एप्रिल फळ (३)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
9 Apr 2008 - 2:45 pm

दुपारी मीठ मेतकुट वापरुन केलीली कैर्‍यांची आंबोळी आता थोडी रस्सेदार झालेली असते.....पानापानात ती पंचपक्वनाच्या दिमाखात स्थानापन्न होते.....बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क
करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो.
कैरी चे लाड इथेच संपत नाहीत. गवताच्या मौ दुलई वर पहुडलेल्या कैर्‍या आता दिसामासाने रंगरूप पालटु लागलेल्या असतात्.सम्राटाने जसे सिंहासन रिकामे करुन युवराजाला गादीवर बसवावे तसे हिरवा सिंहासनावरुन उतरुन लाल रंग त्याची जागा घेउ लागतो हळद आणि गुलाल आकाशात एकदम उडवले आहेत असा भास होत असतो. कर्‍यांच्या गालावर लाली येत असते.आता त्यांच्यावरचा पहारा ही कडक होतो. कैरी बाळाना वाईट मुलांची संगत लागु नये म्हणुन त्यांची रोज उलट सुलट तपासणी होत रहाते. वाईट मुलाना बाजुला केले जाते. हळू हळू अंगावर हळदी केसरी रंगाचा साज चढतो . कैर्‍या आता मोठ्या झालेल्या असतात. अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग अजुन ..तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग .हे गाणे त्या गाउ लागतात. मोठ्याना ही कुणकुण असतेच.त्यातल्याच एका धमकपिवळ्या सुवर्णवर्खी कैरीला अलगद उचलले जाते. आळीतल्या रामाच्या पायाशी नैवेद्य ठेवला जातो. घरातले सगळे या क्षणाची केंव्हाची वाट बघत असतात्.कैरीचे हे कौतुक पाहुन झाड्सुद्धा आनन्दाने डोलत असते.
आंब्याचे दिवस आले तरी कैर्‍यांचा थाट ओसरलेला नसतो .पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर , रत्ना , रायवळ असा मोठ्यांच्या दुनियेत असतो तसा पंक्तीप्रपंच / जातीभेद असतो तसा कैर्‍यांच्या दुनियेत नसतो. तिथे सगळे भीडु आपलेच असा मामला असतो.
कैर्‍यांचे बालपण षोडशत्व आता सम्पुन त्या प्रौढ परिपक्व झालेल्या असतात. हा परिपक्वता पणा त्यांच्या रसाळ गोडवा होउन येतो.
प्रत्येकाचा थाट आगळाच असतो. हापुस तसा ईतरांशी थोडा फटकुन वागणारा. बरोबर आहे राजाचा पोर तो उगाच कशाला एखाद्या फाटक्यापाशी बसेल. मंडई मधे सुद्धा हापुस विकणारे चेहेर्‍यावर वेगळेच राजेशाही भाव आणुन बसलेले असतात. हापुस आंबा दाखवताना एखाद्या हीर्‍याच्या थाटात दाखवला जातो. घेणारे गिर्‍हाईक ही तेवढ्यात टेचात हापुस ची करंडी मिरवत घेउन जाते.
पायरी हा तसा राजकारणी लहान थोरात सारख्याच सलगीने वागणारा. याला हापुस चा दर्जा मिळत नाही आणि रायवळ च्या पंक्तीला बसावे की नाही हा प्रश्न याच्या डोक्यात सतत असतो.त्यामुळेच की काय "आपल्यापायरी ने वागावे" असे कोणि म्हणताना पाहीला की मला जिन्याच्या पायरीपेक्षा पायरी आंब्याची च पटकन आठवण होते. म्हण्टले तर फोडी करा म्हंटले तर घोळुन खा असा दोन्ही डगरीवर पाय ठेवणारा तो पायरी.
हापुस आंबा हा फक्त तबकातुन छान फोडी करुन नजराणा पेष केल्यासरखा पेष करायचा असतो.तो त्याचा मान आहे. हापुस आंबा घोळुन द्या असे कोणी म्हंटले की त्याचा अपमान होतो. आणि म्हणणार्‍याची जागा दिसुन येते.घोळुन आलेला हापुस आंबा हा मला नेहमीच नळदमयन्ती आख्यानातल्याघोड्याच्या तबेल्यात काम करणार्‍या मनातल्या मनात चरफडणार्‍या नळ राजा सारखा वाटतो.
सम्राटाला आणखी कीती लाजवायचे?
देवाच्या प्रसाद होण्याचा मान एक तर हापुस ला मिळतो किंवा त्या तोतया तोतापुरी ला.
पण हापुसच्या प्रसादावर जी झड पडते ती तोतापुरी वर पडत नाही . तो केवळ नगा ला नग वाटतो. हापुस चा प्रसाद हा आपला वाटतो.तोतापुरी कोणीतरी परका वाटतो.
हापुस चा रुबाब तोतापुरी मधे नाही. केवळ कापता येतो म्हनुन त्याला तो मान मिळतो. हे म्हणजे केवल सम्राटासरख्या मिशाआहेत म्हणुन एखाद्याला नाटकात सम्राटाची भूमिका देतात तसे.
एप्रिल शेवटच्या तप्प्यात असतो. "उन "मी वरुन आता "आम्ही" म्हणत असते. घरातले छोटे आता बैठे खेळ खेळुन खेळुन सूट्टी ला पण कंटाळलेले असतात.
अचानक घराबाहेर रिक्षा वाजते. घरातले छोटे उत्सुकतने बाहेर पळतात. आत्या रिक्षातुन उतरते. तिच्या सोबत एक मोठ्ठी पिशवी असते. दोघे जण मिळुन एक एक बंद धरत ती पिशवी आत नेतात.
"आत्या तू कशी आहेस विचारायच्या आतच पिशवी स्वैपाक घरात रिकामी होते. पिशवीतुन घरंगळत गोल गोलरायवळ आंब्यांची फौजच बाहेर पडते. अंगात एकच उत्साह संचारतो. आतापर्यन्त एक दोन फोडींवर समाधान करावे लागत होते म्हणुन नाराज असणार्‍या छोट्यांच्या हातात खाण्यासाठी आख्खा आंबा आलेला असतो.......
(क्रमशः)

