एप्रील फळ (१०)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
14 Mar 2009 - 12:08 pm

या पूर्वीचे दुवे
http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६)
http://misalpav.com/node/1492 = एप्रिल फळ (७)
http://misalpav.com/node/2482 = एप्रिल फळ(८)
एप्रिल फळ (९) http://misalpav.com/node/2538

फ़णासाचे गरे आयुर्वेदात रुचकर ; पौष्टीक असे काहीसे वर्णीले आहेत. पण खाणारा माणुस फ़णसाचे गरा तोंडात टाकतो तेंव्हा अजानतेपनी डोळे मिटतो. वाईन टेस्टरने वाईन तोंडात घोळवत त्याची लज्जत चाखावी तसे काहिसे गर्याची चव तोंडात घोळवतो दोन क्षण का होईना त्याची अक्षरश: ब्रम्हानन्दी टाळी लागते. अंतरात्मा तृप्त होतो.आणि हतिम बीन ताई च्या गोष्टीत सांगितलेल्या प्रमाणे "एकबार देखा है दूसरी बार देखने की चाहत है" या उक्तीनुसार आणखी एकदा ती तृप्ती अनुभवावी म्हणुन दुसरा गरा उचलण्यासाठी त्याचा हात दुस-या कोणाचे तरी नियंत्रण असावे त्याप्रमाणे हात गरे ठेवलेल्या भांड्याकडे आपोआप वळतो..

रंगपंचमी ला मस्त धुडगूस घालुन झालेला आहे साबणाने चारचारवेळा आंघोळ करुन सुद्धा नव्या नवरीच्या गालावर फुलावी तशी रंगाची गुलाबी लालसर झाक दाढिधारी पुरुषांचा गालावरही पुढचे दोनतीन दिवस दिसत असते. स्वतःला आरशात पाहुन उगाचच आनन्द होत असतो. अशाच वेळी वसन्ताचा आगमनाची वर्दी एखादा कोकीळ मुक्त कन्ठाने देत असतो. आम्ब्याच्या झाडावरच्या मोहोराने आता रूप घेतलेले असते. गुलाबी तपकिरी नारिन्गी रंगाच्या पानाआडून काहितरी डोकावत असते.
कधितरी सन्ध्याकाळी आकाशात रंगांची उधलण केलेली असते.भन हरपून पहात रहावे अशी ती कलाकारी कधी रंग बदलते ते समजत ही नाही.
निळा केसरी जांभळा गुलाबी लाल पारवा रंग एकमेकात कसे घुसळून गेलेले असतत. कोणता रंग कोठे सुरु होतो आणि ती रंगछता सम्पून दुसरी नवी कुठे सुरु होते मध्येच ती गायब होउन नवीच रंग छटा येते. अकाशात यक्षानी नुकतीच रंगपंचमी खेळलेली असावी आणि त्याने उधललेल्या रंगांच्या सड्यानी आकाशाचे अंगण सजलेले आहे असेच मला नेहमी वाटत आले आहे.
त्या रंगापंचमीला दाद म्हणून वसन्त ऋतु स्वतः इथे धरतीवर नव्या पालवीच्या रुपाने रंगपंचमी खेळत असतो हिरवा पोपटी नाजूक तपकिरी केसरी रंगांचे ती कोवळी पाने तान्ह्या वाळाच्या बोटांचा असावा तसा त्यांचा तो बाल स्पर्श अनुभवून लोभावला नाही असा इसम विरळाच.
पाडगावकरांच्या " या जन्मावरी ,या जगण्यावरी शतदा प्रेम करावे " या कवितेचे प्रचिती वसन्त पदोपदी आणुन देत असतो.
वसन्त ऋतुची एक गम्मत असते.
तो स्वतः रंगुन येतो. आसपासच्या सगळ्या आसमन्ताला ही रंगवतो.
वर्षा आणि वसन्त ऋतुं दोघेही वेगळे. वर्षा माणसाला रसीक बनवतो. वसन्त माणसाला श्रीमन्त बनवतो.
कोणितरी पाडगावकराना त्यांच्या साठीला वयाबद्दल काहितरी विचरले...पाडगावकर त्वरीत उद्गारले "मी साठ वसन्त अनुभवले आहेत.
वसन्त ऋतुची ही एक गम्मत असते. तो तुम्हाला कहितरी वेगळाच बनवतो . वर्षा ऋतु तुम्हाला मोहोरवतो वसन्त ऋतु तुम्ही मोहोरुन आला आहात हे सर्वाना दवन्डी पिटत सांगत असतो.
निसर्ग ;पाने फळे फुले आकाश झाडे या सर्वांमधुन रंगांची मुक्त हाताने उधळण करत असतो.
निसर्गाच्या या अदाकारीला सलाम म्हणून की काय गुढीपाडव्याला घराघरातून रंगीबेरंगी गुढ्यांची तोरणे या ऋतुराजाच्या स्वागतासाठी उभी करतात. शूभ्र केसरी शालू त्यावर उन्हात झगमगीत चमकाणारा चांदीचा पेला झाकलेला . त्यातून डोकावणारा हिरवाकच्च कडुलिम्बाचा पाला .सुर्य चन्द्र लटकलेले असावेत तशी ती गाठ्यांची माळ गुढीवर लटकत असते. मागे आकाशाचा निळापांढरा पडदा ही म्हणजे वसन्ताच्या आगमनाची नान्दी असते.

