिल का मतलब
.....दौलत-ए -इश्क पे दरबान बिठा रक्खा हैं

इतक्या सुंदर शेराचे मराठीकरण करून तुम्ही त्यातील ऊर्दूच्या लहेज्याची मजा का घालवताय??

आपला,
(उर्दूप्रेमी) तात्या.

चतुरंग's picture

7 Feb 2008 - 11:24 pm | चतुरंग

आचरटपणा झाला खरा!
गुस्ताखी़ माफ!!

चतुरंग

धनंजय's picture

7 Feb 2008 - 11:44 pm | धनंजय

असेच

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Feb 2008 - 12:31 am | llपुण्याचे पेशवेll

हे तुमचे उर्दू आमच्यासारख्या ढुढ्ढाचार्यांना कसेहो कळायचे? कोणी सांगितला मराठी अर्थ तर बिघडले कुठे ? तेवढिच आमच्या ज्ञानात भर पडेल ... कसे?
पुण्याचे पेशवे

प्राजु's picture

8 Feb 2008 - 12:14 am | प्राजु

ॐकार.. इतकी छान गझल.. आणि त्याचा भावानुवदही सुंदर...

- प्राजु.