१५ मिनिट टीकणारी स्मृती घेउन प्रेक्षक चित्रपट बघायला येतात ह्या समजातुन आमिर खानचा नविन गझनी हा चित्रपट बनवला आहे. समोरच्या प्रसंगात काय चालले आहे ह्याची १५ मिनिटापुर्वीच्या चित्रपटाशी सांगड घालायचा प्रयत्न केलात तर तुम्ही फसलात. कशाचा कशालाही आगापीछा नाही. पोलिस अधिकारी बसपेक्षा जोरात काय धावतो, घरी गेल्यावर नायकाला बदड बदड बदडुन बांधुन घातल्यावर त्याची डायरी काय वाचत बसतो, आणि पुढची पाने सापडली नाहीत म्हणून एकदम 'आता मला पुढे काय झाले त्याची गोष्ट सांग' असा हट्ट काय धरतो, सगळाच आनंदी आनंद.
भरपुर बजेट घेउन मी आता वाट्टेल ते बनवणार, कथा कशीही वळणे घेणार कॅमेरे कुठेही लावणार पटकथेत काहीही घुसडणार असे मनाशी ठरवुन दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवला आहे. अर्धा अधिक चित्रपट संपेपर्यंत तुम्ही चिकाटी धरलीत तर चित्रपटातल्या नायका प्रमाणे कुणीतरी आपल्याही डोक्यात एक रॉड घालुन कायमचे मतीमंद बनवावे असे वाटायला लागते. बरं बौद्धीक दिवाळखोरीची हद्द म्हणजे हे सगळे एका दुसर्याच चित्रपटावरुन उचलेले आहे, आणि हा चित्रपट एकदा दक्षीणेत जसाच्या तसा बनवुन झालेला आहे. चित्रपटाची कथा वगैरे जाणुन घ्यायच्याही फंदात पडू नका. आमीर खानच्या गोंदवण्याची देखिल फुकटची हवा केलेली आहे. हे गोंदवणे मूळ इंग्रजी चित्रपटात आहे म्हणून दिग्दर्शकाने इथेही आणले पण १५ मिनिटांनी तो स्वतःच विसरुन गेला असावा असे का केले ते. कारण चित्रपटाच्या सुरुवातीला शर्ट काढुन बॉडी दाखवण्यासाठी हे 'गोंदवलेकर महाराज' उभे राहतात खरे पण पुढे त्या गोंदवण्याचा कथा विस्तारात फारसा काहीही संबध नाही. असा इथे कशाचाच कशाशी संबध नाही तर गोंदवण्याची फिकिर तरी कशाला म्हणा.
चित्रपटाच्या शेवटी शेवटी तर दिग्दर्शक आता काय काय करामत्या करु शकेल ह्याचे आडाखे बांधण्यातच आम्ही वेळ घालवला. उदा. देमार हाणामारी, दिसेल त्याला उचलुन आपटून शेवटी एकदाचा हा गझनी त्या सिंघानियाच्या तावडीत सापडाल्यावर तो त्याला मारुन न टाकता, त्याच्या डोक्यात देखिल नेमक्या अचुकतेने रॉड घालुन त्याची देखिल स्मृती भ्रष्ट करेल आणि वर 'तुम्हे मारकर छुटकारा दिलानेसे अच्छा तो मै तुम्हारा '१५ मिनिट मेमरी' वाला गेम बजाके तुम्हारी जिंदा लाश देखना चाहता हू!' असला काहीतरी डायलॉग मारुन उर्वरीत आयुष्य दोघेही अंगभर गोंदवुन गोंदवल्याला जाउन राहतील असले काहीतरी भन्नाट आडाखे मी बांधत होतो. पण चौफेर उधळालेली दिग्दर्शकाची कल्पना शक्ती आमच्या ह्या कल्पकतेसमोर थिटी पडली. आणि शेवट गझनीला ठार मारुनच झाला. (चित्रपटाच्या शेवटी गझनी सिंघांनियाला मिळेल का? वगैरे उत्कंठा ताणुन घेणार्यांसाठी 'स्पॉइलर अलर्ट' बरंका)
बॉलीवुड मध्ये चित्रपट निवडण्यात सगळ्यात चूझी म्हणून ओळखल्या जाणार्या आमिर खानने हा चित्रपट का निवडला असावा हे न उलगडेले कोडे आहे. त्याच्या डोक्यात खरोखरच रॉड घालुन हा चित्रपट त्याला दाखवला असावा का? अशी एक शंका मनात येते. त्याचा ह्यातील अभिनय बघता त्याला कथा नायकाला स्मृतीभ्रंश नसुन बुद्धीभ्रंश झाला आहे असा त्याचा गैरसमज झालेला वाटतो. बॉडी बिल्डींगचे वगैरे मोप कौतुक झाले असले तरी मला त्यात काही तितके विशेष वाटले नाही. मुळात उंचीत मार खाल्ल्यामुळे नुसतेच ८ पॅक बनवले म्हणून तो अवाढव्य राक्षसी वगैरे अजिबात वाटत नाही. मागे कमल हासनचा 'अभय' नावाचा एक टूकार चित्रपट आला होता त्यात त्याने बनवलेली बॉडी ह्याहुन कितीतरी सरस होती. असो तसेही 'राजा हिंदुस्तानी', 'मेला' वगैरे महान चित्रपट बघीतल्यावर आमिर खानच्या बाबतीत 'नावाजलेला गुरवा देवळात जाउन ***' ह्या म्हणीचा प्रत्यय आलाच होता आता आणखी एक दाखला मिळाला इतकेच.