वावरआस्वाद

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2009 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार

आहाहा एकदम वसंता सारखाच अल्हाददायक लेख हो !
लेख नाहितर एक अप्रतीम काव्य वाचतोय असेच वाटत होते.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

टारझन's picture

14 Mar 2009 - 10:38 pm | टारझन

एकदम कडक, टण्णक , खवाट ... :)

सुधीर मुतालीक's picture

17 Oct 2013 - 1:52 pm | सुधीर मुतालीक

एकदम कडक, टण्णक , खवाट ...

खवाट हा शब्द खास माझ्या माहेरचा आहे - निपाणीचा !! हा शब्द तु कुठून काढला, रे भाऊ ?

खवाट हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला..
साधारण कुठल्या काळात हा शब्द निपाणीत वापरला जायचा? कारण आत्ताची पोरं न्हाई वापरत ह्यो शब्द..

(निप्पाणीकर)

विजुभाऊ's picture

16 Mar 2009 - 9:27 pm | विजुभाऊ

क्रमशः लिहायचे राहिले या वेळेस

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

विजुभाऊ's picture

23 Mar 2009 - 7:21 pm | विजुभाऊ

अर्रर्र् क्रमशःल्ह्यायला विसरलोच.
त्या महान परम्परेचा भंग कशाला करायचा.
क्रमशः

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

आंबोळी's picture

14 Mar 2009 - 12:18 pm | आंबोळी

सुंदर....
दणक्यात आगमन झाले विजुभाऊ....अगदी वसंतासारखेच.....

आंबोळी

दशानन's picture

14 Mar 2009 - 12:19 pm | दशानन

हेच म्हणतो आहे !

पण येवढा मोठा गॅप नका घेत जाऊ विजू भाऊ !

अवलिया's picture

14 Mar 2009 - 12:28 pm | अवलिया

हेच म्हणतो...

--अवलिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

14 Mar 2009 - 1:02 pm | घाशीराम कोतवाल १.२

जोरदार पुनरागमन विजुभाउ आपले

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सर्वसाक्षी's picture

14 Mar 2009 - 12:49 pm | सर्वसाक्षी

छोटासा पण प्रसन्न लेख

शितल's picture

15 Mar 2009 - 1:11 am | शितल

सहमत. :)

प्रभाकर पेठकर's picture

14 Mar 2009 - 1:15 pm | प्रभाकर पेठकर

वसंताचे सुंदर वर्णन.
विजूभाऊ, तुमच्या लेखणीत दम आहे. वसंताच्या काव्यात्म वर्णनास अजूनही अप्रतिम डौल देण्यास तुमची लेखणी समर्थ आहे. वरील वर्णन नक्कीच सुंदर आहे. परंतु, जसे विचार डोक्यात आले, जशा कल्पना सुचत गेल्या तसे ते विचार आणि कल्पना शब्दात बांधण्याची किंचित अवखळ घाई झाल्यासारखी वाटते आहे.
बर्‍याच दिवसांनी तुमचे लेखन पाहून बरे वाटले. 'एप्रिल फळ' चे इतर लेखही वाचायचे आहेत. तेही लवकरच वाचून काढतो.
अभिनंदन.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

विनायक प्रभू's picture

14 Mar 2009 - 1:40 pm | विनायक प्रभू

सुंदर लेख

सहज's picture

17 Mar 2009 - 1:01 pm | सहज

हेच म्हणतो. चित्रदर्शी लिखाण.

शक्तिमान's picture

14 Mar 2009 - 1:30 pm | शक्तिमान

सगळे १० भाग वाचून काढले आज... आणि छळणे म्हणजे काय ते अनुभवले...
सर्व भाग अप्रतिम झाले आहेत...
माझे बालपण डोळ्यासमोर उभे राहीले..

विसोबा खेचर's picture

14 Mar 2009 - 1:44 pm | विसोबा खेचर

मन प्रसन्न करणारा लेख.. जोरदार पुनरागमनाबद्दल विजूभाऊंचे अभिनंदन.. :)

तात्या.