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

9 Apr 2008 - 3:11 pm | धमाल मुलगा

विजुभाऊ, एकदम नंबर वन !

सम्राटाने जसे सिंहासन रिकामे करुन युवराजाला गादीवर बसवावे तसे हिरवा सिंहासनावरुन उतरुन लाल रंग त्याची जागा घेउ लागतो हळद आणि गुलाल आकाशात एकदम उडवले आहेत असा भास होत असतो. कर्‍यांच्या गालावर लाली येत असते.

सह्ही !

पायरी हा तसा राजकारणी लहान थोरात सारख्याच सलगीने वागणारा. याला हापुस चा दर्जा मिळत नाही आणि रायवळ च्या पंक्तीला बसावे की नाही हा प्रश्न याच्या डोक्यात सतत असतो.त्यामुळेच की काय "आपल्यापायरी ने वागावे" असे कोणि म्हणताना पाहीला की मला जिन्याच्या पायरीपेक्षा पायरी आंब्याची च पटकन आठवण होते. म्हण्टले तर फोडी करा म्हंटले तर घोळुन खा असा दोन्ही डगरीवर पाय ठेवणारा तो पायरी.

:-)) मस्तच. पण मला का कोण जाणे, हा राजकारणी पायरीच जास्त आवडतो.

मजा आली वाचायला. एकदम हलकंफुलकं !!

मदनबाण's picture

9 Apr 2008 - 3:11 pm | मदनबाण

आंब्याचे दिवस आले तरी कैर्‍यांचा थाट ओसरलेला नसतो .पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर , रत्ना , रायवळ असा मोठ्यांच्या दुनियेत असतो तसा पंक्तीप्रपंच / जातीभेद असतो तसा कैर्‍यांच्या दुनियेत नसतो.
परफेक्ट.....

सम्राटाने जसे सिंहासन रिकामे करुन युवराजाला गादीवर बसवावे तसे हिरवा सिंहासनावरुन उतरुन लाल रंग त्याची जागा घेउ लागतो हळद आणि गुलाल आकाशात एकदम उडवले आहेत असा भास होत असतो.
वा क्या बात है !!!!!