प्रतिक्रिया
31 Dec 2008 - 12:06 pm | सहज
ढकलपत्रातुन आलेले आहे पण खालेच चित्र दाखवायचा मोह आवरत नाही.
बायकोला चुकून देखील गझनी दाखवु नका नाही तर
31 Dec 2008 - 12:12 pm | नीलकांत
चित्रपट जाऊ द्या पण कोलबेर राव आम्हाला ही समिक्षा खुप आवडली.
नीलकांत
31 Dec 2008 - 2:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नीलकांतशी सहमत
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
31 Dec 2008 - 2:45 pm | नंदन
सहमत आहे, परीक्षण आवडले. सहजरावांनी डकवलेले चित्रही बेष्ट.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
31 Dec 2008 - 3:24 pm | घाटावरचे भट
वरील सर्वांशी सहमत.
31 Dec 2008 - 3:29 pm | अवलिया
वरिल सर्वांशी आणि नंतर सहमत होणा-यांशी पण सहमत
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
3 Jan 2009 - 12:28 am | चित्रा
असेच. आता पाहण्याच्या फंदात पडणार नाही.
31 Dec 2008 - 12:29 pm | कवटी
कोलबेरराव लैच भारी लिवलय तुम्ही....
लै आवडल.....
जिओ....
कवटी
31 Dec 2008 - 4:48 pm | आजानुकर्ण
जबरा लिहिलंय कोलबेरराव... मस्तच हाणलं आहे.
आपला
(८ प्याक) गझनी आजानुकर्ण
31 Dec 2008 - 12:41 pm | परिकथेतील राजकुमार
चित्रपटाच्या सुरुवातीला शर्ट काढुन बॉडी दाखवण्यासाठी हे 'गोंदवलेकर महाराज' उभे राहतात खरे
=)) =))
मागे कमल हासनचा 'अभय' नावाचा एक टूकार चित्रपट आला होता त्यात त्याने बनवलेली बॉडी ह्याहुन कितीतरी सरस होती.
+१ सहमत !
मेमेंटो बघितला असल्यामुळे तसाही हा चित्रपट बघण्याची इच्छा नाहिये.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
31 Dec 2008 - 3:29 pm | विनायक प्रभू
मला १२ तासाचा अम्निशिया असतो. काय करावे बरे?
31 Dec 2008 - 5:33 pm | नि३
कोलबेर साहेब तुम्हाला रब ने बना दि जोडी खुपच आवड्ला असेन नाही का??
जिथे बायको स्वताचा नवरा ओळ्खु शकत नाही का तर म्हणे चष्मा नाही घातला आणी मिशी उडविली ...वा..धन्य आहे ति बाई...बाकी सगळा चित्रपट पण आनंदी आनंद आहे... आणी हा शाहरुख्(कि भुख ) म्हणे सुपर स्टार वा ..रे भारतीय प्रेक्षक..
आणी कोलबेर साहेब हा तोच आमीर खान आहे ज्याने तारे जमीन पर सारखा चित्रपट बनवीला होता,नंतर लगान ,सरफरोश्,गुलाम्,दिल चाहता हे..नसेल बघीतले असेल हे चित्रपट तर एकदा बघाच ते.........
असो तसेही 'राजा हिंदुस्तानी', 'मेला' वगैरे महान चित्रपट बघीतल्यावर
अहो साहेब ...जरा स्वप्नातुन बाहेर या हो..गजीनी हा आमीर चा ३७ वा चित्रपट होता ....त्यात जर १-२ चित्रपट नसेल हि चांगले ..
वाईट लवकर दीसत साहेब....
असो तुम्हाला सांगुन काही फायदा नाही...
गेट वेल सुन
---(ख्रर्या कलाकाराची कदर करणारा आणी जो नाही करत त्यांना फाट्यावर मारणार ) नि ३.
31 Dec 2008 - 6:03 pm | आनंदयात्री
मराठी आंतरजालावर भारी माणुस म्हणुन वावरायला तुम्हाला इराणी, रशियन, फ्रेंच अन झालेच तर गेलाबाजार भुतानी आवडले पाहिजेत. हिंदी चित्रपट आवडला तर तुम्ही तद्दन सी ग्रेड आवडणारे मासेस मधले आहात हे नक्की !!
-
(तद्दन गल्लाभरु, भुक्कड, सी ग्रेडचे चित्रपट पहाणारा अन अत्यंत चिप चॉईस असणारा)
आंद्या
2 Jan 2009 - 1:09 pm | विजुभाऊ
मासेस आणि क्लासेस चे हे गणीत आहे. मासेस ला चित्रपट आवडला की क्लासेस त्याला वगळतात.