तात्या सध्य इथे जोहान्स्बर्ग मध्ये वसंत ऋतू आहे. झाडे फुले एकदम भरात आहेत. रंगांची उधळण चालू आहे.
लिहितो इथल्या एप्रिल फळांबाबत. हो दक्षीणाफ्रिका दक्षीण गोलार्धात असल्याने येथे भारता च्या उलट सीझन असतो.
जुन/जुलै मध्ये कडक हिवाळ तर डिसेंबर/जानेवारीत

विजुभाऊ's picture

17 Oct 2013 - 1:42 pm | विजुभाऊ

जुन/जुलै मध्ये कडक हिवाळ तर डिसेंबर/जानेवारीत उन्हाळा असतो.
इथला ख्रिसमस उन्हाळ्यात साजरा होतो

क्रान्ति's picture

14 Mar 2009 - 2:57 pm | क्रान्ति

सुन्दर आणि प्रसन्न वर्णन केलय वसंताच. खूप छान लेख आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Mar 2009 - 3:34 pm | बिपिन कार्यकर्ते

छान लेख. आणि निरीक्षणं बारकाईची आहेत.

बिपिन कार्यकर्ते

स्वाती राजेश's picture

14 Mar 2009 - 6:36 pm | स्वाती राजेश

विजुभाऊ, लेख मस्त झाला आहे. रंगीबेरंगी...मस्त वाटला.

बाकी फणसाची उपमा कोकणातील लोकांना उपयोगी पडते, असे माझी आजी म्हणायची...
बाहेरून काटेरी पण आतून मऊ (गोड)..

फणसाची आठवण करू नका हो, इथे मिळत नाही....:(

रामदास's picture

14 Mar 2009 - 8:11 pm | रामदास

विजूभाऊ ,मिडटर्म बोळा निघाला वाट्टे.
या वर्षीचे पहीली ओव्हर छान पडली .

लवंगी's picture

14 Mar 2009 - 9:24 pm | लवंगी

आत्ता एका बैठकीत तुमच्या एप्रील फळाचे १० भाग वाचून काढले. अशी मजा आली विचारू नका! मे महिन्याच्या सुट्टीत करवंद, जाम ( आम्ही याला जांबू म्हणतो), खाजरं ( खजूराचा छोटा भाऊ ), रांजणं ( पिवळ्या रंगाचे चिकट छोटेसे फळ असते ), सिताफळ, चीकू, बोरं, असंख्य जातीचे आंबे, ताडगोळे, शहाळि अशी नुसती मजा असायची. जुने दिवस आठवले.

स्वाती दिनेश's picture

14 Mar 2009 - 9:30 pm | स्वाती दिनेश

प्रसन्न करणारा छोटेखानी लेख आवडला,
पण विजुभाऊ," वसंत टू वसंत " लिहायचे ठरवले आहे की काय?
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Mar 2009 - 9:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>लेख आवडला,
>>पण विजुभाऊ," वसंत टू वसंत " लिहायचे ठरवले आहे की काय?

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Mar 2009 - 4:15 pm | डॉ.प्रसाद दाढे

पण विजुभाऊ," वसंत टू वसंत " लिहायचे ठरवले आहे की काय?

असेच म्हणतो! लेख नेहमीप्रमाणे सिद्धहस्त लेखणीतला..

हरकाम्या's picture

15 Mar 2009 - 2:06 am | हरकाम्या

एकदम झकास ....... लई ब्येस ...... असच छान छान लिवा राव.......

लिखाळ's picture

16 Mar 2009 - 9:59 pm | लिखाळ

वा.. छान प्रसन्न स्फुट ..
-- लिखाळ.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Mar 2009 - 12:58 pm | llपुण्याचे पेशवेll

पहील्या नवाप्रमाणेच १०वा ही 'एप्रिल फळाचा' सुंदर लेख.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मदनबाण's picture

25 Mar 2009 - 7:24 pm | मदनबाण

इजुभाऊ आपल्या आज्ञेप्रमाणे फोटु चा जुगाड केला आहे, फळ मानुन घ्या. :)

http://farm4.static.flickr.com/3455/3385147116_23f1c04c98_b.jpg

http://farm4.static.flickr.com/3617/3385148788_b80032ca83_b.jpg

http://farm4.static.flickr.com/3637/3385150894_8abe57195e_b.jpg

http://farm4.static.flickr.com/3639/3385153392_ef9f75c9f8_b.jpg

(फलाहार प्रेमी आणि कंदमुळाची चव कशी असेल??? या इचारत अडकलेला...)
मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

सुधीर मुतालीक's picture

17 Oct 2013 - 1:45 pm | सुधीर मुतालीक

मस्त, मार डाला, फिदा, फना, साक्षात कोकीळेचेच गायन !!
तुमची बासरीही अशीच गुंगवणारी असणार.