घरातल्या ताइ दादाने बाळाला उठवु नये म्हणुन सगळ्य मोठ्यांचा सखत पहारा बसतो......
सगळ्यांच्या बोलण्यातले ईतर विषय संपतात्.......फक्त कैरी आणि कैरी......घरात .....आळीत्..गावात एकच विषय्........कैरी....
कोणाच्या घरी जा..........रस्त्यात कोणाला भेटा. वनवासानन्तर रामाच्या च्या आगमना बद्दल अयोध्येत उत्सुकता असेल त्या उत्सुकतेशी तुलना होउ शकेल तशी उत्सुकता कैरी च्या येण्याची असते. वर्तमान पत्रात रकने च्या रकने भरुन येउ लागतात्....एखादी वळवाची सर आली की भिजलेले डोके पुसल्यानन्तरचा डोक्यात येणारा पहिला विचार असतो कैरी आणि आंब्यांचाच्..एरवी आंब्याच्या झाडाकडे मुलाना फिरकु न देणारे मोठे एकदम उदार होतात आणि पडलेल्या कैर्या धुंडाळण्याच्या मोहीमेवर छोट्याना पाठवतात.
छोटे सुद्धा नाचत नाचत या मोहीमेवर येतात्.....अगदी तोरणा सर केल्याच्या आवेशात आणलेला तुट्क्या फुट्क्या कैर्यांचा ढीगारा मिरवत आणतात्....या कैर्यांवर हक्क फक्त त्यांचा असतो....त्यांचे काय करायचे हे सर्वस्वी त्यानी ठरवायचे असते....
कधी नव्हे ते मिळालेले स्वातन्त्र्य भरपुर उपभोगुन घेतले जाते. फुट्क्या कैर्यांचे फुटीच्या प्रमाणानुसार वाटे केले जातात...
चांगल्या कमी फूटलेल्या कैर्या मोठ्या ताई कडे जातात्...ती कैर्या धुते. त्यांचे बारीक बारीक चौकोनी तुकडे करते....त्याना बर्यापैकी मोठ्या पातेल्यात किंवा तांब्यात घेउन त्यात मीठ साखर टाकली जाते....त्यावर मेतकूट आणि नक्षी पेरावी तशी कोथिम्बीर पेरली जाते....
पातेले ताटलीने झाकुन मग ते नवरात्रात घागर फुंकताना झेलावी तसे हलवले जाते......आतापर्यन्त मोठ्यांच्या ही तोंडाला पाणी सुटलेले असते.......
आई मग छान चिवडा करते.....फुटलेल्या छोट्या कैर्या थेट चिवड्यात रवाना होतात्....पातळ पोह्यांच्या चिवड्याबरोबर चाखत माखत
खाल्लेल्या करीची चव्..............आहाहा अगदी स्वर्गातला इन्द्राला दुर्लभ्...........एखाद्याना त्यावेळी विचारले की अम्रुताच्या बदल्यात हे कैरी वाले पोहे देतोस का? तर १०००% सांगतो तो " अजिबात नाही "असेच सांगेल.
थोड्या लहान कैर्यांचा ताबा आइ घेते..मिक्सर मधे वाटुन ती त्याची फर्मास चटणी बनवते.....ती उद्याच्या हळदीकुंकुवासाठी खास राखुन ठेवते..........फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते. पडलेल्या कैर्यांसोबत आंब्याच्या डहाळ्या आलेल्या असतातच...... आई घरातल्या छोट्याना मग आंब्याचे तोरण करायचे मोठ्या जबाबदारीची काम देते.....फडताळतुन सुतळ्या चे तुकडे निघतात....आंब्याची पाने स्वच्छ पुसली जातात्.. एकसारखी पाने घेउन त्यांचे देठ दुमडुन तो पानातुन आरपार केला जातो...मोठ्या ऐटीत आंब्याचे पान न पान तोरणात विराजमान होते....
संध्याकाळी घरातले सगळे जेवताना एकत्र येतात्.....दुपारी मीठ मेतकुट वापरुन केलीली कैर्यांची आंबोळी आता थोडी रस्सेदार झालेली असते.....पानापानात ती पंचपक्वनाच्या दिमाखात स्थानापन्न होते.....बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क
करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्यांचा गड सर झालेला असतो
प्रतिक्रिया
8 Apr 2008 - 10:16 am | प्रमोद देव
विजुभाऊ! तुमच्या कल्पनाशक्तीचा हेवा वाटतो.
बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क
करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्यांचा गड सर झालेला असतो
हे तर एकदम खासम खास!
9 Apr 2008 - 3:30 pm | भडकमकर मास्तर
मस्त लेख आहे...
... पन्हे पीत वाचताना तर अजूनच मजा आली....
14 Mar 2009 - 12:36 pm | शक्तिमान
एकदम जबरदस्त, खतरनाक, अल्टीमेट, लै म्हंजे लै म्हंजे लैच भारी!
8 Apr 2008 - 10:17 am | मदनबाण
विजुभाऊ मस्तच !!!!!
वनवासानन्तर रामाच्या च्या आगमना बद्दल अयोध्येत उत्सुकता असेल त्या उत्सुकतेशी तुलना होउ शकेल तशी उत्सुकता कैरी च्या येण्याची असते
व्वा क्या बात है ..... अप्रतिमच.....
कैर्यांचा गड सर झालेला असतो
खरचं
(बांबुला आकडा लावुन कैरी तोडणारा)
मदनबाण
8 Apr 2008 - 10:35 am | llपुण्याचे पेशवेll
खाल्लेल्या करीची चव्..............आहाहा अगदी स्वर्गातला इन्द्राला दुर्लभ्...........एखाद्याना त्यावेळी विचारले की अम्रुताच्या बदल्यात हे कैरी वाले पोहे देतोस का? तर १०००% सांगतो तो " अजिबात नाही "असेच सांगेल.
विजुभाऊ काय झक्कास वर्णन केले आहे.. माझ्या घराखालची हडसन नदी माझ्या तोंडाला सुटलेल्या पाण्याने भरून वाहू लागली आहे.
(कैरीवाली भेळ खाणारा)
डॅनी....
पुण्याचे पेशवे
8 Apr 2008 - 10:36 am | धमाल मुलगा
फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते.
नजरेपुढे आल॑!
क्या बात है! मस्त.
8 Apr 2008 - 10:40 am | चंबा मुतनाळ
छानच वर्णन आहे. तोंडाला पाणी सुटले!!
8 Apr 2008 - 10:57 am | स्वाती दिनेश
अरे काय लोकहो हे काय चालवले आहेत..तिकडे प्राजु लोणच्याच्या बरण्या भरते आहे ,इकडे तुम्ही कैरीची कवतिके सांगता आहात.. आम्ही पामरांनी करावं तरी काय? नुसते उसासे टाकण्याखेरीज..
हा भाग ही कैरीसारखाच आंबटगोड..मस्त!
स्वाती
8 Apr 2008 - 11:56 am | विसोबा खेचर
हा भाग ही कैरीसारखाच आंबटगोड..मस्त!
असेच म्हणतो!
विजूभाऊ, अजूनही येऊ द्या!
तात्या.
8 Apr 2008 - 11:04 am | डॉ.प्रसाद दाढे
विजुभाऊ, किती सुरेख लिहिताय..कौतूक करावे तेव्हढे थोडेच..जणू तुमच्या प्रतिभेला मोहोर फुटलाय..व्वा! च॑द्राला म्हणतिया उगवू नग॑स, शुक्राला म्हणतिया मावळू नग॑स..
8 Apr 2008 - 11:19 am | इनोबा म्हणे
बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क
करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्यांचा गड सर झालेला असतो
अहाहा विजूभाऊ....काय वर्णन केले आहे. अगदी कैरीच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटले हो!
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
8 Apr 2008 - 11:53 am | नंदन
झकास लिहिलंय.
फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते.
-- हे वाक्य आणि शेवटचे ट्टॉक खासच.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
8 Apr 2008 - 12:02 pm | बेसनलाडू
मस्त लिहिलंय.. आवडलं.
(वाचक)बेसनलाडू
8 Apr 2008 - 1:10 pm | प्रभाकर पेठकर
एखादी वळवाची सर आली की भिजलेले डोके पुसल्यानन्तरचा डोक्यात येणारा पहिला विचार असतो कैरी आणि आंब्यांचाच्..
वळवच्या सरी येतात तो पर्यंत आंब्याचा मौसम संपत आलेला असतो. पहिला पाऊस पडायच्या आधी (एप्रिल्-मे) आंब्याचा मौसम आणि त्या आधी (मार्च - एप्रिल) कैर्यांचा मौसम.
बाकी लेखाचे दोन्ही भाग छान आहेत.