पण हल्ली दहावी बारावी साठी मासेसना क्लासेस ला जान्याशिवाय गत्यन्तर नसते
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
31 Dec 2008 - 7:31 pm | आजानुकर्ण
कोलबेर यांनी त्यांना स्वतःला हा चित्रपट कसा वाटला आहे हे लिहिले आहे. यात चिडण्यासारखे काय आहे कळले नाही.
कोलबेर साहेब तुम्हाला रब ने बना दि जोडी खुपच आवड्ला असेन नाही का??
जिथे बायको स्वताचा नवरा ओळ्खु शकत नाही का तर म्हणे चष्मा नाही घातला आणी मिशी उडविली ...वा..धन्य आहे ति बाई...बाकी सगळा चित्रपट पण आनंदी आनंद आहे... आणी हा शाहरुख्(कि भुख ) म्हणे सुपर स्टार वा ..रे भारतीय प्रेक्षक..
ह्या कमेंटचा वरील लेखाशी काय संबंध आहे कळले नाही.
आणी कोलबेर साहेब हा तोच आमीर खान आहे ज्याने तारे जमीन पर सारखा चित्रपट बनवीला होता,नंतर लगान ,सरफरोश्,गुलाम्,दिल चाहता हे..नसेल बघीतले असेल हे चित्रपट तर एकदा बघाच ते.........
हे कोलबेर यांनी मान्य केलेच आहे. आमीर हा सर्वात चूझी मानला जातो वगैरे म्हणून. नाही का?
असो तसेही 'राजा हिंदुस्तानी', 'मेला' वगैरे महान चित्रपट बघीतल्यावर
अहो साहेब ...जरा स्वप्नातुन बाहेर या हो..गजीनी हा आमीर चा ३७ वा चित्रपट होता ....त्यात जर १-२ चित्रपट नसेल हि चांगले ..
वाईट लवकर दीसत साहेब....
आमीरने केलेले लव, लव लव, अव्वल नंबर, तुम मेरे हो, अफसाना प्यार का, जवानी झिंदाबाद, इसी का नाम जिंदगी, दौलत की जंग, परंपरा, दिल हैके मानता ही नही, आतंक ही आतंक, अकेले हम अकेले तुम, गुलाम, मन, मंगल पांडे, फना, राजा हिंदुस्तानी, मेला हे तद्दन बंडल होते. ही १-२ चित्रपटांची यादी नसून (मोजा आता) बरीच मोठी आहे.(यादी विकिपीडियाच्या सौजन्याने)
असो तुम्हाला सांगुन काही फायदा नाही...
तरी सांगितलेच की :)
गेट वेल सुन
कोलबेरपंत थ्यांक्यू म्हणतील.
---(ख्रर्या कलाकाराची कदर करणारा आणी जो नाही करत त्यांना फाट्यावर मारणार ) नि ३.
(स्पष्टवक्तेपणाची कदर करणारा आणि जे करत नाही त्यांनी फाट्यावर मारणारा) Aवन आजानुकर्ण
1 Jan 2009 - 6:33 pm | आपला अभिजित
आमीरने केलेले लव, लव लव, अव्वल नंबर, तुम मेरे हो, अफसाना प्यार का, जवानी झिंदाबाद, इसी का नाम जिंदगी, दौलत की जंग, परंपरा, दिल हैके मानता ही नही, आतंक ही आतंक, अकेले हम अकेले तुम, गुलाम, मन, मंगल पांडे, फना, राजा हिंदुस्तानी, मेला हे तद्दन बंडल होते. ही १-२ चित्रपटांची यादी नसून (मोजा आता) बरीच मोठी आहे.(यादी विकिपीडियाच्या सौजन्याने)
हे वाईट चित्रपट होते, असं विकिपिडियात म्हटलंय का?
असो.
लव लव लव, अव्वल नंबर, तुम मेरे हो, अफसाना प्यार का, जवानी झिंदाबाद, इसी का नाम जिंदगी, दौलत की जंग, परंपरा वाईट होते नक्की. ते आमिरच्या आधीच्या कारकिर्दीतले होते. तोपर्यंत त्याने मोठे नाव मिळवले नव्हते.
तसं पाहायला गेलं, तर त्याला नाव मिळवून देणारा `दिल'ही भडक, बटबटीतच होता की! (इंद्र्कुमारचा चित्रपट आणि भडक, बटबटीत हे समानार्थी शब्द आहेत!)
`आतंक ही आतंक' तर आमिरने नंतरच्या टप्प्यात केलेला असूनही वाईट होता. त्याहूनही जास्त वाईट वाटलं, त्यानं धर्मेश दर्शनचा तद्दन टुकार, भडक, भीषण `राजा हिंदुस्थानी' केलेला पाहून. त्याच्या वेगळेपणाबद्दलचा आदर नष्ट व्हावा, इतपत भयानक होता तो.