(तोतापुरी आंब्यामधील भुंग्याला घाबरणारा)
मदनबाण

स्वाती राजेश's picture

9 Apr 2008 - 3:14 pm | स्वाती राजेश

कैर्‍यांचे बालपण षोडशत्व आता सम्पुन त्या प्रौढ परिपक्व झालेल्या असतात. हा परिपक्वता पणा त्यांच्या रसाळ गोडवा होउन येतो.
मस्त वर्णन....:))
प्रत्येकाचा थाट आगळाच असतो. हापुस तसा ईतरांशी थोडा फटकुन वागणारा. बरोबर आहे राजाचा पोर तो उगाच कशाला एखाद्या फाटक्यापाशी बसेल. मंडई मधे सुद्धा हापुस विकणारे चेहेर्‍यावर वेगळेच राजेशाही भाव आणुन बसलेले असतात. हापुस आंबा दाखवताना एखाद्या हीर्‍याच्या थाटात दाखवला जातो. घेणारे गिर्‍हाईक ही तेवढ्यात टेचात हापुस ची करंडी मिरवत घेउन जाते.
खरे आहे...
या लेखांमुळे या महीना आंबामय होऊन गेला.:)) मस्त अनुभव, मस्त छायाचित्रे, त्याच बरोबर सुंदर प्रतिक्रीया...
एप्रिल फळ याचे तीनही भाग उत्तम लिहीले आहेत...
पुढील भागाला शुभेच्छा!!!!

विजुभाऊ's picture

9 Apr 2008 - 7:18 pm | विजुभाऊ

स्वाती धन्यवाद्...तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाने मला प्रोत्साहन दिले

स्वाती दिनेश's picture

9 Apr 2008 - 7:46 pm | स्वाती दिनेश

पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर , रत्ना , रायवळ असा मोठ्यांच्या दुनियेत असतो तसा पंक्तीप्रपंच / जातीभेद असतो तसा कैर्‍यांच्या दुनियेत नसतो.
अगदी खरं..पण तरीही हापूस तो हापूसच!उगाच नाही तो फळांचा सम्राट!
हे जर्मन वेडे, सफरचंदाला फळांचा राजा म्हणतात ते ऐकून तर मला त्यांची कीव कराविशी वाटते.
'हाय कंबख्त तूने पी ही नही ..' च्या चालीवर मला ' हाय..तू ने तो हापूस चखाही नही ..' असे ह्या गोर्‍या मंडळीना म्हणावेसे वाटते आणि तसे अनेकदा म्हणून भारतातून आंबे आणून ह्या 'आर्यांना' खायलाही घातले .तेव्हा त्यांना फळांचा सम्राट कोण? ते पटले..
(राजाबिजा नाही ..सम्राटच!)
स्वाती

डॉ.प्रसाद दाढे's picture

9 Apr 2008 - 7:48 pm | डॉ.प्रसाद दाढे

मस्त झकास सु॑दर

प्रभाकर पेठकर's picture

9 Apr 2008 - 8:53 pm | प्रभाकर पेठकर

आंब्यांची अढी ,खाली गोणपाट, त्यावर पेंढा, त्यावर कैर्‍या, मधे मधे कादे, वर पुन्हा पेंढा, आणि त्यावर पुन्हा दुसते गोणपाट अशी आम्ही लावायचो. कांद्यानेही अढीतली उष्णता वाढते आणि आंबे लवकर पिकतात.
त्या काळी कैर्‍यांच्या करंड्या मिळायच्या. एका करंडीत ५ डझन कैर्‍या असायच्या.

चतुरंग's picture

9 Apr 2008 - 9:29 pm | चतुरंग

अत्यंत सुंदर, मनोहारी वर्णन!
वेगवेगळ्या आंब्यांच्या जातकुळीतले बारकावे चपखल उपमांसह अगदी रसाळ बोलीत टिपलेत!
अगदी आमरसाची वाटीच (की पातेले?;०) तोंडाला लावल्यासारखे वाटले!
येऊदेत अजून;))

चतुरंग

विसोबा खेचर's picture

10 Apr 2008 - 11:02 am | विसोबा खेचर

येऊदेत अजून;))

हेच म्हणतो..!

छोटा डॉन's picture

9 Apr 2008 - 10:18 pm | छोटा डॉन

च्यायला माणूस कैरीसारख्या विषयावर एवढे कसे लिहू शकतो हा प्रश्न मला पडला आहे.
"हॅट्स ऑफ" विजूभाउ. आत्ता तुम्ही हे जर आमच्यासमोर "प्रेझेंटेशन म्हणून सादर केले असते तर आम्ही "स्टँडिंग अवेशन" दिले असते ...