8 Apr 2008 - 4:49 pm | विजुभाऊ
असहमत्...........आमच्याकडे पहीला पाउस ७ जून ला येतो...तो पर्यन्त वळीवच चालु असतो.....
गारा एप्रिल च्या अखेर पडतात्........जोरदार वारे वगैरे सगळे एप्रिल मधे रामनवमी / अक्षय त्रुतिये नन्तर...
8 Apr 2008 - 11:33 pm | प्रभाकर पेठकर
पेठकर काका असहमत्..आमच्याकडे ( सातार्यात)पहीला पाउस ७ जुन ला येतो......हमखास
मलाही तेच म्हणायचे आहे. ७ जून पर्यंत कैर्या आणि आंब्यांचा मौसम संपलेला असतो. त्यामुळे वळीवाच्या पावसाने भिजलेले डोके पुसताना पहिला विचार कैर्यांचा येणे अस्वाभाविक वाटते. कैर्यांचा आणि आंब्यांचा विचार मार्च - एप्रिल - मे मध्ये जोरदार असतो. जून ७ तारखेला येणारा विचार पहिला कसा असेल? तो पर्यंत माणूस कैर्यांचे लोणचे टाकून तसेच भरपेट आमरस खाऊन तृप्त असतो. वळीव आला की आंब्यांचा विचार मागे पडून शाकारणी बरोबर झाली आहे की नाही ह्या चिंतेच शेतकरी असतो. शहरात पाऊस आला की आंब्यांना लोकं हात लावत नाही. आंबे पचायला जड असतात. तसेच, पावसाळ्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असते. त्यामुळे पहिला पाऊस आला की आंब्यांचा कोणी विचार करीत नाही.
9 Apr 2008 - 7:11 pm | विजुभाऊ
मी पावसात भिजल्यानन्तर येणारा पहीला विचार म्हणालो
8 Apr 2008 - 6:34 pm | मदनबाण
अरे त्या कैरी वर एखादा कैर्यांचा क्लोज अप टाक की.
विजुभाऊ तुमची ईच्छा होती ना मग हे घ्या.
हा याच्या पेक्षा जास्त झूम नाही करु शकत फक्त ५x झूम आहे कॅमेरामधे.
(गार पन्ह आवडीने पिणारा)
मदनबाण
8 Apr 2008 - 6:40 pm | मदनबाण
मोजा पाहु किती कैर्या आहेत ते ? पटापट.....
(गणितात एकदम ढ असलेला)
मदनबाण
8 Apr 2008 - 8:55 pm | चतुरंग
चतुरंग
9 Apr 2008 - 3:33 pm | स्वाती राजेश
मी ३४ मोजल्या..
उरलेली एक? कोणीतरी पळवली वाटते?
14 Mar 2009 - 12:35 pm | शक्तिमान
=)) =))
धिस इज अवांतर नंबर वन!
मोजा म्हटले की लागले मोजायला!
=)) =)) =)) =)) =))
8 Apr 2008 - 6:44 pm | मनस्वी
दोन्ही भाग आवडले.
(तक्कूप्रेमी) मनस्वी
8 Apr 2008 - 9:23 pm | विजुभाऊ
एका मित्रा साठी त्याला हे दोन्ही भाग एकत्र पहायचे आहेत
8 Apr 2008 - 9:51 pm | प्राजु
वर्णन सुंदर... अगदी कैरी सारखे चमचमीत आणि आंब्यासारखे रसाळ...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Apr 2008 - 10:07 pm | चतुरंग
सुध्दा मोहोर आलेला दिसतोय,विजुभाऊ! कैर्यांचा गड झकासच सर केलात!
ट्टॉऽऽक!;०
चतुरंग
8 Apr 2008 - 11:37 pm | छोटा डॉन
हेच म्हणतो ...
"बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क
करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्यांचा गड सर झालेला असतो"
सर्वोत्तम ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
14 Apr 2008 - 10:21 pm | विजुभाऊ
.
15 Apr 2008 - 7:03 pm | विसोबा खेचर
या प्रतिसादाचा अर्थ कळला नाही..
तात्या.
15 Apr 2008 - 7:09 pm | विजुभाऊ
तो मी लिहिला आणि नन्तर सम्पादीत करताना काढुन टाकला.
17 Oct 2013 - 5:48 pm | बॅटमॅन
टॉक्क!!!!!
सगळा लेख भारी पण कैरीगडच्या स्वारीचे वर्णन फार जास्त आवडले. टॉक्क!!!