दिल है के मानता नही, अकेले हम अकेले तुम (मन्सूर खान), मन (इंद्रकुमारचा असूनही!) मात्र उत्तम होते. `गुलाम' (विक्रम भट) तर त्याच्या कारकिर्दीला वेळं वळण देणारा महत्त्वाचा चित्रपट मानला जातो!
ही यादी घाईघाईत दिलीत का आजानुकर्णराव?
2 Jan 2009 - 1:15 pm | विजुभाऊ
राख नावाचा त्याच लायकीचा एक चित्रपट होता. त्यात अमिर खान रात्री अपरात्री व्यायाम करत असतो.
ही त्याची मध्यवर्ती कल्पना असावी असे दिग्दर्शकाला वाटले होते
2 Jan 2009 - 6:05 pm | आपला अभिजित
आमीरची गुंड किंवा तत्सम भूमिका होती, एवढंच आठवतंय!
13 Feb 2009 - 9:25 pm | वडापाव
कोणताही चित्रपट मन लावून बघितला तरच आवडतो.
चूका काढण्याच्या उद्देशाने बघितला तर बिक्कारच वाटतो.आपला नम्र,
वडापाव
31 Dec 2008 - 6:57 pm | विसोबा खेचर
खास कोलबेर ष्टाईल परिक्षण! वाचायला मौज वाटली! :)
आमिर अभ्यंकर.
31 Dec 2008 - 7:55 pm | नि३
अकेले हम अकेले तुम, गुलाम,दिल हैके मानता ही नही,फना, राजा हिंदुस्तानी ह्या चित्रपटांना तद्दन बंडल म्हट्ल्यानंतर आपल्याला चित्रपटाबद्द्ल कीती ज्ञान आहे ते लक्षात आलेच..
त्याबद्द्ल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
---नि३.
2 Jan 2009 - 9:19 pm | llपुण्याचे पेशवेll
असहमत...
अकेले हम अकेले तुम तुलनेने चांगला चित्रपट होता. मला तर फार आवडला होता. कदाचित माझ्या सुमार बुद्धीमत्तेमुळे मला तो आवडला असेल.
(मासेस मधला)
पुण्याचे पेशवे
Since 1984
31 Dec 2008 - 8:01 pm | नि३
हे कोलबेर यांनी मान्य केलेच आहे. आमीर हा सर्वात चूझी मानला जातो वगैरे म्हणून. नाही का?
आमिर खानच्या बाबतीत 'नावाजलेला गुरवा देवळात जाउन ***' ह्या म्हणीचा प्रत्यय आलाच होता आता आणखी एक दाखला मिळाला इतकेच.
हे पण त्यांनी मान्य केले नाही का???
तरी सांगितलेच की
खुप काही जे सांगायचे होते पण समजले कि काही फायदा नाही म्हणुन तेवढ्यावरच थांबलो.
(स्पष्टवक्तेपणाची कदर करणारा आणि जे करत नाही त्यांनी फाट्यावर मारणारा) Aवन आजानुकर्ण
तरी वरील प्रतीसाद ...दिला आपण....
असो वाढदिवसाच्या शुभेच्छा..दील्या आहेच आपल्याला....
---(ख्रर्या कलाकाराची कदर करणारा आणी जो नाही करत त्यांना फाट्यावर मारणार) नि३.
31 Dec 2008 - 8:59 pm | सूर्य
एकदम सही परिक्षण. वाट बघतच होतो ;) तरी परिक्षणाची लांबी अजुन हवी होती. जोधा अकबर च्या परिक्षणाची आहे तशी ;)
असो.
माझे दोन पैसे. ;)
गझनीपासुन शिकता येणार्या काही गोष्टी
१. शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला की अंगात प्रचंड शक्ती येते. (आता फॅट लॉस करायचा की मेमरी लॉस या पेचात पडलो आहे ;) )
२. एखादी शिवी दिल्यासारखे किंवा हाक मारल्यासारखे 'अरे शॉर्ट टर्म मेमरी लॉस' असे हिरोला म्हणता येते.
३. बसचे तिकीट सापडले की खुनी शोधुन काढता येतो.
४. बसचा पाठलाग केला की खुनी पुढच्या दाराने पळुन गेला आहे हे लक्षात येत नाही.
अशा बर्याच काही .. १०१ तर निघतीलच. पण सर्वात महत्वाची म्हणजे,
५. अमीर खान चा प्रत्येक चित्रपट डोळे झाकुन बघितला पाहीजे असे नाही.
- सूर्य
3 Jan 2009 - 4:08 am | घाटावरचे भट
>>एखादी शिवी दिल्यासारखे किंवा हाक मारल्यासारखे 'अरे शॉर्ट टर्म मेमरी लॉस' असे हिरोला म्हणता येते.
चुकलात. तो 'शोर्ट टर्म मेमरी लोस' असं म्हणतो.... ;)
31 Dec 2008 - 9:01 pm | प्राजु
आपले हे परिक्षण वाचून मात्र मस्त करमणून झाली. जबरदस्त!
सिनेमा अजून पाहिला नाहिये. पण नक्की पाहणार आहे. कारण आमीर खान हा आवडता हिरो आहे म्हणून.