ह्या भागात कैरीला प्रौढत्व येऊन तिचा आंब्यात होणारा बदल अतिशय अलंकारीक शब्दात मांडल्याबद्दल अभिनंदन
"कैर्‍यांचे बालपण षोडशत्व आता सम्पुन त्या प्रौढ परिपक्व झालेल्या असतात. हा परिपक्वता पणा त्यांच्या रसाळ गोडवा होउन येतो.
प्रत्येकाचा थाट आगळाच असतो. हापुस तसा ईतरांशी थोडा फटकुन वागणारा. बरोबर आहे राजाचा पोर तो उगाच कशाला एखाद्या फाटक्यापाशी बसेल. मंडई मधे सुद्धा हापुस विकणारे चेहेर्‍यावर वेगळेच राजेशाही भाव आणुन बसलेले असतात. हापुस आंबा दाखवताना एखाद्या हीर्‍याच्या थाटात दाखवला जातो. घेणारे गिर्‍हाईक ही तेवढ्यात टेचात हापुस ची करंडी मिरवत घेउन जाते."

जबरा ...

"अचानक घराबाहेर रिक्षा वाजते. घरातले छोटे उत्सुकतने बाहेर पळतात. आत्या रिक्षातुन उतरते. तिच्या सोबत एक मोठ्ठी पिशवी असते. दोघे जण मिळुन एक एक बंद धरत ती पिशवी आत नेतात.
"आत्या तू कशी आहेस विचारायच्या आतच पिशवी स्वैपाक घरात रिकामी होते."

किती समर्पक वर्णन . मस्त आहे, आवडले ...

ओरिजनल हापूसची स्मगलिंग करणारा छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा's picture

10 Apr 2008 - 10:24 am | धमाल मुलगा

च्यायला माणूस कैरीसारख्या विषयावर एवढे कसे लिहू शकतो हा प्रश्न मला पडला आहे.
"हॅट्स ऑफ" विजूभाउ.

तिकडे प्राजुताईनं एक लोणचं घेतलं आणि त्याच्यावर पानभर चटपटीत स्फुट लिहिलं, तर आम्ही आवक् होऊन पडलो...
आणि इथे आमचे विजुभाऊ तर कैरीला पकडून कैरी-आख्यान गातात! क्या बात है! ३-३ लेख...फक्त कैरीवर? आयला, काय डोकं म्हणायचं का कल्पनांचं भांडार?

जियो विजुभाऊ!!!
औरभी लिख्खो! तमारा स्टाईल बद्दा सारु छे! (असंच म्हणतात नै?)

-(आश्चर्य चकचकित) ध मा ल.

मदनबाण's picture

10 Apr 2008 - 10:32 am | मदनबाण

औरभी लिख्खो! तमारा स्टाईल सरस छे !!!!!

(खाकरा प्रमी)
मदनबाण

बेसनलाडू's picture

10 Apr 2008 - 11:45 am | बेसनलाडू

काय आंबटगोड लिहिलंय!!!
(गोड)बेसनलाडू

इनोबा म्हणे's picture

10 Apr 2008 - 11:48 am | इनोबा म्हणे

कैरी बाळाना वाईट मुलांची संगत लागु नये म्हणुन त्यांची रोज उलट सुलट तपासणी होत रहाते. वाईट मुलाना बाजुला केले जाते. हळू हळू अंगावर हळदी केसरी रंगाचा साज चढतो . कैर्‍या आता मोठ्या झालेल्या असतात.
क्या बात है...

अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग अजुन ..तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग .
'कैरी संगीत महोत्सव' भरवायला पायजे आता...

पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर , रत्ना , रायवळ असा मोठ्यांच्या दुनियेत असतो तसा पंक्तीप्रपंच / जातीभेद असतो तसा कैर्‍यांच्या दुनियेत नसतो. तिथे सगळे भीडु आपलेच असा मामला असतो.
सही बोला भिडु...

च्यायला माणूस कैरीसारख्या विषयावर एवढे कसे लिहू शकतो हा प्रश्न मला पडला आहे.
मी पण हेच म्हणतो. कैर्‍या-आंबे खाताना कधी एवढा विचार केला नव्हता राव... आपण फक्त खायचं काम केलं.

औरभी लिख्खो! तमारा स्टाईल सरस छे !!!!!
'मोटा भाई'ची ईश्टायल आपल्याला पण आवडली बॉ...

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

विजुभाऊ's picture

14 Apr 2008 - 10:21 pm | विजुभाऊ

.

विसोबा खेचर's picture

15 Apr 2008 - 7:03 pm | विसोबा खेचर

या प्रतिसादाचा अर्थ कळला नाही..

तात्या.

विजुभाऊ's picture

15 Apr 2008 - 7:10 pm | विजुभाऊ

सम्पादन करुन तेथिल भाग वगळला आहे