पण आता तुमचे परिक्षण वाचल्यानंतर या सिनेमातील दृष्य पाहताना तुमची नक्की आठवण होईल. खास करून "गोंदवलेकर महाराज"..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Jan 2009 - 12:55 am | भास्कर केन्डे
प्राजू ताई,
आम्ही हा चित्रपट येथे बघितला. प्रिंट-प्रत चांगली आहे व बफरही पटकन होतो आहे.
कोलबेरांचे चित्रपरिक्षण मस्तच.
आपला,
(चोखंदळ) भास्कर
माझी चित्रपट अनुदिनी येथे आहे...
2 Jan 2009 - 4:18 am | चतुरंग
काही व्हायरस्/तत्सम सॉफ्टवेअर असावे कारण माझ्या लॅपटॉपवरच्या कास्परस्काय अँटीवायरसने 'मॅलीशियस सॉफ्टवेअर' असा धोक्याचा संदेश दिला आणि साईट ब्लॉक केली.
तेव्हा इथून चित्रपट बघताना जपून.
चतुरंग
1 Jan 2009 - 1:01 am | एक
आवडला नाही.. आणि ही शाब्दिक कोटी अनाठायी वाटली..
त्यामुळे पुढ्चं परिक्षण वाचवलं नाही.
बाकी पिक्चर आजच बघणार आहेच तेव्हा कळेलच कसा आहे ते.
1 Jan 2009 - 2:26 pm | अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
1 Jan 2009 - 1:19 am | पक्या
सिनेमात अनेक अतर्क्य गोष्टी असल्या तरी आमिर ने अक्टिंग मात्र जबरा केली आहे. बॉडी तर काय कमावली आहे !
'उंचीत मार खाल्ला' तरी बॉडी कमावून रूबाबदार दिसणे हे आमीर ने साध्य केले आहे. ८ पॅक बॉडी कमावणे हे काही येर्यागबाळ्याचे काम नव्हे. आमिरच्या चिकाटीचे आणि मेहनतीचे कौतुक. सिनेमा तितकासा रूचला नसला तरी आमिर ला वेगळ्या गेटप मध्ये बघायला आवडले.
'तू मेरी अधूरी प्यास प्यास है ' हे (एवढे एकच) गाणे आवडले.
>>बाकी पिक्चर आजच बघणार आहेच तेव्हा कळेलच कसा आहे ते.
नक्की बघा एकराव. आमिर साठी एकदा बघायला काही हरकत नाही.
2 Jan 2009 - 2:27 pm | राघव
परिक्षण खरोखर आवडले होते.
पण "गोंदवलेकर महाराज" हा अनावश्यक शब्दच्छल आघात करून गेला. पुढचे वाचण्यात रसच राहिला नाही.
शाब्दिक कोटी करतांना महाराजांना कशाला हो मधे घालता. त्यांनी तुमचे किंवा कुणाचेच असे काय बिघडवलेले आहे की त्यांचा असा उल्लेख तुम्ही करावा.
दुसरे काही सुचत नसेल तर निदान असले तरी काही लिहू नका.
2 Jan 2009 - 3:02 pm | विसोबा खेचर
मुमुक्षुरावांचा मुद्दा नक्कीच पटण्याजोगा आहे..
तात्या.
2 Jan 2009 - 3:43 pm | शंकरराव
हम्म
आम्ही बुवा बाबा महराज ह्यांच्या भोंदुगिरीला फाट्यावर मारतो...
2 Jan 2009 - 5:59 pm | लिखाळ
आम्ही सुद्धा !
आम्ही भोंदू नसलेल्या संतांचा आदर राखतो.
गोंदवलेकर महाराजांच्या बाबतच्या मुमुक्षुच्या मताशी सहमत.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
2 Jan 2009 - 10:53 pm | एक
मला वाटलं की मी एकटाच आहे कि काय?
2 Jan 2009 - 9:15 pm | सुचेल तसं
१) आमीर आणि असीनची केमिस्ट्री झकास जमली आहे. (असीनला पाहिल्यावर वाटलं की तिच्यासारखीला मारल्यावर कोणीही वेडापिसा होऊन बदला घेऊ शकतो. १ नं. वाटली ती ह्या सिनेमात)
२) मेमेंटो अजुन पाहिला नसल्यामुळे तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.
३) गाणी बरी वाटली (अर्थात, रेहेमानचा नेहेमीचा टच जाणवला नाही)
४) नेहेमीच्या हिंदी सिनेमापेक्षा वेगळी वाटली स्टोरी...
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
2 Jan 2009 - 9:44 pm | धनंजय
स्मृती (आणि अतीतच) ही तथ्यात्मक की भामक? हा तत्त्वज्ञानातला एक मोठा प्रश्न.
एखाद्या क्लिष्ट प्रश्नापासून सुंदर कलाकृती निर्माण होऊ शकते - "आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है बस यही इक पल है" या शब्दांना दिलेले सुंदर संगीत हेच साधते.
अशाच प्रकारे "गजिनी"मध्ये भन्नाट करमणूक करणारी चित्र-कथा निर्माण करणे शक्य होते. परीक्षण वाचून असे वाटते, की चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकांनी ही संधी वाया घालवली...
धन्यवाद कोलबेर. कोणी फुकट दाखवला तर हा चित्रपट नक्की बघीन.
2 Jan 2009 - 9:49 pm | लिखाळ
अक्षरशः सहमत.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
2 Jan 2009 - 9:56 pm | धनंजय
अवांतर : काही लोक कंबरपट्टा इतका उंच बांधतात, की आयुष्यात कमरेखालचे वार त्यांना फार सहन करावे लागतात.
गावच्या रेड्याबद्दल ज्ञानेश्वराच्या वेद वदवल्याची कोटी कित्येकांनी केली असेल - बहुधा अशा प्रकारची कोटी "पाळीव प्राणी" मध्ये पु ल देशपांडे यांनी केलेली आहे. त्या विनोदात बहुधा प्राण्याच्या मालकांचा स्पष्ट उपहास आहे. पण त्या कोटीने ज्ञानेश्वरांचे कार्य कमी होत नाही. इतकेच काय खुद्द ज्ञानेश्वरांचा कणभरही अपमान पु ल देशपांडे करत नाहीत, असे मला वाटते. पण कंबरपट्टा गळ्याशी बांधलेल्या एखाद्याला आपल्या श्रद्धेविरुद्ध कमरेखालचा वार वाटेल. असे वाटू नये. तसेच गोंदवलेकर महाराजांबाबत.
("कंबरपट्टा फार उंच बांधणे/कमरेखालचा वार" हा दाखला पु लंचाच आहे.)
2 Jan 2009 - 10:31 pm | लिखाळ
सहमत आहे.
अनेकदा काय बोलले या पेक्षा कोण बोलले आणि का बोलले याकडे आपले लक्ष पटकन जाते. काळ सोकावू नये म्हणून (असे उल्लेख पुन्हा पुन्हा होऊ नयेत म्हणून) आपण लगेच प्रत्युत्तर देतो. आपल्या उदाहरणातला रेड्याचा उल्लेख आणि इथे महाराजांचा उल्लेख निराळ्या तर्हेचे वाटतात.
एका चर्चेत त्यांचे नाव आल्या आल्या इकडे वेगळ्या धाटणीचा उल्लेख आल्याने प्रतिक्रिया वेगळ्या झाल्या असतील. असो.
आता कफनी वापरावी असा विचार आहे. :)
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
कंबरपट्टा सोडा घट्ट पँट वापरा.
2 Jan 2009 - 10:34 pm | अवलिया
संपुर्णपणे सहमत
अवांतर - आमच्यात कंबरपट्टा पायातच बांधतात. त्यामुळे नो टेन्शन.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
2 Jan 2009 - 11:10 pm | एक
"..कंबरपट्टा गळ्याशी बांधलेल्या एखाद्याला आपल्या श्रद्धेविरुद्ध कमरेखालचा वार वाटेल. असे वाटू नये. तसेच गोंदवलेकर महाराजांब"....."
आपण सल्ला वगैरे देत आहात का? तर थँक्स मला त्याची गरज नाही.
कोलबेरने त्याला हव्या त्या कोट्या कराव्यात. मी कुठे आडवतो आहे.
मी कोणालाही विरोध केला नाही. कोलबेरला "असं लिहू नये" असे सल्ले पण दिले नाहीत. मी त्याच्या लेखन स्वातंत्र्याचा आदर करतो.
व्यक्तिशः मला ती कोटी खटकली, अतिशय फालतू आणि अस्थानी वाटली म्हणून ती कॉमेंट मी लिहिली.
आता मला काय खटकावं आणि काय नाही हे सुद्धा इतर लोकं ठरवणार आहेत काय?
बाय द वे, पु. लं. ची ती कोटी माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक अशी आहे.
"ज्ञानेश्वरांनी एकट्या रेड्याला वेद शिकवले असल्यामुळे, म्हशी भाव-बिव खात नव्हत्या. दूध वगैरे व्यवस्थीत देत होत्या.."
ही कोटी ज्ञानेश्वरांवर तर नक्कीच टारगेट केलेली नाही. त्यामुळे तुम्ही हयाच कोटीचा रेफरन्स दिला असेल तर मला तो चुकीचा वाटत आहे.
कोलबेर ची कोटी.. आमिरखानचं गोंदणं ==> गोंदवलेकर महाराज..
अशी शाब्दिक"ईनोदी" टाईपची वाटली..
2 Jan 2009 - 10:59 pm | संदीप चित्रे
पण आमिर खान आणि असीनची कामं आवडली.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
2 Jan 2009 - 11:19 pm | दवबिन्दु
गोंदवलेकर महाराज मद्धिल व काडा आनी गोंदलेकर लिवा.
3 Jan 2009 - 11:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नकारात्मक समीक्षेचे उत्तम उदाहरण म्हणजे वरील समिक्षा म्हणावी लागेल !
'गझनी' चित्रपट पाहतांना आम्हाला करमणूक महत्वाची वाटली आणि चित्रपट करमणूक करतो असे वाटले. प्रेक्षक चित्रपट का पहातो ? या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे. मला वाटतं त्याचा पहिला उद्देश हा करमणूकीचा असावा. चित्रपटातील कथा प्रेम याच विषयाभोवती फिरवतांना उत्तरार्धात नायकाला विस्मृतीचा दिलेला टच अनेकांना आवडेल. शेवट लैच रद्दी आहे हे मान्य.
( सिंघानिया म्हणून 'कल्पनाला' ओळखू न येणे, टिकिटावरुन माग काढणे, आणि काही दृष्य आता मसाल्याचे भाग आहेत. असे भंकस प्रसंग अनेक चित्रपटात असतात ) आता चित्रपटातून उपदेश,कलात्मकता,सामाजिक आशय, दिग्दर्शकाची कमाल, या किंवा आणखी कोणत्या गूणवैशिष्ट्यावरुन चित्रपट चांगला ठरवला पाहिजे त्याबद्दल मला माहिती नाही. पण वरील समीक्षेत त्याचा कुठेही विचार दिसला नाही किंवा चित्रपट फसतो कुठे त्याचीही मांडणी परिक्षणात दिसली नाही. चित्रपट भिकार ठरवत असतांना त्याची काहीएक तुलना कशाशी तरी असावी, चित्रपटाचे गूण-वैशिष्टे ठरवले पाहिजेत,त्यावरुन 'गझनी"चे यश-अपयश ठरवावे इतकेच सांगण्यासाठी हा प्रपंच.
असो, चित्रपट एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे !!!
-दिलीप बिरुटे
4 Jan 2009 - 1:15 am | कोलबेर
सर्वप्रथम सर्व वाचकांचे आभार!
१) गोंदवलेकर महाराज उल्लेख : दारू पिउन टुल्ल झालेल्याला 'डोलकर' आणि तितकी न चढलेल्याला 'सावरकर' म्हणतात. इथे सावरकरांची खिल्ली उडवली जाते असे मला वाटत नाही. अर्थात ज्यांना वाटत असेल त्यांना तसे वाटण्याचा आणि निषेध नोंदवण्याचा अधिकार आहे हे मान्य.
२) श्री. नि३ साहेब, तुमच्या लाडक्या अमीर खानच्याच चित्रपटातील एक डायलॉग देतो आहे: " क्यु सिर्फ तेरा राजकमल है इसलिए सडेला पिक्चर भी अच्छा बन जायेगा क्या? अपुन पब्लिक है पब्लिक! जो पिच्चर देखके पैसा वसुल नही हुवा उसका डब्बा गुल" चित्रपट रंगीला.
३) बिरुटे मास्तर : चित्रपट (मला) भिकार का वाटला ह्याची पुरेशी ठळक कारणे मी दिलेली आहेत. त्यापेक्षा खोलात जाउन समीक्षा करण्याइतका महत्वाचा हा चित्रपट मलातरी वाटला नाही.
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद!
-कोलबेर
4 Jan 2009 - 9:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रपट भिकार वाटावा याची पुरेशी कारणे मला तरी वरील लेखनात दिसली नाही. खोलात जाऊन समीक्षा केली असती तर चित्रपटाचे काही भले पैलू आपल्याला मांडता आले असते असे वाटले. असो, आपल्या परिक्षणामुळे चित्रपट पाहावा वाटला याचे श्रेय मात्र आपल्या लेखनाला देतो. :)
बहेका मै बहेका वो बहेखी हवासी आये......मस्तच !
13 Feb 2009 - 5:07 pm | अभिज्ञ
कोलबेर ह्यांच्या परिक्षणाशी १००% सहमत.
एक शंका
"अमीरच्या छातीवर "कल्पना इज किल्ड" हे वाक्य उलट्या क्रमात कोणी लिहिले ?"
चित्रपटात त्याचा कुठे उल्लेख आल्याचे स्मरत नाहि.
हा अतिटुकार चित्रपट पाहून माझी स्मरणशक्ती काहि वेळ काम करीत नव्हती त्यामुळे देखील मला आठवत नसावे.
कोणाला माहिती आहे काय?
अभिज्ञ.
13 Feb 2009 - 5:10 pm | ब्रिटिश टिंग्या
>> "अमीरच्या छातीवर "कल्पना इज किल्ड" हे वाक्य उलट्या क्रमात कोणी लिहिले ?"
माझ्यामते "कल्पना वॉज किल्ड" असं लिहीलं होतं ;)
- (सुधारक) टिंग्यालाडु
14 Feb 2009 - 7:54 am | नि३
. नि३ साहेब, तुमच्या लाडक्या अमीर खानच्याच चित्रपटातील एक डायलॉग देतो आहे: " क्यु सिर्फ तेरा राजकमल है इसलिए सडेला पिक्चर भी अच्छा बन जायेगा क्या? अपुन पब्लिक है पब्लिक! जो पिच्चर देखके पैसा वसुल नही हुवा उसका डब्बा गुल" चित्रपट रंगीला.
कोलबेर साहेब वही सडेला पिक्चर आज बॉलीवुड की टॉप ५ मे गिना जाता है ( in terms of money earned on box office).
२३० कऱोड नेट प्रॉफीट आतापर्यत ...
आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर पब्लीक ला हा चित्रपट ईतकाच टूकार वाट्ला असेल तर ह्या चित्रपटाला एवढे यश कसे मिळाले असेल बुवा??? तुम्हाला आवड्ला नाही म्हणुन स्वताला संपुर्ण पब्लीक नका समजु आणी ऊगाच पब्लीक च नाव खराब नका करु.
ईथे पहा . www.boxofficeindia.com
(आमिर खान चा लाडका)
---नि३.
14 Feb 2009 - 8:31 am | त्रास
दुर्देवाने तुमच्या समीक्षेत अमीर त्या रोल साठी घेतलेल्या कष्टांचा काहीच उल्लेख नाही. समीक्षा ही नकारत्मक केली म्हणजे चांगली असे नव्हे.
गजनी चांगला की वाईट ह्या फंदात मला पडायचे नाही. मला जर हिंदी पिक्चर बघायचा असेल तर मी डोके घरी ठेउन फक्त "करमणूक" म्हणून जातो; तो माझा निर्णय असतो व माझा हेतु फक्त मजा करणे एव्हढा असतो. त्यामुळे त्रास होत नाही.
ठिकाय, गजनी वर मध्यंतरी एक पी. जे. आला होता- गजनी- हत्तीचा गुढगा.
14 Feb 2009 - 11:37 am | नितिन थत्ते
कोलबेर यांची समीक्षा चित्रपटाचा विषय, त्याची मांडणी आणि त्या मांडणीची परिणामकारकता याविषयी आहे.
या कारणांमुळे त्यांनी तो चित्रपट चांगला नाही असे म्हटले आहे.
ज्यांना तरीही तो आवडला त्यांनी कोलबेर आपल्याला मूर्ख म्हणत आहेत अशा समजुतीने त्यांच्यावर टीका केलेली दिसते.
जे करमणूक म्हणून आणि डोके घरी ठेवून चित्रपटाला जातात त्यांना कोणताही चित्रपट आवडून घेण्याचा हक्क आहेच. कोलबेर यांनी त्यावर काही आक्षेप घेतलेले नाहीत.
परंतु हिरोने चित्रपटासाठी मेहनत घेतली, बॉडी बनवली, चकोट केला, मिशा वाढवल्या, गोंदवून घेतले वगैरे गोष्टी चित्रपटाची हवा निर्माण करण्यास उपयोगी असल्या तरी त्यावरून चित्रपटाचा दर्जा ठरवू नये. (ठाकूरची भूमिका उत्तम वठवण्यासाठी संजीवकुमारला हात तोडून घ्यावे लागले नव्हते). तसेही गजनी या व्हिलनचा सूड घेण्यासाठी ८ पॅक ऍब आणि बलदंड शरीर असण्याची आवश्यकता होतीच असे नाही.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
14 Feb 2009 - 12:57 pm | नि३
ज्यांना तरीही तो आवडला त्यांनी कोलबेर आपल्याला मूर्ख म्हणत आहेत अशा समजुतीने त्यांच्यावर टीका केलेली दिसते.
आम्हाला चांगले चित्रपटच आवडतात तुम्ही कोण ते तरीही आवडला म्हणनारे आणी कोलबेर आम्हाला मूर्ख म्हणत आहेत अशा समजुतीने त्यांच्यावर आम्ही टीका केली नाही तर आम्ही तुम्हाला मूर्ख समजुन तुमच्यावर टीका करत आहोत.
परंतु हिरोने चित्रपटासाठी मेहनत घेतली, बॉडी बनवली, चकोट केला, मिशा वाढवल्या, गोंदवून घेतले वगैरे गोष्टी चित्रपटाची हवा निर्माण करण्यास उपयोगी असल्या तरी त्यावरून चित्रपटाचा दर्जा ठरवू नये.
हवा निर्माण केली हो म्हणुन काय त्याने घेतलेली मेहनत व्यर्थ ??? आणी का म्हणुन नाही करणार हवा निर्माण एक वर्ष कठोर मेहनत केली त्याने . त्याने रीलीज केलेला व्हीडीओ ( you tube वर आमीर खान टाईप करा) पहा त्यात त्याने दाखवलेले आहेच की त्याने कशी बॉडी बनवली ती.
ठाकूरची भूमिका उत्तम वठवण्यासाठी संजीवकुमारला हात तोडून घ्यावे लागले नव्हते
अश्या वाक्यावर हसुपण येत नाही पुन्हा एकदा वाचत चला आपण काय लिहले आहे ते. कश्या सोबत काय कंपेयर करायचे ???
तसेही गजनी या व्हिलनचा सूड घेण्यासाठी ८ पॅक ऍब आणि बलदंड शरीर असण्याची आवश्यकता होतीच असे नाही.
बर झाले तुम्ही डायरेक्टर नव्हता ते.
( खर्या कलाकाराची ( स्टार ची नव्हे) कदर करणारा)
---नि३.